आज भारतीय शेतीवर घोंघावणारे सर्वांत मोठे संकट कोणते असेल तर ते शेतीचे लहान लहान तुकड्यात होणारे विभाजन हे होय. उद्योग आणि विकासकामांसाठी मुळात मर्यादित असलेल्या शेती क्षेत्राचे अधिग्रहण चालू आहे. त्यातच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे पडत आहेत. आज देशातील जवळपास ८० टक्के अल्प-अत्यल्प भूधारकांची शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी तर दूरच मात्र त्यातून कुटुंबाचा चरितार्थही व्यवस्थित भागविला जात नाही
असे असताना अजून लहान लहान तुकड्यात शेतीचे विभाजन सातत्याने चालू आहे. विशेष म्हणजे या भीषण वास्तवाकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. लहान आकाराची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेती क्षेत्र कमी – उत्पादन कमी – आणि त्यामुळे उत्पन्नही कमी, यामुळे असा बहुतांश शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे.
शेतीच्या लहान तुकड्यात पायाभूत सुविधा निर्मितीत अडचणी येतात. अशा शेतीत वैविध्यपूर्ण पीक पद्धती, आधुनिक यंत्र-तंत्राचा अवलंबही शेतकरी करू शकत नाही. वाढती मजूरटंचाईची समस्या सर्वत्रच भेडसावत आहे. आकस्मित येणारे रोग-किडी, वन्यप्राण्यांचा त्रास याबरोबर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीनींही गावोगावचे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत.
वैयक्तिक शेतकऱ्याला शेती क्षेत्रात भेडसावणाऱ्या अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी जामदरा जि. वाशीम येथील गावकऱ्यांनी आगामी खरीप हंगामात सामूहिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्तमानकाळातील शेतीतील अडचणी दूर करून ती फायदेशीर ठरण्यासाठी हा रामबाण उपायच म्हणावा लागेल.
शेती क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वैयक्तिक पातळीवर अशा समस्यांचे समाधन अवघड होत चालले आहे. सामूहिक शेतीतून शेतकऱ्यांची ताकद वाढणार असून, कठीणात कठीण समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर विविध प्रयोगांच्या माध्यमातून शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीरही होऊ शकते. असे असले तरी नव्यानेच सामूहिक शेतीत उतरताना कामाचे नियोजन आणि पीक व्यवस्थापन याच्या पद्धती ठरवून घ्याव्या लागतील.
सामूहिक शेतीच्या माध्यमातून विविध आर्थिकस्तर तसेच वेगवेगळ्या कामांचे कौशल्य असलेले शेतकरी एकत्र येणार आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजनाबरोबर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांमध्ये मशागत ते मार्केट अशा कामांची विभागणीही महत्त्वाची ठरणार आहे. सामूहिक शेतीच्या नियोजनाकरिता गावपातळीवर सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली ते योग्यच झाले. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी गट, सामूहिक शेतीची यशस्वी उदाहरणे आहेत.
ज्या जमिनीतून एकरी एक पैसाही मिळत नव्हता तेथे सामूहिक शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. अशा मॉडेल्सचा अभ्यास करून तेथील यशस्वितेची मूलमंत्रे आपल्या गावातही सोयीनुसार जपली जातील याची काळजी घ्यायला हवी. सामूहिक शेतीतून खर्च कमी होतो, उत्पादन वाढते. उत्पन्नाचे विविध स्रोत पुढे येतात. यातून तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी लाभू शकतात.
कौटुंबिक आणि गावपातळीवरील कलह कमी होण्यासही हातभार लागू शकतो. एवढेच नव्हे तर एकोप्याने दु:खही वाटून घेतले गेल्याने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबविण्याची ताकद सामूहिक शेतीत आहे. आज अनेक गावे सामूहिक शेतीच्या वाटेने जाऊ पाहत असताना त्यांना योग्य दिशा मिळत नाही. अशा गावांना जामदरा गाव मार्गदर्शक ठरेल, अशी सामूहिक शेती विकसित करण्यावर गावकऱ्यांचा भर हवा.
ड्रोन आता शेतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ड्रोनमुळे मनुष्यबळाची आवश्यकता कमी होईल. तसेच पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचा वापरही ड्रोनच्या वापरापेक्षा कमी होईल.
देशातील शेतकरी शेतीसाठी ड्रोन वापरू शकतात. केंद्रीय कृषी मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ड्रोनच्या वापरासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली गेली आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग ड्रोनद्वारे करता येईल. शेती, वनीकरण, पिके नसलेले क्षेत्र इत्यादी पिकाच्या संरक्षणासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करता येणार आहे.ड्रोनची एसओपी कीटकनाशके अधिनियम 1968 (नियम 43) आणि कीटकनाशके नियम (97) च्या तरतुदीनुसार वनस्पती संरक्षण, संगरोध व साठा संचालनालयाने तयार केली आहे.
शेतीसाठी ड्रोन वापराच्या एसओपीमागील हेतू
भारतीय शेतीमध्ये आतापर्यंत बरीच प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांनी संशोधन व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला आहे. शेतकरी ठिबक सिंचन आणि विविध प्रकारच्या यंत्रे भारतातील शेतीसाठी वापरली जात आहेत. ड्रोन आता शेतीमध्ये औषध फवारणी करताना महत्त्वाचा ठरणार आहे. ड्रोनमुळे पीक फवारणीसाठी लागणारं मनुष्यबळ नक्कीच कमी होईल. तसेच पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचे प्रमाण ड्रोन वापरण्यापेक्षा कमी होईल. एखाद्याला ड्रोनच्या सहाय्याने आपल्या शेतात फवारणी करायची असेल तर त्याला संबंधित अधिकाऱ्यांना 24 तास अगोदर कळवावे लागणार आहे.
मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?
जमिनीचं क्षेत्र चिन्हांकित करणे ही ड्रोन ऑपरेटरची जबाबदारी असेल.
ऑपरेटर केवळ मंजूर कीटकनाशके आणि त्यांचे फॉर्म्युलेशन वापरेल.
परवानगी दिलेल्या उंचीच्या वर ड्रोन उडवता येणार नाही.
ऑपरेटरद्वारे प्रथमोपचार सुविधा पुरविल्या जातील.
ड्रोन उडवण्याासठी आजूबाजूच्या लोकांना किमान चोवीस तास अगोदर माहिती दिली पाहिजे.
अधिकाऱ्यांना 24 तास अगोदर सूचना देणं आवश्यक आहे.
ड्रोनद्वारे ज्या भागात फवारणी केली जाणार असेल तिथं इतर व्यक्तीं आणि पाळीव प्राण्यांना प्रवेश देऊ नये.
ड्रोनचं संचालन करणाऱ्या व्यक्तींना किटकनाशकं, त्यांचा प्रभाव या संदर्भात प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.
डीजीसीएने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
नियंत्रित एअरस्पेसमध्ये कार्य करण्यासाठी डीजीसीए कडून एक विशेष ओळख क्रमांक (यूएलएन) मिळवावा लागेल. आणि तो ड्रोनला जोडावा लागेल.
फक्त दिवसाच्या उजेडात ड्रोनचा वापर करा.
विमानतळ आणि हेलिपोर्ट्स जवळ ड्रोन उडवता येणार नाहीत.
अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्याशिवाय खासगी मालमत्तेवर ड्रोनचा वापर करता येणार नाही.
केवळ डीजीसीए प्रमाणित चालकांना कृषी ड्रोन उडण्याची परवानगी दिली जाईल.
कोरफड आम्ही औषधी गुणधर्म असलेल्या कोरफडबद्दल बोलत आहोत. कोरफडीचा वापर आजकाल औषधे आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातोय. अशा परिस्थितीत कोरफडीची मागणीही खूप वाढली आहे. म्हणून त्याची लागवड तुमच्या आर्थिक समस्या संपवू शकते.
जर कोरोना संकटाच्यादरम्यान नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशा शेतीबद्दल सांगत आहोत, जेथे फक्त 50 हजार रुपये गुंतवून पुढील 3 वर्षांसाठी वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवता येते. यासाठी आपल्याकडे शेतजमीन आणि प्रारंभिक खर्चासाठी नाममात्र रक्कम असणे आवश्यक आहे. आम्ही औषधी गुणधर्म असलेल्या कोरफडबद्दल बोलत आहोत. कोरफडीचा वापर आजकाल औषधे आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातोय. अशा परिस्थितीत कोरफडीची मागणीही खूप वाढली आहे. म्हणून त्याची लागवड तुमच्या आर्थिक समस्या संपवू शकते.
कोरफडीतून दोन प्रकारे कमाई करता येते
कोरफडची मागणी भारतात तसेच परदेशात खूप जास्त आहे. त्यामुळे कोरफडीच्या लागवडीत भरपूर नफा मिळतो. खाद्यपदार्थांमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कोरफडीची सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. अनेक कंपन्या त्याची उत्पादने बनवत आहेत. देशातील लघुउद्योगांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत ते कोरफड उत्पादने विकून कोट्यवधींची कमाई करीत आहेत. अशा स्थितीत तुम्हीसुद्धा कोरफडीची लागवड करून दरवर्षी लाखोंची कमाई करू शकता. कोरफड व्यवसाय दोन प्रकारे करता येतो. प्रथम त्याची लागवड करून आणि दुसरे म्हणजे त्याच्या रसासाठी किंवा पावडरसाठी एक वनस्पती लावून. येथे आम्ही तुम्हाला कोरफड संबंधित महत्त्वाची माहिती देत आहोत, ज्यात लागवडीचा खर्च आणि प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे.
किती खर्च येईल आणि किती कमाई होईल?
कोरफड लागवडीचा खर्च प्रति हेक्टर 50 हजार रुपये आहे. एक वर्षासाठी लागवड केल्यानंतर आपण तीन वर्षे कापणी करू शकता. दरवर्षी त्याची किंमत देखील कमी होते, तर कमाई वाढते. जेव्हा कोरफड पीक तयार होते, तेव्हा आपण उत्पादन कंपन्यांसह ते थेट मंडईंमध्ये विकू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही कोरफडीचे प्रोसेसिंग युनिट लावून अधिक नफा कमवू शकता. आपण प्रक्रिया युनिटमधून कोरफड जेल किंवा रस विकून मोठे पैसे कमवू शकता. छोट्या आकाराचे प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल.
कोरफड वनस्पतीची किंमत किती असेल?
कोरफडीची लागवड कमी सुपीक जमिनीवर केली जाते. तसेच कमी खतामध्ये चांगले उत्पादन घेता येते. चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी 10-15 टन कुजलेले शेण खताची तयारी करताना वापरावे. कोरफडीतून मोठी कमाई करण्यासाठी आपल्याला प्रथम लागवडीचा खर्च आणि नंतर वनस्पती, श्रम, पॅकेजिंगमध्ये खर्च करावा लागेल. आपण कमी खर्चात हँडवॉश किंवा कोरफड साबणाचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. कॉस्मेटिक, मेडिकल आणि फार्मास्युटिकल्सच्या क्षेत्रात कोरफडीला जास्त मागणी आहे. कोरफड ज्यूस, लोशन, क्रीम, जेल, शॅम्पू या सर्वांना ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. कोरफड आयुर्वेदिक आणि युनानी औषधांमध्ये वर्षानुवर्षे वापरली जात आहे
कोणत्या प्रकारची जमीन आणि हंगामात अधिक उत्पादन देते
कोरफडीची लागवड कोरड्या भागांपासून ते बागायती मैदानापर्यंत करता येते. आजकाल देशाच्या सर्व भागात याची लागवड केली जाते. हे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात व्यावसायिक पातळीवर तयार केले जाते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी कमी पाण्यात आणि अर्ध-शुष्क क्षेत्रातही सहज पिकवता येते. कोरफडीच्या चांगल्या लागवडीसाठी सर्वात योग्य तापमान 20 ते 22 अंश सेंटीग्रेड आहे. ही वनस्पती कोणत्याही तापमानात स्वतःची देखभाल करू शकते. त्याचे उत्पादन IC 111271, IC 111280, IC 111269 आणि IC 111273 या वाणांमध्ये करता येते. यामध्ये आढळलेल्या अॅलोडीनचे प्रमाण 20 ते 23 टक्के असते.
महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये मिरचीचे पीक घेतले जाते. वाळलेल्या व हिरव्या मिरच्यासाठी साधारणतः जून ते मार्च या कालावधीत मिरचीचे पीक घेतले जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून मिरचीवरील बोकड्या/बुरहामुरडा (लिफ कल) हा रोग व पांढ-या माशीमुळे बहुतांश शैतक-यांचे पीक हातचे गेले.
मोठ्या प्रमाणात फवारण्या करुनही चुरहामुरहा रोगाचे व पांढऱ्या माशीचे नियंत्रण होऊ शकले नाहीं मिरची पिकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या कोड/ रोगांचा प्रादुर्भाव पूर्वी कधी दिसून आला नव्हता. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. युरहामुरद्दा या विषाणूजन्य रोगामुळे शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसतात. रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागतात किंवा फुले लागणेसुद्धा बंद होते.
फळे लागली तरी ती कमी आकाराची असतात. झाडाची वाढ खुटते. या रोगाची सुरुवात काहीवेळा रोपवाटिकेत पांढ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होते. प्रादुर्भाव झालेली रोपे निरोगी रोपासारखीच दिसतात. अशी रोगग्रस्त रोपें जेंव्हा आपण शैतात लावतो तेव्हा या रोपावर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा फुले व फळे यायला लागतात, त्यावेळी झाडाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि रोगाची लक्षणे दिसू लागतात. रस शोषण करणाया किडींमुळे हा रोग पसरत जातो व त्यात महत्वाची भूमिका बजावतात त्या पांढ-या माशा.
अलिकड़व्या काळामाये मिरचीवरील चुरड़ामुरहा रोगाचें प्रमाण का वाढले आहे. हे समजून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एकात्मिक कीड़ व्यवस्थापन संशोधन केंट्राने मध्यप्रदेश व महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण केले. या दोन राज्यातील मिरची लागवड क्षेत्रामध्ये नोव्हेंबर 20१४, ऑगस्ट, नोव्हेंबर 20१५ व जानेवारी 20१६ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान शाश्वज्ञांनी या प्रश्नाविषयी शेतक-यांशी चर्चा केली.
शेतक-यांचे म्हणणे असे होते की, मिरचीवरील चुरहामुरहा रोगाचा प्रादुर्भाव प्रथम रोपवाटिकेतन होती ही रोपे शेतात पुनलगिवड केल्यानंतर १o ते १५ दिवसात म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये प्रादुर्भावास सुरुवात होते व ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हा रोग शेतभर पसरतो. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने व त्यांचे नियंत्रण होत नसल्याने अनेक शेतक-यांना पीक सोडून द्यावे लागले. काहीं जणनी मिरव्या उपटून दुसरे पीक घेतले चुरहामुरहा रोगाबरोबरल मिरचीवर पांढ-या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे शेतक-यांनी शाश्वज्ञांना सांगितले. रोग वाढण्यामागची कारणे
सर्वेक्षणादरम्यान शास्त्रज्ञांनी शेतक-यांशी चर्चा केली असता पुढील बाबी निदर्शनास आल्या
जीब्रोलिकअॅसिड इत्यादीसारखी वाढ़संवधके व रासायनिक किंटकनाशकांचे विविध प्रमाणातील मिश्रण मिरचीवर अनेकवेळा फवारले आहे.अनेक शेतक-यांनी अशा प्रकारची फवारणी प्रत्येक ३ ते ५ दिवसानंतर घेतली आहे.
गरज नसताना अनेक शेतक-यांनी रासायनिक बुरशींनाशकांची पण फवारणी घेतली होती.
रासायनिक किटकनाशकांच्या अति वापरामुळे तुरळक मित्रकेिडी दिसून आल्या.
अनेक शैतामध्ये शास्त्रज्ञांना पांढ-या माशीची संख्या मोठ्या प्रमाणात (५0-100 प्रति झाड़) देिसून आली.
याचबरोबर नत्र्युक्त खतांच्या मात्रा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या होत्या. यामुळे मिरचीची शाखीय वाढ जास्तप्रमाणात झाली व त्यामुळे पांढ-या माशांची संख्या वाढण्यास मदत झाली. मिरचीवर वाढ संप्रेरके वापरल्यामुळे मिरचीचे झाड अधिक लुसलुशीत हिरवेगार झाले आणि त्यामुळे पांढ-या माशा त्याकडे जास्तप्रमाणात आकर्षण झाल्या आणि त्याचे प्रजोत्पादनपण वाढत गेले.
शास्त्रज्ञांना निदर्षनास आलेल्या इतर बाबी
सर्वेक्षण केलेल्या ठिकाणी बेगोमो विषाणूमुळं उद्भवणा-या चुरडामुरडा रोगाची लागण मिरचीवर झालेली आहे. सर्वेक्षण केलेल्या बहुतांशशेतामध्ये या रोगाची लागवड ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे दिसून आले.
मिरचीवरील चुरडामुरडा रोगास प्रतिकार करणारा वाण / संकरिंत वाण शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळं खाजगी कंपन्याकडं उपलब्ध असलेल्या वाणातून त्याचा शोध घेणे उचित ठरतं.
रासायनिक किटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्यामुळ पांढ-या माशी मध्ये नियंत्रण मिळवता आले नाही . त्यामुळं किटकनाशकांचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.
चुकाद्यपुढची लागण झाल्यानंतर पांढ-या पाशीष्ट्रारं त्याचा प्रसार होता. त्यामुळं पांढ-या पार्शच नियंत्रण आवश्यक ठरतं.
हिंवाळ्याचा कमी कालावधी आणि उन्हाळ्यामध्ये पडलेल्या पावसामुळे पांढ-या माशांची संख्या वाढण्यास मदत झाली.
बियानाद्वारे चुरडामुरडा रोगाचा प्रसार झाला असण्याची शक्यताहि नाकारता येत नाही.
चुरडामुरडा रोग व पांढऱ्या माशीच व्यवस्थापन करण्यासाठी पुनरलागवडीनंतर ४५ दिवसापर्यंत काळजी घेतली पाहिजे.
ताण व पर्यायीं यजमान पेिकांचे व्यवस्थापन
पांढरी माशी ही ववेलवर्गीय पिके , वांगी , भेंडी , सोयाबीन , भुईमुग रताळे , विविध तणे इत्यादी यजमान पिकांवर ( वनस्पतींवर आपला जीवनक्रण (अंडी , पिले, कोष व प्रौढ ) पूर्ण करत असतं. या पिकाची लागवड वर्षभर कुठ ना कुठ होत असल्याने पांढऱ्या माशीला खाद्य मिळत जाते.त्यामुळे पांढऱ्या माशीच्या यजमान वनस्पती कोणत्या आहे व त्यांची संख्या कमी कशी करायची याचे ज्ञान शेतकर्यांना असायला हवे. पांढरी माशी आपला जीवनक्रम ३० दिवसात पूर्ण करत असत पांढऱ्या माशीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात . तसेच पांढऱ्या माशीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पारदर्शक चिकट द्रव्यावर काळी बुरशी वाढत असते. हि कीड पर्णगुछ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते . यजमान वनस्पतीवर पांढरी माशी आपली अंडी घालत असते, त्यामुळे ते नष्ट करणे आवश्यक ठरते
रोग व किंडींचे व्यवस्थापन
रोपे तयार करतानारोपवाटिकेच्या चारी बाजूने नेट/कपडा बांधावा .यामुळे बाहेरील रस शोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये घुसण्यास मज्जाव होतो.
रोगग्रस्त झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत . कारण रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडांना विषाणूची लागण होते. किडीमार्फत होणारा प्रसार रोखणे हाच एक उपाय आहे.
शेताच्या चोहोबाजूंनी तीन ओळीमध्ये मका , चावली व झेंडू लावावा . हा मका वाढल्यानंतर शेतीभोवती कुंपण तयार होते. यामुळे बाहेरील कीड आत येण्यास मज्जाव होतो. मका फुलातील प्रग खाण्यासाठी मित्रकीटक उदा.क्रायसोपा , लेडीबर्ड बीटल,कोळी , ट्रायकोड्रामा इत्यादी येतात . हे कीटक मक्यावर आलेल्या किडींना खातात . या सजीव कुंपणामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होऊन रसशोषक किडींच्या नियंत्रणास मदत होते.
व्हर्टीसिलियम लेक्यानि किंवा मेटारायझिम अॅनोसोपली या जैविक कीटकनाशकाची ५ मी.ली. प्रती लिटर पाण्यामधून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
पांढरा, पिवळा ,कला,किंवा निळ्या रंगाच्या प्लास्टिक मल्चिंगने पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते
बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन * एक मीटर ) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत फोरेट दाणेदार २० ग्रॅम टाकावे किंवा रोपे उगवल्यानंतर डायमिथोएट १० मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे
लागवडीवेळी इमिडाकलोप्रीड १ मी.ली.+कार्बेंडझिम १ ग्रॅम + ट्रायकोडमा ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे बुडवून नंतर लागवड करावी.
पुनर्रलागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन ४ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून करावी . त्यानंतर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात . फवारणीसाठी कीटकनाशके आलटून पालटून वापरावीत
सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत वा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते याचे महत्त्व आता शेतकऱ्यांना समजू लागले आहे.
रासायनिक खतांच्या आणि पाण्याच्या बेसुमार वापराने आपल्या जमिनींची प्रत दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. आपण शेणखत आणि इतर सेंद्रिय खते वापरत असतो. आपल्या शेतात आपण कोंबड्या पाळतो पण त्या कोंबड्यांचं खत आपण मोठ्या प्रमाणावर वापरत नाही पण विदर्भातील रवींद्र मेटकर या शेतकऱ्याने अनेक पीके हि कोंबडीखतावर यशस्वी उत्पादन करून दाखवली आहेत. आपण त्याच्या शेतीतील काही पिके आणि कोंबडीखताचे महत्व पाहणार आहोत.
सेंद्रिय खताचे महत्त्व सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना कोंबडी खताचे मूल्य समजून घेणे महत्वाचे आहे. आपल्या देशात सुमारे सहा ते आठ दशलक्ष टन कोंबड-खताचे वार्षिक उत्पादन होत आहे. सध्या रासायनिक खतांच्या तसेच पाण्याच्या अति वापराने जमिनींची सुपीकता कमी होत चाललीच आहे आणि अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर करणे आता गरजेचे झाले आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पुरेशा प्रमाणात केला नाही तर आपल्या पीक उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही, तर अन्नसाखळीद्वारे मनुष्य तसेच जनावरे यांच्या शरीरातही त्यांचा अनुकूल प्रभाव दिसून येण्यास मदत होते.
सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत वा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते याचे महत्त्व आता शेतकऱ्यांना समजू लागले आहे. शेतकरी त्यांच्या वापरावर चांगला भर देताना दिसत आहे. विविध विकसित देशांमधील शेतकरी याबाबत अधिक जागरूक असून सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्याने रासायनिक खतांच्या वापरात मोठ्या प्रमाणात बचत करत आहे.
कोंबडी खताचे महत्व पाळीव व दूध देणाऱ्या जनावरांच्या शेणखताविषयी शेतकरी अधिक माहीतगार असला तरी पोल्ट्री खताविषयी तेवढी जवळीक नाही. आधुनिक काळात पोल्ट्री उद्योग भारतात अलीकडील काही दशकांमध्ये उदयाला आला आणि त्यामुळे आता पोल्ट्री खताला चांगला वाव मिळत आहे. यात अनेक पिके जशी ऊस, बागमळा पिके, फळ व फुलपिके अशी पिके या खताला चांगला प्रतिसाद देतात. आता कोंबडखत हे पॅलेट स्वरूपात आणता येते. ५ ते ५० किलोच्या बॅगेत त्याचे रूपांतर करता येते. पोल्ट्रीचा व्यवसाय करणारे शेतकरी तर आपल्या शेतातील वापरासाठी त्याचा वापर करू शकतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक असतातच शिवाय त्यात कॅल्शिअम हा घटकही असतो. ते मुळातच सेंद्रिय असल्याने त्याचे कंपोस्ट करण्याची गरज भासत नाही. त्याचा शेतातही थेट वापर करता येतो.
सुकवलेल्या एक टन “ पोल्ट्री खता’चे मूल्य हे १०० किलो युरिया, १५० किलो सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश, १२५ किलो कॅल्शिअम कार्बोनेट, ३० किलो गंधक, १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट, ५ किलो फेरस सल्फेट, १ किलो मॅंगेनीज सल्फेट, झिंक सल्फेट आदी व अन्य अंशात्मक घटकांएवढे असते. बाजारातील अन्य खतांच्या तुलनेत त्याची किंमतही कमी आहे. त्याचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी यांचे आहे.
भुरट्या चोरांनी अतिशय धुमाकूळ घातला असून शेतात वेचणी करून ठेवलेले कापसाचे गाठोडे चक्क चोरून गायब करण्याची घटना घडत आहे.
पाल परिसरात काही दिवसांपासून शेतातील हंगाम काढणीच्या कामाला वेग आला आहे. भुईमूग, सोयाबीन, मका, ज्वारी व कापूस काढणीस शेतकरी धावपळ करत असून जेमतेम करून शेतातील हंगाम घरात आणण्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. आधीच सर्वच कामे एकत्र आल्याने मंजूरही मिळणे कठीण झाले असुन त्यात चोरांनी शेतात धुमाकूळ घातला आहे. आधीच शेतातील हंगाम अति पावसामुळे खराब झाले असून यावर्षी शेतात लावलेला खर्च सुध्दा निघणार नसून यात भुरटे चोर सक्रिय झाले असून शेतकऱ्यांचे अतिशय हाल होत आहे
वेचणी केलेला कापुस चोरला
पाल येथील सोहेल शब्बीर अहमद यांच्या शेतात पंधरा मजूर कापूस वेचणीस गेले होते. या मजुरांनी काढलेल्या कापसाची गाठोडे कडुनिंबाच्या झाडाखाली ठेवली होती. मात्र दुपारच्या वेळी अज्ञात चोरांनी चक्क वेचणी केलेला कापुसाचे गाठोडे शेतातुन चोरून नेले आहे. यामुळे शेतकरीचे मोठे नुकसान झाले आहे.
या शेतकऱ्यांच्या शेतीतून गाठोडे चोरी
आठवडाभरापासून शेतातील कापसाचे गाठोडे चोरीच्या घटनेत वाढ होत असून भिमसिंग चतरु चव्हाण, डॉ. शब्बीर शेख, नवलसिंग पिता चव्हाण, अभेराम मैताब पवार आणि प्रमोद भंगाळे यांच्या शेताच्या बांधावर ठेवलेले कापूसाचे गाठोडे रविवारी दुपार एक वाजेच्या सुमारास लंपास करण्यात आले.
ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे, मात्र उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा प्रथम असून त्यानंतर अहमदनगर बीड व पुणे जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड व लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी घेतली जाते.
जमिनीच्या खोलीनुसार पेरणी:
रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी,चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुधारित वाणांची निवड करावी. हलकी जमिन (30 ते 45 से.मी. खोल), मध्यम खोल जमिन (45 ते 60 से.मी.खोल) व भारी जमिन (60 से.मी. पेक्षा जास्त खोल) अशा जमिनीच्या खोलीनुसार रब्बी ज्वारीचे वाण निवडावेत.
कोरडवाहू ज्वारीची पेरणीपूर्वी रानबांधणी केल्यास उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. त्यासाठी जुलैचा पंधरवाड्यात पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी 10×12 चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावेत. सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात किंवा 2.70 मीटर अंतरावर सरी यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळीराम नांगरच्या सहाय्याने दंड टाकावेत. त्यामुळे 15 जुलै ते 15 सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यास मदत होते.रब्बी ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची मशागत पेरणी पूर्वी करावी. उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. हेक्टरी ६ टन शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी टाकावे.
बीजप्रक्रिया:
कोरडवाहू रब्बीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी. शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर पेरणी करणे हिताचे आहे. योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव अधिक होतो. पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 1 किलो बियाण्यास 300 मेष गंधकाची 4 ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे कानी हा रोग येत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने 45 से.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे दिन स्वतंत्र चाड्यातून पेरावे. कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर २० से.मी ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश दयावे.
Closeup of Jowar grain (Sorghum) crop.
ज्वारीची उगवण झाल्यावर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करावी.पिकाच्या सुरवातीच्या 35 ते 40 दिवसात पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली पेरणीनंतर तीन आठवड्यानी फटीच्या कोळप्याने करावी. दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यानी पासच्या कोळप्याने करावी, त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो व तिसरी कोळपणी आठ आठवड्यानी दातेरी कोळप्याने करावी. त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
खत व्यवस्थापन:
रब्बी ज्वारीचे सुधारीत व संकरित वाण खाताना चांगला प्रतिसाद देतात. कोरडवाहू ज्वारीस 1 किलो नत्र दिल्यास 10 ते 15 किलो धान्याचे उत्पन्न वाढल्याचे दिसून आले आहे. तक्त्यात दिल्याप्रमाणे खत मात्रा द्यावी.
जमिनीची प्रकार (खोली से.मी.)
ज्वारीचे वाण
रासायनिक खते (किलो/हे)
नत्र (युरिया)
स्फुरद (एसएसपी)
पालाश (एमओपी)
हलकी (30-45 से.मी.)
फुले अनुराधा फुले माऊली
25 (55)
–
–
मध्यम (45-60 से.मी)
फुले सुचित्रा फुले चित्रा फुले माउली मालदांडी 35-1 परभणी मोती
40 (87)
20 (125)
–
भारी (60 पेक्षा जास्त )
फुले वसुधा फुले यशोदा पीकेव्ही-क्रांती सी एस व्ही-22
60 (130)
30 (188)
–
कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी 50:25:25 नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे. त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन:
संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना 50 ते 55 दिवसांनी दयावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी दयावे
डॉ. आदिनाथ ताकटे प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
ज्वारी लागवड भाग 2
प्रस्तावना
ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
पृथक्करण
ज्वारीच्या दाण्याचे प्रमुख घटक सर्वसामान्यपणे पुढील प्रमाणे आहेत. जलांश ११·९%, प्रथिन १०·४%, कार्बोहायड्रेट ७२·६.%, वसा १·९%, लवणे १·६%. ज्वारीतील प्रथिन गव्हातील प्रथिनापेक्षा जैवमूल्याच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे; परंतु प्रथिन, व जीवनसत्त्व व लवणे यांचा एकत्रित विचार केला असता ज्वारी गव्हापेक्षा कमी दर्जाची ठरते.
हवामान
विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत या पिकाची लागवड होते. आफ्रिका, आशिया, उ. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या उष्ण हवामानात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या पिकाला साधारणतः २७° ते ३२° से. तापमान लागते, परंतु काही प्रकार ३८° ते ४४° से. तापमानातही वाढू शकतात. हिवाळी हंगामातील प्रकारांना १६° से. पर्यंत किमान तापमान चालते.सर्वसाधारणपणे हे पीक सपाट प्रदेशात वाढणारे आहे, परंतु कर्नाटकात काही प्रकार ९०० मी. उंचीवरील प्रदेशातही लागवडीखाली आहेत. वार्षिक ५० ते १०० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात ज्वारीचे पीक चांगले येते. ३० ते ४५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमानाच्या विभागात दुर्जल शेती पद्धतीनुसार ज्वारीचे पीक घेतात. यापेक्षा कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात ओलीताखाली ज्वारीचे पीक घेतात.
जमीन
ज्वारीचे पीक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या अगर दुमट जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत व pH मूल्य ५·५ असेपर्यंत अम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकते.
फेरपालट
ज्वारीच्या पिकाच्या बाबत पिकांच्या फेरपालटीची आवश्यकता असते. त्याकरिता ज्वारीच्या पिकाची कडधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करणे जास्त उपयुक्त ठरते. फेरपालटीमुळे जमिनीच्या एकाच पातळीतील वनस्पतीपोषक द्रव्यांचे शोषण होत नाही. मुळे खोलवर जाणाऱ्या पिकानंतर ज्याची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, असे पीक त्याच जमिनीत लावल्यास दोन्ही पिके चांगली येतात. कडधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे त्या पिकाखालच्या जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण वाढून नंतरचे त्याच शेतातील ज्वारीचे पीक चांगले येते. उत्तर भारतात बार्ली, गहू अगर भात व वाटाण्यानंतर ज्वारी पेरतात. मध्य व दक्षिण भारतात कापूस अगर कडधान्याच्या पिकाबरोबर ज्वारीच्या पिकाची फेरपालट करतात. बागायती ज्वारीची फेरपालट मिरची, तंबाखू, भुईमूग वगैरे पिकांबरोबर करतात.
मिश्रपीक
ज्वारीचे पीक मिश्रपीक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात. उत्तर व मध्य भारतात ते तूर, जवस अगर करडईबरोबर आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागांत चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी अगर कुळीथाबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात. काही शेतकरी ज्वारीबरोबर गवार अगर अंबाडीचेही पीक घेतात. रबी ज्वारीत हरभऱ्याचे मिश्रपीक घेतात.
मशागत
या पिकाकरिता जमीन दर वर्षी नांगरीत नाहीत. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. मे महिन्यात दोन-तीन वेळा १०–१२ सेंमी. खोलीपर्यंत जमीन कुळवाने मोकळी करतात.
हंगाम आणि पेरणी पद्धती
एकूण हंगाम तीन असतात. पावसाळी (खरीप), हिवाळी (रबी) व उन्हाळी. पावसाळी हंगामातील जाती जून-जुलैमध्ये व हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. खरीप व रबी पिके दाणे आणि वैरणीसाठी लावतात. उन्हाळी पिके ओल्या वैरणीसाठी लावतात. पीक लावण्याचे जिरायत (कोरडवाहू) व बागायत (ओलीताखालचे पीक) असे दोन प्रकार आहेत. जिरायत पिकाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.
स्थानिक रुढ पद्धत
जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे जमीन चांगली भिजून वाफसा आल्यावर पाभरीने बी पेरतात.
दुर्जल शेती पद्धत
यात पावसाचे पाणी शक्य तितके मुरवून नंतर जमिनीची मशागत करून पाभरीच्या दोन फणांत ४५ सेंमी. अंतर ठेवून बी पेरतात .
टोकण पद्धत
जमिनीत पुरेशी ओल होऊन वाफसा आला म्हणजे ४५x४५ सेंमी. अंतरावर सरळ ओळीत ५-६सेंमी. खोल (ओलीपर्यंत) भोके पाडून त्यांमध्ये प्रत्येकी ६–८ ज्वारीचे दाणे टाकून ओल्या मातीने ती भोके झाकून टाकतात. बी उगवल्यावर बी विरळणीच्या वेळी प्रत्येक टोकणीच्या जागी दोन-तीन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात. खरीप पिकात दोन ओळींमधील अंतर ३०–४५ सेंमी. आणि रबी (कोरडवाहू आणि बागायती) पिकांच्या बाबतीत ते ४५ सेंमी. ठेवतात. पेरणीसाठी निवडक बी वापरतात. त्यासाठी बी चाळून पाखडून घेतात. पिकात पुढे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग उद्भवू नयेत म्हणून पेरण्यापूर्वी बियांना पारायुक्त कवकनाशक अथवा गंधक चोळून घेतात. त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारलेल्या प्रकारांचे बी वापरणे आवश्यक असते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांसाठी तसेच वेगवेगळ्या जमिनींस व हवामानांस अनुकूल असे ज्वारीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. धान्याच्या पिकासाठी हेक्टरी ९–१० किग्रॅ. आणि वैरणीच्या पिकासाठी ५०–६० किग्रॅ. बी पेरतात.
आंतर मशागत
पेरणीनंतर (अगर बी टोकल्यानंतर) सु. तीन आठवड्यांनी पिकाला कोळपणी देतात. निंदणी करून ओळीतील तण काढून घेतात. पुढे तर पंधरा दिवसांनी पिकाला कोळपणी देतात. पिकात तण वाढू देत नाहीत. कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही, पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो. एकूण ३–४ कोळपण्या व दोन-तीन खुरपण्या देतात. दुष्काळी अगर कमी पावसाच्या विभागात अकोला कोळप्यासारख्या कोळप्याने कोळपणी करतात.
खत
वार्षिक ७५ ते ८२ सेंमी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात. हेक्टरी ८० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ. सुपरफॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात. निरनिराळ्या प्रयोगांवरून असे आढळून आले आहे की, हेक्टरी २० ते ४० किग्रॅ. पेक्षा जास्त नायट्रोजन आणि २०–३० किग्रॅ. पेक्षा फॉस्फोरिक अम्ल दिल्यास भारतातील स्थानिक प्रकारांच्या उत्पन्नात वाढीव खताच्या प्रमाणात वाढ होत नाही. मात्र संकरित (हायब्रीड) ज्वारीच्या प्रकारांना जास्त खत दिल्यास स्थानिक जातींच्या तुलनेने जास्त उत्पन्न येते. निरनिराळ्या राज्यांतील बागायत आणि कोरडवाहू तसेच स्थानिक आणि संकरित प्रकारांसाठी रासायनिक खतांच्या वेगवेगळ्या मात्रा प्रयोगान्ती ठरविण्यात आल्या आहेत. बागायती पिकाला कोरडवाहू पिकापेक्षा जास्त आणि स्थानिक प्रकारांपेक्षा संकरित प्रकारांना जास्त खतांची मात्रा ठरविण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी कृत्रिम खतांतील घटकांचे हेक्टरी प्रमाण खालील कोष्टका मध्ये दिल्याप्रमाणे शिफारस करण्यात आले आहे.
कोरडवाहू पिकाला सर्व नायट्रोजन आणि फॉस्फोरिक अम्ल एकाच हप्त्यात पेरणीपूर्वी देतात. बागायती पिकाला नायट्रोजनाची निम्मी मात्रा आणि फॉस्फोरिक अम्ल आणि पोटॅश यांची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी आणि नायट्रोजनाची राहिलेली निम्मी मात्रा पेरणीनंतर ३०–४५ दिवसांनी (पीक ५०–६० सेंमी. उंच झाल्यावर) देतात. ज्या भागात पाऊस खात्रीचा असतो आणि जमिनीतील ओल ज्वारीच्या पिकाची गरज पुरी होईपर्यंत टिकेल अशी शाश्वती असते किंवा पिकाला खत दिल्यानंतर पाणी देण्याची सोय असते, अशा ठिकाणीच रासायनिकखते (वरखते) देणे श्रेयस्कर असते. अन्यथा अशा प्रकारची खते देत नाहीत.
पिकाची राखण
ज्वारीच्या दाण्यासाठी लावलेल्या पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. पिकाच्या दाणे भरलेल्या कणसांवर चिवळ, भोरड्या, चिमण्या वगैरे जातींची पाखरे मोठ्या थव्याने सकाळी व संध्याकाळी उतरतात आणि कणसांतील दाणे टिपून खाऊन पिकाचे नुकसान करतात, म्हणून ती पिकावर उतरल्याबरोबर पिकातून हाकलून द्यावी लागतात.
काढणी
ज्वारीचे पीक तयार व्हावयाला सु. पाच महिने लागतात. पीक काढणीलायक होण्याच्या आधी २०–२५ दिवस त्याच्या ताटांवरील खालची बुंध्याकडची दोन-चार पाने काढून घेतल्यामुळे पिकात हवा खेळती राहून अकार्यक्षम पानांमध्ये जाणारा अन्नरस वाचून त्याचा ताटाला उपयोग होऊन कणसात दाणे चांगले भरतात. दाणे चांगले पक्व झाले म्हणजे ज्वारीची ताटे कापून किंवा उपटून काढून घेतात. कापून वा उपटून काढलेली ताटे शेतातच ३–४ दिवस वाळत ठेवतात. नंतर पेंढ्या बांधून त्या खळ्यावर रचून ठेवतात.
मळणी
कणसे पूर्ण वाळल्यानंतर पेंढ्या खळ्यात पसरून ताटांवरची कणसे कापून घेऊन ती खळ्यात पसरून बैलांची पात धरून अगर त्यांच्यावरून बैलगाडी हाकून ती चोळवटून मळून त्यांच्यातले दाणे मोकळे करतात. खळ्यातल्या कणसांच्या थरावरून दगडी रूळ चालवूनही मळणीचे काम लवकर आणि सुलभतेने करून घेता येते. हा मळलेला माल वाऱ्याच्या अगर उफणणीच्या पंख्याच्या किंवा उफणणीच्या यंत्राच्या साहाय्याने उफणून दाणे वेगळे काढून साफ करून पोत्यात भरून साठवून ठेवतात. हल्ली संपूर्ण मळणीचे काम शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने थोड्याच वेळात करता येते व अशा प्रकारच्या मळणी यंत्रांची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटल्यामुळे या यंत्रांचा वापर वाढत्या प्रमाणावर होत आहे. मळणी व उफणणी ही दोन्ही कामे एकाच यंत्रात होतात. एका तासात ८ ते १२ क्विंटल ज्वारीची मळणी होते.
उत्पन्न
जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान (अथवा पाणी पुरवठ्याची साधने), खताची मात्रा आणि मशागत यांवर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे गावोगावी त्यात फरक आढळतो. १९६८–६९ ते १९७२–७३ या पाच वर्षांच्या काळात ज्वारीचे भारतातील सरासरी हेक्टरी उत्पन्न ४८१ किग्रॅ. होते. कोरडवाहू खरीप ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० किग्रॅ. असते व दाण्याच्या तीन ते साडेतीन पट कडब्याचे उत्पन्न मिळते. कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ६५० ते ७५० किग्रॅ. असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न १,२०० ते १,८०० किग्रॅ. असते. भारी जमिनीत ते हेक्टरी ४,००० किग्रॅ. पर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी २० टन आणि भारी जमिनीत ३० ते ३५ टन मिळते.
उपयोग
नेहमीच्या आहाराचा एक प्रमुख भाग म्हणून ज्वारीचा भारतात, विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या भागात, उपयोग करतात. शिवाय कणसे काढून घेतल्यावर राहिलेली वाळलेली ताटे (कडबा) यांचा जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होतो. दाण्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात अथवा लाह्या, हुरडा व लापशी या स्वरूपांतही दाण्याचा वापर करतात. दाण्यापासून ‘माल्ट’ तयार करतात व त्याचा उपयोग लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी अथवा बिअर तयार करण्यासाठी करतात. पावासाठी गव्हाच्या पिठात ज्वारीचे पीठ २५% पर्यंत मिसळून वापरता येते. तसेच दाण्यातील स्टार्चापासून किण्वनाने (आंबवून) एथिल अल्कोहॉल, सिटोन व ब्युटिल अल्कोहॉल तयार करतात. ज्वारीचा स्टार्च मक्याच्या स्टार्चाप्रमाणे असून त्याचा खाद्य पदार्थांच्या उद्योगांत आणि कापडधंद्यात खळीसाठी उपयोग होतो. कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगातही ज्वारीच्या स्टार्चाचा खळीसाठी वापर होतो. वॅक्सी सोर्घम नावाच्या ज्वारीच्या प्रकारापासून पाकिटे व तिकिटे चिकटविण्यासाठी आसंजक (चिकट पदार्थ) तयार करतात. मिलो आणि काफीर या ज्वारीच्या प्रकारांपासून साबुदाण्यासारखा पदार्थ आणि ज्वारीचे पोहे तयार करतात.
ज्वारीच्या काही प्रकारांच्या तुसांत लाल रंगद्रव्य असते आणि त्याचा चामड्याला रंग देण्यासाठी ईजिप्त आणि भारतात उपयोग करतात.
ज्वारीच्या ताटांपासून रासायनिक कृतीने तयार केलेला लगदा आणि लाकडापासून तयार केलेला लगदा यांच्या मिश्रणापासून लिहिण्याचा, वृत्तपत्राचा आणि वेष्टनाचा कागद तयार करतात.
ज्वारीच्या दाण्यांत ऱ्हायझोपस निग्रिकँस या कवकाचा एक प्रकार काही विशिष्ट परिस्थितीत वाढतो. अशा प्रकारची कवकामुळे दूषित झालेली ज्वारी खाण्यात आल्यास त्याचे अनिष्ट परिणाम म्हणजे तहान लागणे, बहुमूत्रता, भूक मंद होणे, थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी अशा रोगाची साथ पसरली होती.
वैरण
फुलावर आल्यावर ज्वारीची ताटे कापून ती ओली वैरण म्हणून अथवा मुरघास करून जनावरांना खाऊ घालतात. फुलावर येण्यापूर्वी ओली वैरण जनावरांना खाऊ घातल्यास त्यांतील धुरीन या सायनाइड वर्गातील विषारी पदार्थांमुळे विषबाधा होऊ शकते. लक्षणे सायनाइड विषबाधेची असतात व त्वरित उपचार न केल्यास जनावर मृत्युमुखी पडते. पीक फुलावर आल्यावर धुरीनाचे प्रमाण फारच अल्प असते. कडबा उन्हात वाळविल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने राहिलेले अल्प प्रमाणातील धुरीन नाहीसे होते. बागायती पिकात कोरडवाहू पिकापेक्षा धुरिनाचे प्रमाण कमी असते; तसेच खोडामध्ये ते पानांपेक्षा कमी असते.
गहू एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. यद्यपि येथे अनेक जाति आहेत
जमीन
गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा. पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.
पेरणी
पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका. उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल. जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.
बियाणे –
गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. – उशीरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे आणि पेरणी १८ सें.मी. अंतरावर करावी. – जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
सुधारित वाण :- पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरून १२९२ किलोपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्र राज्याच्या काही भागात भात पिकानंतर गव्हाची पेरणी करतात. अशा पीक पध्दतीत गहू घ्यावयाचा असल्यास आणि २-३ पाण्याच्या पाळयांची सुविधा असल्यास निफाड-३४ हा उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण आहे. त्यामुळे या वाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे. एन आय ए डब्ल्यू-३०१ (त्र्यंबक), एन आय ए डब्ल्यू-९१७ (तपोवन), एम ए सी एस-६२२२ हे सरबती वाण व एन आय डी डब्ल्यू-२९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. बागायती उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू-३४ आणि एके ए डब्ल्यू-४६२७ या वाणाप्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू-१५ (पंचवटी) एकेडी डब्ल्यू-२९९७-१६ (शरद) हे वाण उपयुक्त आहेत. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन.आय.ए.डब्ल्यू-१४१५ (नेत्रावती) व एच.डी. २९८७ (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी. वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल.
पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किवा दोन वेळा निंदण करावे. रूंद पानी तणांच्या बंदोबस्तासाठी २,४- डी (सोडीयम साल्ट) या तणनाशकाची प्रती हेक्टरी १ किलो क्रियाशील मूलद्रव्य ५०० लीटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. ही फवारणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी करावी.
खते
अ) हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे. ब) बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे. क) उशीरा पेरणीसाठी हेक्टरी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खते वरीलप्रमाणेच दोन हप्त्यात द्यावीत. ड) जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे. इ) पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.
पाणी व्यवस्थापन
बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी-जास्त असू शकतात. पाण्याचा साठा एकच पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याचा साठा दोन वेळेस पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. पाण्याचा साठा तीन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. तथापि, गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पिकास पाणी देणे फायद्याचे आहे. त्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे
पीकवाढीची अवस्था पेरणीनंतरचे दिवस
1. मुकुटमुळे फुटण्याची वेळ 18 ते 21 2. कांडी धरण्याची वेळ 40 ते 45 3. पीक ओंबीवर येण्याची वेळ 60 ते 65 4. दाण्यात चीक भरण्याची वेळ 80 ते ८५
गव्हावरील किडीचे एकिकृत व्यवस्थापन
महाराष्ट्रात गव्हाची लागवड दोन प्रकारे करण्यात येते. जिरायत पध्दत व बागायत पध्दत म्हणुन . गहु आपल्या भागातील रबी हंगामातील एक महत्वाचे अन्नधन्याचे पिक आहे. या पिकावर अनेक किडीची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या विभागात यापिकावर मुख्यतः खोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी इत्यादी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या व्यवस्थापनाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे २-३ से.मि असुन तिचा रंग गुलाबी असते. ती अंगाने मु आणि डोके काळे असते. या किडीच्या प्रादुर्भावाने वाढणारा मधला भाग सुकुन जातो. ती खोडात शिरुन खालील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे रोपे सुकुन जातात. व त्यांना ओंब्या येत नाही.
या किडीचे नियंत्रणासाठी उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २-३ वेळा मुळासकट उपडुन नाश करावा. तसेच पिकाखाली फवारणी झाल्यावर उपद्रवग्रस्त शेतातील धसकटे एकत्र करुन जाळावित. उभ्या पिकतात पिक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
तुडतुडे
हे किटक आकारने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातुन रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन ती वाळु लागतात. व पिकांची वाढ खुंटते. या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर डायमेखोएट ३० टक्के प्रवाही ३०० मिली. किंवा मिथाईल डिमेटाईल २५ टक्के प्रवाही ४०० मिलि किंवा पेन्थीऑन ५० टक्के २०० मिलि. किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १ किंलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात घरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी /धुरळणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी.
मावा Aphid : Aphis maidis Fab.
गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असते. हेकिटक लाब व वर्तुळाकार असते
या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोडव चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.या किडीचे नियंत्रण तुडतुड्या प्रमाणे करावे.
वाळवी किंवा उधई- Termite: Microtermes obesi (Termitidae: Isoptera)
ही किड सर्वांच्या परीचयाची आहे. व या किडीचा प्रादुर्भाव पिक वाढीच्या अवस्थेत दिसुन येतो. ही किड गव्हाच्या रोपाची मुळे खाते. व त्यामुळे रोपे वाळतात. व व सपुर्ण झाड मरते. वाळवाचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित. व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट केल्यानंतर मध्भागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावेत. आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मिलि. १० लिटर पाण्यात मिसळुन वारुळात वापरावे. वरील औषधाचे मिश्रन ५० लिटर एका वारुळासाठी पुरेसे होते. किंवा क्विनडलफॉस ५ दजाणेदार किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे. आथवा शेनखताबरोबर द्यावे.
उंदीर
उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरड ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमाडिऑलान एकत्र मिसळावे. चमचाभर (आंदाजे १० ग्रॅम) विषारी आमिष प्लॅस्टिकच्या पिशवित टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे.
रोग व त्यांचे व्यवस्थापन
१) तांबेराः
हा हवेव्दारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबे-यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा.(उदा. एचडी २१८९, पूर्णा, एकेडब्ल्यू ३८१ व एचआय ९७७)
तांबे-याची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.२) काजळी किंवा काणीः
या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.३) पानावरील करपाः
गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम + १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
शेतकरी शिफारशी नुसारगहू खत व्यवस्थापन प्रति एकर DAP NPK १२ ३२ १६ दिलेले असल्यास खालील डॉस द्यावा अन्यथा DAP व NPK २५ किलो प्रति एकर द्यावे पहिले पाहणी दिल्यानंतर युरिया ५० किलो झिंक ३३ % ५ किलो किंवा झिंक २१% असेल तर १० किलो सल्फर ३ किलो झाईम १५ किलो दुसरा डॉस युरिया ५० किलो थायफिनाईट मिथाईल ७० % ५०० ग्राम करन्डाझीम १० % मॅन्कोझेब ६३ % ५०० ग्राम DAP व NPK २५ किलो प्रति एकर द्यावे
शेतकरी शिफारशी नुसार पहिली फावरणी पेरणी नंतर 25-30 दिवसा नंतर
तणनाशक फवारणी नंतर 7-8 दिवसात घ्यावी
मिश्रण 1 महाधन 12-61-0 100 gm कीटक नाशक:- Karate 15 ml या मध्ये बुरशी नाशक वापरू शकता १५ लिटर पंप साठी
किंवा
मिश्रण 2 कीटक नाशक Profex Super 30 ml झिंक:-Yara Vita 20 ml Biovita 40 ml 15 लिटर पंप साठी
काळाच्या ओघात शेती व्यवसयात अमूलाग्र बदल झाला आहे. मात्र, आजही मुलभूत बाबींकडे दुर्लक्ष हे राहिलेले आहे. आता शेतात जाण्यास रस्ताच नसल्याच्या तक्रारी आपण सदैव ऐकत असतो. किंवा शेताच्या वाटेवरुन अनेकवेळा शेजाऱ्यांमध्ये भांडण-तंटेही होतात. एवढेच काय रस्ता नसल्याने शेतीकामासाठी वाहनदेखील शेतामध्ये येत नाही. ज्या प्रमाणात शेतामध्ये उत्पादन महत्वाचे आहे अगदी त्याप्रमाणेच शेत रस्ता देखील महत्वाचा आहे. त्यामुळे कायदेशीर रस्ता नेमका करायचा कसा ? त्यासाठी काय करावे लागते याची माहिती आज आपण घेणार आहोत.
शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा
शेत म्हणलं की रस्ता आलाच. तशी सोयच करुन ठेवलेली असते. पण स्थानिक पातळीवर कोण समजूतीने मार्ग काढतात तर कोणी रस्त्यासाठी तयार होत नाही. पण कायदेशीर रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्याला तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज करायचा आहे. शेतकऱ्याला हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.
कसा करायचा अर्ज व अर्जाचा मजकूर
तुम्हाला तहसीलदार यांच्या नावागे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कशाच्या आधारे तुम्ही हा अर्ज करता आहे ते नमुद करायाचे आहे. त्या खालोखाल अर्जाचा विषय लिहायाचा आहे. विषयामध्ये शेतात येण्या-जाण्यासाठी जमिनिच्या बांधावरून कायमस्वरूपी मिळण्याबाबत, असा विषय नमुद करायाचा आहे. यानंतर अर्जदाराचे नाव आणि शेतीच्या माहिताचा तपशील द्यायचा आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव, गाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव असायला पाहिजे. त्याखाली अर्जादाराला आपल्या शेतीचा तपशील द्यायचा आहे. यामध्ये शेती कोणत्या गटात येते तो गट क्रमांक, शेतकऱ्याकडे असलेली शेती किती आहे.
आणि या शेतीवर त्याला किती शेतसारा आकारला जातो, याची माहिती द्यायची आहे. समजा अर्जदाराची शेती जर सामायिक क्षेत्रात येत असेल तर त्याच्या वाटणीला किती शेती येत आहे. यानंतर अर्जदार शेतकऱ्याच्या शेतजमिनी शेजारी कोणाकोणाची शेती आहे. त्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता याची माहिती द्यायची आहे. यामध्ये अर्जदाराच्या जमिनीच्या चारही दिशांना ज्या शेतकऱ्यांची जमिन आहे. त्यांची नावे आणि पत्ते देणे गरजेचे आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
1) अर्जदाराचा आणि शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे. त्या जमिनचा कच्चा नकाशा 2) अर्जदाराचा जमिनीचा सातबारा उतारा 3) शेजारील शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील 4) अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती
रस्त्याची खरोखरच गरज आहे का?
सर्व कागदपत्रांसह शेतकऱ्याने तहसीलदाराकडे अर्ज केला की, अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्ता जाणार आहे, अशा शेजारच्या शेतकरी यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अर्जदाराला शेत रस्त्याची खरोखरच गरज आहे काय? याचीही तहसीलदारांकडून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून खातरजमा केली जाते. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की, तहसीलदार शेत रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात. एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर तहसीलदार अर्ज स्विकारतात किंवा अर्ज फेटाळून लावतात.
तहसीलदारांच्या आदेशानंतर रस्ता
तहसीलदारांनी अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला तर, शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठीचा आदेश काढतात. यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे कमीतकमी नुकसान होईल, याची काळजी घेतली जाते. ८ फूट रूंदीचा रस्ता मंजूर केला जातो. एकावेळेस एक बैलगाडी जाईल इतक्या रूंदीचा रस्ता मंजूर केला जाते. जर तहसीलदार यांनी दिलेला आदेश शेतकऱ्यास मान्य नसेल तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येते.
खरीप हंगामातील (Kharif Hangam) पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. (Marathwada) ऐन काढणीच्या प्रसंगीही परतीच्या पावसाने मराठवाड्यासह विदर्भात धुमाकूळ घातल्याने पिके अद्यापही पाण्यातच आहेत. मात्र, खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, यासाठी आवश्यक आहे ते नियोजन. हरभरा (Chickpeas) हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन होणार आहे. शिवाय हरभरा पीकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनेही भूमिका घेतलेली आहे. कृषी विभागाक़डून बियाणांचा पुरवठा केला जात आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा अधिकचे उत्पादन घ्यावयाचे असेल तर कृषितज्ञ पंजाबराव डख यांचा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या अचूक अंदाजाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे. अचूक अंदाज आणि योग्य वेळी शेतकऱ्यांना दिल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली होती. परिणामी शेतकरी हे सावध राहिल्याने पिकाचे नुकसान झाले. आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे. रब्बी हंगामातील हरभरा या पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांनी नेमके काय करावे याबाबत पंजाबराव डख यांचा सल्ला…
* शेतकरी हे बाजारातील महागडे बियाणे खरेदी करतात. पण घरगुती बियाणे वापरले तर उत्पादनही भरघोस होणार आहे. याकरिता 9211 हेच बियाणे वापरणे आवश्यक आहे. कारण दप्तरी हे देखील बियाणे चांगले आहे. मात्र, यामध्ये हरभऱ्याच्या घाटी गळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जमिनीसाठी पोषक असलेल्या 9211 याच घरगुती बियाणाचा वापर गरजेचा आहे.
* साधारणता शेतकरी हे एकरी 25 किलो बियाणे पेरतात. मात्र, हरभरा जेवढा दाट तेवढे अधिकचे उत्पादन त्यामुळे शेतकऱ्यांनी एकरी 40 ते 45 किलो बियाणे हे जमिनीत गाढणे आवश्यक आहे. त्यामुळे उतार वाढणार आहे. जेवढी दाट पेरणी तेवढे उत्पादन जास्त हेच अधिकच्या उत्पादनाचे सुत्र आहे.
* खताचे नियोजन : एकरी डीएपी ची एक बॅग व त्याच्यासोबत 5 किलो गंधक मिसळून पेरणी केल्यास पीकाची वाढ जोमात होते.
* अशी करा पेरणी : काळाच्या ओघात आता पेरणी ही ट्रक्टरद्वारेच केली जाते. मात्र, खोलवर पेरण्यास अधिकचे डिझेल लागत असल्याने ते वरच्या- वरीच सोडले जाते. त्यामुळे उगवण क्षमता ही कमी होते. त्यामुळे परेणी करताना जास्तीचे पैसे गेले तरी चालतील पण बियाणे हे जमिनीत खोलवर जाणे गरजेचे आहे. जमिनीचा ओलावा कमी झाला की, उगवण क्षमता ही वाढते. चिभडत असेलेल्या जमिन क्षेत्रात अधिकच्या खोलवर पेरणी केली की त्याच जोमात पीकाची उगवणही होते.
* पाण्याचे नियोजन : पेरणी झाली की, दुसऱ्याच दिवशी स्प्रिंक्लरने पाणी केवळ 2 तास द्यावयाचे आहे. पाटाने पाणी दिले की हरभऱ्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे दोनच तास पहिले पाणी द्यायचे तर दुसरे पाणी हे 20 दिवसांनी ते ही 4 तास स्प्रिंक्लर चालू ठेवायचे आहे. 40 दिवसांनी हरभरा फुल लागण्याच्या आगोदर तिसरे पाणी ते ही 6 तासच स्प्रिंक्लर चालू ठेवायचे आहे. हरभरा पीक फुल अवस्थेत असताना पाणी हे द्यायचे नाही. अन्यथा फुल गळण्याचे प्रमाण वाढते. अशा पध्दतीने पेरणीपासून काढणीपर्यंतचे नियोजन केले तर एकरी 16 क्विंटल उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांनो ही चूक होऊ देऊ नका
खऱीपात अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीतील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या आहेत. याचा फारसा परिणाम हा उत्पादनावर होणार नसला तरी पेरणीपूर्वी हलक्या प्रकारची मशागत करुन वेळ खर्ची न करता थेट पेरणीला सुरवात करायची आहे. रब्बी हंगामातील हरभरा हेच मुख्य पीक राहणार आहे. त्याअनुशंगानेच प्रशासनाने देखील खताचे नियोजन केले आहे. मात्र, आता पावसाने उघडीप देताच रब्बी हंगमातील कामे उरकून घेणे आवश्यक आहे.
हरभरा ✨सुधारीत वाण वाण: कालावधी (दिवस): सरासरी उत्पादन (क्विं/हे): वैशिष्टये 👉विजय: जिरायत ८५-९०, बागायत १०५-११०: जिरायत १४, बागायत २३: अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम 👉विशाल: ११०-११५: जिरायत १३, बागायत २०: आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव 👉दिग्विजय: जिरायत ९०-९५, बागायत १०५-११०: जिरायत १४, बागायत २३: पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य 👉विराट: ११०-११५: जिरायत ११, बागायत १९: काबुली वाण, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव 👉कृपा: १०५-११०: बागायत १८: जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण, दाणे सफेद रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव 👉फुले विक्रांत: १०५-११०: बागायत २२: मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीस योग्य 👉फुले विक्रम: जिरायत ९५-१००, बागायत १०५-११०: जिरायत १६, बागायत २२, उशिरा पेरणी १६: यांत्रिक काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य 👉पीकेव्हीके-२: ११०-११५: बागायत १६-१८: जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण 👉पीकेव्हीके-४: १०५-११०: बागायत १२-१५: जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण 👉बीडीएनजी-७९७: १००-१०५: जिरायत १५-१६: मध्यम दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित 👉बीडीएनजीके-७९८: ११०-११५: बागायत १६-१८: काबुली उभट पसरणारा वाण, मध्यम आकाराचे दाणे, मररोग व खुजारोगास मध्यम प्रतिकारक 👉पीडीकेव्ही कांचन: १०५-११०: बागायत १८-२०: पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य 👉पीडीकेव्ही कनक: १०८-१११: बागायत २२-२५: मध्यम टपोरे दाणे, यांत्रिक काढणीस उपयुक्त, मररोग सहनशील
ॲग्रोपंच ॲप (Agro Panch) ब्लॉग वरील संपुर्ण माहिती ही इतर माहिती देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पर्यंत पोहचत आहे .. कोणतीही क्रिया करण्याअगोदर चांगल्या प्रकारे पडताळणी करून घ्यावी.