विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
हयूमिक पॉवर (95% विरघळणारे ह्युमिक अॅसिड किमान 60% ह्युमिक अॅसिड)
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना: 95% विरघळणारे ह्युमिक अॅसिड किमान 60% ह्युमिक अॅसिड म्हणून
डोस: 15 ग्रॅम/पंप किंवा 250 ग्रॅम/एकर
अर्ज करण्याची पद्धत: फवारणी किंवा ठिबकमधून देणे
स्पेक्ट्रम: मुळांची वाढ आणि विकास करते, अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढवते.
सुसंगतता: सर्व खतासोबत सोबत उपयुक्त
प्रभाव कालावधी: 30 दिवस
अर्जाची वारंवारता: 1 वेळ
लागू पिके: सर्व पिकांसाठी
अतिरिक्त वर्णन: वापरानंतर शेतात लगेच पाणी देणे गरजेचे
विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो शेवगा लागवड करण्यासाठी बरेच शेतकरी इच्छुक असतात मात्र त्याबद्दल शास्त्रशुद्ध असे मार्गदर्शन प्रत्तेकलाच उपलब्ध होत नाही आज तुम्हाला याचबद्दल वाचायला मिळणार आहे.
शेवगा या पिकाची पाने फुले व शेंगा यांची भाजी करतात शेवग्याच्या पानांचा रस कीटक चावल्यास आणि अल्सर करिता वापरतात शेवग्याच्या पानांपासून शक्तिवर्धक पेये तयार करतात शेवग्याच्या शेंगा मध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट तसेच कॅल्शिअम लोह व फॉस्फरस ही खनिजे असतात तसेच अ व क जीवनसत्त्वे असतात शेवग्याच्या शेंगा मधील जीवनसत्वामुळे रातांधळेपणा ची आणि लोहामुळे अशक्तपणाचे प्रमाण कमी होते म्हणून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा वापर करणे आवश्यक आहे शेवग्याची लागवड जून-जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये केली जाते शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो शेवग्या साठी हलक्या ते भारी जमिनीची लागवडीसाठी आवश्यकता असते तसेच मध्यम व सकस जमिनीत शेवग्याची पीक चांगले येते
शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या हलक्या, माळरान, डोंगर-उताराच्या जमिनीत करता येते. लागवडीसाठी कोइमतूर-1, कोइमतूर-2, पीकेएम-1, पीकेएम-2 आणि कोकण रुचिरा या जाती निवडाव्यात. लागवड फाटे कलम किंवा बियांपासून करावी. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत शेवग्याची लागवड करावी. लागवड करताना दोन झाडातील अंतर 4 मीटर बाय 4 मीटर किंवा 5 मीटर बाय 5 मीटर ठेवावे.
लागवडीसाठी 60 सें.मी. बाय 60 सें.मी. बाय 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये खड्डा भरताना तळाशी कुजलेला काडी-कचरा, गवत, पाचट यांचा थर द्यावा. तसेच शेणखत एक घमेले, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व माती या मिश्रणाने खड्डा भरावा. पिकाला गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यांनी शेंगउत्पादन सुरू होते.
शेवगा लागवड करण्यासाठी हवामान
शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते सर्वसाधारणपणे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते तसेच तापमान 40 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते
जमीन
शेवग्याची लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते पावसाचे प्रमाण चांगली असलेल्या डोंगर उतारावरील हलक्या जमिनीत शेवगा चांगला येतो मध्यम व सकस जमिनीत व समतोल अन्नद्रव्य दिलेल्या जमिनीत शेवग्याची पीक चांगले येते
जाती
याल पानम्
ही जात भारतात श्रीलंकेतून आणली आहे श्रीलंकेत या जातीची लागवड समुद्रकिनारपट्टीत करतात या जातीच्या शेंगा दोन ते तीन फूट लांब मांसल व अतिशय चवदार असतात या जातीच्या शेंगा खूप लांब असल्यामुळे त्या बाजारपेठेत पाठविण्यास वाहतुकीची अडचण येते मात्र परसबागेसाठी ही जात सर्वोत्कृष्ट आहे
मुला नूर
या जातीची लागवड कमी पावसाच्या प्रदेशात करतात तामिळनाडू मधील आसाम प्रदेशात वार्षिक पाऊसमान सहाशे मिलिमीटर पेक्षाही कमी आहे तेथे या जातीची लागवड करतात या जातीच्या एका झाडापासून एका वर्षात 500 शेंगा मिळतात या जातीच्या शेंगांची लांबी एक ते दीड फूट असते
पि के एम 1
या जातीच्या झाडांची उंची सहा मीटर असून पेरणीपासून 90 ते 100 दिवसांनी फुलधारणा होऊन 160 ते 170 दिवसांनी शेंगा तोडणीस तयार होतात शेंग 90 ते 100 सेमी लांब व 5.2 सेमी घेराची असते वजन 140 ग्राम असते एका झाडापासून दरवर्षी 250 ते 270 शेंगा मिळतात
कोडीकल मोरिंगा
तामिळनाडूमध्ये या जातीची लागवड पान मळ्यात सावली साठी करतात या जातीच्या शेंगा आखूड मांसल आणि चवदार असतात
वार्षिक मोरिंगा
तामिळनाडूमध्ये दरवर्षी इतर पिकांप्रमाणे बी शेतात पेरून शेवग्याची लागवड करतात शेवग्याचे परागीकरण होत असल्यामुळे जातीची शुद्धता राहत नाही त्यामुळे अनेक स्थानिक जाती तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे त्या जातीची चाचणी घेऊन त्यामधून एक शेवग्याची जात निवडली आहे ही जात व्यापारी लागवडीसाठी योग्य आहे या जातीच्या एका झाडापासून दहा महिन्यात चारशे शेंगा मिळतात
लागवड कालावधी
जून ते जुलैमध्ये पावसाळ्यानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो हवेतील आद्र्रता वाढते अशी रोपे रुजण्यास चांगले असते त्याच वेळी लागवड करावी
लागवड पद्धती
शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम किंवा बियांपासून रोपे तयार करून केली जाते फाटे कलम न मिळाल्यास पॉलिथिनच्या पिशवीत बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी हेक्टरी लागवडीकरिता 500 ग्रॅम बियाणे लागते एक ते दोन महिन्यांनी रोपे लागवडीकरिता वापरावी बियाण्यासाठी सगळ्या कृषी सेवा केंद्र मध्ये चौकशी करावी लागवड करण्यापूर्वी 60×60×60 सेंमी आकाराचे खड्डे घ्यावे हे खड्डे चांगली माती, एक घमेले कुजलेले शेणखत,अडीचशे ग्रॅम सुफला 15 15 15 आणि 50 ग्रॅम फोलिफोल पावडर टाकून भरावेत बहुवर्षीय वानांसाठी 4×4 मीटरवर लागवड करावी व एक वर्षीय वानासाठी 2.5×2.5 मीटर वर लागवड करावी
शेवग्याची छाटणी
लागवडीनंतर साधारणपणे तीन ते चार महिन्यांनंतर व झाडांची उंची तीन ते चार फूट झाल्यानंतर वरून अर्धा ते एक फूट शेंडा छाटावा त्यामुळे झाडांची उंची मर्यादित राहून शेंगा देणाऱ्या फांद्या तीन ते चार फुटांच्या खाली आल्याने शेंगा काढणे सोपे जाते लागवडीपासून सहा ते सात महिन्यात शेंगा तोडणीस येतात त्यानंतर तीन ते चार महिने शेंगांचे उत्पादन मिळते एक पीक झाल्यानंतर पुन्हा झाडांची छाटणी करून झाडास योग्य तो आकार द्यावा त्यासाठी झाडाचा मुख्य बुंधा दोन ते चार फूट ठेवून बाजूच्या फांद्या साधारणता एक ते दोन फूट ठेवण्यात
तण नियंत्रण
शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी तणांचा नायनाट आवश्यक आहे तण व्यवस्थापन हे उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वाची बाब आहे पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत तणनियंत्रण याची विशेष काळजी व तणाचा नायनाट केल्यास नुकसान कमी होऊन उत्पादन वाढ होते
पाणी व्यवस्थापन
शेवगा पीक कोरडवाहू असले तरी त्याला थोडेफार पाणी लागतेच शेवगा हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकत असते हे कमी पाण्यात येणारे पीक आहे हलक्या जमिनीत हे पीक घेतले असता 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे परंतु भारी जमिनीवर लागवड केल्यास 15 ते 20 दिवसांनी झाडाला पाणी द्यावे फेब्रुवारी महिन्यात झाडाला पाणी देणे थांबवावे कारण या कालावधीतील झाडाची पाने खाली गळून मे महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत जाते या काळात पिकाला पाणी दिल्यास उत्पादनात घट येते बागायती क्षेत्रात पीक घेतले असताना 1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत पिकाला पाण्याचा ताण द्यावा कारण या काळात पिकाला पाण्याचा ताण मिळाल्यास नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या फुल धारणेत जास्तीत जास्त वाढ होते
खत व्यवस्थापन
जमिनीमध्ये शेवग्याच्या झाडाला प्रतिवर्षी 10 ते 15 किलो शेणखत प्रति झाड द्यावे 75 ग्रॅम नत्र 65 ग्रॅम युरिया अधिक 50 ग्रॅम स्फुरद 132 सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 75 ग्रॅम पालाश म्हणजेच 120 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे खते देण्यासाठी प्रत्येक झाडाला त्याच्या विस्तारा प्रमाणे 15 ते 20 सेंमी खोलीचे गोलाकार आळी करावे व संपूर्ण शेणखत रोप लावताना द्यावे व पुढे प्रतिवर्षी छाटणी केल्यानंतर द्यावे तसेच सर्व खते वर्षातून चार वेळा विभागून द्यावी त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य प्रत्येक वेळेस पाच किलो सर्व खतात मिसळून द्यावे तसेच खते देताना गोलाकार आळे पद्धत किंवा झाडाजवळ 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर पहारीने खते दिली तर ते जास्त परिणामकारक ठरतात
काढणी
शेवग्याच्या लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीस तयार होतात शेवग्याची लागवड साधारणपणे आर्थिक दृष्ट्या सहा ते आठ वर्षे फायदेशीर ठरते त्यानंतर मात्र नवीन लागवड करणे फायदेशीर असते
उत्पादन
शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून सुमारे 30 ते 35 किलो हिरव्या शेंगा मिळतात पुढील प्रत्येक वर्षी शेवग्याच्या झाडापासून वाढीव उत्पादन मिळते
कीड व रोग व्यवस्थापन
कीड नियंत्रण
पाने खाणारी अळी
सुरवातीस कोवळ्या पानांवर प्रादुर्भावास सुरुवात होते हळूहळू आठ ते दहा दिवसात संपूर्ण पाने कोवळे शेंडे व झाडाची कोवळी साल खाऊन टाकते ही अळी खादाड असल्याने थोड्याच दिवसात संपूर्ण झाडाचे नुकसान करते पानांच्या शिरा वरील हरित द्रव्य खाते व पानाची जाळी तयार होते
नियंत्रण
फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरोपायरीफॉस 50 टक्के सायपरमेथ्रीन 5 टक्के संयुक्त कीटकनाशक 1 ते 1.5 मिली किंवा लेम्बडा सायहलोथ्रीन 1 ते 1.5 मिली किंवा मोनोक्रोटोफास 1 ते 1.5 मिली
फळमाशी
ही माशी कोवळ्या व तयार शेंगावर अंडी सोडते तीन ते चार दिवसात अंड्यातून अळ्या बाहेर येतात या शेंगात शिरून आतील गर खातात शेंगातून डिंक व फेस बाहेर पडतो शेंगा वाळून जातात व सडतात याला अनेक शेतकरी डिंक्या म्हणून ओळखतात
नियंत्रण
फवारणी प्रति लिटर पाणी स्पिनोसॅड 45 एस सी 0.3 ते 0.4 मिली
रोग व्यवस्थापन
करपा
पानांवर काळपट ठिपके येतात फांद्या करपतात पाने पिवळी पडून गळतात करपा रोगामुळे झाडे पिवळी पडून करपल्यासारखे दिसते
नियंत्रण
फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब
मर रोग
या रोगामुळे सुरुवातीला झाडे पिवळी पडतात व नंतर चार ते पाच महिन्यांनी झाड वरून पूर्ण वाळत जाते व पिवळे पडून मरते याला मररोग वा मुळकुज म्हणले जाते उताराची व उत्तम निचरा होण्याच्या जमिनीत हा रोग होत नाही
नियंत्रण
आळवणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझिम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 1 ते 1.5 ग्रॅम
जमीन – मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली. पूर्व मशागत – उन्हाळ्यात जमिनीची खोल (15 ते 20 सें.मी.) नांगरट करून कुळवाच्या 2- 3 पाळ्या द्याव्यात. त्या वेळी 25 गाड्या शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे.
सुधारित जाती
1. लवकर पक्व होणाऱ्या जाती (80 ते 90 दिवस) – कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रासाठी. संमिश्र जाती – अरुण, किरण, पारस, सूर्या, पुसा लवकर, महिकांचन, मांजरी. संकरित जाती – एफएच 3211, एफक्युएच 4567. 2. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जाती (90-100 दिवस) – कोरडवाहू, बागायती आणि थोड्याशा उशिरा पेरणीसाठी. संमिश्र जाती – नवज्योत, मांजरी. संकरित जाती- डीएमएच 107, केएच 9451, एमएचएच 69. 3. उशिरा पक्व होणाऱ्या जाती (100-110 दिवस)- वेळेवर पेरणी, निश्चित पाऊस किंवा बागायतीची सोय असलेल्या ठिकाणी. संमिश्र जाती – प्रभातस धवल, आफ्रिकन टॉल, शक्ती 1. संकरित जाती – डेक्कन 103, एनईसीएच 117, एचक्यूपीएम 1. पेरणीची वेळ – 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान.
पेरणीची पद्धत
उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी – ओळीतील अंतर 60 ते 75 सें.मी. व दोन रोपात 20 ते 25 सें. मी.
लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी – दोन ओळीस 60 सें. मी. व दोन रोपात 20 सें. मी.
सरी वरंब्यावर पेरणी करताना सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला पेरणी करावी.
बियाण्याचे प्रमाण – हेक्टरी 15-20 किलोग्रॅम बियाणे पुरेसे.
बीजप्रक्रिया – 2 ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलोग्रॅम बियाणे. त्यानंतर ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाणे चोळावे.
रासायनिक खत
उशिरा तयार होणाऱ्या जातीसाठी – नत्र, स्फुरद व पालाश 120-60-60 किलो प्रति हेक्टर खतमात्रा द्यावी. त्यातील नत्र 40 किलो पेरतेवेळी, 20 दिवसांनी पुन्हा 40 किलो, 40 ते 45 दिवसांनी 40 किलो या प्रमाणे नत्र विभागून द्यावे.
आंतरमशागत – पेरणीनंतर 15 ते 35 दिवसांपर्यंत एक ते दोन खुरपण्या आणि कोळपण्याद्वारे तणांचा बंदोबस्त करावा.
किंवा तणनाशक वापर- पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी अट्रॉझीन (50 टक्के) हे तणनाशक 1 किलो किंवा पेंडिमिथॅलीन 1 ली प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे.
पाणी व्यवस्थापन
पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पीक वाढीची अवस्था),
40- 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
75- 95 दिवसांनंतर पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे.
अनियमित पावसाच्या भागात पाण्याचा ताण असलेल्या काळात 0.2 टक्के थायोयुरियाची (नर व मादी) पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ दिसून आलेली आहे
मका प्रश्नउत्तरे
मका पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे.पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1928 किलो प्रती हेक्टर व उत्पादन 13.65 लक्ष टन आहे.
लागवडीसाठी जमीन कशी असावी तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरीता होतो.
हवामान 1. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे. 2. समुद्र सपाटीपासून ते २७०० मीटर उंचीच्या ठिकाणी देखील मका लागवड करता येते. 3. परंतू पीक वाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्या समानवत नाही4. मका उगवणीसाठी १८ डिग्री सेल्सियस तापमान योग्य असून, त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसर पणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन पीकाच्या उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो. 5. मका पिकाची योग्य वाढीसाठी २५ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान चांगले असते परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ डिग्री सेल्सियस) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो.6. ३५ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असल्यास पीक उत्पादनात घट येते. परागीभावानाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आद्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते.
1. मक्यासाठी मध्यम तेभारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन चांगली. 2. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते. 3. परंतु अधिक आम्ल ( सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त ( ८.५पेक्षा अधिक सामू) जमिनीत मका घेऊ नये. 4. तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. 5. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
पूर्वमशागत 1. जमिनीची खोल ( १५ते२०सें. मी.) नांगरट करावी. पिकाची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाइल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो. 2. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 3. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी १० ते १२ टन (२५ ते३० गाडया) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.
सुधारित वाण : 1. सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते. 2. मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात. 3. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी.
पेरणीची वेळ 1. मका हे खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतलेजाते. 2. खरिप हंगाम : जून ते जुलै २ रा आठवडा खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही. 3. रब्बी हंगाम : १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर 4. उन्हाळी हंगाम : जानेवारी ते फेब्रुवारी २ रा आठवडा 5. धान्य पीकासाठी १५-२० किलो बियाणे प्रती हेक्टरी 6. चारा पीकासाठी 75 किलो बियाणे प्रती हेक्टरी
पेरणीची पद्धत 1. टोकण पद्धतीने पेरणी करावी. 2. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेऊन पेरणी करावी. 3. उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर टोकण करावी. 4. लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी. 5. रब्बी हंगामात मक्याची पेरणी ६० सें. मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एका बाजूला २० सें. मी. अंतरावर २ बिया ४-५ सें. मी. खोल टोकण करून करावी. 6. एक हेक्टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते. 7. अश्याप्रकारे काढणीच्या वेळी प्रति हेक्टरी ९०,००० रोप संख्या मिळते व परिणामी अधिक उत्पन्न मिळते.
आंतरपीक पद्धती 1. खरिप हंगामात मक्याच्या दोन ओळीत असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये उडीद, मुग, चवळी आणि तेलबिया (भुईमुग, सोयाबीन) हि आंतरपिके यशस्वीरित्या घेता येतात. 2. आंतरपीक पद्धतीत ६ : ३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे. 3. मक्यात भुईमुग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते. 4. रब्बी हंगामात मक्यामध्ये करडई, कोथिंबीर आणि मेथी हि आंतरपिके भाजीपाल्यासाठी घेणे फायदेशीर आहे. 5. मक्याची लवकर येणारा वाण ऊस व हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून घेता येते परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येते. त्यासाठी मुख्य पिकास व अंतर पिकास शिफारशीत खतमात्रा देणे गरजेचे आहे. 6. मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात.
बीजप्रक्रीया 1. पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे, म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते. 2. तसेच अझोटोबक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम किंवा 100 मिली प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.
खते 1. तूर पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 75 किलो नत्र व 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश द्यावे. 2. पेरणीनंतर एक महिन्याने 75 किलो नत्र द्यावे. 3. जस्ताची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलोग्रॅम झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे.
उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
• मका पिकाला सुरवातीपासून ते दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. परंतु अतिरिक पाण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे नत्राचा निचरा होतो म्हणून नत्रयुक्त खतमात्रा विभागून द्यावी लागते. परंतु स्फुरद आणि पालाश युक्त खते पेरणीच्या वेळी संपूर्ण मात्रा द्यावी.
• यामध्ये सुरुवातीला मुख्य अन्नद्रव्यांच्या पुरवठयासाठी सुपर फॉस्फेट, डीएपी, १०:२६:२६, म्युरेट ऑफ पोटॅश यांसारख्या खतांचा वापर करावा. तसेच उभ्या पिकात खत देताना युरिया, १९:१९:१९ २४:२४:००, २०:२०:०:१३ यांसारख्या रासायनिक खतांचा वापर करावा.
• तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक आणि बोरॉन ची कमतरता दिसून येते यासाठी पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा पीक वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत चिलेटेड झिंक आणि बोरॉन ची वेगवेगळ्या वेळी फवारणी करावी. जेणेकरून मका कणीसातील दाणे पूर्णपणे भरतील.
• मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे.
• खरीप हंगामात सगळीकडे एकसारखा पाऊस होत नसल्याने बहुतेक शेतकरी जिरायती मकाची पेरणी करतात. त्यामुळे पिकास योग्य कालावधीत पाणीपुरवठा होत नाही. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे.
• मका पिकातील महत्वाच्या पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहे.
1. रोपावस्था – पेरणीनंतर सुरुवातीचे २५ ते ३० दिवस .बियाण्याची उगवण होऊन रोपाची वाढ होण्यासाठी जमिनीत या अवस्थेत वाफसा असणे गरजेचे आहे.
2. वृद्धिकाळ – उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांचा या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या पेऱ्यापर्यंत दुय्यम मुळे निघतात व ती जमिनीत रुजतात. त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडाची जोमदार वाढ होऊन पानांची पूर्णपणे निर्मिती होते.
3. फुलोरा अवस्था – उगवणीपासून ४५ ते ६० दिवसापर्यतचा हा काळ आहे. तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया या १५ दिवसापर्यत सुरू राहते.
4. कणसे लागण्याचा कालावधी – तुरा बाहेर पडल्यानंतर २-३ दिवसात प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसरबाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे ५० ते ७० दिवस पर्यतचा असतो. बीजधारणा झाल्यावर कणसात दाणे भरण्यास सुरूवात होते.
5. दुधाळ अवस्था – दाणे भरताना प्रथमत: दाणे पक्क न होता हुरडा होण्याचा काळ. हा काळ साधारणत: ४ ते ५ आठवड्याचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रियवाढ (८५ % पर्यत) होते.
आंतरमशागत अ) पक्षी राखण :
1. खरिप हंगामात पेरणीनंतर उगवण ५-६ दिवसात तर रब्बी हंगामात ८ ते १० दिवसात होते. 2. पीक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसापर्यंत पक्ष्यापासून राखण करणे अत्यंत महत्वाचे आहे. 3. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अश्यावेळी देखील पक्षी राखण आवश्यक असते. ब) नांग्या भरणे/ विरळणी करणे : मका उगवणीनंतर ८-१० दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात. क) पिकात ज्यादा पाणी किंवा दलदल नसावी : मक्याची रोपावस्था ज्यादा पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस खूपच संवेदनशील आहे म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.ड) तणनियंत्रण / भर देणे: 1. तण नियंत्रणासाठी अट्राटाप ५० टक्के हेक्टरी २ ते २.५ किलो पेरणी संपताच ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे 2. तसेच तणांच्या प्रादुर्भावानुसार मका वाढीच्या सुरवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून ताटाना आधारासाठी माती चढवावी. गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात.
सिंचन: 1. मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे. 2. खरिप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात मका पिक जिरायती खाली घेता येते 3. मका पीक पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरिप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे. 4. पाण्याची एकूण गरज ४०-४५(सें. मी.) व पाण्याच्या एकूण ४ पाळ्या
महत्वाच्या अवस्था मका पिकाच्या महत्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे. 1. रोप अवस्था (२५-३० दिवसांनी), 2. पिक वाढीची अवस्था – हा काळ साधारणपणे पीकाचे उगवणीनंतर ३०-४५ दिवसाचा असतो.वाणाच्या गुणधर्मानूसार मक्यास साधारणपणे १५-२० पाने येतात ही क्रिया झाडावरतूरा येईपर्यंत सुरू राहते. 3. तुरा बाहेर पडताना (४५-५० दिवसांनी) – तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया साधारणत: १५ दिवसापर्यंत सुरू राहते. 4. फुलोऱ्यात असताना (६०-६५ दिवसांनी) – कणसे उमलण्याचा कालावधी:- मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर २-३ दिवसात झाडाच्या एकूण पानापैकी मधल्या प्रथम पानातुन कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसर बाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे ५० ते ७० दिवस पर्यतचा असतो. 5. दुधाळ अवस्था :- हा काळ साधारणतः ४ ते ५ आठवड्याचा असतो.
6. दाणे भरणेचेवेळी (७५-८० दिवसांनी). दाणे पक्व होण्याचा काळ :- दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता १५ ते २० दिवसलागतात. रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १०-१२ दिवसाच्या अंतराने, तर उन्हाळी हंगामात ८-१० दिवसाच्या अंतराने पाणी दयावे.
किड नियंत्रण 1. खोडकिड : अ) शास्त्रीय नाव : कायलो पार्टेलस
ब) किडीची वैशिष्ठे : i. अळीच्या पाठीवर काळ्या ठिपक्यांचे पट्टे. ii. डोक्यावर गडद तपकिरी रंग. iii. पानावर समान रेषेत छिद्रे. iv. पोंगा पूर्ण वाळतो.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : रोपावस्था
ड) भौतिक नियंत्रण : i. वाळलेल्या सुरळ्या अळ्या सहित उपटून जाळून टाकाव्यात. ii. शेत स्वच्छ ठेवावे. iii. प्रकाश सापळा वापरावा
इ) रासायनिक नियंत्रण : i. कार्बारील ८५% डब्ल्यूपी १७६४ ग्रॅम/हेक्टरी ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारावे. ii. किंवा फोरेट १० जी. १० ते १२ किग्रॅ/हेक्टरी प्रमाणे जमिनीत मिसळावे. iii. किंवा डायामिथोयेट ३० ईसी. १.२ मिली. १ पाण्यातून फवारावे.
ई) जैविक कीड नियंत्रण : i. ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत. ii. निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे.
2. गुलाबी अळी : अ) शास्त्रीय नाव : सेसामिया.कहबनु.४च इंफेरंस
ब) किडीची वैशिष्ठे : i. अळी गुलाबी रंगाची असते. ii. डोके फिकट तपकिरी रंगाचे. iii. पानावर लांब निमुळते छिद्र पडते.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : सर्व अवस्था
ड) भौतिक नियंत्रण : i. पूर्ण वाळलेली सुरळी उपटून नष्ट करावी. ii. शेत स्वच्छ ठेवावे. iii. प्रकाश सापळा
इ) जैविक कीड नियंत्रण : ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.
3. कणसे पोखरणारी अळी : अ) शास्त्रीय नाव : हेलीकोव्हरपा आर्मिजेरा ब) किडीची वैशिष्ठे : सुरवातीला कणसाचे स्त्रीकेसर खाते. त्यानंतर कणसाच्या आत शिरून दाणे खाते.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : केशर अवस्था i. एक मादी सुमारे ३५० अंडी किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते. ii. अंड्यातुन ४-५ दिवसात अळ्या बाहेर येतात. iii. अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये १५ ते ३५ दिवसात होते. ई) जैविक कीड नियंत्रण : i. ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत. ii. निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे.
4. मावा : अ) शास्त्रीय नाव : ओपोलोसिफम मेडिस ब) किडीची वैशिष्ठे : लहान माव्याच्या असंख्य किडी पानावर आढळून येतात.पानावर चिकट सतरावा आढळतो. क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : ड) भौतिक नियंत्रण : इ) रासायनिक नियंत्रण : ई) जैविक कीड नियंत्रण : क्रायसोपा कार्निया परोपजीवीचे ५००० अंडी प्रती हेक्टरी सोडावेत.
5. अमेरीकन लष्करी अळी : अ) उगम व प्रसार : i. अमरीकन लष्करी अळी (Spodoptera frugiperda) ही मूळ अमरिकेतील कीड आहे. ii. अमरीकेच्या उष्ण व समशितोष्ण कटिबधात ही कीड आढळते. iii. या किडीची अळी मका, भात, ज्वारी, ऊस, भाजीपाला व कपाशी सारखी 80 पेक्षा जास्त पिकावर प्रादुर्भाव आढळुन येतो. iv. सन 2016 मध्य या किडीचा अफ्रीका खंडात सर्वप्रथम प्रादुर्भावदिसून आला. v.जानेवारी 2018 पर्यंत ही कीड सर्व साधारणपणे संपुर्ण आफ्रीका खंडात परसली होती. तसेच नजीकच्या इजिप्त व लिबीया या खंडातही कीड आढळून आली. vi. सन 2018 मध्य ही किड भारत व श्रीलंकेत आढळून आली आहे.
ब) किडीची ओळख व प्रादुर्भावाची लक्षणे किडीच्या चार अवस्था आहेत : i. अंडी (2 ते 3 दिवस) ii. अळी (12 ते 20 दिवस) : (सहा अवस्था) iii. कोष (12 ते 14 दिवस) iv. पतंग (14 ते 21 दिवस)
किडीच्या वाढीचा कालावधी हवामान व इतर घटकांवर अवलंबून आहे.
1. पहिली अवस्था : अंडी i. अंडी (2 ते 3 दिवस) ii. अंडीसमुहात पानावर किंवा खोडावर सुद्धा घातलीजातात, iii. परंतू सर्वसाधारणपणे पानाच्या खालच्या बाजुने खोडाजवळ घातली जातात. iv. त्यावर पतंगाच्या पांढ-या केसांचा थर दिला जातो.
2. दुसरी अवस्था : अळी i. अळी(12 ते 20 दिवस) – (सहा अवस्था), ii. पहिल्या अवस्थेतील अळी पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते. त्यामुळे पानांवर पारदर्शक / पांढरा पॅच दिसतो त्यास विंडो (खिडकी) असे म्हणतात. iii. प्रथम अवस्थेतील अळी पानाच्या खाली चिकट धाग्याच्या सहाय्याने लोंबकळते व वा-याने उडून नजीकच्या झाडावर पोहचते.त्यास Ballooning असे म्हणतात. iv. अळीच्या डोक्यावर उलटा Y आकाराचे चिन्ह दिसते व शेपटाकडील शेवटून दुस-या भागावर काळ ठिपके समान अंतरावर (चौरसासारखे) दिसतात. v. उर्वरीत शरिरावरील ठिपके अनुक्रमे दोन जवळ व नंतरचे दोन दुर असे असतात. vi. अळी कोवळी पाने पोंग्यात शिरून खाते. त्यामुळ पाने कुरतडल्या सारखी दिसतात.अळीची विष्ठा पोंग्यात मोठ्या प्रमाणात दिसून यत. वाळलेली विष्ठा लाकडाच्या भुश्यासारखी दिसते. vii. पिकाच्या वाढीच्या नंतरच्या कालावधीत अळी कणसाभोवतीची कोवळी पाने खाते व त्यानंतर कोवळे दाणेखाते.
3. तिसरी अवस्था : कोष i.कोष (12 ते 14 दिवस) ii. सहाव्या अवस्थेतील अळी त्यानंतर पीकावरून जमीनीवर पडते व जमीनीखाली कोषात जाते. iii. जमीन घट्ट असेल तर जमीनीवर पीकांचे अवशेष लपेटून तेथेच कोषात जाते. iv. कणसातील अळी कणसातच कोषात जाऊ शकते. v. जमीनीतील अळी कोषा भोवती मातीचा थर लपेटून घेते. vi. कोष सर्वसाधारणपणे 15 मिमी लांबीचा असतो व मातीच्या आवरणासहीत 20 ते 25 मिमी लांबीचा असतो.
4. चौथी अवस्था : पतंग i. पतंग (14 ते 21 दिवस) ii. पतंग रात्री सक्रीय असतात व दिवसा लपून बसतात. दिवसा पीकाच्या पानांच्या मध्ये पतंग लपून बसलेले असू शकतात. iii. पतंग एका रात्रीत 100 किमी पर्यत उडत जाऊ शकतो. iv. मादी पुंजक्यात अंडी घालते एका पुंजक्यात 100 ते 200 अंडी असू शकतात. v. मादी पतंग 6 ते 10 पुंजक्यात अंडी घालते. vi. एक मादी 2 ते 3 आठवड्यात सर्वसाधारणपणे 1500 ते 2000 अंडी घालते.
एकात्मिक किड नियंत्रण
1. पिक पद्धती : अ) आंतरपीक : किडीला सलग मका पिकावर अंडी घालावयास आवडते. किडीस बळी न पडणा-या आंतरपिकाचा वापर केल्यास उपद्रव टाळता येऊ शकतो. ब) फेरपालट : एकाच शेतावर सलग हंगामात किडीला बळी पडणारी पिक घेणे टाळावे. मका पिक सलग (खरीप- रबी-उन्हाळी) हंगामात घेणे टाळावे. एकदल व द्विदल पीकाची फेरपालट करावी.
2. मशागत : अ) खोल नांगरणी i. कीड जमीनी खाली 2 ते8 सेमी खोल कोषावस्थत जाते. ii. हा कोष नांगरीने जमीनीवर आल्यास परभक्षी किटक व पक्षी कीडीचे कोष खाऊ टाकतात. त्यामुळे कीड नष्ट होते. ब) पिकाचे अवशेष नष्ट करणे : i. ज्या ठिकाणी जमीन घट्ट असेल व कीड जमीनीत शिरू शकत नाही तेव्हा अळी जमीनीवर पिकाचे अवशेष (पान) स्वत:भोवती गुंडाळून कोषावस्थत जाते. ii. तसेच कणासातील अळी कणसातच कोषावस्थत जाते. त्यामुळे काढणीनंतर लगेच पिकाचे अवशेष नष्ट करावेत. 3. पेरणी : अ) पेरणीची वेळ : i. एकाच क्षेत्रावर वेगवेगळ्या वेळी पेरणी केल्यास कीडीला सलग कोवळी पिक मिळते त्यामुळे उपद्रव वाढतो. ii. एकाच क्षेत्रावर (गावात) ऐकाच वेळी पेरणी केल्यास कीडीचा उपद्रव कमी होतो. iii. तसेच उशिराने पेरणी केल्यास कीडीचा उपद्रव जास्त होण्याची शक्यता असते. iv. त्यामुळे उशिराने पेरणी करू नये तसेच एका गावात शक्यतो एकाच वेळी पेरणी करावी.
ब) बीज प्रक्रीया : i. उगवणीनंतर लगेच किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते. ii. हे नुकसान कीडनाशकाची व बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया केल्यास टाळता येऊ शकते. iii. त्यामुळे बियाण्यास किटकनाशकाची व बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया करूनच पेरणी करावी.
4. किडीचे नियंत्रण : किडीचा प्रादुर्भाव वेळेत रोखा व किडीचा प्रसार थांबवा i. वनस्पतीजन्य कीडनाशके-निंबोळी अर्क ii. अंडी व अळ्या वेचून नष्ट करा . iii. पक्षी थांबे : पक्षी कीडीच्या अळ्या व कोष खातात. पक्ष्यासाठी पिकात पक्षी थांबे उभे करा. iv. परभक्षी कीटक : उदा. Earwigs, Ladybird beetles, Ground beetles, Ants, Birds and bats v. परोपजीवी कीटक Telenomusremus, Chelonus insularis, Cotesiamarginiventris, Trichogramma (T. pretiosum and T. atopovirilia), Archytas, Winthemia and Lespesia
vi. जैविक कीडनाशक • विषाणू (Viruses) : Nuclear Polyhedrosis Virus (NPVs) such as the Spodoptera Frugi perda Multicapsid Nucleopolyhedrovirus (SEMNPV) • बुरशी (Fungi) : Metarhizium anisopliae, Metarhiziumrileyi, Beauveriabassiana • जिवाणू (Bacteria) : Bacillus thuringiensis (Bt) • Nematodes • Protozoa
vii .कामगंध सापळा • किडीच्या पूर्वसचनेसाठी एकरी एका कामगध सापळ्याचा वापर करा. • सापळ्यात अमेरीकन लष्करी अळीसाठीच्या कामगंध ल्युरचाच (गोळी) वापर करा. • सापळ्यात अडकलेले पतंग नष्ट करा व सापळा स्वच्छ ठेवा. • विहीत कालावधीनंतर सापळ्यातील ल्युर (गोळी) बदला.
viii. रासायनीक कीडनाशक : कीड आर्थीक नुकसान पातळीवर पोहचल्यानंतर शिफारशीनुसार रासायनीक किडनाशकांची फवारणी करावी.
रोग नियंत्रण
1. फुलोऱ्यापूर्वीचा खोड कुजव्या रोग : अ) कारणीभूत जीव : पिथीयम अफॅनीडरमॅटम | इर्विनिया क्रीसांथेम. ब) अनुकूल हवामान : अधिक उष्णता व अधिक आद्रता युक्त हवामान. क) लक्षणे : i. पिथीयम खोडकुजव्या रोगामध्ये लागण झालेला खोडाचा भाग तपकिरी रंगाचा, आकसलेला, मऊ झाल्याचे दिसून येते. ii. तसेच जमीन व पहिल्या पेराच्या ठिकाणी पीळ बसून झाड कोलमडते. iii. याविरुद्ध, जीवाणूजन्य खोडकुजव्या रोगामध्ये रोगाची लागण झाडाच्या कोणत्याही पेरात होऊन त्या ठीकाणचा रंग गडद तपकिरी होतो. तसेच पानाचा देठ व खोडयांवर चिरा दिसून येतात व तद्ननंतर झाड ताबडतोब खाली पडून शेतामध्ये विखुरलेले आढळते. iv. रोगग्रस्त खोड मधून उभे चिरले असता आतमध्ये रंगहीन तसेच पेराच्या ठिकाणी मऊ झाल्याचे निदर्शनास येईल. तसेच मऊ पडलेल्या उतींमधून दुर्गंधी येते. v. तसेच रोगग्रस्त झाडाचा शेंडा झाडापासून सहज वेगळा करता येतो.
ड) रोगाची लागण न होणेसाठी घ्यावयाची काळजी : उत्तम निचऱ्याची जमीन मका लागवडीसाठी निवडावी, पेरणी योग्य वेळत करावी व प्रती हेक्टरी झाडांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी. इ) उपाय : रोगाची लक्षणे दिसून येताच ७५% कॅप्टन १२ ग्रॅम प्रती१००लिटर पाणी प्रमाणात जमिनीतून दिल्यास पिथीयम खोडकुजव्या रोगाचे नियंत्रण करणे शक्य होते.
2. फुलोन्यानंतरचा खोड कुजव्या रोग : अ) कारणीभूत जीव : फ्युजारियममोनिलीफॉर्म। मॅक्रोफोमिन्काऊजिओलिना
ब) लक्षणे : i. पिक फुलोऱ्यात येताना या रोगाची लागण होते. ii. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मूळ, शेंडा आणि खालील पेरे यांच्यावर होतो. iii. खोदाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग गुलाबी-जांभळा किंवा काळ्या रंगाचा झाल्याचे दिसून येईल.
क) रोगाची लागण न होणेसाठी घ्यावयाची काळजी: i. पिक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. ii. नत्र, स्फुरद व पालाश यांचा शिफारशीत योग्य वापर करावा . iii. पिकांची फेरपालट करावी.
ड) उपाय : रोगाची लक्षणे दिसून येताच १० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी १ किलो शेणखत या प्रमाणात मिसळून मिश्रण १० दिवसांनी सरी-वरंब्या मध्ये टाकावे.
3. टर्सिकम पर्ण करपा : अ) कारणीभूत जीव : एक्सेरोहिलम टर्सिकम ब) अनुकूल हवामान : थंड व अधिक आद्रतायुक्त हवामान.
क) लक्षणे : i. पानांवर लांब अंडाकृती, करड्या-हिरव्या रंगाच्या २.५ ते १५ सेमी. चिरा दिसून येतात ii. सुरवातीस याचा प्रादुर्भाव झाडाच्या खालील पानांवर दिसून येतो व नंतर वरपर्यंत पसरत जातो.
ड) उपाय : रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात ८-१० दिवसांच्या अंतराने फवारावे.
4. मेडिस पर्ण करपा : अ) कारणीभूत जीव : ड्रेस्क्लेरा मेडिस ब) अनुकूल हवामान : उष्ण दमट, थंड हवामान. क) लक्षणे : पानांच्या शिरांमध्ये लांबट तपकिरी किंवा गडद लालसर-तपकिरी रंगाच्या चिरा दिसून येतात. ड) उपाय: रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार मॅन्कोझेब | झायनेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
काढणी, मळणी व साठवणूक i. धान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी. ii. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. iii. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा. iv.सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होत नाही. v. मका काढणी पीक पूर्ण पक्व होण्यापूर्वी म्हणजे दाण्यात २५-३० टक्के पर्यंत ओलाव्याचे प्रमाण( फिजिओलोजिकल मच्यूरिटी) असताना करता येते. vi. अशी काढणीची अवस्था पीक पूर्ण पक्व होण्याच्या १०-१५ दिवस अगोदर येते. vii.अशी काढणी केल्यामुळे उत्पन्नात घट येत नाही मात्र कणसे चांगली वाळवावी लागतात. तसेच अश्या प्रकारच्या काढणीमुळे हिरवी ताटे जनावरांना खाण्यास वापरता येतात.
उत्पादन सर्वसाधारणपणे संमिश्रवाणांपासून हेक्टरी ५० क्विटल व संकरीत वाणांपासून हेक्टरी ९५- ते १०० क्विटल उत्पादन मिळते.
सन २०१२-१३ मध्ये भारतातील ऊस पिकाखालील एकुण क्षेत्राच्या (५०.६३ लाख हे.) १५.८० टक्के क्षेत्र (८.०० लाख हे.) महाराष्ट्र राज्यात झाले होते. देशातील एकुण ऊस उत्पादनाच्या (३६१० लाख टन) १९.३९ टक्के उत्पादन (७०० लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. राज्याची दर हेक्टरी उत्पादकता (८७.५ टन/हे.) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (६६.१० टन/हे) जास्त होती. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.४०% होता. हा राष्ट्रीय सरासरी उता-यापेक्षा (१०.२५ टक्के) जास्त होता.
लागवडीचा हंगाम
सुरु – १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी, पुर्वहंगामी – १५ ऑक्टोंबर ते १५ नोंव्हेबर, आडसाली – १५ जुलै ते १५ ऑगस्ट असे ऊस लागवडीचे हंगाम ऊस उत्पादकता व साखर उता-याच्या दृष्टीने योग्य आहेत.
जातींची निवड
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था (व्ही.एस.आय) मांजरी, पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणा-या अनेक जाती प्रसारित केल्या आहेत. तथापी सध्या को. ८६०३२ (निरा), को ९४०१२ (फुले सावित्री), को.एम.०२६५ (फुले २६५), को. ९२००५ आणि को.सी ६७१ या मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असणा-या जातींची प्रामुख्याने निवड करावी. महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या ऊस जातींची माहिती तक्ता क्र १ मध्ये दिली आहे.
तक्ता क्र. १: ऊसाच्या प्रसारित वाणांची संक्षिप्त माहिती.
अं.न
वाण
फक्वता
हंगाम
सरासरी ऊस उत्पादन (मे.टन.हे.)
सरासरी साखर उत्पादन (मे.टन.हे.)
वैशिष्टय
१
को.४१९
मध्यम
सुरु
१२२
१४.८०
गुळासाठी उत्तम
२
को. ७४०
उशिरा
सुरु
१०६
१२.६०
पाण्याचा ताण सहन करते.
पूर्वहंगाम
१२३
१७.००
आडसाली
१५६
२०.४०
३
को. ७२१९ (संजीवनी)
लवकर
सुरु
११०
१२.५०
लवकर पीक होते
पूर्वहंगाम
१३१
१२.५०
४
को.एम.७१२५ (संपदा)
मध्यम
सुरु
१०४
११.२०
ऊस लोळत नाही.
५
को. ७५२७
मध्यम
सुरु
१२२
१७.२०
कोल्हापूर भागासाठी
६
को.एम. ८८१२१ (कृष्णा) / को.एम.७७१४
उशिरा
सुरु
११५
१४.००
पाण्याचा ताण सहन करते, उत्तम खोडवा येतो.
पूर्वहंगाम
१३०
१८.५०
आडसाली
१६६
२३.००
७
को. ८०१४ (महालक्ष्मी)
लवकर
सुरु
९८
१४.११
गुळासाठी उत्तम
पूर्वहंगाम
१३५
१९.४८
८
को.सी. ६७१
लवकर
सुरु
१०५
१५.३३
अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम
१११
१६.०९
९
को. ८६०३२ (निरा)
मध्यम उशिरा
सुरु
१०६
१४.४४
तिन्ही हंगामासाठी व उत्तम खोडवा
पूर्वहंगाम
१३९
१९.७१
आडसाली
१५९
२२.४२
१०
को. ९४०१२ (फुले सावित्री)
लवकर
सुरु
१२८
१९.७४
अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम
१३९
२०.०७
११
को.एम. ०२६५ (फुले २६५)
मध्यम उशिरा
सुरु
१५०
२०.३१
अधिक उत्पादकता व क्षारपड जमिनीसाठी योग्य
पूर्वहंगाम
१६४
२२.५७
आडसाली
२००
२६.८२
१२
को. ९२००५
मध्यम उशिरा
सुरु
१२९
१८.२९
गुळासाठी उत्तम कोल्हापूर भागासाठी योग्य
१३
को.व्ही.एस.आय – ९८०५
मध्यम उशिरा
सुरु
१२४
१९.१५
अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम
१३९
२०.५७
आडसाली
१६१
२४.५३
१४
को.व्ही.एस.आय -४३४
लवकर
सुरु
१२४.१
१९.१२
लवकर पक्व होते व अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम
१३०.७
२०.५६
जमिन आणि लागवड
ऊसासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. उभी आडवी नांगरट, कुळवणी इ.मशागत करुन जमीन चांगली भुसभुसीत करावी.
लागवड
उसाची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी दोन स-यातील अंतर १०० ते १२० सें.मी व भारी जमिनीसाठी १२० ते १५० सें.मी. ठेवून सरीचा लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी. पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी ७५-१५० सें.मी. व भारी जमिनीसाठी ९०-१८० सें.मी पध्दतीचा अवलंब करावा. ऊसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागण करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३०. सें.मी ठेवावे. शक्यतो कोरड्या पध्दतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकून पाणी द्यावे किंवा ऊस लागणीपूर्वी सरीत हलकेसे पाणी सोडावे व वाफशावर कोली घेऊन लागण करावी. दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास दोन टिप-यांमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावी. यासाठी ओल्या पध्दतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागणीसाठी भारी जमिनीसाठी एकरी १०,००० व मध्यम जमिनीसाठी १२,००० टिपरी लागतात.
एक डोळा रोपांपासून ऊस लागवड
संशोधन केंद्रे आणि काही खाजगी नर्सरीमधून आता ऊसाची रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण ३० ते ४० दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात. यासाठी ९ ते १० महिने वयाचे चांगल्या बेणेमळ्यातील शुध्द, निरोगी बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरावे. ऊस बेणे लागणीपूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मि.ली.मेलॅथिऑन + १०० ग्रॅम बाविस्टीनची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्यरोग व खवले किडीचा बंदोबस्त होतो. अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू खतांचे प्रमाण अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात उसाच्या टिप-या ३० मिनीटे बुडवून लागण करावी. त्यामुळे नत्राची ५० टक्के बचत होते. एक महिन्याच्या रोपांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी उसाची रोपे ३०-४० दिवस कोकोपीटमध्ये वाढविलेली असतात. त्यामुळे आपणास शुध्द निरोगी ऊस रोपे निवडून घेता येतात. निकृष्ट रोपे लागवडीस न वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे उसाचे पीक वाढते, एकरी ऊसांची संख्या ४० ते ५० हजार मिळते. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून उसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यत मिळते. रोप लागण पध्दतीत नेहमीच्या लागणीस ३०-४० दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तणनियंत्रण, खते, देखरेख यामध्ये बचत होते. पावसाने ओढ दिल्यामुळे वेळेवर लागण करता येत नाही. अशा वेळी पाऊस १ ते १.५ महिना लांबला तरी उसाची रोपे लागण करुन हंगाम साधता येतो. काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वापसा नसल्याने वेळेवर लागण करता येत नाही. अशा वेळेस ऊस रोपे लागण करुन वेळेवर हंगाम साधता येतो. ऊसाच्या दोन ओळीतील अंतर व रोपातील अंतर यावरुन एकरी लागणा-या ऊस रोपांची संख्या काढता येते.
तक्ता क्र. २: उसाच्या दोन ओळीतील अंतर व एकरी लागणारी ऊस रोपे
अ.नं
दोन सरीतील अंतर
रोपातील अंतर
एकरी लागणारी ऊस रोपे
१
१२० सें.मी
२ फूट
५,५५०
२
१५० सें.मी
२ फूट
४,४५०
३
१८० सें.मी
२ फूट
३,७००
४
२४० सें.मी
२ फूट
२,७८०
५
जोड ओळ (१.२ मीटर X २.५ मीटरः
२ फूट
५,०००
आंतरपिके
आडसाली उसामध्ये भुईमूग, चवळी, सोयाबीन, भाजीपाला, तर पूर्वहंगामी उसामध्ये बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, पालेभाज्या, हरभरा, वाटाणा आणि सुरु ऊसामध्ये उन्हाळी भुईमूग, पानकोबी, फुलकोबी, नवलकोल, मेथी, कोथिंबीर, गवार, भेंडी इ.पिके आंतरपिक म्हणून घेता येतात.
उस बेणे आणि प्रक्रिया
बेणे मळ्यात वाढविलेले १० ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्टया शुध्द बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. उस बेणे लागवणीपूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मि.ली. मेलॅथिऑन + १०० ग्रॅम बाविस्टीनची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्य रोग आणि खवले किडीचा बंदोबस्त होतो.
अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू खतांचे प्रमाण अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात उसाच्या टिप-या ३० मिनीटे बुडवून लागण करावी. यामुळे नत्राखतामध्ये ५० % ची तर स्फुरद खतामध्ये २५ % बचत करता येते.
एकात्मिक खत व्यवस्थापन
रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी झाली आहे. यासाठी सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे.
सेंद्रिय खते
सुरु, पूर्वहंगामी व आडसाली ऊसासाठी प्रति हेक्टरी अनुक्रमे २० (४० गाड्या), २५ (५० गाड्या) व ३० (६० गाड्या) टन शेणखत अथवा पाचटाचे कंपोष्ट खत प्रती हेक्टरी ७.५ टन (१५ गाड्या), प्रेसमड केक प्रती हेक्टरी ६ टन (१२ गाड्या) आणि गांडूळ खत प्रती हेक्टरी ५ टन ( १० गाड्या) ऊस लागवडीपूर्वी दुस-या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोष्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.
टिप – अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूंची बीज प्रक्रिया केलेल्या उसास वरील दिलेली हंगामनिहाय रासायनिक नत्र खतमात्रा ५० % तर स्फुरदाची मात्रा २५ % कमी करुन घ्याव्यात.
को. ८६०३२ या ऊस जातीसाठी उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे रासायनिक खतांची हंगामनिहाय खतमात्रा २५ टक्केने जास्त देण्याची शिफारस आहे. अन्यथा ऊस बारीक पोसतो.
तक्ता क्र.३ ब – पाचट ठेवून घेतलेल्या खोड्या उसासाठी पहारीच्या सहाय्याने खते देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति हेक्टर)
अं.न
खतमात्रा देण्याची वेळ
को.८६०३२
इतर जातीसाठी
नत्र (युरिया)
स्फुरद (सिं,सु.फॉ)
पालाश (म्यु.ऑ.फॉ)
नत्र (युरिया)
स्फुरद (सिं,सु.फॉ)
पालाश (म्यु.ऑ.फॉ)
१
१५ दिवसांचे आत
१५०(३२५)
७० (४३७)
७० (११७)
१२५ (२७१)
५८ (३६३)
५८ (९७)
२
१३५ दिवसांनी
१५०(३२५)
७० (४३७)
७० (११७)
१२५ (२७१)
५८ (३६३)
५८ (९७)
३
एकूण
३००(६५०)
१४० (८७४)
१४० (२३४)
२५० (५४२)
११५ (७१९)
११५ (१९२)
ठिंबक सिंचनातून नत्रयुक्त खते
ठिंबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसाच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पांरपारिक स्फुरदयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यात ऊस लागणीचे वेळी व मोठ्या बांधणीचे वेळी जमिनीतून द्यावीत.
ठिंबक सिंचनातून विद्राव्य खते
अ.नं
आठवडे
नत्र (कि./हे)
स्फुरद (किं./हे)
पालाश (किं/हे)
१
१ ते ४
३०
९
९
२
५ ते ९
७०
३२
१४
३
१० ते १२
१००
५१
३२
४
२१ ते २६
–
–
३७
एकुण
२००
९२
९२
सुरु ऊसासाठी विद्राव्य खताची शिफारस
मध्यम खोल, काळ्या जमिनीत सुरु ऊसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खताचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक फायद्यासाठी ८० % विद्राव्य खते वरिल तक्यानुसार दर आठवड्यास एक या प्रमाणे २६ हप्त्यात ठिबक सिंचनातुन देण्याची शिफारस देण्यात येत आहे. तसेच ठिबक सिंचनाद्वारे १००% बाष्पपर्णात्सना एवढे पाणी एक दिवसाआड देण्यात यावे.
सूक्ष्म अन्नद्रव्ये
जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार त्या त्या सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स प्रति हेक्टर चांगल्या कुजलेल्या शेणखतात (१०:१ प्रमाणात ) १ -२ दिवस मुरवून सरीत द्यावे. स्फुरदयुक्त खतांसाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्पेटचा वापर करावा. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागणार नाही.
आंतरमशागत
पीक ४ महिन्याचे होईपर्यत २ – ३ खुरपण्या कराव्यात व दातेरी कोळप्याने २ – ३ कोळपण्या कराव्यात किंवा तणांचा बंदोबस्त करण्यासाठी ऊस लागवडीनंतर ३ – ४ दिवसांनी जमीन वापशावर असताना ५ किलो अॅट्रॅझीन (अॅट्रटॉप) किंवा मेट्रीब्युझीन (सेंकॉर) १.२५ किलो प्रति हेक्टरी १००० लिटर पाण्यात विरघळून संपूर्ण जमिनीवर फवारावे. तणांचे प्रमाण जास्त असल्यास ऊस लागणीनंतर दोन महिन्यांनी २-४-डी (क्षार) १.२५ किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात विरघळून तणांवर फवारावे किंवा ६० दिवसांनी कोळपणी करावी अथवा ऊस लागवणीनंतर हरळी, लव्हाळा यासारखी बहुवर्षीय तणे आढळस्यास ग्लायफोसेट २.५ किलो क्रियाशील घटक ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी काळजीपूर्वक फक्त तणांवरच फवारावे. यासाठी डब्ल्यु.एफ.एन – ४० ( V आकाराचा ) नोझल वापरावा व नोझलवर प्लॅस्टीक हुड बसवावे.
पाचटाचा वापर केला नसेल तर खोडवा पिकातील तणनियंत्रण करण्यासाठी खोडवा उगवून आल्यानंतर (४ आठवड्यांनी) ग्लायफोसेट २.५ किलो क्रियाशील घटक ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी काळजीपूर्वक फक्त तणावरच फवारणी करावी.
मोठी बांधणी
ऊस लागवडीनंतर १६ ते २० आठवड्यांनी रासायनिक खतांची मात्रा देऊन पहारीच्या औजाराने वरंबे फोडून आंतर मशागत करावी व रिजरने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी स-या वरंबे दुरुस्त करुन घ्यावेत.
पाणी व्यवस्थापन
आडसाली, पूर्वहंगामी, सुरु व खोड्या उसासाठी अनुक्रमे ३४० ते ३५०, ३०० ते ३२५, २५० ते २७५ व २२५ ते २५० हेक्टर सें.मी. पाण्याची गरज असते. मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सें.मी खोलीच्या पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
ऊस वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाचे पाणी
अ.क्र
ऊस वाढीची अवस्था
कालावधी (महीने)
एका पाळीस द्यावयाचे पाणी (हे.से.मी.)
सुरु
पुर्वहंगामी
आडसाली
१
उगवण
१.५ ते २
१.५ ते २
१.५ ते २
६
२
फुटवा
२ ते ४
२ ते ४
२ ते ४
८ ते १०
३
पुर्व वाढ
४ ते ६
४ ते ६
४ ते ६
८ ते १०
४
जोमदार वाढ
६ ते १०
६ ते १२
६ ते १०
१० ते १२
५
पक्वता
१० ते १२
१२ ते १४
१२ ते १४
७ ते ८
उस उगवण अवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात वरंबा बुडेपर्यत पाणी देऊ नये. यावेळी ऊसाला जास्त पाणी दिल्यास नत्रयुक्त खते वाया जातात. कमी पाण्यामुळे जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो. गुळाची वाढ व कार्यक्षमता योग्य राहते.
उसाची पाण्याची गरज व ठिबक संच चालवण्याचा कालावधी
अ.नं
महिने
सरासरी बाष्पीभवन . वेग (मी.मी.)
पिक वाढ गुणांक
विकास पाण्याची गरज (लिटर/दिवस)
सिंचन संच दररोज चालविण्याचा कालावधी ( ४ लीटरचा ड्रीपर)
१
जानेवारी
४.०७
०.६
२.२४
०
३४
२
फेब्रुवारी
५.४९
०.६५
३.२७
०
४९
३
मार्च
७.३३
०.९
६.०६
१
३१
४
एप्रिल
८.७३
०.९
७.२१
१
४८
५
मे
९.२४
१.१
९.३३
२
२०
६
जून
५.६२
१.१
५.६८
१
२५
७
जुलै
४.१
१.१५
४.३३
१
५
८
ऑगस्ट
३.७७
१.१५
३.९८
१
०
९
सप्टेंबर
४.३७
१.१५
४.६१
१
९
१०
ऑक्टोंबर
४.४९
१
४.१२
१
२
११
नोव्हेंबर
४.१
०.८५
३.२०
०
४८
१२
डिसेंबर
३.६३
०.६५
२.१७
०
३३
खोडवा व्यवस्थापन
गाळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी, बुडखे मोकळे करुन पाचट सरीत लोटावे. वरती राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने छाटावेत, छाटलेल्या बुडख्यावर ०.१ % टक्के बाविस्टीनची फवारणी करावी. सरीत लोटलेल्या पाचटावर ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि १ किलो पाचट कुजविणारे जिवाणू प्रति टन पाचटासाठी वापरावे व खोडवा पिकास पाणी द्यावे. वापसा आल्यानंतर ५० टक्के रासायनिक खतांची शिफारशित मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांसह) पहारीच्या सहाय्याने बेटापासून अर्धा फूट अंतरावर, अर्धा फुट खोलीवर व दोन खड्ड्यामधील अंतर १ फूट ठेवून सरीच्या बाजूने ऊस तुटल्यावर १५ दिवसांचे आत द्यावी आणि उर्वरित ५० टक्के मात्रा याच पध्दतीने परंतु सरीच्या विरुध्द बाजूने १३५ दिवसांनी द्यावी.
पीक सरंक्षण
बाविस्टीनच्या ०.१ टक्के (१०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) बेणे प्रक्रियेमुळे उसातील काणी रोगाचा बंदोबस्त होतो. आडसाली उसात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी दोन फुले ट्रायकोकार्डची १० दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस एकरी १ लिटर, ४०० लिटर पाण्यात मिसळून जमिन वापश्यावर असताना सरीतून द्यावे. तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर निंब, बाभुळ व बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदिल व रॉकेलचा वापर करुन सामुदायिकरित्या रात्रीचे वेळी गोळा करुन नष्ट करावेत. कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन फुले ट्रायकोकर्डस् मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी एक महिन्यापर्यंत लावावीत. पोंग्यातील पिढ्या ढेकूण या किडीच्या बंदोबस्तासाठी मिथिल डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ३० मि.ली किंवा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही २६ मि.ली. किंवा मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली यापैकी कोणतेही एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणे. लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र किटकांचे संवर्धन करावे, मित्र किटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट १० टक्के दाणेदार एकरी ६ ते ८ किलो या प्रमाणात ९ महिन्यापर्यंतच्या उसास वापरावे. किंवा मिथिल-डिमेटॉन २५ टक्के प्रवाही किंवा डायमिथीएट ३० टक्के प्रवाही यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रत्येकी १० लिटर पाण्यात १५ मिली याप्रमाणात मिसळून आलटून-पालटून आवश्यकतेनुसार २-३ वेळा फवारावे.
ऊस तोडणी
उसाची तोडणी हंगामनिहाय व पक्वता पाहून करावी. तोडणीपूर्वी पिकाचे पाणी १५ दिवस बंद करावे. तोडलेला ऊस ताबडतोब गळीतास पाठवावा. सुरु १२-१३ महिने, पूर्वहंगामी १४-१५ महिने आणि आडसाली १६-१८ महिन्यात ऊस तोडणी करावी.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने सन २०११ ते २०१३ या वर्षात केलेल्या शिफारशी
अवर्षण प्रवण विभागातील १.०० हेक्टर बागायत जमिन असणा-या शेतक-यांना शाश्वत उत्पादनासाठी मफुकृवि, राहूरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी विकसित केलेली एकात्मिक शेती पध्दतीतील पिक उत्पादन ०.६० हेक्टर नगदी पिके (सोयाबीन, पूर्वहंगामी ऊस + बटाटा), ०.२५ हेक्टर हंगामी पिके (सोयाबीन, मुग, कांदा, बाजरा, रब्बी ज्वारी, गहु, हरभरा आणि चवळी), ०.१४ हेक्टर चारा पिके (हंगामी चारा पिके ज्वारी, मका ०.०४ हेक्टर व बहुवार्षीक गवत ०.१० हेक्टर) आणि गाय पालनासाठी (०.०१ हेक्टर) या घटकांचा आंतर्भाव असलेल्या पध्दतीचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (२०११)
ऊस लागवड करण्याच्या अगोदर दोन डोळ्यांच्या टिप-यांना (३०,००० टिपरी/हेक्टर) ०.१ टक्का बुरशीजनक कार्बनडेंझिम) + १०० पीपीएम जिब्रॅलिक आम्ल या संजीवकाच्या द्रावणात १५ मिनीटे बुजवुन प्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात येत. (२०११)
ऊस बेणे मळ्यापासुन दोन डोळे टिपरी बेण्याच्या अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी प्रति हेक्टरी ५० टन शेणखत, ६०० किलो नत्र, २३० किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश खत मात्रेची शिफारस करण्यात येत. (२०११)
ऊस बेणे मळ्यासाठी विभागणी नुसार रासायनिक खते द्यावयाच्या तक्ता
अ.क्र
खते देण्याचा कालावधी
शेणखत (टन/हे)
सुधारित शिफारसीत खत मात्रा
नत्र (कि./हे.)
स्फुरद (कि./हे.)
पालाश (कि./हे.)
मशागतीच्या वेळी
५० (१०० %)
१
लागवडीच्या वेळेस
४४ (७५ %)
११५ (५०%)
५८ (५०%)
२
लागवडीनंतर १ महिन्यांनी
४४ (७५ %)
३
लागवडीनंतर २ महिन्यांनी
१०० (१७ %)
४
लागवडीनंतर ३ महिन्यांनी
५४ (९ %)
५
लागवडीनंतर ४ महिन्यांनी
५४ (९ %)
६
खांदणीच्या वेळेस
१०४ (१७ %)
११५ (५०%)
५८ (५०%)
७
लागवडीनंतर १ महिन्यांनी
४८ (८ %)
८
लागवडीनंतर २ महिन्यांनी
४८ (८ %)
९
लागवडीनंतर ३ महिन्यांनी
१०४ (१७ %)
एकूण
५० (१०० %)
६०० (१००%)
२३० (१००%)
११५ (१००%)
पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम खोल काळ्या जमिनीत पूर्वहंगामी उसाच्या (वाण-को.८६०३२) आणि साखरेच्या अधिक उत्पादनासाठी आणि नत्र, स्फुरद व पालाश खतांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी १०० % शिफारशीत खत मात्रा (हेक्टरी ७२५ किलो युरिया, ३७० किलो डी.ए.पी आणि २८५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या) बिक्रेट मार्फत पहारीच्या सहाय्याने ५० % खताची मात्रा लागवडीच्या वेळी सरीच्या एका बाजूला आणि उर्वरित ५० % लागवडीनंतर १३५ दिवसांनी सरीच्या बाजूला ३० सें.मी अंतरावर १० सें.मी अंतरावर १० सें.मी खोल खड्डे घेऊन कांडीपासून १० सें.मी. अंतरावर देण्याची शिफारस केली आहे (२०११)
पूर्वहंगामी उसाच्या (वाण-को ८६०३२) लागण आणि खोडवा पिकाच्या ऊस व साखरेच्या अधिक उत्पादनासाठी तसेच जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या २५ % सेंद्रिय खताद्वारे आणि ७५ % रासायनिक खताव्दारे देण्याची शिफारस करण्यात येत आहे. याकरिता ऊस लागवडीअगोदर ताग पेरून गाडावा, बेणे प्रक्रियेसाठी प्रति हेक्टरी १०० लिटर पाण्यात ५ किलो एकत्रित जिवाणू खते (अॅझोटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी १.२५ किलो) मिसळावीत आणि ३००:१२८:१२८ किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी नवीन लागवडीसाठी द्यावा आणि खोडव्यासाठी जागेवर शिफारशीनुसार पाचट (७.५ टन/हे.) कुजवून, ५ किलो एकत्रित जिवाणू खतांचा जमिनीमध्ये वापर करण्याची आणी २२५:१०५:१०५ किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टर देण्याची शिफारस केली आहे. (२०११)
सुरु ऊसामध्ये वेलवर्गीय तणांच्या व्यवस्थापनासाठी मेट्रीब्यूझीन प्रति हेक्टरी १.२५ किलो (क्रियाशील घटक) उगवणीपूर्वी आणि २-४ डी या तणनाशकाची प्रति हेक्टरी १ किलो या प्रमाणात ऊस लागवडीनंतर ७५ दिवसांनी फवारणी करण्याची शिफारस केली आहे. (२०१२)
पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम खोल कोळ्या जमिनीत खोडवा ऊसाचे आणि साखरेचे अधिक उत्पादनासाठी आणि खतांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रति हेक्टरी १८७:८७:८७ किलो नत्र स्फुरद व पालाश ही खतमात्रा युरीया, डी.ए.पी आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या ब्रिकेटमार्फत खालील मुद्दयांचे आधारे देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
५० % खतमात्रा ब्रिकेटच्या स्वरुपात बुडख्यापासून १० सें.मी खोल खड्डे घेऊन, दोन खड्ड्यांमध्ये ३० सें.मी अंतर ठेवून द्यावे. (२०१२)
ऊस पिकावर येणा-या पोक्का बोंग रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी, रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर ०.३० % मॅन्कोझेब या बुरशीनाशकाच्या तीन फवारण्या बारा दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस केली आहे. (२०१२)
व्हिएसआय ४३४ या लवकर पक्व (१० महिने) होणा-या ऊस वाणाचे उत्पादन (१२८, ३९ टन/हे.) आणि साखर उत्पादन (२०.९३ टन/हे.) तुल्य वाण कोसी ६७१ पेक्षा अनुक्रमे १७.८६ % (१०८.९४ टन/हे.) व २३.७७ % (१६.९१ टन/हे) अधिक असुन हा वाण खोडवा पिकासाठी योग्य आहे. या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. हा वाण कांडी काडीस कमी प्रमाणात बळी पडणारा असून काणी, गवताळ वाढ, पोक्का बोंग आणि लाल कुज (प्लग पध्दत) या रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. हा वाण साखर कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात गाळपासाठी योग्य आहे. महाराष्ट्रात पूर्व हंगाम व सुरु हंगामात लागवड करण्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात येत आहे. (२०१२)
पश्चिम महाराष्ट्रात पुर्वहंगामी ऊस लागवड अधिक किफायतशीर होण्यासाठी ऊस लागवडीनंतर हरभ-यांची आंतरपिक म्हणून वरंब्याच्या माथ्यावर टोकण पध्दतीने लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (२०१३)
पूर्व हंगामी व खोडवा ऊस पिकाच्या अधिक किफायतशीर होण्यासाठी ऊस लागवडीनंतर हरभ-यांची आंतरपिक म्हणून वरंब्याच्या माथ्यावर टोकण पध्दतीने लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे (२०१२)
विद्यापीठाने विकसित केलेल्या “खोडवा व्यवस्थापन” या सुधारित तंत्रज्ञानाची अनभिन्नता बहुतांश ऊस उत्पादकांकडे आढळल्याने त्याचा प्रत्यक्ष अवलंब देखील अतिशय कमी प्रमाणात दिसुन आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाणी टंचाईच्या परिस्थितीत खोडवा ऊस उत्पादनात भरीव वाढ होण्याकरिता, विद्यापीठाने विकसित केलेल्या जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी सुधारित पाचट व्यवस्थापन, जमिनीलगत छाटलेल्या बुडख्यांचे व्यवस्थापन, पहारीने खतांचे व्यवस्थापन आणि एक डोळा पध्दतीने रोपांद्वारे पिकातील नांगे भरणे वा खोडवा ऊसातील किमान मशागतीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी, राज्य शासनाने विद्यापीठामार्फत जिल्हावार प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देण्याची शिफारस करण्यात येत आहे. (२०१३)
ऊस पिकाचे आपत्कालीन व्यवस्थापन
ऊस हे उष्ण कटीबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान, ८०-९०% आर्द्रता, प्रखर सुर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते; तथापी कडक उन्हाळा, तसेच पाऊस काळातील कमी/नगण्य पाऊसमान यामुळे ऊस पिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. पिकाच्या काही महत्त्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय व जिवरासायनिक क्रियांवर परिणाम होवून बाष्पीभवनाचा वेग वाढतो व पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. त्यामुळे या काळात योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात १५ ते ५० इतकी लक्षणीय घट येते.
ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतक-यांनी ठिबक अथवा तुषार सिंचन किंवा रेनगन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
को ८६०३२, कोएम ०२६५ व को ७४० हे वाण इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी अशा जातींचा प्राधान्याने वापर करावा.
ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावे.
पाण्याचा ताण पडत असल्यास ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी. जेणेकरुन पाण्याचे वाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ % म्युरेट ऑफ पोटॅश व २ % युरीया यांचे मिश्रण करुन पिकावर फवारणी करावी.
पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ % केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी नेहमीच्या पाटाने पाणी देण्याच्या पध्दती ऐवजी सुरुवातीस खर्चिक असली तरी ठिबक जलसिंचन पध्दतीचा वापर करावा.
ऊस पिक हे तण विरहीत ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होवून ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करुन प्रति टन पाचटासाठी ८ किलो युरीया, १० किलो सिंगल सुपर फॉस्पेट व १ किलो पाचट कुजविणा-या जिवांणूचा वापर करावा.
सुरु उसातील आंतरपीक
हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदि पीक आहे. परंतु दिवसेंदिवस ऊस पिकाचा वाढता खर्च आणि I ऊसाचे एकरी कमी उत्पादन यामुळे ब-याच वेळा ऊसाचे पीक परवडत नाही, म्हणून शेतक-यांना ऊसाऐवजी इतर पिके घेण्याकडे कल वाढलेला दिसतो. यावर उपाय म्हणून उसाचे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी उसात आंतरपिके घेणे ही काळाची गरज ठरणार आहे.
ऊस वाढीच्या अवस्था आणि उसाचा एकूण कालावधी
यांचा शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर फक्त उसाचे उत्पादन न घेता हंगामानुसार आंतरपिके घेणे सहज शक्य आहे. ऊस पीक पद्धतीमध्ये जेथे लागोपाठ उसाचे पीक घेतले जाते अशा क्षेत्रात जर्मनीची सुपिकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी : द्विदलवर्गीय आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. अलीकडे छ्स लागवडीसाठी पट्टापद्धत तसेच जोडओळ पद्धतीचा अवलंब केला जातो.
या पद्धतीने उसाच्या व साखरेच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय जोडओळीसारख्या पद्धतीत पाण्याचीही बचत होत असल्याचे आढ्ळून आले आहे. या पद्धतीत दोन जोड ओळीत पाच किंवा सहा फुटाचा मोकळा पडुा राहत असल्यामुळे या पट्यात आंतरपिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यांचा ऊस पिकाच्या वाढ़ीवर कसलाही विपरित परिणाम होत नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात आपल्या देशातील लुसशेती आणि साखर उद्योग बराच अडचणीत आला आहे. अशा अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांगीण उपाययोजनांचा अवलंब करून ऊस आणि साखरेचा उत्पादन खर्च कमी करता येईल. याबाबत वेगवेगळ्या सतरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
उसाच्या लागवड पद्धतीत बदल करून रुंद सरी किंवा जोडओळ पद्धतीने उसाची लागवड करून हंगामानुसार ऊसात आंतरपिके घेतल्यास ऊस शेतीपासून खर्च वजा जाता निव्वळ नफ्यात वाढ करणे शक्य आहे. सुरू उसाचा कालावधी १२ ते १३ महिन्यांचा असतो. छंसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या काळामध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सन्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. उसामध्ये आंतरपिके घेतल्याने भरपूर फायदा होतो. प्रामुख्याने आंतरपिकामुळे एकूण नेिव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होते. सुरू उसामध्ये भुईमूग, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबिर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचाच पोत सुधारतो.
अंतरपीके घेण्यास उस पिक योग्य
उसाची पूर्ण उगवण होण्यासाठी साधारणपणे ३ ते ६ आठवडे लागतात.
त्यानंतर सुरुवातीच्या २.५ ते ३ महिन्यात पिकाची वाढ सावकाश होत असते. उसाच्या दोन ओळीतील अंतर इतर हंगामी पिकाच्या तुलनेत जास्त असते. तसेच आवश्यकतेनुसार ओळींच्या लागवड पद्धतीतही बदल करता येतो. त्यामुळे लागणीनंतर साधारण ३ ते ३.५ महिन्यांच्या काळात उसाच्या दोन ओळीतील जागा पैिकाशिवाय रिकामी राहते. उसाला दिलेली खते, पाणी रिकाम्या क्षेत्रातील सूर्यप्रकाश इ. अनुकूल परिस्थितीचा कार्यक्षम वापर करण्यासाठी उसाच्या दोन ओळीतील जागेत आंतरपिके घेणे योग्य ठरते. योग्य आंतरपीक घेतल्यास दोन्ही पिकांची वाढ समाधानकारक होते व एकमेकांस स्पर्धा न होता आंतरपीक अल्पावधित (३ ते ३.५ महिन्यात) काढणीस तयार होते. उसामध्ये आंतरपिके घ्यावयाच्या पद्धती
१) सरीवरंब्रा पद्धत (पारंपरिक पद्धत)
जर्मनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत ९0 सें.मी., मध्यम जर्मिनीत 100 से.मी. व भारी जमिनीत 120 में मीं. अंतरावर सन्यावरंबे पाडून उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी! देण्याच्या अगोदर वरंब्याच्या दोन्ही बगलेत आंतरपेिकाची उदा. कोर्बी, फुलकोबी व कांद्याची रोपे यांची टोकण पद्धतीने लागण करावी.
२) पट्टा पद्धत
या पद्धतीत ७५ किंवा ९0 सें.मी. अंतरावर सलग सत्या पाडून दोन सन्यांत ऊस लागवड़ करून तिसरी सरी मोंकळीं सांड़ावों. अशा प्रकारे जोड़ओळ लागवड़ करून राहेिलेल्या १५0 सें.मी. केिंवा १८0 सें.मी. पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करावी. या पद्धतीत ऊसाच्या उत्पादनात घट येत नाही व आंतरपीक निघाल्यानंतर ऊसात आंतरमशागत करणे सुलभ जाते.
ऊसाच्या सुरू लागणीच्या काळात आंतरपीक म्हणून पिकांची निवड करताना ते पीक उसाची स्पर्धा न करणारे, कमी उचीचे, थोड़ा कमी सूर्यप्रकाश व सावली मानवणारे, मुळाची ठेवण उसापेक्षा वेगळी असणारे व अल्प मुदतीत तयार होणारे असावे. त्याचबरोबर आंतरपिकांची वाढ व उंची, अन्नघटक शोषण करण्याची पद्धत व क्षमता, स्थानिक बाजारपेठ, मागणी, जमिनीचा प्रकार इ. बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणून विशिष्ट पीक निवडीस अतिशय महत्व आहे.
ऊस बेणे प्रक्रिया
कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण तसेच काणी रोगाच्या बंदोबस्तासाठी प्रतिहेक्टरी ३00 मि.ली. मेलॅथिऑन अधिक १०० ग्रॅम बाविस्टिन १oo लीटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. रासायनिक बेणे प्रक्रियेनंतर अर्धा तासाने प्रती हेक्टरी १० किलो ऑसिटोबॅक्टर व १.२५ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रती १oo लीटर पाण्याच्या द्रावणात बेणे/टिपरी अर्धा तास बुडवून नंतर लागवड करावी. ऊस बेणे बीजप्रक्रियेकरीता आरसीएफचे द्रवरुप बायोला हे स्फुरद विरघळविणारे उत्तम जीवाणू खत आहे.
भुईमूग : रायझोबियम (२५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे)
सुरू उसातील आंतरपिके
पिके
पिकांच्या जाती
कालावधी
भुईमुग
जे एल -२४ , एसबी -११,जेल -५०१,टीएजी -२४
९० ते ९५१०५ ते ११०१०० ते १०५
कांदा
बसवंत – ७८०फुले समर्थ
१०० ते ११०८५ ते ९०
कोबी
गोल्डन एकर
६५ ते ८०
फुलकोबी
स्नो बॉल -१६ , पुसा सिंथेटिक
० ते १००
मेथी
पुसा अर्ली बंचीग ,कसुरी
३० ते ४०
कलिंगड
शुगर बेबी ,अर्का माणिक
९० ते १२०
काकडी
हिमांगी , फुले,शुभांगी
९० दिवस
सुरु उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमिनक्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे.
सुरु उसामध्ये आंतरपिकाचा समावेश केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. परंतु आवश्यकतेनुसार खुरपणी करवी. कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निवडक रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.
सुरू ऊस आणि आंतरपिकासाठी खत व्यवस्थापन
(खत व्यवस्थापन (कि./हे.) को. ८६o२२ व्यतिरिक्त इतर सर्व ऊस जातींसाठी)
खतांचा हप्ता देण्याची वेळ
नत्र (कि./हे.)
स्फुरद (कि./हे.) पालाश (कि./हे.)
लागवडीच्या वेळी
२५
६० ६०
लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यानी
१००
लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यानी
२५
बांधणीच्या वेळी
१००
५५ ५५
एकूण
२५०
११५ ११५
को. ८६o३२ या जातीची उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे तसेच ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे या जातीसाठी (सुरू उसास) प्रती हेक्टरी ३०० किलो नत्र, १४० किलो स्फुरद व १४० किलो पालाश नेहमीच्या पद्धतीने वापरावे. जीवाणू खताच्या बेणे प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद अन्नद्रव्यांची बचत होते. म्हणून वरील शिफारशीत नत्र व स्फुरद खताची मात्रा हेक्टरी अनुक्रमे ५0 व २५ टक्के कमी करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणा-या जमिनीसाठी गरजेनुसार एकरी १o केिली फेरस सल्फेट व ८ किलो झिंक सल्फेट ५o ते १oo किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. स्फुरदयुक्त खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून द्यावी. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची अतिरिक्त मात्रा द्यावी लागणार नाही. सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला नसल्यास एकरी २५ किलो गंधकाची मात्रा द्यावी. उसामध्ये आांतरपिकाची लागवड केली असता अांतरपिकास त्याच्या व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. आंतरपिके साधारण १00 ते ११o दिवसानंतर काढणीस येतात.
आंतरपिकाची काढणी केल्यानंतर खतमात्रा देऊन उसाची बांधणी करावी
उसातील कांदा, कोबी, फुलकोबी, कलिंगड व काकडी पिकास आंतरपिकाची खतमात्रा देताना १oo टक्के स्फुरद व पालाश आणि ५0 टक्के नत्र लागणीच्या वेळी देऊन उरलेले ५o टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. भुईमूग या पिकाला संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. ऊस पिकामध्ये आंतरपिकाची योग्य निवड करून खत व पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते
✅ ऊस तोडणी नंतर पाचट न जाळता ते कुट्टी मशीन द्वारे कुट्टी करावे.
नंतर त्यावर ट्रायकोडर्मा जैविक बुरशी किंवा वेस्ट डीकंपोझर ची फवारणी करावी जेणेकरून पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
सिंगल सुपर फॉस्फेट ची मात्रा दिल्यास सुद्धा पाचट कुजण्यास मदत होते.
त्यानंतर कुट्टी केलेलं पाचट मातीत गाडावे, त्यासाठी दोन ओळींतील सरी वरंबा फोडून त्याची माती पाचट झाकण्यासाठी वापरावी.
जैविक बुरशी/वेस्ट डीकंपोझर सक्रिय राहून कुजवण्याचे काम चांगले व्हावे यासाठी जमिनीत वापसा स्थितीत ओलावा राखणे आवश्यक असते.
गरज पडल्यास जैविक बुरशी ची दुसरी फवारणी/आळवणी १०-१५ दिवसांनी करावी.
पाचट चांगले कुजेले नाही तर जमिनीत कर्ब:नत्र गुणोत्तर वाढते. त्यामुळं पिकाला नत्राची कमतरता भासू शकते. त्यामुळं पाचट चांगले कुजेल याची काळजी घेणं गरजेचं असतं.
✅ पाचट न जाळता जमिनीत गाडून कुजविण्याचे फायदे: १. सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत २. जमिनीची सुपीकता वाढते व अन्न द्रव्यांचा पुरवठा चांगला होतो. ३. सुप्तावस्थेत असलेल्या कीडी व रोगकारक बुरशी यांचा नायनाट होऊन पुढील पिकास/ खोडवा उसात कीड रोग प्रादुर्भाव कमी होण्यास मदत. ४. पाचट जाळल्यामुळे होणारी मातीतील उपयोगी सूक्ष्म जिवाणू व मित्र किडी यांची हानी टाळण्यास मदत होते. नैसर्गिक कीड रोग नियंत्रणास चालना मिळते. – आपलं शेत आपला परिसर
सूचना – शेतकरी अजूनही सोन्यासारखे पाचट जाळून घालवत आहे. बाबांनो पुढच्या पिढीच्या हातात शेती निरोगी द्यायची असेल तर पाचट जाळणं टाळावं लागेल नाहीतर एक दिवस तुम्हालाही असंच जळावं लागेल – डॉ अंकुश जालिंदर चोरमुले
नाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपातीचा माल तयार होतो.
Nashpati Lagvad
नाशपातीच्या लागवडीसाठी रेताड चिकणमाती असलेली जमीन आणि दळच्या जमीनी खुपच फायदेशीर ठरतात. एकूणच, नाशपातीच्या लागवडीसाठी अशा जमिनीची गरज असते ज्यातून पाणी सहज बाहेर जाऊ शकते. नाशपातीची लागवड ही चिकणमाती आणि अधिक पाणीवाल्या जमिनीतही करता येते. नाशपाती खाल्ल्याने कुपोषण बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते.
नाशपातीविषयीथोडक्यात
नाशपाती हंगामी फळांच्या यादीत येते आणि हे फळ खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.
या व्यतिरिक्त, लोह देखील यात भरपूर आहे, हे फळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. नाशपातीच्या सेवनाने खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते. हेच कारण आहे की लोक नाशपाती खायला पसंती दाखवाताहेत आणि त्याला बाजारात मागणी देखील आहे.
नाशपातीच्या लागवडीसाठी रेताड चिकणमाती असलेली जमीन आणि दळच्या जमीनी खुपच फायदेशीर ठरतात. एकूणच, नाशपातीच्या लागवडीसाठी अशा जमिनीची गरज असते ज्यातून पाणी सहज बाहेर जाऊ शकते. नाशपातीची लागवड ही चिकणमाती आणि अधिक पाणीवाल्या जमिनीतही करता येते.
ही फळे ज्या वृक्षापासून मिळतात त्यांचा समावेश रोझेसी कुलातील पायरस प्रजातीत होतो. गुलाब, सफरचंद या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. सामान्यपणे पायरस प्रजातीच्या वनस्पतींना पेअर म्हणतात. या प्रजातीत सु. २० जाती असून विशेषकरून त्या समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. पायरस कॉम्युनिस म्हणजे सामान्य पेअर. ही वनस्पती मूळची पूर्व यूरोप आणि पश्चिम आशियातील असून त्यापासून आजचे रसाळ आणि लुसलुशीत प्रकार विकसित झाले आहेत. आशियातील आजचे प्रकार चिनी सँडपेअर (पा. पायरिफोलिया ) या जातींपासून तयार झाले आहेत. या प्रकारातील फळांचा गर काहीसा चरबरीत आणि रवाळ असतो. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि निलगिरी टेकड्या येथे काही ठिकाणी नासपतीची लागवड करतात.
नासपती वृक्ष डेरेदार व पानझडी असून १०-१५ मी. उंच व सरळ वाढतात. पाने साधी, एकाआड एक, २-२.५ सेंमी. लांब, वर्तुळाकार, चिवट व तळाशी पाचरीसारखी असतात. फुले पांढरी, २-२.५ सेंमी. व्यासाची असून ती पानांच्या अक्षामध्ये येतात. बहुतेक जातींमध्ये मधमाश्यांमार्फत परागण होते. झाडे लावल्यापासून ४ ते ७ वर्षांमध्ये फलधारणा होते. फळे आकाराने पेरूसारखी, देठाजवळ निमुळती व दुसऱ्या टोकास गोलाकार, नरम व गोड असतात. एका फळात बिया सु. १०, परंतु कमीजास्त असतात. फळांच्या गरामध्ये १५% कर्बोदके असून ०.४% प्रथिने असतात. याखेरीज कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, अन्य खनिजे, तसेच ब-समूह आणि क जीवनसत्त्वे असतात. ही फळे सफरचंदापेक्षा अधिक नरम व गोड असतात. पाणी व ऊष्मांक दोन्ही फळांमध्ये सारखी असतात.
नासपतीची ताजी व पिकलेली फळे तशीच खातात. त्यांच्या रसापासून सरबते तसेच मद्ययुक्त पेये बनवितात. फळे तशीच किंवा हवाबंद करून विक्रीसाठी ठेवतात. त्यांपासून मुरांबे करतात. फळात शर्करा कमी असल्याने ती मधुमेही लोकांना खाण्यास उपयोगी असतात. फळे स्तंभक, शामक व ज्वरनाशी आहेत.
कोणकोणत्याआहेतनाशपातीच्याजाती
नाशपाती खाल्ल्याने कुपोषण बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते. नाशपातीच्या बऱ्याच चांगल्या जाती आहेत ज्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देऊ शकतात. नाशपतीच्या जाती जशा कि, पत्थर नाग, पंजाब नख, पंजाब गोल्ड, पंजाब अमृत, पंजाब ब्यूटी आणि बागुगोसा.
पत्थरनाग: पत्थरनाग ही एक कडक फळे असलेली नाशपाती प्रजाती आहे जिचे झाड हे पसरनारे असते. याची फळे साधारण आकाराने गोल आणि हिरवी असतात. साधारणपणे जून महिन्यात नाशपाती पिकण्यास सुरवात होते, परंतु ह्या जातींचे नाशपाती जुलैच्या अखेरीस पिकतात आणि प्रति झाड दीडशे किलोपेक्षा जास्त फळे देतात.
पंजाबनख: पंजाब नख ही नाशपातीची जात देखील एक कठीण फळ असणारी आणि पसरणारी आहे. याची फळे अंडाकृती, हलकी पिवळी आणि रसाळ असतात. पंजाब नख जातीवर ठिपके बनलेले असतात.
पंजाबगोल्ड: पंजाब गोल्ड सामान्यता मऊ फळ येणारी नाशपातीची जात आहे. ह्याला स्पर्श केल्यास किंचित मऊ असल्याचे जाणवेल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ते काढणीसाठी तयार होते. पंजाब गोल्डच्या नाशपातीपासून विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
पंजाबनेक्टर : पंजाब अमृत देखील एक मऊ फळ येणारी प्रजाती आहे. या जातीची फळे सामान्यपेक्षा मोठी आकाराची असतात. या जातीची फळे बाहेरून हिरवी असतात. आतून ह्या फळांचा पांढरा गीर असतो. फळ पिकल्यानंतर रसाळ होतात खाण्यास चविष्ट असतात.
पंजाबब्युटी : ही नाशपातीची वाण देखील सामान्य आणि मऊ आहे. ह्याच्या फळांचा आकार थोडा मोठा असला तरी, रंग पिवळा आणि हिरवा राहतो. ह्या फळाचा गीर पांढरा असतो. ह्या जातींचे फळ खूप रसाळ आणि गोड असते.
बागुगोसा: बागुगोसा ही एक सामान्य नाशपातीचा प्रकार आहे, जो ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात पिकतो. ज्यांना बाजार लांबचा असतो, त्यांच्यासाठी ही जात सर्वोत्तम आहे.
जोपर्यंत नाशपातीला फळ लागत नाही, तोपर्यंत उडीद, मूग आणि तोर यासारखी पिके आंतरपीक म्हणुन घेता येतात. तर रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि इतर भाज्यांची लागवड करता येते.
नाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपाती तयार होतात.
रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिबदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. (Agropanch App)
Gandhul Kaht Nirmiti
देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
गांडूळ खत म्हणजे काय
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
गांडूळाचे प्रकार
एपिजिकः ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
अॅनेसिकः ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.
एण्डोजिकः ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.
गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती
गांडूळांच्या 300हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.
गांडूळ जीवनक्रम
गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेऊन त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात (Agropanch App)
गांडूळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मीती
जागेची निवड व बांधणी
गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे – उपलब्ध होणारे शेणखत व छपरासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छपरामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.
गांडूळ खाद्य
चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.त्याच प्रमाणे घरातील कचरा, सांडपाणी, तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुद्धा वापरता येतो.(Agropanch App)
शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लॅंन्टमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. या व्यतीरीक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रीया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल.
गांडूळना ग्लिसरडियाचा पाला गांडूळ बेड वर टाकून त्यावर ४ इंच जाडीचा शेनाचा लेप दिल्यास १० पटीने गांडूळ संख्या वाढते
गांडूळखत करण्याच्या पद्धती
गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.
ढीग पद्धत
ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत.
साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.(Agropanch App)
खड्डा पद्धत
या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा
खत तयार होण्यास लागणारा कालावधी
गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.
गांडूळखत तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी
गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.
शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व 15-20 दिवस कुजवावे.
खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: 15 ते 20 सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.
गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याअगोदर 1 दिवस पाणी मारावे.
गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
व्हर्मीवाॅश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाॅश जमा करण्याचे नियोजन करावे
गांडूळखत वेगळं करणे
खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे.गांडुळखत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल.ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत.अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतिरीक्त दुसऱ्या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.(Agropanch App)
गांडूळखताचे फायदे
जमिनीचा पोत सुधारतो.
मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीची धूप कमी होते.
बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
गांडूळपालन हे काही प्रकारचे गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळांच्या काही प्रजातींच्या प्रक्रिया आहे. याला जंत शेती असेही म्हणतात. गांडूळखत हे शेणखत प्रक्रियेचे उत्पादन म्हणून वर्णन केले आहे. ज्यात वर्मीकास्ट, पेंढा सामग्री आणि अन्न कचरा यांचे विषम मिश्रण तयार करण्यासाठी पांढरे वर्म्स, लाल विग्लर आणि गांडुळे यांचा समावेश आहे.गांडूळ पालनामध्ये पाण्यात विरघळणारे पोषक घटक असतात ज्यात पोषक समृद्ध सेंद्रिय खत तयार करतात.हे मातीचे सर्वोत्तम कंडिशनर म्हणून कार्य करते. म्हणून ते लहान प्रमाणात सेंद्रिय शेतीत वापरले जातात. काळ्या पाण्यापासून किंवा सांडपाण्यापासून ऑक्सिजन मागणीसाठी देखील वापरले जातात.हे मातीचे सर्वोत्तम कंडिशनर म्हणून कार्य करते. म्हणून ते लहान प्रमाणात सेंद्रिय शेतीत वापरले जातात. काळ्या पाण्यापासून किंवा सांडपाण्यापासून ऑक्सिजन मागणीसाठी देखील वापरले जातात.तळघर किंवा घराच्या बाल्कनीमध्ये गांडूळ लागवड करता येते. जंत बिनचा फायदा हा आहे की ते प्रक्रियेस गती देऊ शकतात.
गांडुळांचे प्रकार
गांडुळ मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त असून, ते सेंद्रिय कचऱ्याचे गांडूळ खतात रुपांतरण करतात.
एपिजिक : ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
अॅनेसिक : ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.
एण्डोजिक : ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना:
Shetmal Taran
शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असुन या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने (180 दिवस) कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रिय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते.
कृषि पणन मंडळाने या योजने अंतर्गत सन 1990-91 ते 2020-21 अखेर पर्यंत एकुण रू. 23,885.15 लाख इतके तारण कर्जाचे वाटप केलेले आहे.
शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर :-
एकूण किंमतीच्या 75% रक्कम. (प्रचलित बाजार भाव किंवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी असेल त्या दराने होणाऱ्या एकुण किंमतीच्या)
६ महिने
६ टक्के
2
वाघ्या घेवडा (राजमा)
एकूण किंमतीच्या 75% रक्कम. किंवा रु.3000/- प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम
६ महिने
६ टक्के
3
काजू बी
एकूण किंमतीच्या 75% रक्कम. किंवा रु.100/- प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम
६ महिने
६ टक्के
4
सुपारी
एकूण किंमतीच्या 75% रक्कम. किंवा रु.100/- प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम
६ महिने
६ टक्के
5
बेदाणा
एकुण किंमतीच्या कमाल 75% किंवा जास्तीत जास्त रु. 7500/- प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम
६ महिने
६ टक्के
शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, अटी व शर्ती खालीलप्रमाणे-
शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्विकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही.
प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किमंत ही त्यादिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते.
तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) असुन तारण कर्जास व्याजाचा दर 6% आहे.
तारण कर्जाची 180 दिवस मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीस पणन मंडळाकडून 1% किंवा 3% व्याज प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही.
तारण कर्जाची विहित मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीकडून कृषि पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही.
स्वनिधीतून तारण कर्जाचे वाटप करणाऱ्या बाजार समितीस तिने वाटप केलेल्या कर्ज रकमेवर 1% किंवा 3 % प्रोत्साहनपर व्याज सवलत अनुदान.
6 महिने (180 दिवस) मुदतीनंतर सहा महिन्यापर्यत 8 टक्के व्याज दर व त्याचे पुढील सहा महिन्याकरिता 12 टक्के दराने व्याज आकारणी केली जाते.
तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामुल्य करते.
तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची राहते.
राज्य अथवा केंद्रिय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही बाजार समित्यांकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
तणनाशक म्हणजे काय? तणनाशक हे अवांछित वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे. पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव.
खालील कारणांमुळे तणे पिकांचे शत्रू मानली जातात : तणांमुळे प्रती हेक्टरी १५० किग्रॅ नायट्रोजन वाया जातो. काही तणांच्या (उदा., लव्हाळा) मुळांवाटे विषारी द्रव्ये बाहेर पडतात व त्यांचा लागवडीखालील पिकावर अनिष्ट परिणाम होतो. तणांचा नाश करण्यासाठी फार मोठा खर्च होत असल्याने पिकाच्या उत्पादनाचा खर्च वाढतो. तणांमुळे लागवडीखालील पिकांचे उत्पन्न कमी येते व पिकाची कापणीही त्रासदायक होते. पिकाची मळणी करतेवेळी तणांची बीजे पिकात मिसळल्यामुळे पिकाला बाजारात कमी किंमत येते. कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), सूक्ष्मजंतू, व्हायरस व किडी या पिकांच्या शत्रूंना तणे आश्रय देतात. काही तणे मनुष्य आणि जनावरांना विषारी असतात (उदा., सत्यनाशी अथवा पिवळा धोत्रा). पाण्यात वाढणाऱ्या तणांमुळे पाण्याच्या प्रवाहात (नद्या, कालवे, पाण्याचे नळ) अडथळा निर्माण होतो. कृषिव्यवसायात मनुष्याची पुष्कळशी शक्ती तणांशी झगडण्यात खर्च होते. याबाबतीत शिथिलता आली की, तणांचा जोर वाढतो व मग तणनाशाचे काम आणखीच त्रासदायक आणि खर्चाचे ठरते.
पिकासाठी तण उपयुक्त: प्रत्येक गोष्ट उपयुक्त आणि हानिकारक आहे. तणांमुळे पुष्कळसे तोटे होत असले, तरी काही फायदेही असतात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. फुलावर येण्यापूर्वी तणे जमिनीत गाडल्यास पिकाला सेंद्रिय खताचा पुरवठा होतो (उदा., बावची, गोखरू). शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) तणांपासून जमिनीला नायट्रोजनाचा पुरवठा होतो. ओसाड प्रदेशांत वाळूमुळे व जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशांतील उतारावरील जमिनीचे वाहत्या पाण्यामुळे होणारे नुकसान तणांमुळे वाचते. हरळीसारख्या तणांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो. काही तणांचा औषधासाठी उपयोग होतो. गुम्मा (ल्युकस ॲस्पेरा) नावाचे तण सर्पदंशावर गुणकारी आहे. पिवळ्या धोत्र्याच्या बियांपासून काढलेले तेल त्वचारोगावर उपयोगी आहे. कासे गवतासारख्या तणांचा उपयोग घरे अथवा झोपड्या शाकारण्यासाठी व लव्हाळ्याचा उपयोग उदबत्त्या तयार करण्यासाठी करतात. पिवळ्या धोत्र्याच्या झाडांमुळे क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनी सुधारण्यास मदत होते.
काही महत्त्वाची तणनाशके : सामान्यतः तणनाशक हे अवांछित वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे. पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव. २,४–डी : हे वृद्धिनियंत्रक अथवा हॉर्मोन वर्गातील दैहिक वेचक तणनाशक असून ते फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. याचा शोध १९४४ च्या सुमारास लागला आणि या व अशा प्रकारच्या इतर तणनाशकांच्या शोधामुळे तणनियंत्रणाच्या शास्त्रात फार मोठी प्रगती झाली. हे तणनाशक तृणधान्याच्या पिकांतील वर्षायू आणि बहुवर्षायू रुंद पानांच्या तणांचा नाश करते, परंतु पिकाला इजा होत नाही. तुलनेने ते स्वस्त असून मनुष्य आणि जनावरे यांना त्यापासून विषबाधा होत नाही. ते ज्वालाग्राही नसल्यामुळे आणि वापरण्यास सोपे असल्यामुळे फार लोकप्रिय ठरले आहे. या तणनाशकामुळे वापरण्याची भांडी गंजत नाहीत. अतिसूक्ष्म प्रमाणातही ते प्रभावी आहे. सोडियम लवण (उदा., डायकोटॉक्स), आमइन लवण आणि एस्टरे अशा तीन स्वरूपांत ते मिळते. ते मुळावाटे व पानांवाटे शोषिले जाते. बी पेरल्यावर परंतु उगवून येण्यापूर्वी, तसेच पीक उगवून आल्यावर अशा दोन्ही अवस्थांमध्ये ते फवारण्यास उपयुक्त आहे. गहू, भात, ऊस, मका, ज्वारी, बाजरी आणि इतर तृणवर्गीय पिकांतील रुंद पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी हे तणनाशक सोडियम लवणाच्या स्वरूपांत वापरले जाते. लव्हाळा या बहुवर्षायू तणाचा नाश करण्याच्या कामीही याचा वापर केला जातो. मात्र यासाठी हे तणनाशक फक्त एकदाच फवारून तणाचा संपूर्ण नाश होत नाही. याची फवारणी करते वेळी ते शेजारच्या रुंद पानांच्या पिकांवर (उदा., कापूस, टोमॅटो, भेंडी) वाऱ्याने उडून पडणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते, कारण पिकांना तणनाशकामुळे इजा होण्याचा धोका असतो. हे तणनाशक विषारी नसले, तरी फवारताना त्याचा त्वचेशी संपर्क येणार नाही अथवा ते नाकातोंडात जाणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
२, ४–५ टी : हे तणनाशक २, ४–डी पेक्षा जमिनीत जास्त दिवस टिकून राहत असल्यामुळे काष्ठमय तणांचा नाश करण्याच्या कामी उपयुक्त आहे. ते २, ४–डी पेक्षा महाग असते.
एमसीपीए : २, ४–डी सारखेच हे तणनाशक आहे परंतु २, ४–डी पेक्षा जास्त वेचक आहे.
एमसीपीबी आणि २, ४–डीबी : ही तणनाशके त्यांच्या मूळ स्वरूपांत वनस्पतींना विषारी नाहीत. अशिंबावंत वनस्पतीच्या पानांत या तणनाशकांचे अनुक्रमे एमसीपीए आणि २, ४–डी मध्ये रूपांतर होऊन त्या तणांचा नाश होतो. शिंबावंत वनस्पतींना काही इजा होत नाही. वाटाण्यासारख्या शिंबावंत पिकातील रुंद पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी ही तणनाशके वापरतात.
स्टॅम एफ ३४ : हे स्पर्शीय वेचक तणनाशक आहे. भारताच्या पिकातील वर्षायू गवते आणि रुंद पानांची तणे यांचा नाश करण्यासाठी उपयुक्त आहे.
शेतकरी शिफारस केलेली काही तण नाशके :-
१. टोमॅटो – सामान्यतः टोमॅटो पिकामध्ये तनाची निर्मिती खुप प्रमाणात होते त्यामध्ये तुम्हाला जर तणांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर Targa Super & Sencor हे तणनाशक वापरावे जे की १-१.५ ml + १ gm डोस असावा. याच प्रमाणात तुम्ही कोबी या पिकाला सुद्धा हेच तणनाशक व डोस देऊ शकता.
२. सोयाबीन – सोयाबीन या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Iris हे तणनाशक वापरा ज्याचा डोस २ ml असावा, सोयाबीन पिकासाठी Iris हे तणनाशक खूप प्रभावी आहे
३. मका – मका या पिकामध्ये तण रोखण्यासाठी तुम्ही Laudis + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ११५ ml + ५०० gm प्रति एकर असावे किंवा Tynger + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ३० ml + ५०० gm प्रति एकर असावा.
४. गहू – गहू या पिकातील तण जाळण्यासाठी तुम्ही Algrip हे तणनाशक वापरावे ज्याच्या डोस चे प्रमाण ८ gm प्रति एकर असावे.
५. ऊस – उस या पिकामध्ये जास्त प्रमाणात तण उगवते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ D + Sencor + Atrazin हे तणनाशके वापरावे ज्याचे प्रमाण ५ ml + २ gm + ३ gm असावे.
६. कलिंगड, खरबूज, वांगी, मिरची, शिमला मिरची, काकडी, भेंडी, वाटाणा, शेपू , मेथी, कारले, दुधी भोपळा, दोडका, चवळी, फरशी, गवार, बिट या पिकांमधील तण जाळण्यासाठी तुम्ही Targa Super हे तणनाशक वापरा ज्याचा डोस १.५ ml ते २ml असावा.
७. केळी, पपई, आंबा, सीताफळ, चिकू, पेरू या पिकातील तण रोखण्यासाठी Targa Super + Gramazone हे तणनाशक वापरावे ज्याचा डोस २ ml ते १० ml या प्रमाणात असावा.
राऊंडप तणनाशक :- परिणाम :- सर्व प्रकारचे तणाचा नाश करण्यास मदत घटक :- ( isopropylamine salt of glyphosate 41%) राऊंडप हे औषध तणनाशक म्हणून वापरले जाते .हे तणनाशक फक्त मोकळ्या शेतात किंवा बांधा वर मारले जाते . हे तणनाशक २१ दिवस त्याची गुणवत्ता टिकून ठेवते त्या मुळे नंतर कोणतेही पीक घेण्या अगोदर नांगरणी करणे आवश्यक आहे .या तणनाशकाला थेट पिकांमध्ये वापरणे टाळावे .
वापरण्याची पद्धत :- ८० मिली राऊंडप व १० मिली स्टिकर २० लिटर टाकी साठी ४००-४५० ग्राम युरिया २० लिटर टाकी साठी १ लिंबू पिळून टाका लिंबू हे पाण्याचा ph(Potential of Hydrogen ) वाढवण्यासाठी वापरतात ( युरिया ऐवजी अमोनियम सल्फेट वापरू शकता) वरील तणनाशकांशिवाय अनेक तणनाशके उपलब्ध आहेत. ग्रॅमाझोन, टोक ई–७५, अनसार, रॅनडॉक्स आणि लास्सो ही नवी तणनाशके आहेत.
स्वतःची काळजी :- कोणतीही फवारणी करण्या अगोदर स्वतःची काळजी घ्या पूर्ण झाकलेले कपडे ,मास्क, हात मोजे व गॉगल चा वापर करा .
तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी – 1) उगवणपूर्ण तणनाशके फवारताना जमिनीत ओल असावी. 2) नॅपसॅक फवारणी पंपाचा वापर करावा. फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकासाठी स्वतंत्र फवारणी पंप वापरावा. पंप स्वच्छ धुऊनच वापरावा. 3) फवारणी करताना हवा शांत असावी. ढगाळ वातावरणात फवारणी करू नये. 4) पाऊस न येण्याची शक्यता (किमान 2 ते 4 तास) लक्षात घेऊन फवारणी करावी. 5) कीटकनाशकांपासून तणनाशके स्वतंत्र ठेवावीत. 6) शिफारस केलेली तणनाशके संबंधित पिकासाठी, दिलेल्या मात्रेमध्ये, दिलेल्या वेळी आणि दिलेल्या पद्धतीने वापरावीत. 7) फवारणीसाठी वापरावयाचे पाणी स्वच्छ असावे. 8) तणनाशकांचा आलटून-पालटून वापर करावा. 9) तणनाशके वापरलेल्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा. 10) उभ्या पिकात हुडचा वापर करावा. 11) फवारणी करताना हातमोजे, तोंडाला फडका किंवा मास्क वापरावा. 12) फवारणी करताना धूम्रपान करू नये, तंबाखू खाऊ नये.
तणनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी ❏ तणनाशके नामांकित कंपनीची खरेदी करावीत. तणनाशके खरेदी करताना खरेदी केलेल्या तणनाशकाचे पक्के बील (पावती) घ्यावी. ❏ बिलावर तणनाशकाचे नाव, उत्पादक कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादन दिनांक व मुदत दिनांक, पिकाचे नाव व वापराचे प्रमाण नमूद केल्याची खात्री करावी. ❏ नजीकच्या 1 ते 1.5 महिना कालावधीत मुदत बाह्य होणारी तननाशके शक्यतो खरेदी करणे टाळावे. ❏ खरेदी करणारे तननाशक ज्या पिकाकरता वापरायचे आहे त्या पीकास सदर तननाशकाची शिफारस आहे किंवा कसे याची प्रथम खात्री करावी. ❏ खरेदी केलेले तननाशक शिफारशीत पिकामध्ये शिफारशीत केलेल्या फवारणी पद्धतीने व शिफारशीत मात्रेत फवारावे. ❏ फवारणी केल्यानंतर तणनाशकाचा प्रत्यक्ष परिणाम दिसेपर्यंत तणनाशक वेस्टने काळजीपूर्वक जतन करावेत व योग्य त्या परिणामाची खात्री झाल्यानंतरच वेस्टनांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. ❏ तणनाशके बुरशीनाशके किंवा कीडनाशके एकत्रित ठेवू नयेत अथवा फवारून शिल्लक राहिलेले तननाशक रिकाम्या तणनाशकाच्या वेष्टनात साठवू नये कारण नजरचुकीने चुकीचे तणनाशक पिकावर करण्याची शक्यता असते.
टीप :- तणनाशक हे मनुष्य तसेच जमिनी साठी सुद्धा धोक्याचे असते त्यामुळे होईल तेवढ वापरणे टाळा .. बाजारात चांगल्या प्रतीचे तण काढणी यंत्र मिळतात ते वापरून पहावे.
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते.
Amba Lagvad
जमीन
मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी
सुधारित जाती व संकरित जाती
हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज
अभिवृदधी किंवा रोप तयार करणे
पारंपारिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयापासून केली जाते. कोय कलम, मृदूकाष्ठ कलम, व्हिनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करुन अभिवृद्धी करण्यात येते.
लागवड
१० X १० मी भारी जमिनीत
९ X ९ मी मध्यम जमिनीत
१ X १ X १ मी. आकाराचे खडे घेऊन शेपाखत (४० -५० किलो) + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्पेट (२ किलो) मिश्रणाने भरावेत.
खते
एक वर्ष वयाच्या झाडास १५ किलो कंपोस्ट खत, १५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद १०० ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्यावेत. दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून १० व्या वर्षापासुन प्रत्येक झाडास ५० किलो कंपोस्ट खत, १.५ किलो नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद व १ किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्यावे.
पाणी व्यवस्थापन
पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३ – ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
आंतरपिके
आंबा बागेत १० वर्षापर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, धैंचा, ताग ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.
फळांची काढणी
आंबा फळे १४ आणे (८५ %) पक्वतेची काढावीत. यावेळी फळांना लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता १.०२ ते १.०४ एवढी असावी. फळांची काढणी देठासहित करावी. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चारनंतर काढावीत.
प्रतवारी
> ३५० ग्रॅम, ३००- ३५१ ग्रॅम, २५१ ते ३०० ग्रॅम व २५० ग्रॅम पेक्षा कमी वजनाची अशी प्रतवारी करावी. प्रतवारी झाल्यावर फळे ५०० पीपीएम कार्बनडेन्झिम (०.५ ग्रॅम कार्बनडेन्झिम १ लिटर पाण्यात ) च्या द्रावणात १० मि. बुडवावीत त्यामुळे काढणीनंतर फळे कुजण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर फळे पंख्याखाली वाळवून खोक्यामध्ये भरावीत.
तुडतुडे
पिल्ले व पुर्ण वाढलेले तुडतुडे कोवळी पाने, मोहोर व छोट्या फळांच्या देठातून रस शोषतात. यामुळे पाने वेडीवाकडी होतात, पालवी कोमेजते, मोहोर गळतो. तसेच छोटी फळेही गळतात. मोहोराच्या वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सुर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करुन तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) कीटकनाशकाची फवारणी करावी.मिजमाशी
मिजमाशी कोवळ्या पालवीच्या दांड्यावर, पानांच्या देठावर, मोहोराच्या मधल्या दांड्यावर, तसेच मोहोराच्या तु-यांवर अंडी घालते व त्यातुन बाहेर येणारी पांढरट पिवळसर अळी आतील पेशींवर उपजीविका करते. परिणामी त्या ठिकाणी बारीक फुगारे काळी गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी पालवीवर व मोहोरावर दिसून येतात. व त्यामुळे पालवी व मोहोर करपतो. जून जुलैमधील पालवीवरील मिजमाशीचे नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यात उघडीप पाहून डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) फवारावे. या कीडीची अळी जमिनीत कोषावस्थेत जात असल्यामुळे पाऊस थांबल्यावर झाडाखालची जमीन नांगरुन त्यात मिथील पॅराथिऑनची भुकरी मिसळावी.फुलकिडे
फुलकि़डे पानांची खालची बाजू तसेच मोहोराचे दांडे व फुले खरवडतात यामुळे पाने वरच्या बाजूला वळून पानाचा रंग करडा बनतो. मोहोर तांबूस होऊन गळतो व फळधारणा होत नाही. फळांची साल खरवडून त्यातून येणारा रस शोषतात. फुलकिडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर – फेब्रुवारी महिन्यापर्यत दिसून येतो. फुलकिडीचा सिरटोथ्रिप्स डार्सेलिस या प्रजातीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ई.सी (१०मिली/ १० ली) किंवा फोझॅलॉन ३५ ई.सी. (१०मिली/ १० ली) या किटकनाशकाची फवारणी करावी. आंबा फळावर आढळून येणा-या थ्रिप्स प्लॅक्स व (२.५ मिली/ १० ली) व त्यानंतर आवश्यकता भासल्यास थायमेथोक्झाम २५ WG (२ग्रॅम/१० ली) या कीटकनाशकाची फवारणी करावी.फळमाशी
फळ पिकण्याच्या अवस्थेत असताना मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणा-या अळ्या गरावर उपजीविका करतात. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. कामगंध सापळे वापरावेत.
भूरी
मोहर व कच्च्या फळांची गळ होते. नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने, मोहर नष्ट करावेत. ०.२% गंधकाची पहिली फवारणी करावी. १५ दिवसांनी ०.१ % डिनोकॅपची दुसरी फवारणी करावी.डायबॅक
रोगग्रस्त फांद्या शेंड्यापासून वाळायला लागतात. नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी. रोगग्रस्त फांद्यांची ३ इंच खालपासून छाटणी करावी. त्यानंतर ०.३ % ऑक्झीक्लोराइडची फवारणी करावी.
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते.
Halad Lagvad
महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. त्यासाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्याने विचार होणे गरजेचे आहे. त्यामध्ये सतत होणार्या हळदीच्या दरामधील चढउतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींचा विचार करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आहारातील हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. १०० ग्रॅम हळदीमध्ये खालील घटक आढळतात.
पाणी
६ ग्रॅम
सोडिअम
१० मिली ग्रॅम
ऊर्जा
३९० कॅलरी
लोह
४७.५ मिली ग्रॅम
प्रथिने
८.५ ग्रॅम
अ जीवनसत्व
१७५ आय. यु.
स्निग्ध पदार्थ
८.९ ग्रॅम
ब जीवनसत्व
०.०९ मिली ग्रॅम
कर्बोदके
६९.९ ग्रॅम
ब – २ जीवनसत्व
०.१९ मिली ग्रॅम
तंतू
६.९ ग्रॅम
निआसीन
४.८ मिली ग्रॅम
राख
६.८ ग्रॅम
अॅस्कॉरबीक अॅसिड
५० मिली ग्रॅम
कॅल्शिअम
०.२ ग्रॅम
कुरकुमीन
२ ते ६ %
फॉस्फरस
२८० मिली ग्रॅम
सुगंधी तेल
५ % पर्यंत
पोटॅशिअम
२५०० मिली ग्रॅम
हळदीचे औषधी गुणधर्म
1. आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे.
2. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.
3. पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.
5. डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.
महत्त्व
धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य, पूजा, भंडारा, सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात.
हवामान
हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणार्या निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते.थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.
जमीन
हळद पिकाची यशस्वी किंबहुना फायदेशीर लागवड ही प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवरच अवलंबून असते. हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरीसुद्धा त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म, जमिनीची जडण – घडण, जमिनीचा सामू, जमिनीचा उतार या गोष्टी लागवडीपूर्वी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपणाकडे उपलब्ध असणार्या जमिनीचा प्रकार, तिचे विविध गुणधर्म, त्या जमिनीचा पोत याचा अभ्यास करूनच हळद लागवड करावयाची की नाही हे ठरवावे लागते. या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन, क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही म्हणून हळद लागवडीसाठी शक्यतो अशा जमिनीची निवड करू नये. चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. आपल्याकडे हलक्या व माळरानांच्या जमिनीत सुध्दा हळदीचे पीक घेता येईल. मात्र सरासरी उत्पादन मिळविण्यासाठी त्या जमिनीची सुपिकता वाढवणे, पोत सुधारणे, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे आणि जमिनीची चांगली मशागत करणे इ. गोष्टी केल्यास माळरानावर सुध्दा हे पीक फायद्याचे ठरू शकते. शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो व पिकाची वाढ चांगली होत नाही.
सुधारित जाती
१) फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.
२) सेलम : या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे.
३) कृष्णा (कडाप्पा ) : या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्यांची संख्या ८ ते ९ असून झासांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकून पिकाच्या कालावधीमध्ये १० ते १२ पाने येतात. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास ही जात अल्प प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ ६ ते ७ सें.मी. असते.या जातीच्या वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७५ ते ८० क्विंटल प्रती हेक्टरी येते. ही जात हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन १९८४ साली कडाप्पा जातीमधून निवड पद्धतीने काढण्यात येऊन शेतकर्यांना लागवडीसाठी प्रसारित केली आहे.
४) राजापुरी : या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात. या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बर्याच वेळा हळदीच्या वायदे बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो. महणून ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.
५) खाण्याची हळद (Curcuma Longa ) : ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो. पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६% लागवड भारतात होते.
६) कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने लांब – वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.
७) इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot) : मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्रा, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते. कंदातील स्टार्च १२.५ % असून त्याचा उपयोग खर्या अॅरोरूटला पर्याय म्हणून तसेच मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.
८) आंबेहळद (Curcuma Amada) : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट – पांढरी असून बोंड तीनधारी असते. औषधी उपयोग : कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.
९) काळी हळद (Curcuma Caesia) : बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये ९.७६% सुवासिक तेल असते.
१०) कचोर (Curcuma Zedoria) : वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानांचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो.
पूर्व मशागत
हळद लागवडीमध्ये पूर्वमशागतीच्या कामामाध्ये नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाणे खणून ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची ट्रॅक्टर ने १८ ते २२ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. पहिल्या नंगारटीनंतर शेतात नंगारटीमधून चुकलेल्या कडा १ फुटांपर्यंत टिकावाने खणून घ्याव्यात. त्याचवेळी जमिनीमधील कुंदा, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.
पहिल्या नंगारटीनंतर शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून घ्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
हळद लागवडीच्या पद्धती
१) सरी वरंबा पध्दत
हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागावाद करावयाची झाल्यास ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सर्या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
२) रुंद वरंबा पध्दत
रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना १५० सें.मी. अंतरावर प्रथम सर्या पाडाव्यात. त्या सर्या उजरून ८० ते ९० सें.मी. माथा असलेले १५ सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रूंदीचे सरी वरंबे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करून घ्यावी.
लागवडीचा हंगाम आणि लागवड
हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो. लागवडीसाठी वापरले जाणार्या बियाणांची सुप्तावस्थ संपलेली असावी. बियाणाचे डोळे नकळत फुगलेले असावेत. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालतात. मात्र हळकुंड बियाणे ३० ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे असावेत. सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास वरंब्याच्या दोन्ही बाजूस ३० सें.मी. अंतरावरती गड्डे कुदळीने अगर्या घेऊन लावावेत किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत. रुंद वरंबा पद्धतीने ३० x ३० सें.मी. अंतरावरती गड्डे लावून घ्यावेत. लागवडीच्या वेळी गड्डे पुर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
बेणे
एकरी १००० किलो बेणे लागते. लागवड मातृकंदापासून करतात. या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवसाच्या वयाच्या रोपापासूनही लागवड करतात. कन्याकंदही लागवडीसाठी वापरतात.
बीजप्रक्रिया
१ लि. जर्मिनेटर १०० लि. पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये १०० किलो बेणे १० मिनिटे भिजवून नंतर ते सुकवून लावावे. हे द्रावण २ ते ३ वेळा वापरता येते. त्यामुळे कंद (बेणे) लवकर, एकसारखे उगवून मर होत नाही.
आंतरमशागत (भरणी करणे)
हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यांच्यामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजे ‘भरणी करणे’ होय. माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर पिकास हलकेसे पाणी द्यावे. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंड झाकले जातात व त्यांची चांगली वाढ होते. मात्र याउलट भरणी न केल्यास जमिनीच्या बाहेर आलेल्या हळकुंडाची वाढ होत नाही. थोडीफार झाली तरी ती निकृष्ट दर्जाची होते आणि उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी घट येते.
पाणी व्यवस्थापन
हळदीची लागवड एप्रिल -मे महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण दरम्यानच्या काळात मुळांकडून स्थिरता प्राप्त होणे हा महत्त्वाचा कालावधी असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतिनुसार हा कालावधी कमी -जास्त ठेवावा. पावसाला सुरू झाल्यानंतर पावसाचेह पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यानंतर हिवाळयामध्ये पाण्याच्या २ पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. मात्र पीक काढणीच्या १५ दिवस अगोदर अजिबात पाणी देऊ नये.
खते
हळद पिकासाठी खतामधील सर्व घटकांची कमी- अधिक प्रमाणात गरज असते. मात्र हळद पिकासाठी रासायानिक खते वापरलेल्या हळदीच्या कंदावरती अनिष्ट परिणाम होतो. असा अनुभव शेतकर्यांचा आहे. तेव्हा हळदीला शक्य तेवढ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये पुर्ण कुजलेले शेणखत एकरी १० टन (२० बैलगाड्या) आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५ ते १०० एकरी किलो दिन हप्त्यातून (लागवडीवेळी अर्धी मात्र आणि भरणीच्यावेळी अर्धी मात्रा याप्रमाणे) द्यावे. त्याचवेळी हेक्टरी २०० ते ३०० किलो करंजी किंवा निंबोळी पेंड द्यावी आणि भरणी करून द्यावी. या पिकास भरणीनंतर कोणतीही खते देऊ नयेत.
आंतरपिकांची लागवड
मुख्य पिकाशी स्पर्धा न करता हळद पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करणार्या आंतरपिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही पिके हळद पिकापेक्षा उंचीने कमी तसे च पसार्याने कमी जागा व्यापणारी असावीत. हळद पिकाची लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येउन कंद पोसण्यास सुरुवात होते. त्यासाठी हळकुंड येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी होणे फायदेशीर ठरते, महणून हळद पिकामध्ये श्रावणघेवडा, मिरची, कोथिंबीर या पिकांची लागवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. कारण मक्यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २० % घट येते.
कीड नियंत्रण
१) कंदमाशी : या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात. अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात. याच्या नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागताच माशा मारण्यासाठी प्रोटेक्टंट ३० ग्रॅम आणि क्विनॉलफॉस २५% प्रवाही २० मी.ली. १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान १ ते २ फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. याच किटकनाशकाचे पुढील २ हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत. अर्धवट कुजले, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.
२) पानातील रस शोषून घेणारा ढेकूण : या किडीची पिल्ले पानाच्या पाठीमागे एकत्रितपणे आढळून येतात. ते पानाच्या पाठीमागे राहून पानातील रस शोषून घेतात. या किडींचा उपद्रव झालेली पाने तांबूस पिवळसर रंगाची दिसून येतात. तिच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट २५ ग्रॅम + मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
३) पाने गुंडाळणारी अळी : हळद पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते. किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.
४) सुत्रकृमी : काही भागामध्ये या पिकावर सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून द्यावा किंवा फोरेट १० जी. हेक्टरी २५ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते क्विं/हे. लिंबोळी पेंडीचा वापर करावा.
रोग नियंत्रण
१) कंदकूज (गड्डे कुजव्या) : हळद तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५०% पर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालीपर्यंत वाळले जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना/आंतरमशागत करताना कंदास ईजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंदकुजण्यास सुरुवात होते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करतान निरोगी बियाण्याचा वापर करावा. जमीन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचर्याची निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करून घ्यावा. तसेच मेटॅलॅक्सिल ८% + मॅकोझेब ६४% हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडॅझिम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ गरम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशाकांची आलटून पालटून फवारणी करावी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस पाच किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावा.
२) पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) : या रोगामध्ये पानावरती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. ते सूर्याकडे धरून पाहिल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पूर्णत: वाळतो व तांबूस राखी रंगाचा दिसतो. असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि संपूर्ण पान करपते. या रोगाची तीव्रता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून येते. हा रोग कोलेटोट्रिकम कॅपसिकी या बुरशीमुळे होतो. यांच्या नियंत्रणासाठी थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली आणि हार्मोनी १५ ते २० मिली १० लिटर पाण्यात किंवा १ टक्का बोर्डोमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्य कराव्यात.
३) पानावरील ठिपके (टिक्का) : हा बुरशीजन्य रोग असून टॉंफ्रिन मॅक्यूलन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आर्द्रतायुक्त हवामानामध्ये या रोगाची सुरुवात. जमिनीलगतच्या पानावर होऊन तो वरील पानावर पसरतो. या रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. त्यासाठी लिफ ब्लॉच या रोगासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो.
वरील कीड, रोग प्रतिबंधक तसेच प्रभावी उपाय म्हणून तसेच पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादन व दर्जात खात्रीशीर वाढ होण्यासाठी खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.
फवारणी
१) पहिली फवारणी : (जूनमध्ये ) : हळद १ महिन्याची असताना जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (ऑगस्टमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.
४) चौथी फवारणी : (ऑक्टोबरमध्ये ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ३५० ते ५०० मिली + २०० ते २५० लि. पाणी.
सप्तामृत, हार्मोनी फवारण्याचे फायदे : पहिल्या फवारणीमुळे उगवून आलेल्या कोंबाची मर होत नाही. तसेच रोगापासून संरक्षण होऊन वाढ चालू होते. दुसर्या व तिसर्या फवारणीमुळे हळदीचा फुटवा होऊन पाने रुंद, चमकदार आणि तजेलदार तयार होतात. तसेच कंद वाढीस लागून हळद लागत (सडत) नाही. तिसर्या फवारणीमुळे कंद पोसून फण्यांची संख्या, आकारात वाढ होऊन एकंदरीत उत्पादन व दर्जात वाढ होते.
जर्मिनेटर, प्रिझममुळे हळदीची वाढ झपाट्याने होऊन मर किंवा हळद लागणे यावर प्रतिबंध होतो. थ्राईवर, क्रॉंपशाईनर, हार्मोनीमुळे पानांवर करपा, ठिपके येत नाहीत, तसेच वेडीवाकडी पाने सरळ व टवटवीत होतात. धोधो पाऊस, धुक्याचा त्रास होत नाही. राईपनर, न्युट्राटोनमुळे हळदीच्या फणींची संख्या, आकार, वजन व गर वाढून गर्द रंगाची दर्जेदार हळद उत्पादन घेता येते.
काढणी : हळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी बंधूना खर्या अर्थाने क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी होय. चांगल्या उत्पादन देणार्या हळद पिकाची काढणी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी. पक्क झालेल्या हळद पिकाच्या झाडाला पाला जमिनीच्या मगदूरानुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ६० ते ८० टक्केच वाळला जातो. अशावेळी झाडाचा पाल जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा. त्यानंतर जमीन थोडीशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी. काढणी करताना जेठे गड्डे, हळकुंडे, सोर गड्डा अशी प्रतवारी करावी. काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरीत सावलीच्या ठिकाणी हलवावे.
हळद शिजवण वाळविणे व पॉलिश करणे
हळद शिजवताना सच्छिद्र वापर करून हळद शिजविणे फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये डिझेलच्या बॅरलपासून बनविलेले १.५ फूट उंचीचे व २ फुट व्यासाचे ४ते ५ सच्छिद्र ड्रम ५ फुट व्यासाच्या मोठ्या कढईमध्ये पाणी ओतून पाण्याची आतील पातळी ड्रमच्या उंचीच्या वर ४ ते ५ से.मी. इतकी ठेवली जाते. नंतर ड्रम जाड गोणपाटाने झाकून घेतले जातात. या पद्धतीने हळद फक्त २५ ते ३० मिनिटात चांगल्या प्रकारे शिजते. त्यावेळी पाण्याचे तापमान ९० डी. ते १०० डी. सेंटीग्रेट असते. हळद शिजल्यानंतर चुलवानामध्ये इंधन टाकण्याने प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे आपोआप पाण्याचे तापमान कमी होते. शिजलेल्या हळदीचे ड्रम लांब बांबूच्या सहाय्याने २ कड्यामध्ये असकून २ व्यक्तिंकडून सहजासहजी उचलून वाळविण्यासाठी खळ्यामध्ये अथवा कठीण जागेवर टाकावे. असे रिकामे झालेले ड्रम पुन्हा कच्च्या हळदीने भरून काहीलीतील गरम पाण्यात ठेवतात.
पाण्याची पातळी पुन्हा ठेवलेल्या ड्रमवर ४ ते ५ सेंमी राहील इतकी ठेवली जाते. ठेवलेले ड्रम वरीलप्रमाणे गोणपाटात झाकतात व परत इंधन टाकून त्याच पद्धतीने हळद शिजविली जाते.
वरील पद्धीतमध्ये एका ड्रममध्ये सुमारे ५५ ते ६० किलो याप्रमाणे एका वेळी जवळ जवळ २५० ते ३०० किलो हळद शिजविली जाते. प्रत्येक वेळी जुन्या पद्धतीप्रमाणे गरम पाणी काढून टाकणे आणि पुन्हा नवीन पाणी टाकणे ही प्रक्रिया करावी लागत नाही. दुसरे हळद भरलेले ड्रम काहिलीत ठेवलेले असता पाण्याचे तापमान ८३ डी. ते ८४ डी. सेंटीग्रेडपर्यंत खाली येते. त्यामुळे पहिले ड्रम काढल्यानंतर दुसर्या घेतलेल्या ड्रममधील हळद शिजविण्यासाठी लागणारे इंधन हे तापमान ८४ ते १०० डी. सेंटीग्रेटपर्यंत वाढविण्यासाठी लागेल इतकेच असते. त्यामुळे इंधनाची बचत होते. तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते. शिजताना पाण्यातील माती हळकुंडावर न बसता काहिलीत जमा होते. त्यामुळे इंधनाची बचत होते. तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते. त्यामुळे मातीविरहीत स्वच्छ धुतलेली हळद मिळते. अशा हळदीस वाळविल्यानंतर पॉलिश केल्यास आकर्षक रंग प्राप्त होतो आणि उताराही चांगला मिळतो. अशा हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने बाजारभावही चांगला मिळतो. अशा या वेळ, इंधन व मजुरी यांची बचत करणार्या व किफायतशीर नफा मिळवून देणार्या सुधारीत तंत्राचा पारंपारिक पद्धतीत थोडाफार खर्च करून अवलंब नक्कीच फायदा होईल.
हळद वाळविणे
हळद शिजविल्यानंतर सुरुवातीचे ४ ते ५ दिवस ३ ते ४ इंचापेक्षा मोठा थर देऊ नये. मोठा थर दिल्यास हळकुंड वाळण्यास उशीर लागतो. त्याचप्रमाणे हळकुंड काळी पडतात. हळकुंडे साधारणपणे ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळवावी, वाळलेली हळद पाण्याने भिजाणार नाही याची दक्षता घ्यावी. हळद शक्यतो तोडपत्रीवरती किंवा कठीण जागेवरती वाळवावी, त्यामुळे मजुरीवरती होणारा खर्च कमी होईल.
पॉलिश व प्रतवारी करणे
वाळलेली हळद विक्रीसाठी मार्केटला पाठविण्यापूर्वी पॉलिश करणे अत्यंत आवश्यक असते. हळद पॉलिश करणे म्हणजे वाळलेल्या हळकुंडावरची खरबरीत साल काढून टाकणे होय. पॉलिश करण्यासाठी ऑईलच्या बॅरलला १.२ ते २ इंच अंतरावरती छन्नीने भोक पाडून हा बॅरल लोखंडी कन्यावरती फिट करून हा पॉलिश ड्रम स्टँडवर बसवून फिरविल्यास हळकुंडाची वरची साल निघून जाते व हळद पॉलिश होते. हेच काम १ एच. पी. सिंगल फेज मोटारवरती चालणार्या लाकडी अष्टकोणी ड्रमवरतीच करता येते. हळद पॉलिश केल्यानंतर प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मोठे हळकुंड, मध्यम, लहान कणी, त्याचप्रमाणे गड्डे, सोरा गड्डा अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रतवारी करून तयार माल विक्रीसाठी मार्केटला पाठवावा. पतवारी न करता विक्रीस पाठविल्यास मालास योग्य भाव मिळत नाही, परिणामी आर्थिक नुकसान होते.
उत्पादन
हळदीचे उत्पादन हे वापरलेली जात, निरोगी बियाणे, दिलेली खते, जमिनीचा प्रकार यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ओल्या हळदीचे प्रति हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल (+ २५ ते ३० क्विंटल गड्डे ) इतके उत्पादन मिळते. तसेच या ओल्या हळदीपासून ५८ ते ७५ क्विंटल वाळलेली हळद मिळते.