कोबी व फूल कोबी लागवड मराठी माहिती ( Fulkobi Patta Kobi Lagvad Marathi Mahiti )

कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे 7000 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या पिकांमध्‍ये फॉस्‍फरस, पोटॅशियम, सल्‍फर, चुना, सोडीयम, लोह ही खनिज द्रव्‍ये असून अ ब क ही जीवनसत्‍वे मुबलक प्रमाणात असतात. त्‍यामुळे या भाजीपाला पिकांना आहारात महत्‍व आहे.

हवामान

या पिकांना हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते. फूलकोबीच्‍या जाती तापमानाच्‍या बाबतीत अधिक संवेदनशील असल्‍यामुळे त्‍यांची निवड त्‍या त्‍या हवामानाच्‍या गरजेनुसार करावी.

जमीन

रेताड ते मध्‍यम काळी निच-याची जमीन या पिकास लागवडीस योग्‍य आहे. जमिनीचा सामु 5.5 ते 6.6 च्‍या दरम्‍यान असावा.

पूर्वमशागत

जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भुसभुशित करावी. जमिनीत20 ते 30 टन हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे. जमीनी सपाट करून या भाज्‍यांच्‍या लवकर व उशिरा येणा-या जातींच्‍या लागवडीस अनुसरून अनुक्रमे 45 व 60 सेमी अंतरावर स-या तयार करून घ्‍याव्‍यात. कोबी या पिकाची लागवड सपाट वाफयावर सुध्‍दा केली जाते. त्‍याकरिता जमिनीच्‍या उताराप्रमाणे योग्‍य अंतरावर वाफे तयार करावेत.

लागवडीचा हंगाम –

या पिकांची लागवड सप्‍टेबर, आक्‍टोबर महिन्‍यात करतात.

बियाण्‍याचे प्रमाण

हेक्‍टरी 0.600 ते 0.750 किलो बियाणे लागते. पेरणीपुर्वी बी गरम पाण्‍यात 50 अंश सेल्सिअस तापमानास अर्धा तास किंवा स्‍ट्रेप्‍टोसायक्‍लीन च्‍या 100 पीपीएम द्रावणात 2 तास बुडवावे. व नंतर बी सावलीत सुकवावे.

लागवड

या पिकाची रोपे गादी वाफयावर तयार करतात. वाफयाच्‍या रूंदीस समांतर 12  ते 15 सेमी अंतरावर रेषा ओढून बियाणे पातळ पेरावे व बियाणे मातीने अलगद झाकावे.

बियांची उगवण होईपर्यंत झारने पाणी द्यावे. बी पेरल्‍यापासून 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीस तयार होतात. लागवडीपूर्वी सरी वरंबे अथवा वाफे यांना खतांचा मात्रा द्यावी. लवकर येणा-या जातींकरीता 45 बाय 45 सेमी वर तर उशिरा येणा-या जातींना 45 बाय 60 सेमी किंवा 60 बाय 60 सेमी अंतरावर लागवड करावी. रोपांची लागवड करण्‍यापूर्वी रोपे 10 लिटर पाण्‍यात 36 इसी मोनोक्रोटोफॉस टाकून या द्रावणात बुडवून घ्‍यावी.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

कोबी पिकास लागवडीपूर्व 80 किलो नत्र 80 किलो स्‍फूरद व 80 किलो पालाश द्यावे व लागवडीनंतर 1 महिन्‍याने 80 किलोचा नत्राचा दुसरा हप्‍ता द्यावा. तसेच फुलकोबीसाठी 75 किलो नत्र 75 किलो स्‍फूरद आणि 75 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्‍याने 75 किलो नत्राचा दुसरा हप्‍ता द्यावा.

लागवडीनंतर तिस-या दिवशी आाणि नंतर पुरेसा ओलावा राहील. अशा अंतराने जमिनीचा मगदूर पाहून पाण्‍याचा पाळया द्याव्‍यात. कोबी व फूलकोबीचे गडडे निघू लागल्‍यापासून गडडयांची वाढ होईपर्यंत भरपूर पाणी द्यावे व नंतर हलकेसे पाणी द्यावे.

आंतरमशागत

शेत 2 ते 3 खुरपण्‍या देऊन तणविरहीत करावे. खुरपणी करताना रोपांच्‍या बुंध्‍याशी मातीचा आधार द्यावा म्‍हणजे रोपे कोलमडत नाही व रोपांची वाढ चांगली होते. फूलकोबीच्‍या गडडयांची पांढरी शुभ्र प्रतीक्षा तयार होण्‍याकरिता गडडे काढणीपूर्वी 1 आठवडाभर गडडयाच्‍या आतील पानांची झाकून घ्‍यावे. त्‍यामुळे सूर्यप्रकाशामुळे होणारी हानी टाळली जाते.

किड व रोग

कोबीवर्गीय भाज्‍यांना मावा तुडतुडे फूलकिडे कोबीवरील अळी कॅबेज बटर फलाय असे विविध किडींचा तसेच ब्‍लॅक लेग, क्‍लब रूट, घाण्‍या रोग, रोपे कोलमडणे, लिफ स्‍पॉट या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

किडींच्‍या बदोबस्‍तासाठी रोपवाटीकेतीील रोपांपासून ते लागण झालेल्‍या भाज्‍यांवर एन्‍डोसल्‍फान 35 सीसी 290 मिली किंवा फॉस्‍फोमिडॉन 85 डब्‍ल्‍यू एस सी 60 मिली किंवा मॅलेथिऑन 50 सीसी 250 मिली 250 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारावे. किडी व रोगाचे एकत्रितरित्‍या नियंत्रण करण्‍यासाठी मॅलॅथिऑन 50 सीसी 500 मिली अधिक कॉपर ऑक्‍झक्‍लोराईड 50 डब्‍ल्‍यूपी 1050 ग्रॅम् किंवा डायथेम एम 45, 500  लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. वरील किटक नाशकांच्‍या 2 ते 3 फवारण्‍या 10 ते 12 दिवसांच्‍या अंतराने कराव्‍यात.

कोबी खत आणि फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण कोबीचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती पाहणार आहोत.यामध्ये ड्रिपद्वारे कोबीचे खत व्यवस्थापन आणि फवारणी द्वारे आपण कोबीचे व्यवस्थापनाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी कोणते औषध/खत कोबी साठी योग्य ठरणार आहे, कोणते औषध/ खत कधी द्यावे आणि त्याच्या वेळा कोणत्या असणार आहेत हे पाहणार आहोत.यानुसार जर तुम्ही कोबी पिकासाठी नियोजन केले, तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे आणि उत्पादनात नक्कीच तुम्हाला वाढ दिसून येणार आहे . हे वेळापत्रक टेस्टेड आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ड्रिप द्वारे कोबीचे खत व्यवस्थापन कसे करायचे आणि ड्रिपद्वारे कोणत्या दिवशी कोणते औषध फवारायचे आणि त्याच्या किती फवारण्या करायचा. तसेच खत व्यवस्थापन कसे करायचे.

कोबी खत व्यवस्थापन वेळापत्रक –

  • १. कोबी पिकाच्या लागवडीनंतरच्या पाचव्या दिवशी ड्रीपच्या साहाय्याने ह्युमिस्टार WG (४०० ग्रॅम ), इनटेक (५०० मिली),किश रूट हेल्थ (१४ ग्रॅम) प्रती एकर या प्रमाणात लागवडीनंतर खत ड्रीपने द्यावे.
  • २. कोबी लागवडीनंतरच्या आठव्या दिवशी बासाफर प्लस (५०० ग्रॅम) या प्रमाणात प्रति एकर खत ड्रीपने द्यावे.
  • ३.तिसरी फवारणी ही १० व्या दिवशी करावी. या फवारणी मध्ये नोव्हाटेक N-२१ (२.५० किलो) आणि सिलॉन (५०० मिली) एवढ्या प्रमाणात ड्रीपच्या साहाय्याने खत कोबी पिकासाठी ड्रीपने पुरवावे.
  • ४.कोबी पिकाची चवथी फवारणी २० व्या दिवशी करायची आहे. त्यासाठी न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६ (२.५ किलो) ,बासफोलियर केल्प SL (५०० मिली) या प्रमाणात प्रती एकर ड्रीप च्या साहाय्याने कोबीला खत द्यावे.
  • ५. त्यानंतर पाचव्या फवारणीसाठी हायड्रोस्पीड CaB(२.५० किलो), सिलॉन(५०० मिली) या प्रमाणात प्रती एकर ड्रीपच्या सहाय्याने लागवडीनंतर २५ व्या दिवशी कोबीला खत द्यावे.
  • ६. कोबीच्या लागवडीनंतर ३० व्या दिवशी नोव्हाटेक १४:४८ (२.५ किलो) या प्रमाणात प्रती एकर ड्रीपने खत द्यावे.
  • ७. त्यानंतर कोबीची सातवी फवारणी ४० व्या दिवशी करावी.त्या फवारणीसाठी न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७:०० (२.५० किलो), ह्युमिस्टार WG (४०० ग्रॅम), इनटेक (५००मिली) या प्रमाणात प्रती एकर कोबीला देण्यात यावे.
  • ८. त्यानंतची आठवी फवारणी ही कोबी लागवडीनंतरच्या ५० व्या दिवशी करावी. त्यासाठी नोव्हाटेक १४:४८ (२.५० किलो) हे प्रति एकर या प्रमाणात ड्रीप च्या साहाय्याने पिकाला द्यावे.
  • ९. त्यानंतर जी फवारणी कराची त्यासाठी नोव्हाटेक १४:८:३० (२.५ किलो) प्रती एकर या प्रमाणात कोबी लागवडीच्या ६० व्या दिवशी ड्रिप ने द्यावे.
  • १०. शेवटचे खत हे कोबी लागवडीच्या ७० व्या दिवशी द्यावे. त्यामध्ये न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०:७:४६ (२.५ किलो) प्रति एकर या प्रमाणात ड्रीप ने द्यावे. 

कोबी फवारणी वेळापत्रक –

  • १. कोबीची लागवड केल्यानंतर पहिली फवारणी ही १५ व्या दिवशी करण्यात यावी. त्यासाठी फोल्युर S (२ मिली),न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७.० (२.५ ग्रॅम ) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी.
  • २. त्यानंतर कोबीची दुसरी फवारणी ही लागवडीनंतर २५ व्या दिवशी करावी. त्यासाठी फोल्युर S (२ मिली),न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७.० प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • ३. तिसरी फवारणी ही लागवडीनंतरच्या ३५ व्या दिवशी करण्यात यावी आणि त्यासाठी बासफोलीअर कव्हर (२ मिली) आणि बासफोलीअर बोरो (०.५० मिली) या प्रमाणात प्रति लिटर पाण्यात मिसळून ही फवारणी करण्यात यावी.
  • ४. कोबी पिकाची चौथी फवारणी लागवडीनंतर च्या ४५ व्या दिवशी करावी आणि त्यासाठी बासफोलीअर कव्हर (२ मिली) आणि बासफोलीअर बोरो (०.५० मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून ही फवारणी करावी.
  • ५. त्यानंतर पाचव्या फवारणीसाठी ऑमिफॉल (२.५ मिली), सिलॉन (२ मिली) हे प्रति लिटर पाण्यात मिसळून ५५ व्या दिवशी फवारणीद्वारे कोबीला द्यावे.
  • ६. त्यानंतर ची फवारणी ही ६० व्या दिवशी करावी. ही सहावी फवारणी ही पाचव्या फवारणीप्रमाणे करावी.
  • ७. कोबी लागवडीनंतरच्या ७० व्या दिवशी कोबीची शेवटची फवारणी म्हणजेच ही सातवी फवारणी असणार आहे, त्यासाठी न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६ (२.५ किलो),बासफोलीअर बोरो (०.५० मिली) हे प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मित्रांनो लक्षात घ्या या फवारणी आणि खत व्यवस्थापन, फळ आणि फवारणी व्यवस्थापन हे आपापल्या जमिनीचे माती परीक्षण करून त्याचा दर्जा तपासून पहा आणि नंतरच जमिनीच्या दर्जाप्रमाणे अशाप्रकारे फवारणी आणि खत व्यवस्थापन कोबी साठी करा,नक्कीच तुम्हाला चांगले उत्पादन मिळेल.

काढणी व उत्‍पादन

जातीपरत्‍वे कोबी 2ण्‍5 ते 3 महिन्‍यात तयार होतो. तयार गडडा हातास टणक लागतो. तयार गडडा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्‍यावर तो फूटून नुकसान होण्‍याचा संभव असतो. म्‍हणून तो वेळीच काढून घ्‍यावा. फूलकोबी चा गडडा पिवळसर पडण्‍यापूर्वी काढावा.

कोबीचे 200 ते 250 क्विंटल तर फूलकोबीचे 100 ते 200 क्विंटल हेक्‍टरी उत्‍पादन घेता येते.

वीस गुंठे जमिनीत दहा टन कोबीचे पीक

कर्जत तालुक्यात अनेक प्रगतशील शेतकरी विविध प्रयोग करून पिके घेण्याचा प्रयत्न करतात.

कर्जत तालुक्यात अनेक प्रगतशील शेतकरी विविध प्रयोग करून पिके घेण्याचा प्रयत्न करतात. कुणी टोमॅटो, कुणी वांगी, भेंडी, त्याचबरोबर भुईमूग, किलगड आदींची भरघोस पिके घेतात. आयुष्यभर भात पीक घेणारे शेतकरी परिस्थितीनुरूप पिके घेण्यास सरसावले आहेत. वदप गावातील अशाच एका शेतकऱ्याने परंपरागत भात पिकाऐवजी विविध पिके घेण्याचे निश्चित केले आणि त्याने केवळ वीस गुंठे जमिनीतून सुमारे दहा टन कोबीचे पीक काढण्याची तयारी केली आहे. येत्या दहा-बारा दिवसांत हे पीक तयार होत असून याचा हा प्रयोग दृष्ट लागण्यासारखा आहे.
भात शेती हा आतबट्टय़ाचा व्यवहार आहे. त्यामध्ये नेहमीच तोटा होतो असा सर्वसाधारण समज आहे. कर्जत तालुक्याच्या काही भागांत उन्हाळी मिळणाऱ्या पाण्यामुळे दुबार भात पीक घेतले जाते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे डबल नुकसान होते, असा त्याचा अर्थ होतो. मात्र केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी काही शेतकारी भात पीक घेतात. जमीन ओसाड ठेवत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून राजनाला कालव्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शेतीसाठी पाणी सोडले नसल्याने तेथील शेतकरी उन्हाळी भात पीक घेत नाहीत. पहिल्या वर्षी पाण्यासाठी आरडाओरडा करणाऱ्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या वर्षी कडधान्याचे पीक घेतले आणि त्यांना पिकाचा पर्याय मिळाला. अशाच एका शेतकऱ्याने आपल्या शेतावर विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली व आयुष्यभर फक्त भात पीकच आपल्या जमिनीत होते, घाटावरची किंवा अन्य पिके होत नाहीत हा गरसमज दूर केला. तालुक्यातील वदप गावातील विनय मारुती वेखंडे यांनी आपल्या केवळ अर्धा एकर जमिनीत कोबीची लागवड करून दहा टन पीक काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
विनय वेखंडे यांनी या पिकाचे फायद्याचे गणित मांडतांना ‘अर्धा एकर जमिनीवर २५ नोव्हेंबर २०१५ रोजी ७० ते ८० दिवसांत तयार होणाऱ्या सेंट जातीच्या कोबीची बारा हजार रुपयांची बारा हजार रोपे आपल्या जमिनीवर लावली. त्यासाठी त्यांनी पूर्वी वापरलेलाच माल्चीन पेपर वापरला. लागवडीपूर्वी पन्नास किलो सुफला १५:१५:१५ किंमत ९५० रुपये, तीन ट्रॅक्टर शेणखत- किंमत चार हजार रुपये व लागवड मजुरी १२०० रुपये. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे एक किलो १९:१९:१९ दिवसाआड दहा वेळा खर्च १६०० रुपये, पंचेचाळीस दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे ००:५२: ३४ एक किलो दिवसाआड चार वेळा खर्च ८०० रुपये, पंचावन्न दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारेच ००:००: ५० एक दिवस आड पाच वेळा खर्च ५०० रुपये अशी खतांची मात्रा दिली. किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास एक महिन्यापर्यंत क्लोरपायरी फॉस पन्नास टक्के आणि सायपर मेथ्रीस पाच टक्के दोन मिली प्रति लिटर अशी फवारणी केली. त्याकरिता २०० रुपये खर्च अपेक्षित धरला.
एक महिन्यानंतर किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास स्पिनोसॅड ७५ मिली दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली. त्या साठी १२५० रुपये खर्च. त्यानंतर दहा दिवसांनी पुन्हा कीड आढळल्यास इंडोक्झाकार्ब एक मिली एक लिटर पाण्यात याप्रमाणे फवारणी केली- त्याचा खर्च ८०० रुपये. तणनाशकाकरिता लागवडीपूर्वी दोस्त सुपर चार मिली एक लिटर पाण्यातून फवारले. २५ दिवसांनंतर एजील १.५ मिली फवारणी खर्च २५० रुपये, मजुरी १२०० रुपये, ठिबक सिंचन पाच हजार रुपयांचे व वाहतूक खर्च ४००० रुपये असा एकूण २५ हजार ७०० रुपये खर्च झाला. आठ-दहा दिवसानंतर पीक होईल ९.६ टन. घाऊक दर नऊ रुपये प्रति किलो असला तरी ८६ हजार ४०० रुपये मिळतात, म्हणजे ६० हजार रुपये नफा अपेक्षित आहे, असे सांगून मला या पिकासाठी सुहास अ‍ॅग्रो ट्रेडर्स, प्रगतशील शेतकरी बाळ दळवी व पंचायत समितीतील चिंचोळे व घायले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, असे विनय वेखंड यांनी नम्रपणे सांगितले.

हरभरा सुधारीत वाण हरभरा सुधारित जाती ( Harbhara Sudharit Vaan Jaati)

हरभरा
✨सुधारीत वाण
वाण: कालावधी (दिवस): सरासरी उत्पादन (क्विं/हे): वैशिष्टये
👉विजय: जिरायत ८५-९०, बागायत १०५-११०: जिरायत १४, बागायत २३: अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम
👉विशाल: ११०-११५: जिरायत १३, बागायत २०: आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
👉दिग्विजय: जिरायत ९०-९५, बागायत १०५-११०: जिरायत १४, बागायत २३: पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य
👉विराट: ११०-११५: जिरायत ११, बागायत १९: काबुली वाण, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
👉कृपा: १०५-११०: बागायत १८: जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण, दाणे सफेद रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव
👉फुले विक्रांत: १०५-११०: बागायत २२: मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीस योग्य
👉फुले विक्रम: जिरायत ९५-१००, बागायत १०५-११०: जिरायत १६, बागायत २२, उशिरा पेरणी १६: यांत्रिक काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य
👉पीकेव्हीके-२: ११०-११५: बागायत १६-१८: जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
👉पीकेव्हीके-४: १०५-११०: बागायत १२-१५: जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
👉बीडीएनजी-७९७: १००-१०५: जिरायत १५-१६: मध्यम दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित
👉बीडीएनजीके-७९८: ११०-११५: बागायत १६-१८: काबुली उभट पसरणारा वाण, मध्यम आकाराचे दाणे, मररोग व खुजारोगास मध्यम प्रतिकारक
👉पीडीकेव्ही कांचन: १०५-११०: बागायत १८-२०: पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य
👉पीडीकेव्ही कनक: १०८-१११: बागायत २२-२५: मध्यम टपोरे दाणे, यांत्रिक काढणीस उपयुक्त, मररोग सहनशील

हरभरा पीक खत व्यवस्थापन ( harbhara khat vyavasthapan )
पेरणीच्या आधीच हरभरा खत व्यवस्थापन करावे जेणेकरून तुम्ही दिलेले खत जमिनीत कस धरून राहतील
कोणती खते द्यावी
कोरोड वाहू एक एकर :-
DAP बॅग
१८ ४६ एक बॅग
सल्फर १० किलो
MOP पोटॅश ३० किलो
किंवा
१० २६ २६ एक बॅग
सिंगल सुपर फॉस्पेट १ बॅग
सल्फर १० किलो किंवा सल्फर युक्त खते
किंवा
१४ ३५ १४ एक बॅग
सिंगल सुपर फॉस्पेट १ बॅग
सल्फर १० किलो

बागायती साठी एक एकर :-
DAP एक बॅग
सिंगल सुपर पोस्पेट एक बॅग
सल्फर १० किलो
MOP पोटॅश ३० किलो
१२ ३२ १६ २५ किलो
किंवा
१० २६ २६ एक बॅग
१४ ३५ १४ एक बॅग
सल्फर १० किलो किंवा २४ २४ 0 ८ एक बॅग
युरिया हा १५ ते २० दिवसानंतर देऊ शकता

हरभरा पिकाला पहिली फवारणी
हरभरा पेरणी नंतर २० ते २५ दिवसा नंतर
कीटक नाशक :- Biovita १० ग्रा प्रति १५ लिटर
बुरशीनाशक :- roko किंवा saaf ३० ग्राम प्रति १५ लिटर
विद्राव्यखत :- १९ १९ १९ किंवा sagarika ३० मिली प्रति १५ लिटर

कॉम्बिनेशन :- Emamectin Benzonite १० ग्राम + रोको ३० ग्राम +सागरिका ३० एम एल १५ लिटर पंप साठी

टीप : दिलेले माहिती शेतकरी शिफारशी नुसार किंवा इतर समाजमाध्यम कडून दिलेली असते कोणतेही खत देण्याअगोदर माती परीक्षण करून व योग्य मार्गदर्शन घेऊनच द्यावे .

वेलवर्गीय पिकांवरील रोग व उपाय योजना (Rog Karle कारले रोग)

कारले पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव उपाययोजना
खरीप हंगामात लागवड केलेल्या भाजीपाला पिकामधील जमीन पाऊस पडून गेल्यानंतर कडक होते. अशा पिकांना हलके पाणी देऊन घ्यावे.
– मिरची, वांगी, टोमॅटो पिकांना रासायनिक खते देऊन जमिनीची खांदणी करून मातीची भर लावावी.
– रांगडा कांदा पिकाची लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी ऑक्‍सिफ्लोरफेन या तणनाशकाची 1.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

महाराष्ट्रात सध्या सर्वदूर पाऊस समाधानकारक झालेला आहे. ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर रसशोषक किडींचा, फळ पोखरणाऱ्या अळीचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.
– काकडी, कारली, दोडका, दुधी भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर रसशोषक किडी, नागअळी, फळ माशी या किडी व केवडा, भुरी, फळसड/ फळकूज व डिंक्‍या रोग इत्यादी आढळून येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

– रसशोषक किडी – वेलवर्गीय पिकांवर फुलकिडे, मावा व पांढरी माशी या किडी पानांतील रस शोषून घेतात. पाने वाकडी होतात, तसेच या किडींमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो.
उपाय – थायामेथोक्‍झाम (25 डब्ल्यूजी) 4 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारावे.
नाग अळी – ही अळी पिकांवरील पानांच्या आत राहून आतील भाग खाते, त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.
उपाय – ट्रायझोफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारावे.

– केवडा (डाऊनी मिल्ड्यू) – काकडी, कारली, दोडका, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा या वेलवर्गीय पिकांवर केवडा रोग येतो. सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्‍यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात.
उपाय – रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यानंतर 20 दिवसांपासून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने क्‍लोरोथॅलोनील किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात साध्या हातपंपाने फवारणी करावी.
– रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मेटॅलॅक्‍झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात दर दहा दिवसांच्या अंतराने फवारावे.

– भुरी – जवळजवळ सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सीकोरेसीआरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग येतो. रोगाची सुरवातच प्रथम जुन्या पानांपासून होते. पानांच्या दोन्ही पृष्ठभागावरून पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
उपाय – भुरी रोगाची लक्षणे दिसताच डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ किंवा पेनकोनॅझोल 10 मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. पुढील फवारणी गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

– फळकूज/ फळसड – हा रोग काकडी, भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर येतो. पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजारिअम, रायझोक्‍टोनिया, स्केलोरिशयम नावाच्या बुरशीमुळे फळसड होते.
उपाय – रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड किंवा मॅन्कोझेब किंवा कॅप्टन किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळावर कापरासारखी पांढरी बुरशीची वाढ असेल तर मेटॅलॅक्‍झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

– डिंक्‍या रोग – डायडीमेला ब्रायोनिआ नावाच्या बुरशीमुळे हा रोग दुधी भोपळा, घोसाळी, काकडी या वेलवर्गीय पिकांवर येतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे वेलींच्या कांड्याच्या भागात पिवळसर तपकिरी रंगाचा डिंकासारखा द्रव पाझरतो व नंतर तो काळ्या रंगाचा होतो. खोड आणि फळे यावर चिरा पडतात. यामुळे वेल वाळतो आणि फळे सडतात. रोगाचा प्रथम प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. संकरित वाणावर रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.
उपाय – रोगाची लक्षणे दिसताच कार्बेन्डाझिम किंवा थायोफिनेट मिथाईल 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून – पालटून फवारण्या कराव्यात.

– फळमाशी – अळ्या फळात राहून गर खातात, त्यामुळे फळे सडतात आणि अकाली पक्व होतात.
उपाय –
1) क्‍ल्यु-ल्युरचे एकरी 5 सापळे लावावेत.
2) मॅलॅथिऑन 20 मि.लि. + 100 ग्रॅम गूळ एकत्र करून 10 लिटर पाण्यातूम नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.

स्त्रोत:- फेसबुक पोस्ट

वेस्ट डि कंपोजर

ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.

साहित्य-

– वेस्ट डि कंपोजर

– २ किलो गुळ

– २०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)

– २०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)

कसे बनवावे-

ड्रममधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर व २ किलो गुळ टाकून लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिय वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास ५ ते ७ दिवसाचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.

पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. ५ व्या किंवा ७ व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एंझाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे. हेच द्रावण विरजन म्हणून 20लिटर एका ड्रम मधे टाकून त्यात 200लिटर पाणी व 2किलो गुळ टाकुन वरील प्रमाणे 5-7दिवसात तयार करा. अशा प्रकारे लाखो लिटर द्रावण तयार करता येते.

-कसे वापरावे –

– जमीनीमधे

तयार झालेले २०० लिटर द्रावण १ एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमीनीत सूक्ष्मजीवाणू व गांडूळांची वाढ होऊन जमिन सुपिक व भुसभुशित बनते. जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परीणामी पिकांची वाढ जोमाने होते.

फवारणीसाठी

पिकांवर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून दर ८ ते १५ दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.

१ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून पेरणी आधी बियाण्यांवर शिंपडावे व अर्धा तास सावलीत वाळवून पेरणी अथवा टोकण करावी. रोप लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बुडवून लागण करावी. यामुळे बियाण्याचे व मुळांचे जमीनीतील हानीकरक.

– शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनविण्यासाठी

अंदाजे १ टन शेणखताच्या ढिगावर केवळ २० लिटर वेस्ट डि कंपोजर द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढिग पलटावा व त्यावर पुन: २० लिटर द्रावण शिंपडावे असे दर आठवड्याला करत ४० दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते ज्यामधे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या अधिक आहे. शेणाऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडीकचरा किंवा धान्य मळणीनंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावरही अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते

एकदा तयार झालेया या द्रावणापासून आपण पुन: पुन: नवीन द्रावण तयार करू शकता. यासाठी तयार द्रावणातून पहील्यांदा २० लिटर द्रावण शिल्लक ठेवून त्यात २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. ५ ते ७ दिवसात तेवढ्याच उपयुक्ततेचे द्रावण तयार होईल. किंवा तयार झालेल्या द्रावणातून नवीन २०० लिटर क्षमतेच्या ५ ड्रम मधे प्रत्येकी २० लिटर द्रावण, २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून पुढील ५ ते ७ दिवसात आपणास १००० लिटर द्रावण तयार होऊ शकते.

असे आपण वर्षानुवर्षे तयार करू शकत



सुक्ष्म अन्नद्रव्ये

खालील प्रमाणे तयार करा.

वेस्ट डिकंपोजर – सुक्ष्मअन्नद्रव्ये

पिकास आपल्या वाढीदरम्यान मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत गरज भासते. यापैकी कुठल्याही घटकाची कमतरता झाल्यास पिकाच्या वाढीवर व परीणामत: उत्पादनावर परीणाम होतो. हे घटक पुरविण्यासाठी विक्रेते महगड्या निविष्ठांची व खतांची शिफारस करतात. आपल्या दैनंदीन वापराच्या अनेक साधनांद्वारे यातील बरेच घटक आपणाला पिकास उपलब्ध करून देता येतात. ही साधने अल्पखर्चिक असण्याबरोबर आपण स्वत: यापासून निविष्ठा तयार केल्यामुळे ही विश्वासार्ह देखील असतात. नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारा संशोधित वेस्ट डि कंपोजरच्या सहाय्याने अशा सहज उपलब्ध साधनांपासून उत्तम प्रकारची अन्नद्रव्ये पिकास पुरविता येतात. वेस्ट डि कंपोजर हे उत्तम द्रावक असल्याने या साहित्यातील अन्नद्रव्ये व इतर हार्मोन्स अत्यंत प्रभावीरीत्या त्यात विरघळली जातात व फवारणी किंवा जमीनीच्या माध्यमातून पिकास तुलनेने लवकर प्राप्त होतात.

साहित्य

मका २ किलो

मोहरी २ किलो (किंवा मोहरीची पेंड)

तीळ २ किलो(काळा किंवा पांढरा)

सुर्यमुखी २ किलो

मूग २ किलो

तूर २ किलो

लोखंडी खिळे १० ते १२

तांब्याचे छोटे जुने भांडे अथवा तारा

जस्त (Zink) भस्म

वेस्ट डि कंपोजर द्रावण १०० लिटर

यापैकी मका, मूग आणि तूर यांचे दळून पीठ करून घ्यावे. मोहरी, तीळ आणि सूर्यमुखी यांना मिक्सरमधे अथवा जात्यावर बारीक भरडून घ्यावे.

दिलेल्या साहित्यांपैकी एखादे साहित्य कमी अधिक प्रमाणात असेल किंवा अगदीच नसेल तरी चालेल. आपल्या जवळ जे सहजी उपलब्ध असेल ते वापरावे.

कसे बनवावे

१०० लिटर वेस्ट डि कंपोजरच्या द्रावणात इतर साहित्य मिसळून लाकडी काठीने अथवा प्लास्टिकच्या दांड्याने हलवावे. हे मिश्रण सावलीच्या ठिकाणी स्वच्छ कापडाने झाकून १० दिवस ठेवावे. यादरम्यान दररोज किमान एकदा काठीच्या सहाय्याने द्रावण ढवळावे. या कालावधीत सर्व साहित्यांमधील अन्नद्रव्ये मिश्रणात विरघळतील. चार ते पाच दिवसातच अन्नद्रव्ये मिश्रणात विरघळण्यास सुरवात होते, परंतु उत्कृष्ट परीणामांसाठी दहा दिवस हा योग्य कालावधी आहे. पाण्यात मिसळल्यानंतर वापराआधी हे द्रावण गाळून घ्यावे ज्यामुळे ड्रिप अथवा पंपाची नोझल चोक होणार नाही.

कसे वापरावे

पंपाने फवारणी अथवा ठिबक द्वारे द्यायचे असल्यास पाणि मिसळल्या नंतर द्रावण स्वछ कापडाने अथवा चाळणीने गाळून घ्यावे.

या द्रावणाचा वापर पिकावर दोन मुख्य अवस्थेत करणे जरूरी आहे. धान्य पिकात कणसे अथवा ओंब्या सुरू होताना तसेच दाणे पक्व होताना. फळझाडांमधे फुलधारणेच्या वेळी व फळधारणे नंतर. जवळपास सर्वच प्रकारच्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे. गाळून उरलेला चोथा झाडांच्या खोडाजवळ अथवा जमीनीमधे पसरवून टाकावा.

पिकावर फवारणी व जमीनीतून अशा दोन्ही प्रकारे याचा वापर केला जाऊ शकतो. फवारणीच्या माध्यमातून दिलेली सर्वच अन्नद्रव्ये जमीनीतून दिल्याच्या तुलनेत लवकर लागू होतात.

फवारणीसाठी ५ लिटर द्रावण १०० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी साठी वापरावे.

जमीनीतून देण्यासाठी १० लिटर द्रावण २०० लिटर पाण्यात मिसळून १ एकरास द्यावे. यात वापरलेली सर्वच साधने जैविक असल्यामुळे याचे फवारणी करणाऱ्याच्या आरोग्यावर कुठलेही विपरीत परीणाम नाहीत.

शोधकर्त्यांच्या निर्देशानुसार हे द्रावण बराच काळ टिकू शकते. वातावरणातील हवेबरोबर संपर्काने जैविक द्रावणात मूलभूत बदल होत असतात. कालांतराने द्रावण क्षीण होऊन तितकेसे प्रभावी राहत नाही. त्यामुळे अशा निविष्टा त्यांच्या वैध कालावधीत वापरून संपतील इतक्याच बनवाव्यात.

वापरल्या जाणाऱ्या साहित्यापासून कोणकोणती अन्नद्रव्ये प्राप्त होतात.

मका

फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅन्गेनीज, झिंक, लोह, सेलेनियम व अल्प प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियमकार्बोहाहड्रेट्स,

विटामिन B6

मोहरी

उत्तम स्त्रोत सेलेनियम फॉस्फरस, मॅग्नॅशियम, ताम्र, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, विटामिन B1

तीळ

उत्तम स्त्रोत मॅन्गेनीज, या व्यतिरीक्त कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नॅशियम, लोह, झिंक, मॉलेब्डिनम, विटामिन B1, सेलेनियम या व्यतिरीक्त विविध प्रोटीन्स

सूर्यमुखी

मॅन्गेनीज, सेलेनियम, फॉस्फरस, मॅग्नॅशियम, विटामिन E पोटॅशियम विटामिन मॅग्नॅशियम

मूग

प्रोटीटामिन, मुबाक प्रमाणात मॅग्नॅशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम. अल्प प्रमाणात लोह, सोडियम, झिंक, तांबे, मॅन्गेनीज, सेलेनियम

तूर

कार्बोहाहड्रेट्स, लोह, कॅल्शियम व खनिजे.

लोखंडी खिळ्यांपासून लोह व तांब्याच्या भांड्यापासून तांबे .

आत्ता पाहूया “वेस्ट डिकंपोजर”मध्ये नेमके काय आहे. यात खालील चार मुख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत.

1) Cellulose degrading Bacteria

2) Xylan degrading Bacteria

3) Phosphorus solubilizing Bacteria (PSB)

4) Potash solubilizing Bacteria (KSB)

ICAR-IIFSR च्या अहवालानुसार यामध्ये त्या ४ जिवाणुचा कावुंट तीव्रता खालील प्रमाणे आढळते.

1) Cellulose degrading Bacteria (१०.०×१०७)

2) Xylan degrading Bacteria (२.४ ×१०४)

3) PSB (२.० ×१०७)

4) KSB (८.० × १०४)

सर्व सामान्य शेतकरी व माहितगार व्यक्तींना यातील खालचे दोन बॅक्टेरिया *(PSB व KSB) परिचीत आहेत.

तर आता माहिती घेऊया यातील सर्वात पहिल्या घटकाची म्हणजे

Cellulose degrading Bacteria.

याच्या नावातच याची अोळख आहे. Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच काष्टा पासुन किंवा टाकावू पदार्था पासून कार्बन विलग करणारा जिवाणू. हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

याच जिवाणू वरूनच या प्रोडक्टचे नाव ठरविण्यात आलें आहे. तेंव्हा सहाजीकच याच जिवाणूची तीव्रता (कावुंट) या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे.

त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते. वेस्ट डि कंपोजर मधिल याच जिवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाणे (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे.

परंतु, पिकास जमीनीतूनही बरेच काही हवे असते, ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे. अशा वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे.

आता पाहुया ‘डि-कंपोजर’ मधिल दुसरा जिवाणू

Xylan degrading Bacteria

आता जाणुन घेवुया Xylan (झायलान) म्हणजे काय?

सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे. या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू.

वरील दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्मजीवाणू म्हणजे Pseudomonas, Bacillus, Rhizobium हे आहेत. या मुळे नत्र स्थिरीकरणास चालना मिळते. आछादनातील बायाेमासचे वेगाने

‘डि-कंपोज करुन पिकास मुख्य अन्नद्रव्यांच्या व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा ‘डि-कंपोजर करते.

आता पाहुया ‘डि-कंपोजर’ मधिल तिसरा जिवाणू PSB (Phosphorus solubilizing Bacteria) दाेन अथवा तिन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करुन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये रुपांतरीत करुन मुळाना देते.

4)KSB (Potash solubilizing Bacteria) मातीतील पाेट्याश सुलभतेने घेण्यास मुळाना मदत करते. अशा प्रकारे मुख्य अन्नद्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा ‘डि-कंपोजर करते. तसेच बुरशी नाशक व किटकनाशक म्हणुनही याचा वापर करु शकताे. या सर्व गुणा मुळेच *वेस्ट डि-कंपोजर शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत अहे.

टीप:- दिलेली माहिती ही शेतकरी शिफारशी नुसार किंवा इतर समाज माध्यमातून घेतलेली असते कोणतीही क्रिया करण्याअगोदर कृषी अधिकारी किंवा मार्गदर्शक सल्ला घ्यावा.. विरुद्ध क्रियेला ॲग्रोपंच ॲप जबाबदार राहत नाही

ऑक्टोबर छाटणी 

ऑक्टोबर छाटणी नंतर दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी द्राक्षबागेचे व्यवस्थापन 

द्राक्षाचा वेल मूळचा रशियातील समशीतोष्‍ण भागांतील आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. वायव्य हिमालयावर द्राक्षांच्या जंगली वेली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे.
द्राक्ष हे महात्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाल टिकणारे फळ आहे. त्याचा उपयोग मुख्यत: तीन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात द्राक्षे ताजी खाण्यासाठी (टेबल द्राक्षे) वापरतात. दुसर्‍या प्रकारात द्राक्षे वाळवून, टिकवून खाण्यासाठी वापरतात. तिसर्‍या प्रकारात मद्य आणि इतर पेये बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो. जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी ८०% उत्पादनाच वापर मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी केला जातो. १०% द्राक्षे ताजी खाण्यासाठी १०% मनुका तयार करण्यासाठी वापरतात. महाराष्‍ट्रांत नाशिक येथे द्राक्षांची लागवड फारच मोठया प्रमाणावर होते. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणीही द्राक्षांची लागवड आहे.
भारतात द्राक्ष लागवडीसाठी असणा-या एकूण क्षेत्राच्या निम्यापेक्षा जास्त क्षेत्र हे एकटया महाराष्ट्रातच असल्याने द्राक्ष शेतीस महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले आहे. यशस्वी द्राक्ष उत्पादन हे एका विशिष्ट व उच्च तंत्रावर अवलंबून आहे. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षाची प्रत ही फार उच्च दर्जाची असावी लागते. अशा द्राक्षाचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बंधूनी त्याच्या शेतावर आवलंबला तर अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या द्राक्षाची मागणी वाढून निर्यात वाढेल.
द्राक्ष वेलीच्या जीवनक्रमात एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणीला अत्यंत महत्त्व आहे. ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे. ऑक्‍टोबर छाटणी ही प्रत्यक्षपणे उत्पादनाशी निगडित असते. एकसारख्या निघणाऱ्या फुटी व फुटीबरोबर दिसणाऱ्या घडांच्या संख्येवर पुढील हंगामाचे भवितव्य ठरलेले असते. ऑक्टोबर छाटणी नंतरचे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करताना खालील बाबींचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन :
द्राक्ष वेलीच्या ऑक्टोबर छाटणीनंतर आलेला फुटवा व बहार सदृढ होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन एक महत्त्वपूर्ण बाब आहे. द्राक्ष वेलीचे माती, पाणी व देठ निरिक्षण मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करून घेतल्यास उपलब्ध आणि कमतरता असलेले अन्नद्रव्यांची पूर्व कल्पना येते व त्यानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करता येते. माती परिक्षण करून त्याप्रमाणे खत व्यवस्थापन करावे. निकृष्ट, कमी कसदार जमिनीत खतांचा वापर अधिक प्रमाणात करावा लागतो.
जमिनीतील पाणी प्रमाण, भुसभुसितपणा, खनिजद्रव्यांची उपलब्धता, क्षार व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण व त्यातून होणारी जीवाणूंची वाढ इ. बाबींचा विचार करून द्राक्ष वेलीला खते द्यावीत. तसेच जमिनीचा पोत, हवामान, वेलीचे वाय, लागवडीचे अंतर, इ. बाबींचाही विचार करावा. हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढविणे शक्य आहे. धैंचा, उडीद, मुग, चवळी, गिरिपुष्प, इ. पिकांचा वापर हिरवळीच्या खतांमध्ये करता येतो. तसेच कत्तलखान्यातील खत, मासळी खत, तेलबियांच्या पेंडी, इ. खतांचाही वापर करता येतो.
द्राक्ष वेलीचे जेवढे ड्राय वजन असते तेवढेच अन्नद्रव्ये वेल जमिनीतून शोषून घेत असते. वेली जमिनीतून सतत खतांची मात्रा ग्रहण करत नाही तर प्रत्येक नव्या वाढीसाठी टप्प्यात आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद व पालाश द्राक्ष वेल ग्रहण करते. नवीन फूट येताना, आलेली पाने पसरून हरीतद्रव्ये बनवत असताना व फुलोरा वाढत असताना अश्या तीन अवस्थेमध्ये वेल अन्नद्रव्ये शोषून घेत असते. सर्वसाधारणपणे एका एकरमधून १० टन उत्पन्न मिळविण्यासाठी ४० किलो नत्र व प्रत्येकी २० किलो स्फुरद व पालाश तर १६ टन उत्पादनासाठी ६२ किलो नत्र, १२ किलो फोस्फेट, ५४ किलो पालाश, ३२ किलो कैल्सियम व १८ किलो मैग्नेशियम जमिनीतून शोषून घेतले जाते. यपेक्षा अधिक दिलेल्या खतांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. एका एकरला १०० किलो अमोनियम सल्फेट छाटणी पूर्वी, छाटणी नंतर १८ ते २० दिवसांनी आणि द्राक्षवेली फुलोऱ्यापूर्वी किंवा छाटणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावा. तसेच, ३०० किलो सुपर फोस्फेट द्राक्ष बागेत चर खोडून द्यावे. छाटणीनंतर ६० दिवसानंतर वेलीचे खोड फुगू लागते, त्यावेळी ४०० किलो स्टेरामिल द्यावे.
४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व ५० किलो पालाशचा पुरवठा करण्यासाठी १० टन पूर्ण कुजलेले शेणखत बागेला टाकतात. द्राक्षबागेतील दुसऱ्या डीपिंग नंतर घड मऊ झाल्यावर प्रत्येकी १०० किलो डीएपी व एसओपी आणि ५०० किलो करंज व शेंगदाणा पेंड दिल्यास उच्च प्रतीचा आणि निर्यातक्षम गुणवत्तेचा वजनदार द्राक्षमाल तयार होतो.
द्राक्ष मण्यांमध्ये साखर भरताना तसेच फुलोरा अवस्थेत द्राक्ष वेलीला पालाशची आवश्यकता असते. छाटणीनंतर ८० दिवसांनी द्राक्ष बागेतील एखादा घड परिपक्व झाल्यावर ५० किलो एसओपी द्यावे, यावर मालाचा दर्जा, वजन, टिकाऊपणा, गोडवा अवलंबून असतो. ९० दिवसांच्या आसपास मण्यांमध्ये साखर भरली जाते. या काळात पालाश कमी पडले तर ते पानांमधून घेतले जाते, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. त्या खालोखाल फुलोरा अवस्थेत पालाशची आवश्यकता वेलीला असते.
द्राक्ष बागेला सेन्द्रीय खते दिल्यास जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होऊन जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढून ते अधिक कार्यक्षम होतात. बागेतील जमिनीत हवा व पाणी यांचे समप्रमाण राखून चांगले उत्पन्न घेता येते. 

संजीवकांचे व्यवस्थापन :
उच्च प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात पीक संजीवकांचा फार मोलाचा वाटा आहे. पीक संजीवके हे वेलीच्या अंतर्गत क्रियेत अमुलाग्र बदल घडवून आणणारी महत्त्वाची रसायने आहेत. संजीवकांच्या वापराशिवाय निर्यातक्षम द्राक्षनिर्मिती अशक्य असल्यासारखेच आहे. भरघोस आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळविण्यासाठी द्राक्षाच्या खरड छाटणीपासून ते निर्यातीपर्यंत संजीवकांचा योग्य त्या अवस्थेत योग्य त्या प्रमाणत वापर करणे आवश्यक आहे. द्राक्षाच्या दर्जेदार उत्पादनासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी संजीवकांचा वापर करत आहेत परंतु योग्य माहिती अभावी योग्य त्या अवस्थेत, योग्य त्या प्रमाणात वापर न केल्यामुळे व अतिवापरामुळे अन्य वाईट परिमाण दिसून येतात. 
द्राक्षाची गुणवत्ता ही मण्यांच्या आकारातील व रंगातील एकसारखेपणा, मण्यामधील साखर-आम्लता प्रमाण व मण्यांची साठवणक्षमता यावर अवलंबून असते. हे सर्व घटक अपेक्षेप्रमाणे निर्माण होण्यासाठी संजीवकांचा वापर करणे अनिवार्ह आहे.
गुणवत्तेसोबतच इतर कार्यांसाठी (डोळे फुटून येण्यासाठी, घड जिरू नये, इ.), तसेच साठवण करताना मणीगळ नियंत्रित करण्यासाठी सुद्धा संजीवाकांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे द्राक्षबागेत वेलीच्या छाटणीनंतर हायड्रोजन सायानामाईड, जिब्रेलिक आम्ल, सीपीपीयु (फोरक्लोरोफेन्युरॉन), नेप्थालिक अ‍ॅसिटीक आम्ल, इ.चा वापर विविध अवस्थांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.
द्राक्षबागेत फळ छाटणीनंतर हायड्रोजन सायानामाईडचा वापर फळ छाटणीनंतर वेलीवरील काड्यांची एकसारखी फूट निघण्यासाठी करतात. एकसारखी फूट निघण्यासाठी एकसारखी जाडीची काडी असणे व काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायानामाईडचे पेस्टिंग करणे या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.
काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायानामाईडचा वापर :
काडीची जाडी हायड्रोजन सायानामाईडचे प्रमाण
(१ लिटर पाणी) १ लि. हायड्रोजन सायानामाईड किती लिटर पाण्यात वापरावे
६ मि.मी. ४० मि.लि. २५ लिटर
८ मि.मी. ५० मि.लि. २० लिटर
१० मि.मी. ६० मि.लि. १६.७ लिटर
१२ मि.मी. ८० मि.लि. १२.५ लिटर
• हायड्रोजन सायानामाईडचा योग्य वापर होण्यासाठी ते द्रावण काडीच्या डोळ्यांना व्यवस्थित लावणे आवश्यक असते. द्रावणात लाल रंग वापरून रसायनाची लावणी योग्यरीत्या होत असल्याची खात्री करता येते.
• ज्या व्यक्तींना हायड्रोजन सायानामाईडची एलेर्जी आहे त्यांणी पेस्टिंगचे काम करू नये.
• पेस्टिंग करण्यापूर्वी हातांना पेट्रोलियम जेली, एरंडेल तेल किंवा व्हेसलीन व रबरी हातमोजे घालूनच या द्रावनाचा वापर करावा.
• हायड्रोजन सायानामाईडच्या बाटलीसोबत वापरासंबंधी दिलेल्या सुचानांचे तंतोतंत पालन करावे.
घडाचे आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर :
घडाच्या आकारमानाच्या द्राक्ष उत्पादनात मोलाचा वाट आहे. निर्यातक्षम घडाचे आकारमान हे सामान्यपणे ३०० ते ७५० ग्राम इतके असते. हे साधण्यासाठी जीबेर्लिक आम्लाचा फुलोरा येण्यापूर्वी वापर महत्त्वाचा असतो.
द्राक्षमणी आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर :
संजीवकांचा वापर मण्याचा आकार-रंग व त्यातील गार नियंत्रित करण्यासाठी केला जातो. मणी आकारमान वाढविण्यासाठी जीबेर्लिक आम्ल व सीपीपीयु यांचा वापर फारच उपयोगी पडतो. ही संजीवके पेशींची संख्या वाढवून आकारमानात वाढ घडवून आणतात. त्यामुळे या संजीवकांचा वापर मण्यातील पेशी ज्या अवस्थेत जोमात वाढतात त्या अवस्थेत देणे फायद्याचे ठरते.
संजीवकांचा वापर :
अ. क्र. संजीवक तीव्रता वापरण्याची वेळ उद्देश
१. जीबेर्ल्लिक आम्ल   + फोरक्लोरफेनुरॉन  ४-५० पीपीएम + १-२ पीपीएम ३-४ व ६-७ मि.मी. जाडी आकाराचे मनी असताना देठांची जाडी वाढविण्यासाठी
२. जीबेर्लिक आम्ल + युरिया, फोस्फेट  १० पीपीएम
(५.५-६ पी.एच.)  घडाचा पोपटी रंग – स्प्रे  घडाचे आकारमान वाढविण्यासाठी
३. जीबेर्लिक आम्ल + सायट्रिक आम्ल  १५ पीपीएम
(५.५-६ पी.एच.) वरील अवस्थे नंतर ३-४ दिवसांनी – डीपिंग घडाचे आकारमान वाढविण्यासाठी
४. जीबेर्लिक आम्ल + सायट्रिक आम्ल  २० पीपीएम
(५.५-६ पी.एच.) वरील अवस्थे नंतर ३-४ दिवसांनी – डीपिंग घडाचे आकारमान वाढविण्यासाठी
५. कैल्शिअम नायट्रेट
०.५ ते १ टक्के ७५, ९० किंवा १०५ दिवसा नंतर एकदाच मण्यांच्या पेशींचा ताठरपणा, पेशीभित्तिका वाढविण्यासाठी
६. नेप्थालिक अ‍ॅसिटीक आम्ल ५-१०० पीपीएम फळ काढणी अगोदर ८ ते १० दिवस काढणी पाश्च्यात मण्यांची गळ कमी

द्राक्ष वेलीच्या पानांचे व्यवस्थापन :
दर्जेदार द्राक्ष उत्पादनात कॅनोपी मॅनेजमेंट (पानांचे विस्तार व्यवस्थापन) ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेतून होणाऱ्या अन्नसाठ्यामुळे पाने मजबूत होतात. द्राक्षवेलीवरील पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पानांचे योग्य नियोजन आवश्‍यक आहे.
दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी ऑक्‍टोबर छाटणीनंतर सर्व टप्प्यांवर योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. वेलीतील अन्नद्रव्ये फळाला पुरविण्यासाठी पानांचे कार्य सर्वांत महत्त्वाचे ठरते. पाने सक्रिय व मजबूत राहण्यासाठी त्यांना एकसारखा सूर्यप्रकाश जास्तीत जास्त काळ मिळेल अशा पद्धतीने त्यांचे नियोजन आवश्‍यक आहे. वेळेच्या आत वांझफुटी काढून टाकाव्यात. फांदीची लांबी जास्तीत जास्त ८५ ते ९० सेंमी असावी. सव्वा मीटरपर्यंत लांबत गेलेल्या फांदीमध्ये मोठा अन्नसाठा वाया जातो. काडीची जाडी आठ मिलिमीटरपेक्षा अधिक नसावी. वेलीवर पानांची गर्दी अधिक झाल्यास पाने पिवळी पडून मणीगळ वाढते.
वेलीवरील पानांच्या योग्य नियोजनामुळे द्राक्षाच्या वजनात लक्षणीय फरक पडत असल्याचे प्रयोगातून आढळून आले आहे. द्राक्षवेलीवरील पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर कितीही खतांचे डोस दिले तरी ते पुरेसे ठरत नाहीत. सर्वसाधारणपणे एका वेलीवर ३५० ते ४०० पाने असावीत. मंडपावरील एका चौरसफुटात १६ ते २० पाने असावीत. एकावर एक तीन थरांपेक्षा जास्त पाने नसावीत. पानांची खुडणी (टॉपिंग) वेळेवर होणे गरजेचे आहे. फलधारणेच्या काळात अपेक्षित शेंडावाढ मिळण्यासाठी वेळेत होणारी पींचिंग, टॉपिंग, पाणी नियोजन महत्त्वाचे आहे.

द्राक्ष घड व्यवस्थापन :
द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर १० ते १२ दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने ३ ते ५ पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
छाटणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करावी. अनेक द्राक्षबागायतदार या वेळी हायड्रोजन सायनामाईड वापरत नाहीत. तरीसुद्धा बागेत फुटी निघतात. परंतु वातावरणात तापमान जास्त व आर्द्रता कमी असल्याकारणाने बाग मागेपुढे व उशिरा फुटते. हायड्रोजन सायनामाईड पेस्टिंग अथवा फवारणी केल्यास बाग लवकर फुटण्यास मदत होईल, यामुळे ओलांडा डागाळणार नाही.
हायड्रोजन सायनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते १२ दिवसांत दिसू लागतात. द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर १० ते १२ दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने ३ ते ५ पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो व घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
घड जिरण्याच्या समस्येचे मूळ कारण जरी एप्रिल छाटणीतील व्यवस्थापन व त्या वेळीस होणारा वातावरणातील बदल असेल तरी या समस्येस बरीच कारणे आहेत.
घड जिरण्याची कारणे :
१) उशिरा झालेली खरड छाटणी : खरड छाटणी उशिरा झालेल्या बागांमध्ये खरड छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाऱ्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या येते.
२) खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान : खरड छाटणी मुख्यतः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणण्याकरिता केली जाते. सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना वातावरणातील घटक अनुकूल नसल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम घडनिर्मितीवर होतो किंवा अंशतः घडनिर्मिती होऊन प्रत्यक्षात फूट निघण्याच्या वेळी दिसून येणारा घड हा योग्य प्रकारे तयार होत नाही.
३) फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल : फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमधून होते. ऍनालाजेनची निर्मिती, फळधारक डोळ्यांची निर्मिती आणि फुलांची निर्मिती या तीन अवस्थांपैकी फुलोऱ्यांची निर्मिती ही अवस्था खूप महत्त्वाची असते. या अवस्थेच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये त्यात प्रकाश सायटोकायनिन, आरएनए (रायबोन्युक्‍लिक ऍसिड) बदल झाल्यास त्याचा परिणाम बाळी किंवा शेंडा निर्मितीमध्ये होतो.
४) सूक्ष्म घडांचे पोषण : काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते, म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात; परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर ६१ ते ९० दिवसांच्या कालावधीत काही कारणामुळे घडांचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. त्यातच असे घड फुटीची वाढ होताना पावसाळी हवा असेल तर असे घड फुटींच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्‍यता जास्त असते. स्वच्छ हवामानात असे घड टिकून राहतात; परंतु वाढ फारशी समाधानकारक होत नाही.
५) वेलीतील अन्नसाठा : खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणांमुळे वेलींमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. या अगोदर सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या या परिस्थितीमध्ये यायला नको, तरी फुटींच्या वाढीसोबत घडाचा विकास होणे अडचणीचे ठरते.
६) बोद व पांढऱ्या मुळींची संख्या : संशोधनाअंती आढळून आले, की बागांमध्ये छाटणीच्या वेळी वेलींच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेली पांढरी मुळे नसल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम घड जिरण्यात होतो. वेलींमध्ये मुळातच अन्नसाठा कमी त्यात मुळी कार्यक्षम नसल्याने तसेच पांढरी मुळे कार्यक्षम न करून घेतल्याने फूट बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक जोम मुळांद्वारे मिळत नाही, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
७) ऑक्‍टोबर छाटणीतील चुका : ऑक्‍टोबर छाटणी करताना झालेल्या चुकांमुळे वेलीवर कमी घड लागतात. योग्य ठिकाणी छाटणी न झाल्यामुळे घड जिरण्याची शक्‍यता कमी होते. हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करताना जास्त डोळ्यांना पेस्टिंग केली गेल्यामुळे जास्त डोळे फोडून निघतात. वेलीमध्ये अन्नसाठ्याचा अभाव असताना जास्त डोळे फुटल्यास फुटीचा जोम कमी राहतो. अन्नसाठ्याची विभागणी होते व घड जिरणे किंवा लहान येणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात.
ऑक्‍टोबर छाटणी घड जिरू नये म्हणून उपाययोजना :
बागेच्या व्यवस्थापनात झालेल्या काही चुका तसेच काही घटकांचा ऑक्‍टोबर छाटणीशी असणारा प्रत्यक्ष संबंध याचा विचार करता या समस्येवर ऑक्‍टोबर छाटणीनंतर कशाप्रकारे मात करता येईल यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते.
१) खरड छाटणी शक्‍यतोवर उशिरा करू नये.
२) द्राक्ष काडीची घडासाठी तपासणी करावी : ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करून काडीवरील डोळ्यांमधील घडांची परिस्थिती समजावून घेणे आवश्‍यक आहे. सुरवातीच्या डोळ्यांमध्ये घडनिर्मिती चांगली झालेली असते तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन छाटणी केल्यास चांगली घडनिर्मिती झालेले डोळे उपयोगात येऊ शकतात.
३) ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी ताण देणे : छाटणीअगोदर ताण दिल्यास पानांमधील अन्नसाठा द्राक्ष काडीकडे व डोळ्यांकडे वळविला जाऊन त्याचा फायदा नवीन फुटीस होईल व एकसारखी फूट निघण्यास मदत होईल.
४) योग्य छाटणी व एकसारखी फूट : योग्य छाटणी व नियंत्रित डोळ्यांमधून एकसारखी फूट काढणे यास देखील महत्त्व आहे. काडीवरील जितके जास्त डोळे फुटून येतील तेवढा अन्नसाठ्याचा व्यय जास्त होईल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. म्हणूनच नेमके डोळे फुटून येण्यासाठी छाटणी व पेस्टिंगद्वारे उपाययोजना करावी. हायड्रोजन सायनामाईडचे प्रमाण योग्य वापरून पेस्टिंग करताना नेमकेच डोळे फोडून काढावेत व नंतर साधारणतः एका काडीवर एक घडाची फूट व विस्ताराच्या दृष्टीने काही वांझ फुटी राखाव्यात.
घड जिरण्याची समस्या दिसत असल्यास वाढ विरोधकांचा वापर करावा. सध्या सीसीसी सारख्या वाढविरोधकास मनाई नसली तरी त्यावरील प्रयोग सुरू असल्यामुळे ते वापरणे इष्ट होणार नाही म्हणून दुसरे वाढविरोधके वापरू नयेत. वेलीच्या वाढीचा वेग हा पाणी तसेच नत्र यांच्या नियंत्रणाने कमी करावा. या वेळी वेलीच्या वाढीचा वेग मंदावणे गरजेचे असते. त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा योग्य वापर करावा. त्यामध्ये जास्त रसायनाचा वापर टाळावा व जोपर्यंत घड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नत्र तसेच जीएचा वापर करू नये. या दरम्यान सी.विड एक्‍सट्रॅक्‍ट किंवा तत्सम रसायनांचा वापर टाळावा. घडात सुधारणा दिसू लागल्यानंतर जीएच्या फवारणीस सुरवात करावी.
५) जमिनीचे व्यवस्थापन : पांढऱ्या मुळींची संख्या बरेच प्रमाणात घड जिरण्याच्या समस्येसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी जमिनीचे व्यवस्थापन करायला हवे. जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावेत. तसेच पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणे आवश्‍यक असते.
अनियमित पावसामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. एप्रिल छाटणी उशिरा झालेल्या द्राक्ष बागांमध्ये ही समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे त्यांना वरील काही उपाययोजना फायदेशीर ठरतील.

स्रोत :-

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
पी.एचडी. (फळशास्ञ) स्कॉलर, जुनागढ कृषी विद्यापीठ, गुजरात.
संपर्क- ९४२२२२११२०

चुकून तणनाशक फवारले गेले तर काय करावे (Chukun Tannashak Favarle Gele Tar)

*चुकून तणनाशक फवारले गेले.तर काळजी करू नका*

कोणत्याही पिकावर चुकून आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले असल्यास ,त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.
मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर खालील प्रमाणे रामबाण उपाय आहे तो म्हणजे

१)*१५ लिटर च्या पंपासाठी ७५ ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि ६० ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट* ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे .
*टीप*- डी ए पी २ तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.
गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर ७/७ तासाच्या अंतराने ४ वेळा फवारणी केल्यास ९०/९५% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .

२) *१५ लिटर च्या पंपासाठी ५० ग्रॅम रोजच्या खाण्याचे मीठ झाड ओले होईल अशी फवारणी करावी.
*टीप*- ५०० ग्रॅम मिठाला १० ग्लास पाण्यामध्ये मिसळवून १ ग्लास एका पंपला या प्रमाणे फवारणी करावी. फवारणी झाल्याच्या २४ तासा नंतर
१२/६१/०० – १०० ग्रॅम
अमिनोअसिड – ४० मिली
मायक्रोनुट्रियंस – ५० मिली
या प्रमाणे फवारणी करावी परत ७ दिवसांनी परत फवारणी करावी.

*बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही दिलेली महिती शेतकरी शिफारशी नुसार आहे याची नोंद घ्यावी*

द्राक्ष लागवड ( Draksh Lagvad )

जमीन

योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामु ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

हवामान

उष्ण व कोरडे, २५ ते ३५ सेल्सिअस तापमान, ६०० मि.मी पेक्षा कमी पर्जन्यमान

लागवडीचे अंतर

३ X १.५ मी वेलीची संख्या / हे २,२२२

लागवडीची वेळ/दिशा

डिसेंबर – जानेवारी किंवा जून – जुलै / दक्षिणोत्तर

लागवडीची पद्धत

अ) स्वमुळावरची लागवड ब) खुंटावरील लागवड असलेल्या ठिकाणी म.फु.कृ विद्यापीठाने डॉगरीज या खुंटाची शिफारस केली आहे. डॉगरीज या खुंटाजी लागवड डिसेंबर- जानेवारीमध्ये करुन त्यावर पाचर कलम करावे. कलम करतेवेळी योग्य जात निवडावी.

सुधारित जाती

थॉमसन सिडलेस, तास-ए-गणेश, सोनाका, माणिक चमन, शरद सिडलेस व फ्लेम सिडलेस, रेडग्लोब

वळण देण्याची पध्दत

टी (T)  किंवा मंडप पध्दतीचा अवलंब करावा.

संजीवकाच्या मात्रा

फुले उमलण्यापूर्वी १० ते २० पी पी एम जिब्रॅलिक अॅसिडची फवारणी करावी. २५ % टोप्या पडल्यानंतर २० पी पी एम व ७५ % टोप्या पडल्यानंतर ४० पी पी एम मध्ये घड बुडवणी करावी. फळधारण झाल्यानंतर ४० पी पी एमचा फवारा द्यावा.

खताच्या मात्रा

डॉगरीज खुंटावर लागवड केलेल्या द्राक्ष पिकास प्रति हेक्टरी ६६६ कि. नत्र ४४४ कि. स्फुरद व ४४४ कि. पालाश द्यावे. खरड छाटणीनंतर ७० % नत्र (४६६ कि.) ५० % स्फुरद (२२२ कि.) व १७५ कि. पालाश विभागुन द्यावे. खरड छावणीनंतर उर्वरीत स्फुरद लगेच द्यावा तर नत्र १५ दिवसाना द्यावा. पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यत उर्वरीत पालाशापैकी ७० % द्यावा. तर पाणी उतरण्याच्या अवस्थेत उर्वरीत ३० % द्यावा.

 द्राक्ष बागेतील रोग नियंत्रण –

द्राक्ष बागेत फळ छाटणीनंतर आद्रता जास्त असणे साहजिकच आहे यापूर्वी पावसाळी वातावरणात वाढलेल्या बागेमध्ये वेग वेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला दिसून येईल अशी बाग निघाल्यानंतर ही त्रासदायक परिस्थिती निर्माण करत असते अशा परिस्थितीत बागेत काडीवर, ओलांड्यावर तसेच खोडावर असलेली रोगग्रस्त पाने गोळा करून बागेच्या बाहेर फेकून द्यावी त्याचबरोबर बागेमध्ये बोर्डो मिश्रणाची फवारणी पूर्ण वेलीवर तसेच जमिनीवर बांधावर सुद्धा करून घेण्यात यावी यामुळे बागेत असलेले रोगाचे जिवाणू नियंत्रणात ठेवणे अधिक प्रमाणात शक्य होईल.

* द्राक्ष बागेमध्ये संजीवकाची फवारणी करणे –

द्राक्ष बागेमध्ये 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये द्राक्ष घड जी .ए.3 व पी.पी.एम. या संजीवकांच्या फवारणी करण्याजोगा होतो वातावरणातील परिस्थितीची पाऊस बघूनच फवारणी करावी .जी .ए. 3. ची फवारणी व कार्य करण्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने बागेमध्ये एका दिवसापूर्वी झिंक आणि बोराॅनची 0.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.जी.ए.3 . चे अधिक चांगले परिणाम होण्यासाठी जी. एक.3. च्या द्रावणात युरिया फॉस्फेट एक ग्रॅम प्रति लिटर किंवा सायट्रिक ऍसिड0.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा फॉस्फरिक ऍसिड 0.3 मि.लि.लिटर पाणी या प्रमाणात मिसळून घ्यावे

पाच दिवसानंतर पुन्हा पंधरा पी.पी.एम तीव्रतेच्या फवारणी केल्यास प्रिब्ल्यूम अवस्थेमध्ये घर चांगल्या रीतीने मोकळा झालेला दिसतो अशाप्रकारे द्राक्षाच्या काळी मधून घड बाहेर येण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे ऑक्टोबर मध्ये छाटणी करणे आवश्‍यक असते. त्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे Draksh Lagwad Mahiti Marathi व्यवस्थित नियोजन करून द्राक्ष बागेत अधिकाधिक उत्पादन घ्यावे.

द्राक्षाची छाटणी

  1. अप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी- द्राक्षवेलीच्या काडावरील डोळ्यामध्ये सूक्ष्मघड निर्मिती होण्यासाठी एप्रिल किंवा खरड छाटणी महत्त्वाची असते. एप्रिल छाटणीनंतर ७ पानांवर गरजेनुसार सबकेन करावी.
  2. ऑक्टोबर छाटणी – द्राक्षाच्या माल काडीमधुन घड बाहेर येण्यासाठी ऑक्टोबर छाटणी करणे आवश्यक असते.

वेल व्यवस्थापन – प्रतिवेलीवर काड्यांची संख्या – ३५ ते ४०

  1. i.   प्रतिकाडीवर पानांची संख्या – १५ ते १६

गुणवत्तेशीर द्राक्ष उत्पादनासाठी – १) विरळणी २) गर्डलिंग ३) योग्य व्यवस्थापन ४) योग्य वेळी योग्य संजीवकाचा वापर करावा.

  1. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
  2. खरड छाटणी तसेच ऑक्टोबर छाटणी वेळेवर करुन छाटलेल्या काड्या व पाने बांधावर न टाकता जाळून नष्ट कराव्यात.
  3. छाटणीनंतर खोड व वलांड्यावरील मोकळी झालेली साल काढावी.
  4. छाटणीनंतर लगेच वेलीच्या खोडांना आणि वलांड्यांना ब्लायटॉक्स ०.४ टक्के किंवा गेरू ३ किलो प्रति १० लिटर अथवा १० टक्के बोर्डो पेस्ट + मेथोमील ३ ग्रॅम + क्लोरापायरीफॉस नुवान ३ मि.ली + १.५ मि.ली स्टिकर प्रति लिटर पाणी या प्रमाणात पेस्टींग करावे.
  5. फुलकिडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यू.जी. ३ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५% एस.पी. ३. मि.ली किंवा फिप्रोनील ८० % डब्ल्यू.जी. १५ मि.ली या किटकनाशकाची १५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.
  6. नवीन फुट आली असताना निंबोळी अर्क ५ टक्के दोन फवारण्या आणि मॅलिथिऑन ०.१० टक्केची फवारणी करावी.
  7. मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत मिलीबगचा प्रादुर्भाव वाढल्यास १५०० ऑस्ट्रेलियन बिटल  ( क्रिप्टोलिमस भुंगेरे) प्रति हेक्टरी २१ दिवसाच्या अंतराने २ वेळेस सोडावेत.
  8. फवारणीच्या पाण्याचा पी.एच. ६.५ ते ७ असावा.
  9. केवड्याच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील –मॅन्कोझेब (०.२%) किंवा सायमोक्झॅनील- मॅन्कोझेब (०.२%) किंवा फिनॅमिडन- मॅन्कोझेब (०.२५%) किंवा अझोक्जीस्ट्रॉबीन (२०० मिली/एकर) किंवा फेमॉक्झॅडोन + सायमोक्झॅनील (२०० मिली/एकर) किंवा क्रिसॉक्झीम येथील (२५० मिली/एकर) किंवा पायरॅक्लॉस्ट्र्रोबीन + मेटीरॅम (१.७५ ग्रॅम/लीटर) या बुरशीनाशकांच्या ५ फवारण्या छाटणीनंतर १२ दिवसांचे अंतराने आलटून-पालटून कराव्यात.
  10. भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८०% पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा डिनोकॅप ५ मि.ली १० लिटर पाण्यात किंवा ट्रायडेमिफॉन २५० ग्रॅम किंवा पेनकोनॅझॉल ५ मि.ली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

10. तसेच भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी नियोजन करावे.

फळ छाटणीनंतरचे दिवस औषधे  प्रमाण

४०     फ्लुजीलॅझोल ४० ई.सी    ०.१२५ मि.ली./लिटर

६०     पेनकोनॅझोल १० ई.सी + पोटॅशिअम बायकार्बोनेट    ०.५ मिली + ५ ग्रॅम/लीटर

७०     ट्रायडेमिफॉन २५ डब्ल्यू.पी. १ ग्रॅम/लीटर

८०     हेक्साकोनॅझोल ५ ई.सी + पोटॅशिअम बायकार्बोनेट    १ मि.ली + ५ ग्रॅम/लीटर

९०     मायक्लोब्युटॅनील १० डब्ल्यू. पी.   ०.४५ ग्रॅम/लिटर

१०५    अझोक्झीस्ट्रॉबीन २३ एस.सी      ०.५ मि.ली./लीटर

१२०    अझोक्झीस्ट्रॉबीन २३ एस.सी      ०.५ मि.ली./लीटर

तंत्र द्राक्ष लागवडीचे

मध्यम व हलक्‍या जमिनीत द्राक्ष वेलीची वाढ चांगली होते. जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा आणि क्षारता कमी असणे या गोष्टी द्राक्ष उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. जमिनीचे भौतिक गुणधर्म उदा. मातीचा पोत, मातीची रचना, खोली व पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याचबरोबर रासायनिक गुणधर्म (मातीचा सामू व क्षारता इ. घटक) तपासूनच द्राक्ष लागवडीचा विचार करावा.
नवीन द्राक्ष लागवडीचा कालावधी सुरू होत आहे. हे लक्षात घेऊन आतापासूनच नवीन लागवडीची पूर्वतयारी सुरू करायला हरकत नाही. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आताची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. द्राक्ष पिकातून चांगला नफा मिळवायचा असेल, तर लागवडीच्या नियोजनापासूनच योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते. द्राक्ष बाग उभारणीमध्ये हवामानाच्या परिस्थितीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे द्राक्ष लागवड करताना हवामानातील घटकांचा विशेषतः तापमान, सूर्यप्रकाश, पर्जन्यमान व सापेक्ष आर्द्रता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे.
1) तापमान
द्राक्षवेलीच्या वाढीकरिता उष्ण व कोरड्या हवामानाची आवश्‍यकता असते. घडाच्या पक्वतेच्या काळात येणारा पाऊस हानिकारक असतो. वेलीच्या वाढीच्या काळामध्ये तापमान 40 अंश से.पेक्षा जास्त वाढल्यास फलधारणेवर विपरीत परिणाम होतो, उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे फळछाटणीनंतर कमीत कमी तापमान 15 अंश से.च्या खाली आल्यास डोळे फुटण्यास अडचणी येतात.
2) पर्जन्यमान
अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये द्राक्ष लागवड अयोग्य ठरते. कारण खरड छाटणीनंतर सूक्ष्म घडनिर्मितीच्या काळात जास्त पाऊस असल्यास घडनिर्मिती होत नाही. फळ छाटणीनंतर जर बागेत जास्त पाऊस आला, तर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन बागेत नुकसान होते. फळपक्वतेच्या कालावधीमध्ये जर पाऊस झाला, तर मणी तडकण्याची विकृतीसुद्धा जास्त दिसून येते.
3) सापेक्ष आर्द्रता
बागेमध्ये पाण्याचा कमी – अधिक वापर व पाऊस यावर त्या वातावरणातील आर्द्रता अवलंबून असते. बागेत जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो, त्यामुळे द्राक्ष लागवडीकरिता जागेची निवड करताना सापेक्ष आर्द्रतेचा विचार करणे आवश्‍यक असते. बागेत हवा खेळती राहिल्यास आर्द्रता वाढणार नाही.

मातीसंदर्भातील घटक

द्राक्षबाग लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये शक्‍य होत असली, तरी मध्यम व हलक्‍या जमिनीत वेलीची वाढ चांगली होते. जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा आणि क्षारता कमी असणे या गोष्टी द्राक्ष उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. जमिनीचा भौतिक गुणधर्म उदा. मातीचा पोत, मातीची रचना, खोली व पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याचबरोबर रासायनिक गुणधर्म (मातीचा सामू व क्षारता इ. घटक) इत्यादी बाबींचा द्राक्षवेलीसाठी जमिनीची निवड करताना विचार करावा.
1) मातीचा पोत
मातीचा पोत ठरवताना त्यामध्ये वाळू व चिकनमातीच्या कणांचे प्रमाण विचारात घेतले जाते. त्यावरून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, कॅटायन विनिमय दर, निचरा व पाण्याचा जमिनीतील शिरकाव निश्‍चित होतो. वाळूच्या कणांचे जेवढे प्रमाण जास्त, तेवढे मातीमधील हवा खेळण्याचे प्रमाण, तसेच पाण्याचे वहन चांगले होते, निचरा चांगला होतो; परंतु या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. याउलट काळ्या चिकणमातीमध्ये पाणी चांगल्याप्रकारे धरून ठेवले जाते; परंतु पाण्याचा निचरा चांगला होत नाही, त्यामुळे द्राक्ष लागवडीसाठी या दोन्हींचा मध्य साधून मध्यम प्रकारच्या जमिनीची निवड योग्य ठरते.
2) मातीची रचना
मातीमधील कणांची रचना जमिनीची प्रतवारी (भारी, मध्यम व हलकी) या प्रकारामध्ये मोडते. भारी जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने इतर समस्या उद्‌भवतात, तर खूप हलक्‍या जमिनीत पाण्याच्या दुर्भिक्षाचे परिणाम जाणवतात, त्यामुळे द्राक्ष लागवडीसाठी मध्यम प्रकारच्या जमिनीची निवड करावी. या जमिनीत मुळांची वाढ अतिशय चांगल्याप्रकारे होते; तसेच पाण्याचा निचरा झाल्याने क्षारतेची समस्या लवकर उद्‌भवत नाही व उपचारांनी टाळता येते.
3) जमिनीची खोली
वेलीच्या मुळांचा विस्तार व वाढ यावर जमिनीच्या खोलीचा परिणाम होतो. खुंटांची मुळे जास्त खोलवर आणि लांबवर पसरत असल्याने कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करता येणे शक्‍य असते. भारी जमिनीत देखील खुंटाची मुळे पाच फुटांपर्यंत चांगल्या प्रकारे वाढलेली आढळून येतात; परंतु स्वमुळावरील वेलींच्या बाबतीत मुळांचा मुख्य विस्तार प्रामुख्याने दोन फुटांपर्यंत आढळून येतो. यामुळे जमिनीच्या खोलीचा विचार लागवडीच्या दृष्टीने आवश्‍यक असतो. कमी खोलीच्या किंवा वरच्या थरात कठीण खडक असलेल्या ठिकाणी चर घेऊन किंवा रिपिंग करून मुळांच्या विस्तारासाठी अनुकूल वातावरण तयार करणे शक्‍य असते.
जमिनीचा सामू
द्राक्षाची लागवड साधारणतः 6.5 ते 8.0 सामू असलेल्या जमिनीत आढळून येते. कमी किंवा जास्त सामुळे उपलब्ध होणाऱ्या अपायकारक घटकांचा परिणाम वेलीच्या वाढीवर होत असतो.
4) जमिनीची क्षारता
क्षारता ही मातीमध्ये उपलब्ध क्षारांच्या प्रमाणानुसार ठरविली जाते. यासाठी “विद्युत वाहकता’ या प्रमाणाचा वापर केला जातो. विद्युत वाहकता ही मिली मोज प्रति सेंटिमीटर या एककाने मोजली जाते. जमिनीत जेवढे क्षार जास्त, तेवढी विद्युतवाहकता वाढत जाते. चार मिली मोज प्रति सेंटिमीटरपेक्षा अधिक क्षार असलेल्या जमिनीस खार जमीन म्हणून संबोधले जाते. अशा प्रकारची जमीन द्राक्ष लागवडीसाठी पूर्णपणे अयोग्य असते. अधिक क्षारतेमुळे वेलीची वाढ खुंटते व पानांवर जळल्यासारख्या खुणा दिसून येतात. 
या सर्व गोष्टींचा विचार करूनच नवीन द्राक्ष बाग लागवडीचे नियोजन आणि आखणीस सुरवात करावी.

आधुनिक द्राक्ष लागवड :

********************

द्राक्षाचे मूळ स्थान रशियातील अरमेनिय जिल्हा आहे.

भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे.

महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर, ऊस्मानाबाद या जिल्ह्यांत द्राक्षाची सर्वांत जास्त लागवड आहे.

नाशिक, पिंपळगाव बसवंत, सांगली, तासगाव, उगाव, नारायणगाव, करकंभ – पंढरपूर, फलटण हा भाग उत्तम प्रतीच्या द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

द्राक्षाच्या लागवडीला औरंगाबाद, बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांतही तेथील अनुकूल हवामानामुळे भरपूर वाव आहे.

द्राक्षाचा उपयोग मुख्यत: तीन प्रकारे केला जातो.

पहिल्या प्रकारात द्राक्षे ताजी खाण्यासाठी (टेबल द्राक्षे ) वापरतात.

दुसर्‍या प्रकारात द्राक्षे वाळवून, टिकवून खाण्यासाठी वापरतात.

तिसर्‍या प्रकारात मद्य आणि इतर पेये बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो.

जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी ८० % उत्पादनाच वापर मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी केला जातो.

१०% द्राक्षे ताजी खाण्यासाठी

१०% मनुका तयार करण्यासाठी वापरतात.

भारतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यांतील द्राक्षे त्यांच्या उच्च प्रतीमुळे प्रसिद्ध आहेत.

द्राक्षाच्या पिकापासून सर्वांत जास्त आर्थिक लाभ होत असल्यामुळे इतर जिल्ह्यांतील द्राक्षाची लागवड वाढत आहे.

**जमिन :—

******

द्राक्ष हे पीक लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत १० ते १५ वर्षे राहणारे असल्याने योग्य जमिनीचे निवड करणे फार महत्त्वाचे असते.

या पिकासाठी मध्यम काळी, मध्यम खोलीची, चांगल्या निचर्‍याची, पोयटायुक्त, रेताड किंवा मुरमाड सुपिक अशा जमिनीची निवड करावी.

अगदी भारी काळ्या जमिनीत या पिकाची लागवड करणे टाळावे.

तसेच क्षारयुक्त जमिनी द्राक्ष लागवडीस अयोग्य आहेत.

कारण अंशा जमिनीमध्ये द्राक्ष वेलींची वाढ खुंटते व उत्पादनक्षमता कमी होते.

जमिनीचा सामू (pH) हा ६.५ ते ७.५ असावा.

जमिनीमध्ये क्षारतेचे प्रमाण १.०० पेक्षा अधिक नसावे.

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५० ते १ किंवा त्याहून अधिक असल्यास अती उत्तम समजावे.

**क्षारता :—

*******

मातीतील पाण्यात विद्राव्य स्थितीत असणारे क्षार जमिनीची क्षारता ठरवितात.

ह्या क्षारांचे प्रमाण मोजण्यासाठी विद्युत वाहकता ०.३ मि. म्हो./ सें.मी. पेक्षा जास्त असल्यास जमीन खार जमीन मानली जाते.

आणि आशी जमीन द्राक्ष लागवडीस योग्य ठरत नाही.

सोडियम व क्लोराईडचे प्रमाण द्राक्ष लागवडीत महत्वाचे ठरते.

तसेच सर्वसाधारण जमिनीमध्ये —

एकरी नत्र १५० ते १८० किलो,

मुक्त चुना (CaCO3) २ ते ४%,

तांबे (Cu) ०.३ ते २.५%,

लोह (Fu) ०.२० ते १.५%,

मंगल (Mn) ०.३ ते २.५ %,

जस्त (Zn) ०.०८ ते ०.८५%,

बोरॉन (B) ०.०२ ते ०.०८%,

मॉलीब्लेडम (Mo) ०.०१ ते ०.०५%, मॅग्नेशियम (Mg) २ ते ४% असावे.

**हवामान :—

********

द्राक्ष हे थंड हवामानातील पीक असल्याने अतिथंड हवामान जर असेल तरच द्राक्ष सुप्तावस्थेत जातात.

परिणामी पिकाची वाढ होत नाही.

मात्र आपल्या भागातील तापमान फारसे थंड नसल्याने त्याची वाढ समाधानकारक होते.

अधिक पावसामुळे व दमट हवामानामुळे या पिकाची वाढ चांगली होत नाही.

तसेच रोग किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

कमी पाऊस, कोरडी हवा आणि मध्यम तापमान असल्यास द्राक्ष वेलीची आणि फळांची वाढ चांगली होते.

फळे वाढीच्या काळात मध्यम तापमान, कोरडी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यास फळे निरोगी व आकर्षक राहतात.

फळातील साखरेचे प्रमाण वाढून आम्लतेचे प्रमाण कमी होते.

यासाठी वेलीची वाढ चांगली होण्यासाठी २५ से ३० डी. से. तापमान असावे.

तापमान जर ४० डी. से. च्या वर गेल्यास किंवा १० डी. से. पेक्षा खाली आल्यास वेलीची वाढ मंदावते.

बागेच्या निरोगी वाढीसाठी हवेत आर्द्रता ६० % पेक्षा कमी असणे अनुकूल ठरते.

आर्द्रता ८० % पेक्षा अधिक असल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

ऑक्टोबर ते मार्चचा काळ फलधारणेस, फळ पोसण्यास आणि फळांना गोडी वाढण्यास अनुकूल असतो.

ऑगस्ट – सप्टेंबर या काळात ढगाळ हवामान राहते, उष्णतामानही घटते.

त्यामुळे वेलींची वाढ खुंटते आणि वेलींना काही प्रमाणात विश्रांती मिळते.

द्राक्ष बाग फुलोर्‍यात असताना पाऊस पडल्यास फुलोर्‍याची गळ होते.

द्राक्षमण्यात पाणी फिरण्यास सुरुवात झाल्यापासून म्हणजेच द्राक्ष पक्व होण्यास सुरुवात झाल्यापासून पुढील काळात तापमानात खूपच वाढ होत असेल तर फळ पिकण्यावर त्याच अनिष्ट परिणाम होतो.

अधिक तापमानामुळे फळे पिकण्याची क्रिया लवकर होते.

परंतु त्यात साखरेचे प्रमाण कमी पडते.

ज्या भागात कडक उन्हाळा असतो, त्या भागात द्राक्षवेली उत्पादनक्षम होण्यास खरड छाटणी वेळेवर करावी.

कडक थंडी फार काळ टिकून राहिली तर कोवळ्या घडावर त्याच परिणाम होतो.

अगदी कोवळे घड थंडीमुळे सुकून जातात.

फळधारणेच्या क्रियेवर परिणाम होतो.

**यशस्वी लागवडीसाठी जमीन व

***************************

हवामानाच्या बाबतीत खालील दक्षता

*******************************

घ्यावी :—

*******

१) खरड छाटणीनंतर ४५ ते ६० दिवसांच्या कालावधीत सुर्यप्रकाशाचा दिवसातील कालावधी ८ तासांपेक्षा कमी नसावा.

२) ऑक्टोबर छाटणीनंतरच्या महिन्यात किमान तापमान १८ डी. से. पेक्षा कमी नसावे.

३) नवीन फूट फुटत असताना थंडीमध्ये बर्फाचे कण पडत असणारे ठिकाण नसावे.

४) घड तयार होत असताना दमट हवामान नसावे.

५) निवडलेल्या जमिनीत ९० सें. मी. पर्यंत कठीण थर नसावा.

६) जमिनीतील एकूण विद्राव्य क्षार ०.३ पेक्षा जास्त नसावेत.

७) मातीतील पाण्याच्या संयुक्त द्रावणात एक्चेंजेबल सोडीअमचे प्रमाण १५ पेक्षा जास्त नसावे.

८) मातीतील पाण्याच्या संयुक्त द्रावणात क्लोराईड ५० मिली / लिटरपेक्षा जास्त नसावे.

९) पाण्यात एकूण क्षार १५०० पी. पी. एम. पेक्षा जास्त नसावे.

१०) पाण्यात क्लोराईड १४०० पी. पी. एम. पेक्षा जास्त नसावे.

११) पाण्यात सोडीयम ३६० पी. पी. एम. पेक्षा जास्त किंवा सोडीयम अॅबसॉर्पशन रेशिओ काळ्या मातीत ८ आणि हलक्या मातीत १२ पेक्षा जास्त नसावे.

**नर्सरी तयार करणे :—

****************

द्राक्षाची लागवड ही द्राक्षाच्या छाटापासून केली जाते.

यासाठी आपणास हव्या असलेल्या उत्तम काड्या चांगल्या जोपासलेल्या निरोगी अशा बागेतून घ्याव्यात.

छाट वजनदार, निरोगी, पूर्ण पिकलेला, डोळे भरदार असलेला, असा हवा.

काडी फोफशी नसावी.

बागेला सातत्याने उत्तम माल आलेला असावा.

अत्यंत निरोगी काड्या घ्याव्यात.

कारण डेडआर्म सारखे रोग छाटांपासून नव्या बागेत घुसतात.

चांगले छाट हे वजनदार असून त्यांच्या वरची साल ही चिरटलेली असते.

अशा काड्या रसरशीत दिसतात.

या काड्या गोल आकाराच्या मध्यम पेराच्या ( ६ ते ८ सें. मी. लांबीच्या) टुपटुपीत डोळे असणार्‍या मध्यम जाडीच्या असतात.

कमकुवत, अन्नसाठा कमी असलेल्या काड्या घेऊ नयेत.

लांब पेराच्या फार जाड किंवा बारीक काड्या निवडू नयेत.

छाट ४ डोळ्यांचे घ्यावेत.

खालचा काप खालच्या डोळ्याजवळ सरळ घ्यावा.

वरचा काप तिरपा पण डोळ्याच्या विरुद्ध बाजूला अतरत जाणारा असा घ्यावा.

छाट घेण्याचे काम सावलीत करावे.

छाट घेतल्यानंतर सर्व छाट थंड जागेत ओल्या गोणपाटाखाली ठेवावेत.

शक्यतो श्वसन कमी होईल हे पहावे.

श्वसनात खर्च होणारा अन्नसाठा वाचविला पाहिजे.

काड्या किंवा छाट जास्त तापमानात बाहेर राहिल्यास त्यांतील ओलावा कमी होतो.

रस आटतो. रसाचा प्रवाह खंडित होतो. म्हणून काळजी घ्यावी.

**रोपवाटीका तयार करण्यासासाठी

****************************

जमीन बनविणे :—

**************

उत्तम निचरा असणारी, तण विरहित अशी जमीन निवडावी.

जमिन उत्तम नांगरून घ्यावी.

बारीक दगड वगैरे असतील तर वेचून काढावेत.

*त्यानंतर जमिनीत १ गुंठा क्षेत्रासाठी —

————————————————-

उत्तम कुजलेले शेणखत ५०० किलो + कल्पतरू सेंद्रिय खत ५ किलो + सुपरफॉस्फेट २० किलो +

१ किलो झिंक सल्फेट

व्यवस्थित मिसळून सर्वत्र सारखे विस्कटावे.

यातच २५ किलो निंबोळी पेंड मिसळावी.

याचबरोबर प्रोटेक्टंट + क्लोरेडेन डस्ट करून घ्यावे.

त्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी नांगरून, वखरून २ फुटावर सर्‍या पाडावयात.

जमिनीची बांधणी करून पाणी द्यावे.

**छाट कलमांची लागवड :—

********************

छाट कलमे लागवडीपुर्वी एक रात्रभर पाण्यात ठेवावीत.

तसेच मुळ्या फोडण्यासाठी लागवडीपुर्वी १०० मिली जर्मिनेटर + १० लि. पाणी या द्रावणात काड्या भिजवून लागवड करावी.

जमीन वाफशावर असताना (चिखल नसताना) जेव्हा मऊ असते. तेव्हा दोन डोळे जमिनीखाली जातील असे वरंब्याच्या बगलेत हलक्या हाताने दाबावे.

तिसरा डोळा जमिनीला लागेल इतकी काडी थोडीशी तिरपी लावावी.

हलक्या हाताने काडीच्या बुडाजवळील माती दाबावी.

अशा रितीने साधारण प्रत्येक वितावर वरंब्याच्या दोन्ही बाजूस काड्या लावून घ्याव्यात आणि हलके पाणी द्यावे.

दर ५ /६ दिवसांनी जमिनीचा वरचा १” थर वाळला की पुन्हा पाणी द्यावे.

योग्य तापमान असल्यास जवळ जवळ २ आठवड्यात डोळे उमलू लागतात.

साधारणपणे २० – २५ दिवसांनी वर छोटी पाने आणि खाली मुळ्या सुटायला लागतात.

या रोपालाच आपण ‘हुंडी’ म्हणतो.

डोळे उमसत असतांना त्यावर उडद्या किडीचा प्रादूर्भाव होत असतो.

म्हणून जवळच्या प्रोटेक्टंटचा वापर करावा.

‘कृषी विज्ञान’ केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारावीत.

याच वेळी बारीक पाऊस वगैरे लागून राहीला तर प्रोटेक्टंटसह क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट आणि बाविस्टिनची फवारणी घ्यावी.

**हुंडीची वाढ :—

***********

काड्या लावल्यानंतर साधारणपणे दीड महिन्याने वर पाने वाढीस लागतात.

वाढ काही काळ स्थिरावते आणि जमिनीत मुळ्या वाढावयास लागतात.

सुरुवातीला या मुळ्या वाढावयास लागतात.

सुरूवातीला या मुळ्या पांढर्‍या असतात.

लावणीनंतर ६० -६५ दिवसांनी ही मुळी वीत – दीड वीत इतकी ऐसपैस लांब होते.

या मुळ्या पांढर्‍या सुतळीसारख्या जाड होतात.

हळुहळु त्या रंग बदलून तपकिरी होतात.

या काळात खताचा ( नत्राचा ) डोस दिल्यास फूट जोरात वाढीस लागते.

मात्र मुळ्या कमकुवत राहतात.

म्हणून हा मोह आवरावा.

भरपूर कार्यक्षम, जोमदार मुळ्या येण्यासाठी जर्मिनेटर एकरी १ लि. मुळाशी २०० लि. पाण्यातून द्यावे.

एक बादली ताजे शेण + १ बादली मूत्र एकत्र करून त्याची ३ -४ बादल्या पाण्यात घालून रबडी करावी.

या रबडीत २ किलो युरिया + २ किलो सुपरफॉस्फेट + १०० ग्रॅम गूळ + १ किलो झिंक सल्फेट + १ किलो फेरस सल्फेट घालून ती २०० लि. बनवावी.

यांतील १ लिटर पाण्यात ९ लिटर पाणी घालून रोपांना बुडख्यात १/४ लि. (२५० मिली) प्रमाणात ओतावे.

याचे उत्तम परिणाम दिसतात.

यानंतर हुंडी वाढीचा २ रा टप्पा सुरू होतो.

हा टप्पा कलम लावल्यापासून २ ।। ते ४ महिन्यात येतो.

या काळात प्रथम मुळ्या तपकिरी होऊन त्यांत अन्नसाठा होण्यास सुरुवात होते.

काडीचा मुळचा भाग जाड होऊ लागतो.

नंतर या काडीवरची साल चिरटते.

अशी हुंडी भरपूर अन्नसाठा असलेली असते.

या हुंडीला ‘पक्की हुंडी’ म्हणतात.

या हुंडीची खालची पाने जाड व जून बनतात.

**कोवळ्या हुंड्यांची लागवड :—

************************

एप्रिल छाटणीतील काड्यापासून तयार केलेल्या हुंड्यांची लागवड सप्टेंबर अखेरीस करावी.

या हुंड्यांमध्ये अद्याप भरपूर असा अन्नसाठा नसतो.

मुळ्या कमीत कमी दुखावतील अशी लागण करणे महत्त्वाचे असते.

नर्सरीतून वाफशावर मुळ्या जादा न दुखावता काढाव्यात.

माती ढासळू द्यावी.

या मुळ्या वाळू देऊ नये.

शेतातच असल्यास लावण्यापूर्वी बादलीत पाण्यात बुडवून लावणीपर्यंत न्याव्यात.

लांबून आणावयाच्या असतील तर ओल्या (जर्मिनेटरच्या द्रावणात ) गोणपाटात गुंडाळून आणाव्यात.

*हुंडी लागवडीपूर्वी —

————————

१० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन त्या द्रावणात १० मिनिट भिजवून लागवड करावी किंवा ह्या द्रावणाचे लागवडीनंतर ड्रेंचिंग करावे.

हुंडी नवीन जागी बसविताना मुळांना लागणार्‍या जागेएवढा खड्डा वाफसा असतांना करावा.

त्या खड्ड्यात मुळ्या मूळ जागेप्रमाणे पसरून हळुहळु वाफशाची माती दाबून घ्यावी.

पाणी हलके द्यावे.

अशा हुंड्या बसवताना मुळींना जेवढा कमी मार बसेल तितक्या लवकर त्या टवटवीत होतात.

नंतर ८ -१० दिवसांनी वाढ होऊ लागते.

मात्र कडक तापमानामुळे वरची पाने सुकतात व वाळतात.

अशी पाने गेल्यास नवीन पाने येऊन ती पाने ३० -३५ दिवसांची होईपर्यंत हुंडीची उपासमार होते.

कारण हुंडीतील अन्न संपवूनच ही पाने येतात.

ऑगस्टमध्ये लावलेल्या हुंड्यांची परिस्थिती अशी झाली तर वरील कोवळी वाढ हमखास पावसात सापडून रोगग्रस्त बनते.

रोगामुळे पाने जातात.

पुन्हा नवी फूट येत राहते.

अशा रितीने अन्नसाठा कमी होऊन हुंड्या कमकुवत बनतात.

अशा हुंड्या सुधारणे फारच कठीण असते.

यासाठी सुरुवातीसच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम या २५० मिली औषधांची बुरशीनाशकासह १०० लि. पाण्यातून लागवडीनंतर ८ -८ दिवसांनी दोन फवारण्या घ्याव्यात.

त्याने हुंड्याची प्रतिकार शक्ती वाढून अन्नसाठा वाढेल.

तसेच हुंड्यांची प्रतिकुल हवामानातही जोमाने वाढ होईल.

काही ठिकाणी पावसाच्या शेवटी लागवड करतात.

एकंदरीत ही लागवड यशस्वी होते.

फेब्रुवारीमध्ये लावलेल्या हुंड्यांना मात्र नंतर वाढत्या तापमानाचे उष्ण कोरडे हवामान मानवते व या हुंड्या महिनाभरात त्यावरील पाने वयात आली असल्याने भरपूर अन्न बनवून जोमाने चाल घेतात.

ऑगस्ट व फेब्रुवारीमेध्ये लागवड केलेल्या हुंडीच्या वाढीतील हा हवामानाचा परिणाम समजून घ्यावा.

**पक्की हुंडी लागवड :—

*****************

किमान चार महीने वयाच्या शेवटच्या दीड महिन्यात कोवळी फूट न आलेल्या हुंडीत भरपूर अन्नसाठा असतो.

ऑक्टोबर लागवडीपर्यंत अशा हुंड्या वापरतात.

अशा पक्क्या हुंड्या लावताना तळातील मुळ्या काडीला जेथून मुळ्या फुटल्या आहेत, तेथून मुठीत धरून बाकीच्या कापून काढाव्यात.

व वरची काडी नवीन वाढीतील तपकिरी फुटीतील २ ते ३ डोळे ठेवून छाटून टाकावी.

अशा हुंड्या कायम जागी वाफशावर बसवाव्यात.

नेहमीप्रमाणे हुंडी वापशावर माती दाबून गच्च बसवावी.

म्हणजे माती दाबून घेतल्याने मुळांच्या भोवती पोकळी राहणार नाही.

नंतर हलकेसे पाणी द्यावे.

या हुंड्यांनाही वरीलप्रमाणेच वाफश्यावर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करावे.

अशा हुंडीत भरपूर अन्नसाठा असल्याने आणि जर्मिनेटरचा वापर केल्याने लावणीनंतर १० -१२ दिवसांत वर वाढावयास लागतात.

**ऑक्टोबर छाट कलम

******************

कायम जागी लावणे :—

*****************

या पद्धतीत जागेवरच द्राक्ष छाट बसवितात.

एका जागी ३ छाट ४” अंतराने बसवितात.

फेब्रुवारीत त्यांतील जोमदार एकच कलम राखावे.

संक्रांतीनंतर अशा लागणीची फारच काळजी घ्यावी लागते.

नांगे भरून घेणे हे पहिले काम आहे.

हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे.

फेब्रुवारीत लावण्यात येणार्‍या कोवळ्या हुंडीची चाल तशीच घ्यावी, तळात छाटू नये.

ऑगस्ट / ऑक्टोबरमध्ये हुंडी बसवून घेतलेली वाढ तशीच जमिनीवर पसरून द्यावी.

थंडीत ही वाढ आपोआप मंदावते.

फेब्रुवारीपर्यंत मुळीत भरपूर अन्नसाठा होतो.

काड्याही तपकिरी होतात.

ही वाढ तळांत २ डोळे ठेऊन छाटावी.

मात्र ऑक्टोबरमधील केलेली छाट कलमाच्या लागवडीमध्ये कोवळ्या हुंडीतील लागवडीत वाढ कोवळी असते, त्याकरिता तळात छाटू नये.

अशा रितीने लावणीच्या कोणत्याही पद्धतीत २।। ते ४ महिने करून घ्यावयाची वाढ जमिनीच्या वर करून न घेता जमिनीच्या खाली भरपूर मुळी येईल अशीच करावयाची असते.

अशी मुळी वाढावी. याकरिता जमीन आवळून आली असेल तर वरचेवर टाचण मारून ढिली करून घ्यावी.

याकरिता लावणीच्या वेळी आणि नंतर १ महिन्याने कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमीन भुसभुषीत राहून हवा, पाणी खेळते राहते.

अशा जमिनीत जास्तीत जास्त वाफसा राहिल असे पहावे.

तसेच जर्मिनेटरचे द्रावण महिन्यातून २ वेळा द्यावे.

नत्र देऊ नये.

तसेच नवी वाढ २ ते २।। महिन्याची होईपर्यंत वेलीतील अन्नसाठा संपत असतो.

हे लक्षात ठेवून त्याची जपणूक करावी.

यासाठी नवीन द्राक्ष लागवडीत लावणीनंतर पहिले ३ महिने मुळ्यांचीच वाढ करून घ्यावयाची असते.

हे यशस्वी लावणीचे पहिले सूत्र पूर्ण आत्मसात करावे.

पुढील वाढीचा हा पाया ठरतो.

यासाठी वरील खत व औषधांचा वापर फायदेशीर ठरतो.

**चाल घेणे :–

*********

वरीलप्रमाणे लावणीचे तंत्र नीट सांभाळले तर जानेवारी अखेरीस वेली चाल घेतात.

शेंड्याकडे रोज एक नवे पान व नवे पेर येणे या वाढीला ‘चाल’ असे म्हणतात.

*ही चाल —

१) जमिनीतील मुळ्यांच पसारा,

२) मुळ्यांनी साठविलेला राखीव अन्नसाठा,

३) योग्य तंत्रज्ञानाचा, खातांच पुरवठा,

४) वाफसा,

५) उष्णता

या गोष्टींवर अवलंबून असते.

वाढीसाठी योग्य तापमान महत्त्वाचे असते.

कमी तापमानात एन्झाईम्स काम करीत नाहीत.

खत घातले की वाढ झालीच पाहिजे अशी आपली गैरसमजूत असते.

प्रथम तापमान अनुकूल हवे.

त्यानंतर खत दिल्यास वेली खत वापरू शकतात.

थंडीत खते घालून वाढ मिळवता येत नाही.

तेथे डॉ. बावसकर तंत्रज्ञान ‘कृषी विज्ञान’ केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावे. म्हणजे अपेक्षीत रिझल्ट मिळतील.

जोरात येणारी चाल काही काळ मधेच थांबली तर त्याचे मुख्य कारण तापमान कमी होणे असते.

नाहीतर रोज एक पेर, एक पान अशी वाढ चालू राहते.

चांगली वाढ रोज ३ इंचापर्यंत होते.

ही वाढ रात्रीतून जास्त होते.

चाल घेतल्यानंतर येणारी पहिली पाने १” ते ४” रुंदीची असतात.

चांगली वाढलेली द्राक्षाची पाने ८” ते १०” रुंदीची असतात.

चाल घेतलेल्या रोपांना १।। फूटाजवळ बगल फुटी येऊ लागल्या पाहिजेत.

पहिली ३ इंचे ते १।। फूट वाढ गाठाळ चालते.

नंतरची वाढ लांब पेराची होणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे असते.

वेलीच्या शेंड्याकडील चार पेरानंतर पाचव्या पानाच्या बगलेत बगल फूट येते.

अशा बगल फुटी येऊ लागल्या तर त्या २ -३ पाने राखून खुडाव्यात.

सामान्यपणे वेल १।। फूट वाढल्यावर तळातून बगल फुटी वाढल्या पाहिजेत.

बगल फुटी येणे म्हणजे जमिनीत मुळी जोमदार वाढत आहे असे ओळखावे.

मुळींनी बनवलेल्या सायटोकायनीनमुळे या फुटींना वाढायला मदत होते.

चाल घेतलेल्या द्राक्षवेलींना वेळीच आधार द्यावा.

यासाठी प्रत्येक वेलाजवळ मजबूत बांबू वेलाच्या नैऋत्येकडे (दक्षिण – पश्चिम कोपरा) रोवावा.

वाढणारे वेल बांबूला बांधून ठेवण्याची एक पद्धत असते.

हे वेल वाढीच्या टोकांकडचा फुटभर भाग नेहमी झुकता ठेवीत, त्याखाली बांधत जावे.

वेल चाल घेण्याच्या आधी मांडव तयार हवा.

वेलीचा शेंडा खुडेपर्यंत त्याची जाडी पुरेशी जाड हवी.

म्हणजे निश्चित घड मिळतील.

म्हणून वेल भरत वाढत गेला पाहिजे.

३ फूट ते ५ फुटापर्यंतची वाढ जोरात झाली पाहिजे.

पहिल्या फुटांत ४ पानावर बगल फूट थांबवावी.

नंतरच्या फुटात ५ पानावर,

अशा रितीने ५ फुटपर्यंत वेल भरून घ्यावा.

पाच फुटानंतरचा शेंडा १५ -२० दिवस लोंबत टाकावा.

दरम्यान खोड जाड होते.

पायाच्या आंगठ्याप्रमाणे ते जाड झाले तर उत्तम पीक येईल.

पाच फुटाजवळ थांबविल्याने खोड चांगले भरते.

यानंतर ५ फुटावर टॉंपींग करताच जोरात फुटते.

त्याच्या वाढीसाठी नियमित अन्नपुरवठा या पानावाटे चालू राहतो.

टॉंपींग केल्यानंतर ज्या दोन फुटी जोमात वाढतात, त्या साधारण १।। फूट वाढल्यानंतर आडव्या तारेवर बांधून घ्याव्यात.

आणि त्यांची वाढ ८ -१० पानाची झाल्यावर ७ पानावर टॉंपींग करावे.

म्हणजे दोन्ही बाजूचे ओलांडे स्थिरावतात.

आणि त्यावरील १४ -१५ काड्या उत्तमप्रकारे वाढतात.

मे अखेरपर्यंत इतकी वाढ झाली तर बागेस निश्चित माल मिळतो.

**द्राक्ष बाग केव्हा लावणार :–

**********************

द्राक्ष उत्पादन निर्यातीच्या दृष्टीकोनातून करतेवेळी प्रामुख्याने त्या देशांमधील बाजारपेठेची माहिती मिळवून कोणत्यावेळी मागणीनुसार पुरवठा केल्यास विक्रीदर जास्त मिळेल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

साधारणत: दक्षिण आफ्रिका, चिली, ऑस्ट्रेलिया इ. देश अग्रेसर आहेत.

या देशांचा माल जानेवारीमध्येच युरोपीय देशामधील मार्केटमध्ये येत असल्यामुळे साहजिकच त्यांना मार्केटमध्ये खूप मागणी असते.

कारण जानेवारी ते मार्चमध्येच द्राक्षांना जास्त प्रमाणत मागणी असते.

आपल्याकडे द्राक्षाचा हंगाम मार्च ते मे पर्यंत चालतो.

परंतु जर का डिसेंबरअखेर किंवा जानेवारीमध्ये आपण द्राक्षे मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकलो तर आपल्या द्राक्षास प्रचंड मागणी राहिलेली आहे व राहणार आहे.

हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करणार्‍या अनेक द्राक्ष बागाईतदारांनी अनुभवले आहे.

तेव्हा या बाबी ध्यानात घेऊन द्राक्ष लागवड केल्यास अधिक फायदेशीर ठरणार आहे.

**द्राक्ष बाग लागवडीची पूर्वतयारी :—

****************************

द्राक्षबाग लागवडीपूर्वी मार्च – एप्रिलमध्ये उत्तम मशागत करून सध्या प्रचलित असलेल्या वाय (Y) पद्धती मांडवाची उभारणी करावी.

यासाठी लागवडीचे अंतर १०’ x ६’, १२’ x ६’ किंवा ९’ x ६’ निवडावे.

यापेक्षा लागवडीतील अंतर कमी – अधिक झाल्यास पुढे पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.

लागवडीतील अंतर अधिक झाल्यास काही ठिकाणी असे आढळले आहे की, जमिनीच्या सुपीकतेनुसार काही काळाने वेलीच्या शेंड्याचा जोर कमी होत जातो.

परिणामी ५ -६ वर्षानंतर द्राक्षामध्ये सौरजळ होण्याचा संभव असतो.

द्राक्ष लागवडीसाठी निवडलेल्या अंतरावर चर किंवा नांगराने खोल तास मारावे.

चर किंवा खोल तास घेण्याचे कारण म्हणजे द्राक्षाची उत्पादकता व कार्यक्षमता ही द्राक्षाच्या मुळांच्या कार्यावर अवलंबून असते.

जेवढी द्राक्षाच्या झाडांची मुळे खोलवर पसरतील तेवढी उत्पादकता व कार्यक्षमता जास्त वर्षापर्यंत चालू राहते.

नांगराच्या तासापेक्षा चर खोल असल्याने ते अधिक फायदेशीर ठरतात.

चर साधारणपणे २।। x २।। फूट किंवा ३ x ३ फुटाचे घ्यावेत.

नांगराने तास एवढे खोल जात नसल्याने अशा तासांमध्ये लागवड केल्यावर ३ फुटाखालील थर कडक असल्याने मुळ्याची वाढ त्याच्या खाली होण्यास अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे ५ -७ वर्षानंतर वर्षानुवर्ष बागांची उत्पादकता घटत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र सर्वांनाचा चर घेणे जमेल असे नसल्याने कमीत कमी नांगराने खोल तास मारून लागवड करावी.

द्राक्ष हुंडी तयार केलेली असल्यास खड्डे घेऊनही लागवड करणे सोईचे व फायदेशीर ठरते.

यासाठी खड्डे २ x २, २।। x २।।, किंवा ३ x ३ फुटाचे घ्यावेत.

**चर / खड्डा भरणे :—

****************

*चर घेतल्यानंतर त्यामध्ये एकरी —

——————————————-

२० टन चांगले कुजलेले शेणखत + २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे.

शेणखत कमी प्रमाणात असल्यास कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस त्या प्रमाणात वाढवावा.

*तसेच या खतासोबत —

—————————–

१५० ते २०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट,

५० किलो मॅग्नेशियम सल्फेट,

५० किलो फेरस सल्फेट,

२५ किलो झिंक सल्फेट,

५ किलो बोरॅक्स,

२५ किलो फॉलीडॉंल डस्ट

या प्रमाणात वापरावे.

खत देताना अर्धी मात्रा मातीत मिसळून चर किंवा खड्डे भरून घ्यावेत.

व उरलेली अर्धी मात्रा चराच्या किंवा खड्ड्याच्या तोंडाशी द्यावी.

त्यानंतर पाण्याने चर/ खड्डे ओलावून घ्यावेत व वापसा आल्यानंतर चराच्या ( ओळीत ) मध्यभागी दोरीने खुणा कराव्यात.

या ठिकाणी हुंडी बसेल एवढे खड्डे घ्यावेत.

निरोगी, जोमदार, मुळे भरपूर असलेली पन्हेरी निवडून ती लागवडीच्या वेळी जर्मिनेटर १०० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅम + १० लि. द्रावणात या प्रमाणात भिजवून (बुडवून) घेऊन लावावी.

तसे शक्य झाले नाही तर हेच द्रावण हुंडी लागवडीनंतर प्रत्येक हुंडीवरून ५० मिली द्रावण ( ड्रेंचिंग करावे ) ओतावे.

हुंडी लागवडीनंतर खड्डा उकरलेल्या मातीने हुंडी दाबून बसवावी व हलके पाणी द्यावे.

**जाती :—

******

महाराष्ट्रात सुरुवातीला भोकरी, फकडी आणि बंगलोर पर्पल या जाती लागवडीखाली होत्या.

नंतरच्या काळात अनाबेशाही, काळी साहेबी आणि चिमा साहेबी या जातींची लागवड झाली.

या सर्व जाती आता मागे पडल्या असून थॉम्पसन सीडलेस, किशमिश चोर्नी, फ्लेम सीडलेस, तास ए- गणेश, सोनाका या जातींची लागवड सर्वांत जास्त प्रमाणात केली जात आहे.

**काही प्रमुख जातींची माहिती

***********************

खाली दिलेली आहे :—

*****************

१) थॉम्पसन सीडलेस :—

****************

भारतात या जातीची लागवड व्यापारी तत्त्वावर फार फायदेशीर ठरलेली आहे.

द्राक्षाच्या बिनबियांच्या जातींमध्ये उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन देणारी ही जात आहे.

या जातीचे उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन असून घड मध्यम, भरगच्च मण्यांनी भरलेला असतो.

परंतु मण्यांचा आकार लहान असतो.

मण्यांचा आकार वाढविण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी आणि जिब्रेलिक अॅसिड यांचा वापर केल्यास घडाचे वजन जवळजवळ दुप्पट वाढते.

साखरेचे प्रमाण २० ते २२% असल्यामुळे बेदाणे करण्यास या जातीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जोतो.

२) अनाबेशाही :—

***********

भारतात ही जात प्रसिद्ध असून आंध्र प्रदेशात हैद्राबाद सभोवतालच्या प्रदेशात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

या जातीचे हेक्टरी उत्पादन २० ते २५ टनांपर्यंत असून घडाचा आकार मध्यम, मणी मोठे, टपोर्‍या आकाराचे, फिकट पिवळ्या रंगाचे असतात.

यात साखरेचे प्रमाण १५ ते १६ % असून साल जाड, चिवट आणि गर घट्ट असतो.

ही जात वाहतुकीला सोयीची असल्यामुळे भारतात सर्व राज्यांत पाठविण्यास चांगली आहे.

३) गुलाबी :—

*******

या जातीला मस्कती स्वाद असून ही जात रस तयार करण्यासाठी चांगली आहे.

घड निमुळत्या आकाराचे असून मणी मध्यम आकाराचे आणि काही मणी बिनबियांचे असतात.

घडामध्ये मणी विरळ भरलेले असून मणी एकसारख्या आकाराचे नसतात.

मणी एकाच वेळी पक्क होत नाहीत.

या जातीचे हेक्टरी उत्पादन ८ -१० टन येते.

४) बंगलोर पर्पल :—

************

काळ्या गुलाबी रंगाच्या द्राक्षांत ही जात प्रसिद्ध आहे.

हेक्टरी उत्पादन २० ते ३५ टन येत असल्यामुळे व्यापारी दृष्ट्या या जातीखालील क्षेत्र जास्त आहे.

या जातीवर करपा रोग येत नसल्यामुळे पावसाळी प्रदेशातील लागवडीस योग्य आहे.

मणी गोलाकार, मोठा असून रंग लालसर काळा असतो.

साल जाड, गर घट्ट आणि साखरेचे प्रमाण १८% असून द्राक्षाची प्रत तितकी चांगली नाही.

या जातीचा वापर प्रामुख्याने मद्य तयार करण्यासाठी करतात.

५) काळी साहेबी :—

************

या जातीचा घड मोठा असून घडात काळ्या रंगाचे लांबट मणी विरळ असतात.

ही जात उशिरा तयार होणारी असून साखरेचे प्रमाण १८ -२०% असते.

मणी एकाच वेळेला पक्क होत नाहीत.

६) फकडी :—

*******

ही जुनी जात असून घड मोठ्या आकाराचे परंतु विरळ मण्यांनी भरलेले असतात.

साल नाजूक व पातळ असून प्रतीला फारशी चांगली नाही.

मात्र रसाकरिता चांगली जात आहे.

७) तास – ए – गणेश :—

**************

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे ही जात थॉम्पसन सीडलेस जातीमधूनच निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली.

या जातीचे घड घट्ट नसून मणी आकाराने लांब, सोनेरी रंगाचे व साठवणुकीस योग्य असतात.

८) सोनाका :—

********

ही जात नानज, जिल्हा सोलापूर येथे थॉम्पसन सीडलेस या जातीमधून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली.

या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे पानांचे देठ तांबूस असून मणी १ ते १.५ इंच लांबीचे, टपोरे, पातळ सालीचे असतात.

मण्यांचा रंग पिवळसर तांबूस असून देठ मजबूत असल्यामुळे वाहतुकीस योग्य अशी जात आहे.

साखरेचे प्रमाण २४ ते २६% असल्यामुळे बेदाणे करण्यास चांगली जात आहे.

९) किशमिश चोर्नी :—

**************

या जातीस शरद सीडलेस नावानेही ओळखले जाते.

मूळची ही जात रशियन असून रंगाने काळी आणि बिनबियांची आहे.

लवकर तयार होणारी ही जात मनुके करण्यासाठी उत्तम आहे.

१०) फ्लेम सीडलेस :—

*************

ही जात काळ्या रंगाची (पूर्ण पिकल्यावर) व बिनबियांची आहे.

लवकर तयारी होणारी गोड अशी ही जात थोड्या काळात लोकप्रिय झाली आहे.

या जातींव्यतिरिक्त मद्यनिर्मितीसाठी काही खास जातींची लागवड शँपेन/इंडेज वाइन्स यांनी नारायणगाव परिसरात केली आहे.

त्यात चारडोणी पिनो वळा, मेरलाट, कॅबरनेट या जातींचा समावेश आहे.

( स्तोत्र :- Facebook )

टोमॅटो लागवड ( Tomato Lagvad )

महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडीखाली अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो  पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो  पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो  मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व अनन्‍य साधारण आहे. टोमॅटो  अ, ब आणि क जीवनसत्‍वे तसेच खनिजे चुना, लोह इत्‍यादी पोषक अन्‍नद्रव्‍येही टोमॅटो मध्‍ये पुरेशा प्रमाणात असतात.

टोमॅटोची कच्‍ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोशिंबीरीसाठी वापरली जातात. तसेच टोमॅटोच्‍या पिकलेल्‍या फळांपासून सुप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्‍युस इत्‍यादी पदार्थ बनविता येतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्‍व वाढलेले आहे.

हवामान

टोमॅटो  हे उष्‍ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्‍ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अति थंडी पडल्‍यास टोमॅटोच्‍या झाडाची वाढ खुंटते. तपमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो. 13 ते 38 सेल्सियस या तापमानास झाडाची वाढ चांगली होती. फूले आणि फळे चांगली लागतात. रात्रीचे तापमान 18 ते 20 सेल्सियस दरम्‍यान राहिल्‍यास टोमॅटो ची फळधारणा चांगली होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपिन हेक्‍टरी रंगद्रव्‍य 26 ते 32 सेंटिग्रेडला तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते. तापमान, सुर्यप्रकाश आणि आद्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्‍या वाढीवर होतो. 20 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्‍वच्‍छ सुर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्‍के आर्द्रता असेल त्‍यावेळी  टोमॅटो  पिकाचे चांगले उत्‍पादन मिळते.

  • 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असले तर पिकाची वाढ खुंटते.
  • 16 अंश ते 29 अंश सेल्सिअस असले तर बी उगवण चांगली होते.
  • 21 अंश ते 24 अंश सेल्सिअस असले तर पिकांच्या वाढीस अनुकूल असते.
  • 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस असले तर फुले व फळधारणा चांगली असते.
  • 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास फळधारणा होत नाही.

जमिन

टोमॅटो  पिकासाठी मध्‍यम ते भारी जमिन लागवडी योग्‍य असते. हलक्‍या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्‍याचा निचरा चांगला होतो. आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पवुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्‍याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्‍यम प्रतिचा म्‍हणजे 6 ते 8 असावा.

पूर्वमशागत

शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखारणी द्यावी. जमिनीत हेक्‍टरी 30 ते 40 गाडया शेणखत मिसळावे लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 60 ते 90 सेमी व दोन रोपातील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे. खरीप व हिवाळी हंगामासाठी 90 बाय 60 सेमी अंतरावर व उन्‍हाळी हंगामासाठी 60 बाय 45 सेमी अंतरावर लागवड करावी.    .

हंगाम

खरीप – जून, जूलै महिन्‍यात बी पेरावे.

रब्‍बी ( हिवाळी हंगाम) सप्‍टेबर, ऑक्‍टोबर मध्‍ये महिन्‍यात बी पेरावे.

उन्‍हाळी हंगाम – डिसेंबर, जानेवारी महिन्‍यात बी पेरावे

बियाण्‍याचे प्रमाण – हेक्‍टरी टोमॅटो  पिकाचे 400 ते 500 ग्रॅम बी लागते.

सुधारीत वाण

महाराष्‍ट्रात लागवडीच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त टोमॅटोचे वाण खालीलप्रमाणे आहे.

पुसा रूबी : तीनही हंगामात घेता येते. लागवडीनंतर 45 ते 90 दिवसांनी फळे काढणीस येतात. फळे मयम चपटया आकाराची गर्द लाल रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 325 क्विंटल

पुसा गौरव : ही जात झुडूप वजा वाढणारी आहे. फळे लांबट गोल पिकल्‍यावर पिवळसर लाल रंगाची होतात. वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 400 क्विंटल

पुसा शितल : हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्‍य जात असून फळे चपटी गोल लाल रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल

अर्का गौरव : फळ गडद लाल मांसल व टिकावू असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल पर्यंत

रोमा : झाडे लहान व झाुडपाळ असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्‍याने वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 25 टन.

रूपाली, वैशाली, भाग्‍यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली डवार्फ इ. जातीची लागवड केली जाते.

लागवड

रोपे तयार करण्‍यासाठी बियांची पेरणी गादी वाफयावर करावी. गादी वाफा तयार करण्‍यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्‍या 2, 3 पाळया देऊन जमिन भुसभूशीत करावी. गादी वाफा हा 1 मी. रूंद 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा. गादी वाफयात 1 घमेले शेणखत 50 ग्रॅम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास 3 ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे. बियांची पेरणी ही वाफयाच्‍या रूंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्‍यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे. वाफयास झारीने पाणी द्यावे. बी उगवून आल्‍यानंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळीत काकरी पाडून प्रति वाफयास 10 ग्रॅम फोरेट द्यावे. वाफे हे तणविरहीत ठेवावेत. फूलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणाकरिता 10 लिटर पाण्‍यात 12 ते 15 मिली मोनोक्रोटोकॉस व 25 ग्रॅम डायथेन एम 45 मिसळून बी उगवल्‍यानंतर 15 दिवसांनी फवारावे. नंतरच्‍या दोन फवारण्‍या 10 दिवसाच्‍या अंतराने कराव्‍यात. बी पेरणीं पासून 25 ते 30 दिवसांनी म्‍हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्‍यावर रोपांची सरी वरंब्‍यावर पुर्नलागवड करावी. रोपे उपटण्‍यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्‍ध होतात.  रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्‍याकाळी किंवा उन कमी झाल्‍यावर करावी.

रासायनिक खते

सरळ वाणांसाठी 200-100-100 व संकरीत वाणांसाठी 300-150-150 किलो नत्र, स्‍फूरद पालाश या प्रमाणात खत द्यावे. अर्धा नत्र लागवडीच्‍या वेळी व उरलेला लागवडीनंतर 40 दिवसांनी द्यावे.

पाणी व्‍यवस्‍थापन

रोपांच्‍या लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे. आणि त्‍यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पावसाळयात टोमॅटो  पिकास 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने तर हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्‍या अंतरानी व उन्‍हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांच्‍या अंतरानी रोपांना पाणी द्यावे. भारी काळया जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पिक फूलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्‍वाचे आहे. अन्‍यथा फूलगळ, फळे तडकणे, या सारख्‍या नुसकानी संभवतात. उन्‍हाळयात टोमॅटो  पिकाला पारंपारिक पध्‍दतीने पाणी दिल्‍यास 77 हेक्‍टर सेमी पाणी लागते. तर ठिबक सिंचनाने पाणी दिल्‍यास 56 हेक्‍टर सेमी पाणी लागते. ठिबक सिंचनामुळे पाण्‍याची 50 ते 55 टक्‍के बचत होऊन उत्‍पन्‍नात 40 टक्‍के वाढ होते.

आंतरमशागत

नियमित खुरपणी करून तण काढून टाकावेत. खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्‍यावी.  जेणेकरून त्‍याचा उत्‍पन्‍नावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

लागवडीसाठी जमीन तयार करणे

जमीन उभी व आडवी खोलवर नागरून घ्यावी जमिनीत कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. जमिनीत गवताच्या काड्या, हारळीच्या काश्या चांगल्याप्रकारे वेचुन घ्याव्या. भारी जमिनीत 90 ते 120 सें.मी. अंतरावर, व हलक्या जमिनीत 60 ते 75 सें.मी. अंतरावर स-या पाडून जमिनीचा उताराप्रमाणे वाफे पाडून घ्यावेत.व लागण करण्याच्या वेळी दोन रोपामधील अंतर 45 ते 60 सें.मी. इतके ठेवावे.

टोमॅटो रोपाची लागवड

टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना 8 ते 10 दिवस अगोदर पाणी देऊन वाफवा स्थितीत ठेवावे.

रोपांची लागवडीच्या दिवशी वाफ्यांना परत पाणी द्यावे, वाफ्यात पाणी असतानाच रोपाची लागवड करावी.

वाकडे, चपटे.मुळे नसलेली व कोमावलेली रोपांची लागवड करू नये.

लागवड केल्यानंतर 2-3 दिवसांनी पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन

लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे व त्यानंतर 2-3 दिवसात आंबवणीचे पाणी द्यावे.

पिकाच्या सुरूवातीला पाणी जास्त प्रमाणात झाल्यास पानांची व फाद्यांची वाढ जास्त होते. त्यामुळे पिकाला फुल येईतोपर्यंत पाणी अंदाजे 60 दिवसांपर्यंत द्यावे. ठिबक संचाच्या साहाय्याने पिकाला पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करून नियमात पाणी द्यावे.फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळण्याची समस्या निर्माण होते.

टोमॅटोच्या झाडांना आधार देणे

लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी झाडांची वाढ झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात वाढतात त्यामुळे त्यांना बांबु, सुतळी व तार च्या साहाय्याने झाडाला बांधुन आधार दिला जातो.

जमिनीतल्या सरीच्या दोन्ही बाजूला 6 ते 8 फुट उंचीचे लाकटी बांबु जमिनीत खोलवर रोवावे.व जमिनीपासुन 1 मीटर अंतरावर दोन्ही खांबावर तार ओढून घट्ट बांधून बांबुना आधार द्यावा.

झाडाची उंची 30 सें.मी. झाल्यानंतर झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधुन ती तारेला बांधावी.

बागेला वळण आणि आधार देणे

टोमॅटो  पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्‍यामुळे त्‍यांना आधाराची आवश्‍यकता असते. आधार दिल्‍यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्‍याशी संपर्क येत नाही.  त्‍यामुळे फळे सडण्‍याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात. टोमॅटोच्‍या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो. 1. प्रत्‍येक झाडाजवळ दिड ते दोन मीटर लांबीची व अडिच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्‍या वाढीप्रमाणे काठीला बांधत जावे. 2. या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठयांचा वापर करून ताटी केली जाते. आणि आा ताटयांच्‍या आधारे झाडे वढविली जातात. सरीच्‍या बाजूने प्रत्‍येक 10 फूट अंतरावर पहारीने दर घेऊन त्‍यात दिड ते दोन मीटर उंचीच्‍या आणि अडिच सेमी जाडीच्‍या काठया घटट बसवाव्‍यात सरीच्‍या दोन्‍ही टोकांना जाड लाकडी दाम बांधाच्‍या दिशेने तिरपे रोवावेत. प्रत्येक डांबाच्‍या समोर जमिनित जाड खुंटी रोवून डाम खुंटीशी तारेच्‍या साहारूयाने ओढून बांधावेत. त्‍यानंतर 16 गेज ची तार जमिनीपासून 45 सेमी वर एका टोकाकडून बांधत जाऊन प्रत्‍येक काठीला वेढा आणि ताण देऊन दुस-या टोकापर्यंत ओढून घ्‍यावे अशा प्रकारे दुसरी 90 सेमी वर व तिसरी 120 सेमी अंतरावर बांधावी. या तारेंना रोपांच्‍या वाढणा-या फांद्या सुतळी किंवा नॉयलॉनच्‍या दोरीने बांधाव्‍यात. टोमॅटोचे खोंड मजबूत करण्‍यासाठी झाडाला वळण देणे आवश्‍करतात.क असते.

रोग व किड

रोग

करपा : हा रोग झाडाच्‍या वाढीच्‍या कोणत्‍याही अवस्‍थेत येऊ शकतो. रोगामध्‍ये पाने देठ खोड यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात.

उपाय : डायथेम एम 45, 10 लिटर पाण्‍यात 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारावे. फवारणी दर 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.

भुरी : पानाच्‍या खालच्‍या बाजूस पांढरे चटटे पडतात. आणि पानाचा

रोग व किड

  • करपा = हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. या रोगामध्ये पाने देठ खोड यावर तपकिरी ठिपके पडतात.

नियंत्रण = मॅन्कोफेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा टेब्युकोनॅझोल 10 मि.लि. प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी.

  • फळे पोखरणारी अळी = ही अळी पाने खाते. हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते.

नियंत्रण = क्विनॉलफॅास 20 मि. लि.प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

  • नागअळी = ही अळी पानांच्या पापुद्र्यामध्ये जावुन हिरवा भाग खातात.

नियंत्रण = निंबोळी अर्कच्या 2 ते 3 वेळा फवारणी करावी. किंवा अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्टीन 4 मि .लि. प्रति 10 लिटर पाण्यात टाकुन फवारणी करावी.

फळाची तोडणी

पुर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे तोडावीत. पंरतु बाजारासाठी लागणारी फळे निम्मी लाल व निम्मी हिरव्या रंगाची तोडावी.

फळाची तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावी.

तोडणी अगोदर 3 ते 4 दिवस किटकनाशकाची फवारणी करू नये.

काढलेली फळे सावलीत आणावी व त्याची आकारानुसार वर्गवारी करावी.तडा गेलेली, खराब फळे बाजुला काढावीत.

अद्रक आले लागवड (Adrak Lagvad Ale Lagvad )

जमीन

आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी २५टन मिसळावे.

लागवड कशी व केंव्हा करावी

लागवड एप्रिल – मे महिन्यांत पूर्ण करावी. लागवडीसाठी माहीम, रिओ-डी-जानेरो, कालिकत इत्यादि जाती निवडाव्यात. लागवडीसाठी हेक्‍टरी १८ ते २० क्विंटल बेणे लागते. बेणे २५ते ४५ ग्रॅम वजनाचे असावे, डोळे फुगलेले असावेत. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे. यासाठी २० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ईसी) +१५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५०%डब्लू.पी.) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून यामध्ये बेणे २० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. लागवडीपूर्वी हेक्‍टरी दोन टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. लागवड करताना ९० सें.मी. रुंदीचे आणि २५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून २२.५ X २२.५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. हेक्‍टरी १२० किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये द्यावे. यासाठी पहिला हप्ता लागवडीनंतर दीड महिन्याने, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता एक महिन्याच्या अंतराने द्यावा. लागवडीच्या वेळी स्फुरद ७५ किलो आणि पालाश ७५ किलो द्यावे. आवश्‍यकतेनुसार आंतरमशागत करावी. आले पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे. आल्यावर कंदमाशी, पाने खाणारी अळी, रसशोषण करणाऱ्या किडी, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा, तसेच करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीड व रोग नियंत्रण करावे. लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यांत आले पीक काढणीला येते. हेक्‍टरी १५ ते २० टन आल्याचे उत्पादन मिळते.

हवामान : उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते.लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होते.वाढीसाठी सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता.साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते.

जमीन :चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य.नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य.हलक्‍या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी.लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्‍यतो टाळाव्यात.कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन.जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते.

जाती : ज्या भागात हे पीक घेतले जाते, त्या भागाच्या नावावरून जात ओळखली जाते. उदा. कालिकत, कोचीन, आसाम, भारत, उदयपुरी, औरंगाबादी, गोध्रा इ.राज्यात माहिम जातीची लागवड केली जाते.काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओ-डी-जानरो, चायना, मारन जमेका या जातींचा समावेश आहे.

वरदा : कालावधी : २०० दिवस., तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के.सरासरी ९ ते १० फुटवे,  रोग व किडीस सहनशील.सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के,  उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २२.३ टन. 

महिमा : कालावधी : २०० दिवस,  तंतूचे प्रमाण : ३.२६ टक्केसरासरी १२ ते १३ फुटवे, सूत्रकृमीस प्रतिकारकसुंठेचे प्रमाण :१९ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २३.२ टन

रीजाथा : कालावधी : २०० दिवस , तंतूचे प्रमाण : ४ टक्केसुगंधी द्रव्याचे प्रमाण : २.३६ टक्के, सरासरी ८ ते ९ फुटवेसुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के,सरासरी उत्पादन :प्रतिहेक्‍टरी २२.४ टन

माहीम : महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात, कालावधी : २१० दिवसमध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, ६ ते १२ फुटवेसुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २० टन

पूर्वमशागत :लागवडीपूर्वी जमिनीची एक फुटापर्यंत खोल उभी, आडवी नांगरट करावी.१ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हे पीक जमिनीत १८ महिन्यांपर्यंत राहत असल्यामुळे जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी.जमिनीतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्‍या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड-गोटे वेचून काढावेत.शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्‍टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.  स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.

लागवडीच्या पद्धती :  सपाट वाफे पद्धत :पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत.सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.

सरी वरंबा पद्धत :मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी.लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वरती सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी.दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.

रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत :काळ्या जमिनी, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.. या पद्धतीमध्ये १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते.जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गादी वाफ्याची) लांबी ठेवावी.१२० सें.मी. वरती सरी पाडून घ्यावी म्हणजे मधील वरंबा ६० सें.मी. रुंदीचा होईल.दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ६० सें.मी. सोडावी.या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्यावरती २२.५ सें.मी. x २२.५ सें.मी. अंतराने लागवड करावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवड :लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. यानंतर लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी.मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत.बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे.हेक्‍टरी २५ क्विंटल बियाणे लागते. लागवड करताना कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावा. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो, त्याची चांगली वाढ होते.जर डोळा खाली आणि आतल्या बाजूला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यावी.

बीजप्रक्रिया : बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी  क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणि कार्बेन्डाझिम (५० टक्के) १५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. २० मिनिटानंतर बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.बियाणे प्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.

तणनाशकाचा वापर : लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ४ ते ५ ग्रॅम ॲट्राझीन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ४ ते ५ मि.लि. ग्लायफोसेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उगवण सुरू झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्‍यतो टाळावा.

खत व्यवस्थापन : या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्‍यकता असते.संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत.हेक्‍टरी १२० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.नत्र खताचा निम्मा हप्ता आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी हेक्‍टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने हेक्‍टरी ३७.५ किलो पालाश दोन वेळा मिसळावे.

पाणी व्यवस्थापन :लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती पद्धतीने केली जाते. तर कमी पावसाच्या प्रदेशात पाणी देऊन केली जाते.सुरवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो.लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या-चौथ्या दिवशी लगेच द्यावे.पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.पावसामध्ये १० ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे.हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.पाणी व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतींचा वापर करावा.गादीवाफा पद्धतीने लागवड करावी.एका गादीवाफ्यावर एक ठिबक सिंचनाची नळी टाकून दोन लिटर तास पाणी देणाऱ्या तोट्या बसवाव्यात.जमिनीच्या मगदुरानुसार ठिबक सिंचन संच सुरवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ-संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.

आंतरमशागत :तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी खुरपणी करावी.उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावी. यासाठी लांब दांड्यांच्या खुरप्याने माती हलवली जाते. यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतूमय मुळे फुटतात. पिकास पाचव्या ते सहाव्या महिन्यात फुले येतात. त्यास हुरडे बांड असे म्हणतात.उशिरात उशिरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यास सुरवात होते. उटाळणी केली नाही, तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते.उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.

आंतरपिके : पीक २५ टक्के सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू, मिरची, तूर, गवार यांसारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

संजीवकांचा वापर : उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरिया व नॅप्थील ॲसेटिक ॲसिडचा वापर ६० आणि ७५ व्या दिवशी शिफारसीप्रमाणे करावा फवारावे.फुटव्याच्या संख्या वाढविण्यासाठी २०० पी.पी.एम. प्रमाणात इथेफॉनच्या ७५ व्या दिवसांपासून १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

कीड नियंत्रण कंदमाशी :माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. अळ्या उघड्या गड्ड्यांमध्ये शिरून त्याच्यावर उपजिविका करतात.

नियंत्रण : क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि.किंवा डायमिथोएट १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्टदरम्यान आलटून-पालटून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.फोरेट (१० टक्के दाणेदार) प्रति  हेक्‍टरी २५ किलो या प्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे. पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे.याच कीटकनाशकाचे पुढील दोन हप्ते एक महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत.अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये.जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून द्यावेत.

पाने गुंडाळणारी अळी :ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर दुसऱ्या आठवड्यापर्यंत किडींचा प्रादुर्भाव दिसतो.किडीची अळी हिरवट रंगाची असून, ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते. आत राहून पाने खाते.

नियंत्रण :गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. डायक्‍लोरव्हाॅस १० मि.लि. किंवा कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खोड पोखरणारी अळी :जुलै ते ऑक्‍टोबरमध्ये आढळते. अळी छोट्या खोडाला छिद्र करून उपजीविका करते, त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरवात होते. अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.एक महिन्याच्या अंतराने १० मि.लि. मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

सूत्रकृमी :मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज प्रादुर्भाव होतो.लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी पाच किलो ट्रायकोडर्मा प्लस शेणखत मिसळून द्यावे.प्रति हेक्‍टरी फोरेट (१० जी) २५ किलो याप्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे किंवा १८ ते २० क्विंटल निंबोळी पेंड जमिनीत मिसळून द्यावी.

रोगनियंत्रण 

कंदकूज (गड्डे कुजव्या) :हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये दिसतो.प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होऊन कंद कुजण्यास सुरवात होते.लागवड करताना निरोगी बियाण्याचा वापर करावा. हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करावा.मेटॅलॅक्‍झिल (८ टक्के) + मॅन्कोझेब (६४ टक्के)  हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रतिलिटर किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) एक ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बीजप्रक्रिया करावी.शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशकांची आलटून – पालटून फवारणी करावी. लागवडीच्यावेळी प्रतिहेक्‍टरी पाच किलो ट्रायकोडर्मा प्लस शेणखतातून मिसळून द्यावे.

पानावरील ठिपके :रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.२५ ते ३० ग्रॅम मॅंन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी.  हवामान परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

काढणी आणि उत्पादन :पीक ७५ टक्के परिपक्व झाल्यानंतर काढणी करता येते.हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी सहा महिन्यांनी करावी.विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागवडीनंतर आठ महिन्यांनंतर पुढे काढणी करावी.शक्‍यतो बाजारातील मागणीप्रमाणे काढणी करावी.गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.पाला कापून गड्डे, बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावीत.काढणीनंतर कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत. त्यानंतर बाजारात पाठवावेत.  उत्पादन :   प्रतिहेक्‍टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १५ ते २३ टन.

द्विहंगामी पीक : उत्तम निचऱ्याची जमीन असेल, तर आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून  द्विहंगामी पीक घेता येते.याचे उत्पादन पहिल्या वर्षीपेक्षा दीडपट ते दुप्पट मिळते. पाने सुकल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पिकास पाणी द्यावे.साधारणतः अडीच ते तीन महिन्यांनंतर पुन्हा नवीन फुटवे फुटू लागतात.

बियाण्यांची साठवण :काढणीनंतर असणाऱ्या जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी बियाणे रचून साठवण करावी.काढणीनंतर निवडलेल्या गड्डे बियाणे २० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) आणि १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यात १० ते १५ मिनिटे बुडवावे. त्यानंतर ते सावलीत सुकवावे.प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चर खणून किंवा खड्ड्यात केली असता उगवण क्षमता चांगली राहते.बियाण्याच्या गरजेनुसार सावलीत आवश्‍यक तेवढ्या लांबी-रूंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे याची खात्री करावी.खड्ड्याच्या तळाला एक इंच जाडीचा वाळूचा थर टाकावा.खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा, वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्यांची साठवण करावी.खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे.खड्ड्यातील आले व फळी यामध्ये थोडे अंतर सोडावे. त्यामुळे खड्ड्यात हवा खेळती राहते. अशा प्रकारे साठविलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता चांगली राहते.पत्रा, सिमेंट अगर कौलारू छप्पर असलेली बंद खोली बियाणे साठवण्यासाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यांत आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब असलेले आले बियाण्यांसाठी वापरावे.बियाण्यांच्या वजनामध्ये २५ ते ३० टक्के घट येते.

वाळलेले आले, सुंठ आणि पावडर : वाळलेले आले किंवा सुंठ तयार करण्यासाठी वापरावयाचे आले हे पीक परिपक्व झाल्यानंतरच काढणी करावी. ते पूर्ण वाढलेले निरोगी असावे. कुजके, सडलेले, अपरिपक्व आले सुंठीसाठी वापरू नये. आले अधिक तंतूमय असू नये.सुंठ तयार करण्यासाठी जमेका, चायना, रिओ-डी-जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतूमय असणाऱ्या जातींचा वापर करावा.वाळलेले आले प्रथम आले चांगले स्वच्छ धुवून घ्यावे. ते मूळविरहीत असावे.स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून ठेवावे.दुसऱ्या दिवशी त्याच्यावरील साल बांबूच्या टोकदार कडाने चिवट्याने खरडून काढावी.स्वच्छ पाण्यात आले धुवून काढावे. साल काढलेले आले ७ ते ८ दिवस उन्हात चांगले वाळवावे. वाळवताना एक ते दीड इंचापेक्षा जाड थर देऊ नये.आले सुकविण्यासाठी स्वच्छ प्लॅस्टिकचा किंवा ताडपत्रीचा वापर करावा.वाळविताना वरचेवर आल्यामध्ये हात फिरवावा.सायंकाळी पसरलेले आले गोळा न करता ताडपत्रीने झाकून घ्यावे, म्हणजे धुक्‍याने काळपट पडत नाही.पाण्याचा अंश आठ ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत कमी आल्यानंतर आले पूर्ण वाळले असे समजावे. पूर्ण वाळल्यानंतर आले परत एकदा हाताने चोळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या आल्यास वाळवलेले आले किंवा चुन्याची प्रक्रिया न केलेले आले असे म्हणतात. वाळलेले आले थंड आणि कोरड्या जागेत साठवावे.वाळलेल्या आल्याचे उत्पादन ओल्या आल्याच्या २० ते २५ टक्के इतके असते. हे उत्पादन आल्याच्या वाणानुसार बदलते.

सुंठ  :  सुंठ तयार करण्याची मलबार पद्धती : प्रथम आले स्वच्छ निवडून ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवावे.त्यानंतर त्याची साल काढून घ्यावी. साल काढलेले आले दोन टक्के चुन्याच्या द्रावणात  ६ ते ७ तास भिजत ठेवावे.हे आले छोट्या बंद खोलीत पसरून ठेवून आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी द्यावी. (एक किलो कंदाला ६ ते १० ग्रॅम या प्रमाणात गंधकाची धुरी द्यावी.)कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवावेत. परत १२ तास गंधकाची धुरी द्यावी.  अशा प्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढराशुभ्र रंग येतो.प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये पाण्याचा अंश ८ ते १० टक्के राहेपर्यंत वाळवावे. गोणपाटामध्ये घालून स्वच्छ करावे.हे आले सुंठ म्हणून बाजारात विकले जाते.

सुंठ तयार करण्याची सोडा खार मिश्रण पद्धती : सर्वप्रथम स्वच्छ आले निवडून ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढावी.त्यानंतर हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या १.५ × २ फूट आकाराचा गॅल्व्हनाईज जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे.तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडियम हायड्रॉक्‍साइड याची २० टक्के, २५ टक्के आणि ५० टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणामध्ये कंदाने भरलेला पिंजरा २० टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, २५ टक्के द्रावणामध्ये एक मिनिट आणि ५० टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनिट धरावा.त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ॲसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर आले चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवावे.चांगले वाळविल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते.पद्धतीने तयार केलेल्या सुंठेला परदेशात चांगली मागणी आहे.

पावडर : चांगले वाळलेल्या आल्याची बारीक पावडर तयार करावी.ही पावडर ५० ते ६० मेशच्या चाळणीमधून चाळावी. त्यानंतर पावडर हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरावी.पावडरीचा उपयोग ओलिओरेझिन, तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.

आले पिकाचा आढावा : जगाच्या २२ टक्के उत्पादन भारतात, ७८ टक्के इतर देशांमध्ये उत्पादन.चीन, नेपाळ, इंडोनेशिया, जमैका, नायजेरिया, सीरिया, थायलंड, जपानमध्ये आले लागवडीचे क्षेत्र.देशातील ८० टक्के आले लागवड क्षेत्र दक्षिणेकडील राज्यात.देशातील उत्पादनाच्या १२ टक्के निर्यात. ८८ टक्के उत्पादनाचा वापर देशामध्ये.राज्यात आले लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी; परंतु अनुकूल हवामान आणि जमीन पाहता लागवडीस मोठा वाव.देशाच्या उत्पादकतेपेक्षा राज्याची उत्पादकता कमी, त्यामुळे उत्पादकता वाढवण्यास वाव.सातारा, औरंगाबाद, पुणे, रायगड जिल्ह्यांमध्ये लागवड.

स्रोत :- ऍग्रोवन

मल्चिंग पेपर चे फायदे (Mulching Paper Fayde Marathi)

मल्चिंग पेपरचे फायदे :-त्यामुळे पाण्याची बचत होते आणि बाष्पीभवन थांबल्याने क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण कमी होते, कमी पाण्याच्या वापरामुळे खतांचे प्रमाण देखील कमी होते. मल्चिंग फिल्म मुळे जमिनीत हानीकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो आणि तणाच्या वाढीस प्रतिकार होतो कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही.

बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि बाष्पीभवन थांबल्याने क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण कमी होते, कमी पाण्याच्या वापरामुळे खतांचे प्रमाण देखील कमी होते. मल्चिंग फिल्म मुळे जमिनीत हानीकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो आणि तणाच्या वाढीस प्रतिकार होतो कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. प्लास्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी रोग दूर जातात. मल्चिंग फिल्म जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यात कार्बोन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते. मल्चिंग फिल्म मुळे पिकाची उगवण २-३ दिवस लवकर होते. भुईमुगासारख्या पिकाकरीत मल्चिंग फिल्म वापरल्यास मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते आणि सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते.मल्चिंग फिल्ममुळे पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते. इतर छटांच्या प्लास्टिक च्या तुलनेत काळे प्लास्टिक बरेच महत्वाचे फायदे देतात. तण नियंत्रणासाठी काळे प्लास्टिक एक उत्कृष्ठ मटेरियल आहे. गडद रंग सूर्यप्रकाशास बाहेर काढतो ज्यामुळे किरण तणलेल्या रोपांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे त्यांना पुढील वर्षासाठी तण उपटणी प्रक्रियेस आणखी मदत करेल. ज्यांना आपले बागकाम हंगाम वाढवायचे आहेत त्यांना हे जाणून घेण्यास आनंद होईल कि मातीचे तापमान वाढवण्यासाठी काळी प्लास्टिक अत्यंत प्रभावी आहे. हे दवापासून उत्कृष्ठ रक्षणकर्ता बनू शकते.

मल्च फिल्मची निवड कशी करावी-

मल्चिंग पेपर हे वेगवेगळ्या रंगांमध्ये,  आकारामध्ये असतात.  रंग, जाडी,  आकार इ. गोष्टींचा विचार करून पिकांच्या गरजेनुसार मल्चिंग पेपरची निवड करावी लागते.  उदा.  भुईमूग पिकासाठी जर मल्चिंग पेपर वापरायचे ठरवले तर सात मायक्रॉन जाडीचा पेपर वापरायचा असतो.  एक वर्षाच्या कालावधीची पिके असतील तर २० ते २५ पंचवीस मायक्रॉन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे असते.  मध्यम कालावधीच्या पिकांसाठी ४० ते  ५०  मायक्रॉन जाडीचा व बहुवार्षिक पिकांसाठी  ५०  ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे असते.

काळी प्लास्टिक फिल्म

काळी प्लास्टिक फिल्म जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते तसेच पिकांमध्ये तनवाढीला नियंत्रित करते. बागायती शेतांमध्ये या फिल्म चा वापर केला जातो.

अपारदर्शक फिल्म/ सिल्वर फिल्म

अपारदर्शक फिल्म जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यास चांगला करते तसेच पिकांमध्ये तनवाढीला नियंत्रित करते.

पारदर्शक फिल्म

हि फिल्म जमिनेचे सोलरायझेशन करण्यास मदत करते. थंडीच्या मौसमात शेती करताना या फिल्म चा वापर होतो.

मल्चिंग फिल्म खरेदी कशी करावी ?

बाजारामध्ये खूप कंपन्याचे चांगला मल्चिंग पेपर मिळतात पण फिल्म खरेदी करताना स्वस्तात फिल्म देणाऱ्या कंपन्यांना बळी पडू नका. अपारदर्शक किंवा काळी फिल्म खरेदी करताना तिला सूर्यप्रकाशाच्या दिशेने धरावे जर तिच्यातून सूर्यप्रकाश आरपार झाला तर अशी फिल्म खरेदी करू नये. सध्या बाजारामध्ये लाल, निळ्या अशा विविधरंगी फिल्म मिळतात पण या फिल्म खरेदी करण्याचा मोह टाळावा. शक्यतो याऐवजी काळी किंवा सिल्वर फिल्म खरेदी करावी.

मल्चिंग फिल्म चा वापर करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी

प्लास्टिक फिल्म हि सकाळी किंवा सायंकाळी अंथरावी आणि अंथरताना ती जास्त ताणू नये किंवा सैल देखील सोडू नये. फिल्म मध्ये रोपासाठी छेद करताना सिंचन नलिकेची जागा लक्षात घ्यावी. छेद करताना ते एकसमान आकाराचे असावेत आणि छेद करताना फिल्म फाटणार नाही याची काळजी घ्यावी. मल्चिंग फिल्म चा पुनर्वापर होतो म्हणून तिला फाटण्यापासून वाचवावे आणि गुंडाळताना रोल मध्ये गुंडाळून सुरक्षित ठेवावी.

  मल्चिंग पेपर कसा वापरावा

  • ज्याठिकाणी किंवा ज्यापिकासाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे. त्यावेळी प्रथम संबंधित पिकासाठी लागणारे बेड व्यवस्थित तयार करावे.
  • बेड तयार करताना माती,  दगड, काडी कचरा काढून स्वच्छ माती युक्त बेड तयार करावे.
  • बेड तयार केल्यानंतर संपूर्ण बेड व्यवस्थितपणे ओले करावे व चांगला वापसा आल्‍यानंतर पेपर बेडवर व्यवस्थितपणे अंथरावा त्यामुळे हवा इत्यादी घटकांचा प्रभाव न होता बाष्पीभवन रोखले जाते.  
  • विविध पिकांच्या लागवड अंतर वेगवेगळे असते त्या लागवड अंतरानुसार पेपरचे अंतर ठरवली जाते.
  • आपल्याला जेवढा पेपर आवश्यक आहे,  तेवढा पेपर व्यवस्थित कापून घ्यावा.

मल्चिंग पेपर वापरतांना घ्यावयाची काळजी

 मल्चिंग पेपर अंथरतांना सर्वात जास्त लक्ष तापमानावर द्यायचे म्हणजे उन्हाचे प्रमाण जास्त असेल व वातावरणात तापमान जास्त असेल तर अशावेळी पेपर अंथरू नये. कमी ऊन असताना शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पेपर अंथरावा.

पेपर फिल्मला छिद्रे पाडत असताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. कारण छिद्रे पाडत असताना ठिबक नळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मल्चिंग पेपरला छिद्रे पाडत असताना ते छिद्रे एक समान असावेत व छिद्रे पाडतांना पेपरला छिद्र पडू नये याची काळजी घ्यावी.  शक्यतो छिद्र पाडताना ते मलचिंग ड्रिलच्या साह्याने पाडावे. त्यामुळे छिद्र एकसारखे  व पेपर ही फाटत नाही.

 पाणी देण्याची पद्धत

 बेडवर मल्चिंग पेपर अंथरल्या पूर्वी ठिबक च्या नळ्या टाकाव्यात कारण बऱ्याचदा भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचनाची आवश्‍यकता असते.  भुईमूग सारख्या पिकांसाठी तुषार सिंचनाचा वापर करू शकतात.

   मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे

  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे आपल्याला उपलब्ध पाण्यात नियोजन करावे लागते. मल्चिंग पेपर असेल तर पाण्याचे बाष्पीभवन पूर्णतः थांबते व पाण्याची बचत होते. त्यामुळे बाष्पीभवनामुळे जमिनीच्या वरच्या भागात होणारे क्षारांचे संचयन थांबते.
  • खतांच्या एकूण मात्रेत बचत होते कारण मल्चिंग पेपरमुळे खत पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
  • जमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ थांबते.
  • मल्चिंग पेपरमुळे तण वाढू शकत नाही कारण पेपरमुळे तळापर्यंत सूर्य प्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तणांची वाढ होत नाही व त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होते.
  • मल्चिंग पेपर आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अधिक असते.
  • मातीला व पिकांना आवश्‍यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.
  • जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात उगवण दोन-तीन दिवस लवकर होते.
  • भुईमुगाचा सारख्या पिकात मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते.
  • पावसाळ्यात पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.

 त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्चिक असलेल्या मल्चिंग पेपरचा वापर करून अधिक उत्पादन वाढ करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकावे जेणेकरून कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न मिळेल

मल्चिंग प्रयोग फळबागेत

औरंगाबाद- बीड परिसरात मोसंबी व डाळिंब उत्पादकांनी यंदाच्या भीषण दुष्काळात सेंद्रिय व प्लॅस्टिक मल्चिंगद्वारे आपली पिके जगवण्याचा प्रयत्न केला, त्यातून हिरवाई टिकवली व आर्थिक आधाराची आशाही पल्लवीत झाली.

बीड महामार्गावरील सांजखेडा हे पिंप्री राजा मंडळातील गाव. मोसंबीचे आगार समजल्या जाणाऱ्या भागातील हे गाव आहे. मोसंबीची बाग म्हणजे पाणी भरपूर आहे असे म्हटले जाते. सुकना मध्यम प्रकल्पाचा कॅनॉलही जवळून वाहतो, त्यामुळे हे पीक भरभराटीस आले; मात्र या वर्षी दुष्काळाच्या झळा या गावातील मोसंबी उत्पादकांनाही बसल्या. विहिरीचे पाणी आटले. कॅनॉल तर वर्षाच्या सुरवातीपासूनच कोरडा होता. खरीप व रब्बी पाण्याअभावी वाया गेला. मोठ्या कष्टाने जगविलेल्या बागा नष्ट होताना पाहणे दुःखकारक होते. अशा वेळी कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी आणि पैठण तालुक्‍यातील देवगावचे जय जवान जय किसान शेतकरी मंडळ पुढे आले आणि बागा जगविण्याच्या प्रयत्नाला सुरवात झाली. 

शेतकऱ्यांकडून दोन- तीन वर्षांपासून शेततळ्यांतील पाण्याचा वापर फळबागांसाठी व्हायचा; मात्र या वर्षी पाऊसच इतका कमी झाला, की विहिरींचा तळ उघडा पडला, त्यामुळे शेततळ्यांत भरण्यासाठी पाणीच राहिले नाही. मिळेल तेथून पाणी विकत आणण्याचा व त्यातून पिके जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागले. मात्र, पाणी कुठपर्यंत विकत घ्यायचे व ते पुढे विकत मिळेलच याची शाश्‍वती नव्हती.


आच्छादनाचा पर्याय निवडला


कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फळबागांना मल्चिंग (आच्छादन) करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मल्चिंगचे महत्त्व समजावून देण्यात आले. यात दोन प्रकारचे म्हणजे सेंद्रिय पदार्थांचे व प्लॅस्टिकचे (पॉलिमल्चिंग) आच्छादन शेतकऱ्यांनी वापरले.


सेंद्रिय आच्छादन


शेतातीलच गवत, काडी कचरा, बाजरीच्या बनग्या व अन्य प्रकारचा पालापाचोळा शेतकऱ्यांनी सेंद्रिय आच्छादन म्हणून वापरला. दुपारच्या वेळेस झाडाची सावली जमिनीवर जिथपर्यंत पडते तेथपर्यंतचा भाग आच्छादनाने झाकला. त्याखाली वाळवीसारख्या किडींचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून थोडे फोरेट टाकले. ठिबकवरच आच्छादन होते, त्यामुळे तेथे पडणारे पाणी हे जमीन व त्यालगतचे आच्छादन सतत ओले ठेवू लागले. जमीन थंडगार राहू लागली. झाडाच्या सर्व मुळ्यांना पुरेशी ओल मिळू लागली. पाऊस कमी असल्याने पाहिजे तेवढे गवत वा काडी कचरा उपलब्ध झाला नसला तरी शक्‍य तेवढे सेंद्रिय पदार्थ शेतकऱ्यांनी वापरले.


प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय


ज्यांच्याकडे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध नव्हते अशांनी प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय स्वीकारला. औरंगाबाद, जालना, नाशिक जिल्ह्यातून प्लॅस्टिक आणले. चार फूट रुंदी व 1300 फूट लांबी असलेले प्लॅस्टिकचे प्रत्येक बंडल होते. मोसंबीच्या जुन्या झाडांना आच्छादन करताना किमान दहा फूट रुंद व दहा फूट लांब असे चौकोनी प्लॅस्टिक आच्छादणे गरजेचे होते. मात्र, ठिबक असल्याने झाडाच्या दोन्ही बाजूस आच्छादन केले तरी त्याचा उपयोग होणार होता, त्यामुळे चार फुटांचा पट्टा दोन्ही बाजूस अंथरला. ठिबकची नळी आच्छादनाखाली येईल अशी काळजी घेतली.


मल्चिंगचे असे केले नियोजन


ठिबक सिंचन करताना झाडाच्या चार कोपऱ्यांत पाणी पडते. प्लॅस्टिक आच्छादन करण्यापूर्वी जेथे पाणी पडते, तेथे सहा बाय सहा इंच आकाराचा खड्डा घेऊन त्यात एक घमेले शेणखत भरले. ठिबकच्या मायक्रोट्यूबमधून पाणी पडेल अशा प्रकारे नळ्या अंथरूण घेतल्या. त्यावर चार बाय दहा फूट आकाराचा प्लॅस्टिक पेपर एका बाजूने अंथरला. प्लॅस्टिक उडून जाऊ नये म्हणून त्याच्या कडा चोहोबाजूने मातीने दाबून टाकल्या. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूनेही प्लॅस्टिक अंथरूण घेतले. शेणखत टाकल्यामुळे पाणी जास्त काळ धरून ठेवले जाते. ज्यांची मोसंबीची झाडे लहान आहेत, त्यांनी चार बाय दहा फूट आकाराचे प्लॅस्टिक संपूर्ण झाडाभोवती अंथरूण घेतले. 

प्लॅस्टिक पेपरची एक बाजू चंदेरी रंगाची (सिल्व्हर), तर एक बाजू काळी आहे. चंदेरी बाजू वरच्या दिशेने राहील अशा प्रकारे पेपर अंथरला. ही बाजू वरच्या दिशेने असल्याने सूर्यकिरणे परावर्तित होण्यास मदत होऊन प्लॅस्टिक कमी प्रमाणात तापते, त्यामुळे पाण्याची वाफ कमी प्रमाणात होते, त्यामुळे पाण्याची बचत होते. 

काहींनी आच्छादन करण्यापूर्वी एका विशिष्ट पॉलिमरचा वापर केला, त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची शक्ती चांगल्या प्रकारे आहे. पॉलिमरसाठी आलेला खर्च पाणी विकत आणण्यापेक्षा काही पट कमी होता.


झाडाची कळी खुलली


आच्छादनाचा परिणाम दृष्टिपथास येऊ लागला. झाडाच्या मुळ्यांभोवती सतत ओलावा टिकून राहू लागला. आठ दिवसांनी द्यावयाची पाण्याची पाळी पंधरा दिवसांनी देणे शक्‍य झाले. झाडाभोवतालची जमीन सतत वाफसा स्थितीत राहिल्यामुळे पांढऱ्या मुळींची वाढ झाली. आच्छादनाखाली सतत ओलावा राहिल्याने गांडुळांची संख्या वाढली. झाडाच्या पोषणास योग्य वातावरण निर्माण झाल्याने झाडाची कांती टवटवीत झाली.


पिकाचे सुयोग्य नियोजन


झाडावर बहर असला तर पाण्याची गरज जास्त असते. अशा वेळी तेवढे पाणी देणे शक्‍य नसल्याने फळे मर्यादित ठेवण्यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण ठेवले. जास्तीच्या फांद्याही काढून झाडाची पाण्याची गरज कमी केली. झाडे जगवणे हेच महत्त्वाचे होते. मोसंबीला दर दिवशी सरासरी 80 ते 140 लिटर पाण्याची गरज असते; मात्र ठिबक सिंचनाद्वारे जास्तीत जास्त एक तासभर पाणी देता येऊ शकत असल्याने प्रति झाड आठ ते नऊ लिटर पाणी देण्यात आले.


डाळिंबासाठी प्लॅस्टिक पट्टा


डाळिंबाची झाडे मोसंबीच्या तुलनेत जवळ- जवळ असतात, फांद्या एकमेकांना भिडल्या जातात, त्यामुळे ज्या ठिकाणी डाळिंबाचे झाड येईल, तेवढ्या भागापुरते प्लॅस्टिक गोल कापून संपूर्ण गादीवाफाच प्लॅस्टिकने झाकून टाकला. डाळिंबाला प्रति झाड 20 ते 50 लिटर पाणी प्रति दिवस लागते. आच्छादनामुळे तीन दिवसांनंतर देण्यात येणारी पाण्याची पाळी आठ दिवसांनंतर देणे शक्‍य झाले. 

मलचींग पेपर बद्दल शेतकऱ्यांने दिलेल्या प्रतिक्रिया

मोसंबी व डाळिंबाच्या झाडांना प्लॅस्टिक आच्छादन करण्यासाठी प्रति हेक्‍टरी 30 ते 35 हजार रुपये, तर अंथरण्यासाठी 4000 रु. खर्च आला. 
 

तीन वर्षांची डाळिंबाची झाडे असून, एक वेळ उत्पादन घेतले आहे. 50 गुंठे क्षेत्रातून या वर्षी आठ टन उत्पादन मिळाले. प्लॅस्टिक मल्चिंगसाठी 20 हजार रु. खर्च आला. डाळिंबासाठी एक तास व शेवग्यासाठी अर्धा तास ठिबक चालविले. प्लॅस्टिक आच्छादनामुळे दर तीन दिवसांनी देत असलेले पाणी पाच दिवसांनंतर दिले तरी जमिनीत ओल पुरेशी राहिली. 

मोसंबीची आठ वर्षांची झाडे असून, त्यासाठी पाणी विकत आणून द्यावे लागले. मोसंबीच्या दोन्ही बाजूला 19 x 4 फूट आकाराचे प्लॅस्टिक आच्छादन केले. त्यापूर्वी शेणखत टाकले. त्यामुळे मोसंबीखाली सतत ओलावा टिकून राहिला. पांढऱ्या मुळींची वाढ झाली. गांडुळांची संख्या वाढली. झाडे हिरवीगार झाली. 

मोसंबीची काही झाडे आठ वर्षांची, तर काही दोन वर्षांची आहेत. टॅंकरने पाणी विकत आणून झाडे जगविताना एका टॅंकरसाठी 1500 रु. खर्च येतो. एका वेळेस चार टॅंकर मागवावे लागतात. दुष्काळी परिस्थितीत हा खर्च परवडणारा नाही. विहिरीत कमी पाणी असून ते किती दिवस टिकेल याची शाश्‍वती नाही. अशा वेळेस प्लॅस्टिक आच्छादनाने थोडीशी आशा जागविली. 
 

अकरा वर्षांच्या मोसंबीच्या व एक वर्षाच्या डाळिंबाच्या बागेत प्लॅस्टिक मल्चिंग केले. त्यापूर्वी चार टॅंकर पाणी विकत आणून टाकावे लागायचे. नंतर दोनच टॅंकर पाणी प्रत्येक आठवड्याला विकत घ्यावे लागेल अशी वेळ आली. पाण्याची बचत झाल्याचे आढळले.