गुलाब लागवड व व्यवस्थापन (Gulab Lagvad)

जमीन : गुलाब बहुवर्षायू फुलझाड असल्याने जमीन काळजीपूर्वक निवडावी. उत्तम निचऱ्याची, भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त व आम्ल – विम्ल निर्देशांक (सामू) ६ ते ७.५ च्या दरम्यान असणारी जमीन लागवडीयोग्य असते. जमिनीची खोली एक मीटर असावी. कठीण खडकाच्या, चुनखडी व क्षारयुक्त जमिनी या फुलझाडास मानवत नाहीत. त्यामुळे अशा जमिनीत लागवड टाळावी.

गुलाब लागवड

हवामान : गुलाबास थंड व कोरडे हवामान मानवते. १५ टे २० अंश सेल्सिअस तापमानात गुलाबाची वाढ चांगली होऊन उत्पादन भरपूर मिळते. स्वच्छ हवा, भरपूर सुर्यप्रकाश आणि मध्यम तापमान वाढीस योग्य असते. समुद्रसपाटीपासून ४००० मीटर उंचीपर्यंत गुलाबाची लागवड होऊ शकते. हवेतील सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५% असावी.

जाती : गुलाबात अनेक प्रकार आहेत. विविध रंगांच्या व आकारांच्या जाती आहेत. काही जातीच्या फुलांना सुगंध असतो. तर काही जातीच्या पाकळ्या बारीक असतात. गुलाबाच्या फुलांची संख्या व वाढ यामध्ये जातींमध्ये फरक आढळतो. या वैशिष्ट्यावरून गुलाबाचे सहा प्रकार पडतात.

१) हायब्रीड टी, २) फ्लोरीबंडा, ३) पॉलीएंथा, ४) मिनीएचर, (छोटे गुलाब). ५) वेली गुलाब, ६) रानटी गुलाब, यापैकी हायब्रीड टी व फ्लोरीबंडा या जातीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.

१) हायब्रीड टी : टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाब यांच्या संकरातून ही जात तयार केली आहे. फुले आकाराने मोठी, एका रंगाची, दोन रंगाची अथवा विविध रंगी आकर्षक असतात. गुलाबाचा आकार सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये अनेक जाती आहेत.

अ) लाल रंगाच्या जाती : पपा मिलांड, ग्लॅडिएटर मिस्टर लिंकन, खिश्चन डिऑर, सोफिया लॉरन्स, हॅपीनेस, क्रिमसन ग्लोरी, ओक्मा होमा.

ब) गुलाबी रंगाच्या जाती : क्वीन एलिझाबेथ, सुपर स्टार, फ्रेंडशिप, सोनिया मिलांद, मारीया क्लास, फस्र्ट प्राईझ, सिंदूर, पिटर फ्रँकेन फेल्ड,

क) पिवळ्या रंगाच्या जाती : लांडोरा, समर सनशाईन, सनकिंग, किंग्ज रॅमसन, गंगा गोल्डन जाएंट, पूर्णिमा, गोल्डन स्पेंडॉंर, ग्रॅन्ड मेरी जेनी.

ड) पांढऱ्या रंगाच्या जाती : ऑनर व्हर्गो, पास्कली डॉ. होमी भाभा, जॉन ऑफ केनेडी, मेसेज, मेमोरियम, चंद्रमा.

इ) निळ्या रंगाच्या जाती : ब्ल्यू मून, लेडी एक्स, पॅराडाइस, स्टर्लिंग सिल्व्हर.

ई) बहुरंगी जाती : डबल डिलाईट, पीस, अॅनव्हील स्पार्स्क, अमेरिकन हेरीटेज, सी पर्ल, किस ऑफ फायर, गार्डन पार्टी.

फ) सुगंधी जाती : नूरजहान, दमास्क, क्रिमसन ग्लोरी, एडवर्ड

२) फ्लोरीबंडा : फ्लोरीबंडा ही जात हायब्रीड टी व पॉलिएंथा यांच्या संकरातून निर्माण केली आहे. फुले घोसात व मोठ्या संख्येने येतात. फुलांचा आकार चांगला असून हंगाम मोठा असतो. काही महत्त्वाच्या फ्लोरीबंडा जाती, त्यांच्या फुलाचा रंग खाली दिला आहे.

अ) ऑल गोल्ड: फुलांना पिवळा रंग असून मंद सुवास असतो.

ब) अँगल फेस : गुलाबी फुले असतात. फुलांना भरपूर सुवास असतो.

क आरथर बेल : फुले पिवळी व सुवासिक असतात.

ड) एलिझाबेथ ऑफ ग्लॅमिस : सालमन रंगाची सुवासिक फुले असतात.

इ) फ्रेंच लेस : पांढरी मंद सुवासिक फुले असतात.

ई) गोल्डन टाईम्स : या जातीची फुले पिवळ्या रंगाची असतात.

उ) लिटल डार्लिंग : पिवळसर गुलाबी फुलांना भरपूर सुवास असतो.

ऊ) मरसेडिस : शेंदरी रंगाची व मंद सुवास असणारी फुले येतात.

ए) सिंप्लीसिटी : गुलाबी रंगाची फुले असतात.

ऐ) आईस बर्ग : पांढऱ्या रंगाची फुले खूपच सुवासिक असतात.

काही महत्त्वाच्या भारतीय जाती व फुलांचा रंग :

१) अभिसारिका – नारंगी,

२) आकाश सुंदरी – गुलाबी,

३) अनुपमा – लाल,

४) अनुरंग – रोझी,

५) अप्सरा – गुलाबी,

६) अर्जुन – रोझी,

७) भीम – गर्द लाल,

८) गंगा – सोनेरी,

९) हसीना – गुलाबी,

१०) जवाहार – पांढरा (मंद सुवास),

११) राजकुमार – गुलाबी,

१२) सुगंधा – लाल (गोड सुवास)

* अभिवृद्धी : गुलाबाची अभिवृद्धी बिया लावून, छाट कलम, गुटी कलम व डोळे भरून केली जाते. व्यापारी तत्त्वावर लागवड करताना अभिवृद्धी टी (T) पध्दतीने डोळे भरून करावी. गुलाबाच्या अभिवृद्धीसाठी प्रथम खुंट रोप (Root Stock) तयार करून त्यावर डोळा भरावा.

अ) खुंटरोपाची निवड (Selection of Root Stock) : गुलाबासाठी प्रामुख्याने चार खुंट रोपे वापरली जातात.

१) रोझा इंडिका,

२) रोझा मल्टिफ्लोरा,

३) रोझा स्पेसीज,

४) थॉर्नलेस (काटे नसणारे) वरीलपैकी पहिल्या दोन खुंटरोपाचा वापर सर्रास केला जातो. ७.५ पेक्षा जात सामू (विम्लधर्मी) असणाऱ्या जमिनीसाठी ‘रोझा इंडिका’ हे खुंटरोप वापरावे. ७.५ पेक्षा कमी सामू (आम्लधर्मी) असल्यास त्या जमिनीत ‘रोझा मल्टिफ्लोरा’ या खुंट रोपावर डोळे भरावेत. प्रथम फांदीकलमाद्वारे खुंट रोप वाढवावे व त्यावर टी (T) पद्धतीने चांगल्या जातीचा डोळा भरावा.

ब) डोळा भरणे : पावसाळी हंगामात खुंट रोपाची, पॉलिथिनच्या पिशवीत लागवड करावी. खुंटरोपाची चांगली वाढ होऊ द्यावी. ज्या जातीचा डोळा भरावयाचा आहे. त्या काडीवरील टी (T) आकाराचा डोळा काळजीपूर्वक काढावा, असा डोळा १० मिली जर्मिनेटर + ५ ग्रॅम प्रोटेक्टंट + १ लि. पाणी या द्रावणामध्ये ५ ते १० मिनिटे भिजवून, खुंटरोपावर याच टी (T) आकाराची खाची पाडून त्यात भरावा. प्लॅस्टिक पट्टीच्या सहाय्याने हा डोळा खुंट रोपाशी घट्ट बांधतात. एक महिल्यानंतर डोळा व फांदी कलम एक होऊन फूट होऊ लागते. मात्र याच दरम्यान खुंट रोपावर येणारी कोवळी फूट वरचे वर काढावी. चांगली वाढ झाल्यानंतर रोप शेतात किंवा बागेत कायमच्या जागी लावावे.

क) पॉलिबॅग मेथड : ही गुलाबावर डोळे भरण्याची अतिजलद पद्धत आहे. कमी वेळात रोपे तयार होतात. यासाठी ६ ते १० सेंमी. रुंद व १५ ते २० सेंमी. उंचीची पॉलिथिन पिशवी १ भाग सुपीक माती, १ भाग शेणखत, १ भाग भाताचे पिंजर व बी. एच. सी. पावडरचे मिश्रण भरावे. मिश्रण भरताना पिशवी फुटू नये म्हणून १०० ते २०० गेज पॉलिथीन पिशवी वापरावी. मातीचे मिश्रण चाळून घेऊन दाबून पिशवीत भरावे.

ज्या जातीचे खुंटरोप निवडले आहे त्याची पेन्सिल आकाराची १५ सेंमी लांबीची खोडकाडी घेऊन पिशवीत लावावी. पाच ते सहा आठवड्यात काही मुले धरते. भरपूर मुळे फुटल्यानंतर काडी डोळे भरण्यास योग्य समजली जाते. योग्य जातीचा डोळा घेऊन तो खुंटरोपावर ‘इंग्रजी टी (T) पद्धतीने भरावा.

पूर्व मशागत : लागवडीपूर्वी उभी – आडवी खोल नांगरणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून कुळवणी करावी. जमीन तणविरहित करून योग्य अंतरावर खड्डे घ्यावेत. गुलाबाची लागवड चर काढून अथवा खडडे घेऊन करता येते. खड्डे अथवा चराचा आकार जमिनीचा प्रकार व गुलाबाच्या जातीवर अवलंबून असतो.

१) खड्डयाचा आकार : उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे

१) ५० x ५० x ५० सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

७५ x ७५ x ७५ सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

५० x ५० x ५० सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

२) चराचा आकार :

४५ x ४५ सेंमी. (रुंदी, खोली)

४५ x ५० सेंमी. (रुंदी, खोली)

६० x ६० सेंमी. (रुंदी, खोली)

६० x ४५ सेंमी. (रुंदी, खोली)

* लागवडीतील अंतर : गुलाबाची लागवड विविध अंतरावर करता येते. परंतु जमिनीचा प्रकार, जातीची निवड व मशागतीची पद्धत यानुसार पुढील अंतरावर लागवड करता येते. खड्ड्यात १ मी. x १ मी. व १.५ मी. x १.० मी. वर लागवड करावी. तर चरामध्ये १.५ मी. x ६.६ मी. अंतरावर लागवड करावी.

खड्डे भरणे : चर अथवा खड्डे मातीचे चांगले मिश्रण तयार करून भरावेत. योग्य प्रतीचे गार्डन मिक्चर (Garden Mixture) तयार केल्यास झाडांची वाढ चांगली होते. गार्डन मिक्श्चरसाठी खड्डयातून निघालेली माती, शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा. खड्डे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावेत.

लागवडीची वेळ : गुलाबाची लागवड वर्षभर करता येते, परंतु लागवड करताना काही गोष्टी विचारात घ्याव्यात. कमी पर्जन्यमानाच्या भागात जून – जुलै महिन्यात लागवड करावी. जास्त पाऊस पडून पाणी साचत असल्यास ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लागवड करणे फायदेशीर ठरते. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास जून, ओक्टोबर व जानेवारी महिन्यातील कालावधी लागवडीस अधिक योग्य आहे.

* लागवड : गुलाबाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. पहिल्या पद्धतींत निवडलेल्या अंतरावर कलमांची रोपे लावून लागवड केली जाते. दुसऱ्या पद्धतीत अगोदर लागवडीच्या जागी खुंट लावून त्यावर योग्य जातीचा डोळा भरतात.

आंतरमशागत : गुलाब बहुवर्षायू असल्याने ६ ते १० वर्षे शेतात राहतो. त्यामुळे आंतरमशागतीकडे लक्ष द्यावे. आंतरमशागत वेळेवर केल्याने गुणवत्ता व उत्पन्नात भर पडते. खुरपणी, भरणी, खुंटरोपावरील फुटवे काढणे इत्यादी गोष्टींचा यात समावेश होतो. लागवडीपासूनच शेत खुरपूण स्वच्छ ठेवावे. हरळी अथवा नटग्राससारखी तणे एकदा वाढली तर नियंत्रण करणे अवघड जाते. गोखारूसारख्या तणांचा नायनाट करण्यासाठी २ ते ३ वेळा पंधरा दिवसांच्या अंतराने खुरपण्या कराव्यात.

पाणीपुरवठा : गुलाबास नियमित पाण्याची गरज असते. जमिनीचा प्रकार, हंगाम व वाढीच्या अवस्थेवर पाण्याची गरज अवलंबून असते. भारी जमिनीत जास्त अंतराने तर हलक्या जमिनीत कमी अंतराने पाणी द्यावे. झाडे फुलाधारणेच्या अवस्थेत असताना पाणी कमी पडू नये, याची काळजी घ्यावी. हंगामाचा विचार केल्यास पावसाळी हंगामात १५ – २० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीला पीक चांगला प्रतिसाद देते. या पद्धतीने पाण्याची बचत होऊन जास्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळतात. पाण्याचे नमुने तपासून पाणी देणे योग्य असते. पाण्यात क्लोराइडसारखे हानिकारक क्षार असणार नाहीत याची काळजी घ्यावी.

उत्पादन व गुणवत्ता वाढ : गुलाब फुलाझाडास पाणी, खते व्यवस्थापन व इतर नियोजन अनुकूल असूनही गुणवत्ता व उत्पन्नात भर पडत नाही. अशा वेळी गुणवत्ता वाढीच्या पुढील पद्धती अवलंबाव्या लागतात.

१) डी – सकरिंग (De – Sukering) : डोळा भरल्यानंतर खुंट रोपावर येणारे फुटवे काढण्याच्या क्रियेस ‘डी – संकरिंग’ म्हणतात. कोवळी फूट वेळेतच काढावी. अन्यथा ती डोळे भरलेल्या फांदीच्या वाढीवर परिणाम करते. डोळा भरल्यानंतर वर्षभर डी – सकरिंग केले जाते. कोवळे फुटवे झाडातील अन्न मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे ते योग्य वेळी काढून टाकणे महत्त्वाचे ठरते.

२) पिंचिंग (Pinching) : वाढीच्या काळात टोकाकडील फांदीचा जोमाने वाढणारा थोडा भाग कापण्याच्या क्रियेस ‘पिंचिंग’ असे म्हणतात. झाडास योग्य व एकसारखा आकार आणण्यासाठी पिंचिंग करतात. लागवडीनंतर काही फांद्या जोमाने व उरलेल्या हळुवार वाढतात. जोमाने वाढणाऱ्या फांद्या टोकाकडे थोड्या प्रमाणात कापल्यास त्यांची वाढ थांबते. आपोआप इतर फांद्यांच्या वाढीला संधी मिळते. यामुळे सर्व फांद्यासारख्या वाढून झाडाला आकर येतो. पिंचिंगमुळे झाडावरील फांद्या वाढण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे फुलांची संख्या वाढते.

३) डिस – बडिंग (Dis Budding) : गुलाबावरील लहान फुले व कळ्या काढण्याच्या क्रियेला ‘डिस -बडिंग’ म्हणतात. झाडावर भरपूर फुले आल्यास झाड त्यांना पोसू शकत नाही. त्यामुळे त्यांचा आकर लहान राहतो. याउलट मर्यादित फुले झाडावर ठेवल्यास फुलांचा दर्जा चांगला राहतो. म्हणून डिस – बडिंग फायदेशीर ठरते, परंतु आवश्यकता असेल तेव्हाच डिस – बडिंग करावे.

४) मल्चिंग (Mulching) : प्लॅस्टिक कागद अथवा पालापाचोळ्याने दोन रोपांमधील जमीन झाकण्याच्या क्रियेस ‘मल्चिंग’ (आच्छादन) म्हणतात. जमिनीत ओलावा टिकवून तणांची वाढ रोखण्याच्या उद्देशाने आच्छादन करतात. आच्छादनासाठी वाळलेले गवत. पालापाचोळा व काळ्या पॉलिथिन कागदाचा वापर करावा. आच्छादन करण्यासाठी ३०० गेजची काळी पॉलिथिन शीट योग्य असते, आच्छादनाचा हंगामानुसार चांगला उपयोग होतो. पावसाळ्यात तणांची वाढ रोखली जाऊन उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

५) पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे : उत्पादन दर्जेदार आणी सतत, भरघोस येण्यासाठी खालीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात त्याने कीड रोगास आळा बसतो. फवारणी

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + न्युट्राटोन १०० मिली + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. राईपनर १५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली + स्प्लेंडर ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४५० ते ५०० मिली + स्प्लेंडर ४५० मिली + २५० लि. पाणी.

५) तोडे चालू झाल्यानंतर हवामानातील बदलानुसार : (१० ते १५ दिवसाच्या अंतराने ) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४५० ते ७५० मिली + हार्मोनी ४५० ते ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २५० लि. पाणी.

बहार संपल्यानंतर छाटणी केल्यावर नवीन फुटीसाठी : (छाटणीनंतर ८ ते १० दिवसांत)

जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रिझम ५०० मिली.+ १०० लि.पाणी.

त्याचबरोबर जर्मिनेटर एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून मुळावाटे द्यावे.

* छाटणी (Pruning) : फुलांची संख्या वाढविण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला ‘छाटणी’ म्हणतात. गुलाबाला नवीन वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत. नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यास झाडाचा आकार बिघडतो. छाटणीत जोमदार वाढीच्या निरोगी फांद्या ठेवून बारीक, कमजोर रोग व कीडग्रस्त, वाळलेल्या, अयोग्य दिशेत वाढणाऱ्या फांद्या काढाव्यात.

छाटणीचे उद्देश : १) जुनाट भाग व निर्जीव फांद्या काढणे.

२) फुलांची संख्या वाढविणे.

३) रोग व कीडग्रस्त फांद्या काढणे.

४) फवारणी, फुलांची तोडणी व इतर आंतरमशागती सोप्या करणे.

५) कोवळ्या, गर्दी करणाऱ्या व वांझ फांद्या काढणे.

६) योग्य वेळी झाड बहारात आणणे.

झाडाच्या वाढीच्या सुरुवातीला चांगला आकर आणण्याकडे लक्ष द्यावे. निवडक फांद्या ठेवून बाकीचा भाग काढावा. झाड फुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित छाटणी करावी. छाटणीची तीव्रता लक्षात घेतल्यास, गुलाबाच्या छाटणीचे प्रकार पडतात.

१) सौम्य छाटणी (Soft Pruning) : फुलांचा बहार व पावसाला संपल्यानंतर छाटणी केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस छाटणी केली जात असल्याने ‘हिवाळी छाटणी’ असेही म्हणतात. पावसाळी बहार झाल्यानंतर दुसरा बहार येण्यासाठी ही छाटणी केली जाते. बहार नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन फेब्रुवारी – मार्चपर्यंत चालतो. सौम्य छाटणीत फांदीचे शेंडे छाटले जातात. यामुळे झाडास फुले भरपूर लागतात, परंतु ती आकाराने लहान असतात.

२) मध्यम छाटणी (Medium Pruning) : या छाटणीत फांद्याची खरडून अथवा फार उंचीवर छाटणी करत नाहीत. मध्यम उंचीवर म्हणजेच फांदीवर ७ ते ८ डोळे ठेवून छाटणी करतात. छाटणीनंतर ४० ते ५० दिवसांत नवीन फुटीवर फुले येतात. फुले भरपूर व मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. मध्यम छाटणी झाडाची उंची मध्यम राहून डौलदार वाढतात.

३) कडक छाटणी (Heavy Pruning) : कडक छाटणी उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे मे महिन्याच्या शेवटी करावी. फांदीच्या खोडाकडील भागावर ३ ते ४ डोळे राखून छाटणी करावी. कडक छाटणीस ‘उन्हाळी छाटणी’ असेही म्हणतात. छाटणी उन्हाळ्यात लवकर करू नये. तसे केल्यास कोवळ्या कोंबांना इजा पोहोचते. छाटणी खोलवर केल्याने फुले संख्येने कमी असतात. परंतु आकाराने मोठी असतात.

* छाटणीनंतर घ्यावयाची काळजी :

१) छाटणी योग्य वेळी करावी.

२) रोग – कीडग्रस्त व गर्दीच्या फांद्या काढाव्यात.

३) छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.

४) धारदार सिकेटरने एकाच कापात छाटणी करावी.

५) छाटणीनंतर मशागत करून खत घालावे.

फुलांची तोडणी, प्रतवारी व उत्पन्न : गुलाबाची लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांनी फुले लागण्यास सुरुवात होते. सुरुवातीला फुलांची संख्या कमी असते, परंतु एक वर्षानंतर नियमित व भरपूर फुले येण्यास सुरुवात होते. फुलांच्या बाहेरील एक ते दोन पाकळ्या उमलण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांची तोडणी करावी. फुलांच्या वापरावरून तोडणी वेगवेगळ्या प्रकारे करावी. हार, अत्तरे तयार करण्यासाठी तसेच देवाला वाहण्यासाठी पूर्ण उमललेली फुले तोडावीत. अशी फुले उघड्या टोपलीत गोळा करावीत.

फुलदाणी वापरण्यासाठी (कट फ्लॉवर्स) १५ ते ६० सेंमी लांबीची देठ ठेवून फुले तोडावीत. निरोगी डोळ्याच्या वरील बाजूस देठावर धारदार चाकूने कट द्यावा. गुलाबपुष्पाची तोडणी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्तवेळी करावी. त्यामुळे उन्हामुळे होणारे फुलांचे नुकसान टळते. उशिरा तोडल्याने फुलदांडी व फुलांचे आयुष्य कमी होते. अत्तरे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फुले उशिरा तोडल्याने सुगंधी द्रव्याचे प्रमाण कमी होते. फुलदांडी (कट फ्लॉवर्स) तोडणी केल्यानंतर फुलांचे देठ मानेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे फुलांचे आयुष्यमान वाढते. तोडणी संपेपर्यंत फुले सावलीत ठेवावीत.

प्रतवारी : तोडणीनंतर सावलीत ठेवलेल्या फुलांची प्रतवारी करावी. सुकलेली व खराब फुले बाजूला काढावीत. चांगल्या व निरोगी फुलांची देठाच्या लांबीनुसार प्रतवारी करावी. जास्त देठाच्या लांबीची फुले चांगल्या प्रतीची समजली जातात. तसेच त्यांना बाजारात किंमत जास्त मिळते. देठाच्या लांबीनुसार पुढील ग्रेडमध्ये फुलांची प्रतवारी केली जाते.

ग्रेड देठाची लांबी

अ ६० सेंमी पेक्षी जास्त

इ ४५ ते ६० सेंमी

उ ३० ते ४५ सेंमी

ऊ १५ ते ३० सेंमी

ए १५ सेंमी पेक्षा कमी

प्रतवारी जाती व रंगानुसार करावी. समान दांडे असलेली ६ किंवा १२ फुले एकत्र बांधून जुड्या खोक्यात पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात.

उत्पादन : प्रतिवर्षी फुलांचे सरासरी एकरी १.२५ लाख फुले मिळतात. दुसऱ्या वर्षापासून स्थिर उत्पादन येते.

गुलाबावरील रोग :

१) भुरी (Powdary Milde)

२) काले ठिपके (Black Spots)

३) शेंडा मर (Die -Back)

४) तांबेरा (Rusty)

१) भुरी : भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. स्पेरोथिका पेनोसा नावाच्या बुरशीमुळे होतो. उष्ण – दमट वातावरणात प्रादुर्भाव जास्त आढळतो. पानावर भुरकट पांढऱ्या रंगाची बुरशी वाढून नंतर पानाच्या दोन्ही बाजूस पसरते. बुरशी कळ्या, फुलांचे देठ व कळीच्या मानेखाली पसरते. बुरशी आकुंचन पावतात. कळ्यांनी नैसर्गिक वाढ होत नाही. झाडाची वाढसुद्धा खुंटते.

उपाय : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २ मिली/लि. याप्रमाणे थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत फवारावे.

२) शेंडा मर : हा बुरशीजन्य रोग आहे. फांदी शेंड्याकडून पाठीमागे काळपट पडून वाळत येते. छाटणीतून होणाऱ्या जखमांमधून बुरशी आत शिरते व मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसाळ्यात व पाणथळ जागी रोगाची तीव्रता जास्त असते.

Woman gardener transplanting roses flowers from pot into wet soil after watering it with watering can. Summer garden work.

उपाय : जर्मिनेटर, प्रिझम प्रत्येकी ५ मिली आणि हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. त्याचबरोबर जर्मिनेटर एक लि./२०० लि. पाण्यातून एकरी मुळावाटे सोडावे.

३) काळे ठिपके : डिप्लोकारपॉन रोझी या बुरशीमुळे रोग होतो. जमिनीलगतच्या जुन्या पानांपासून रोगाची सुरुवात होऊन अनुकूल हवामानात वरपर्यंत पसरतो. पानावर गोलाकार काळपट ठिपके पडतात. रोगट पाने पिवळी पडून थोड्याशा धक्क्याने गळून पडतात. झाड कमकुवत होऊन फुलांची प्रत व उत्पादनावर परिणाम होतो.

उपाय : थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणी हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

४) तांबेरा : फ्रॅग्मीडियम म्युक्रोनॅटम या बुरशीमुळे तांबेरा होतो. हिवाळा व पावसाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. रोगग्रस्त पाने तपकिरी पडून झाडाची वाढ खुंटते. पानगळ होऊन झाड अशक्त बनते. यामुळे फुलधारणेस उशीर लागतो.

उपाय: हार्मोनी २ मिली किंवा झेड – ७८ दोन ग्रॅम/लि. पाणी याप्रमाणे फवारावे.

गुलाबावरील किडी:

१) सुरवंट (Hairy Catter Piller),

२) भुंगेरे (Chafer Beetle),

३) फुलकिडे (Thrips),

४) मावा (Aphids),

५) खवले कीड (Scale Insects),

६) लाल कोळी (Red Mites)

१) सुरवंट : हे किडे पानांच्या शिरामधील भाग खातात, फक्त शिरा शिल्लक राहतात. यामुळे पान जाळीदार बनते. पाने व फुलांच्या कळ्यांचे नुकसान होते. सुरवंटाची अंडी पानाच्या खालील बाजूस आढळतात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या फुलांना भाव मिळत नाही.

२) भुंगेरे : भुंगेरे काळपट तपकिरी ते लालसर असतात. ते निशाचर असतात. दिवस तणांमध्ये व बुंध्याजवळ जमिनीत लपून बसतात. आणि रात्री पाने व कोवळी फूट कुरतडतात.

जास्त प्रादुर्भाव असल्यास भुंगेरे फुगलेले डोळे व कळ्या खातात.

३) फुलकिडे : फुलकिडे भुरकट पिवळ्या रंगाचे व लांबट आकाराचे असतात. कोवळे शेंडे. पाने, कळ्या व फुलांच्या पाकळ्या खरडून स्त्रवणारा रस शोषतात. असा भाग प्रथम पांढरा व नंतर तपकिरी होऊन खरचटल्यासारखे डाग पडतात. पाने व फुले आकसून वेडीवाकडी होतात.

४) मावा : तपकिरी, राखी हिरवट किंवा तपकिरी रंगाचे आणि लहान आकाराचे किडे असतात. शरीर गोल व मऊ असते. समूहाने पानाच्या खालच्या बाजूस अथवा शेंड्याकडील बाजूस आढळतात. हिवाळ्यात प्रादुर्भाव जास्त असतो. पिल्ले व पूर्ण वाढ झालेले किटक पाने, कळ्या व फुलातील रस शोषतात. कीडग्रस्त कळ्या उमलत नाहीत. माव्याच्या प्रादुर्भावने पानांवर व फुलांवर चिकटपणा आढळतो.

५) खवले कीड : काळसर करड्या रंगाची, पापद्यासारख्या आकाराची कीड, खोड व पानांना चिकटलेली असते. खवले एकाच ठिकाणी राहून रस शोषतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या वाळतात.

६) लाल कोळी : किटक लांबट – गोल व तांबूस रंगाचे असतात. पूर्णावस्थेत आठ गाय असतात. खालच्या बाजूकडील पानांचा रस शोषतात. त्यामुळे पाने निस्तेज बनून झाडातील जोम कमी होतो.

सर्व फुलांमध्ये गुलाबास वरचे स्थान आहे. गुलाबास ‘फुलांचा राजा’ म्हटले जाते. उत्तरे, सुगंधी तेल (ओटो), गुलकंद यासारखी मौल्यवान उत्पादने गुलाबापासून मिळतात. गुलकंद आरोग्यवर्धक असून उत्तम टॉंनिक आहे. रोझ दमास्काना या जातीपासून उत्तर व गुलाबपाणी काढले जाते. गुलाबाची फुले केशशृंगार, पुष्प सजावट, फुलदाणी सजावट, हार, गुच्छ बनविण्यासाठी वापरली जातात. आजारी माणसाला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देताना गुलाबाची फुले दिली जातात. बग्गेरियाना या जातीच्या फुलबोंडापासून ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते. याशिवाय भावना व्यक्त करण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो. तांबड्या रंगाचा गुलाब प्रेमाचे व पिवळ्या रंगाचा गुलाब मैत्रीचे प्रतिक मानला जातो.

भोईमूग लागवड (bhuimug lagwad)

प्रस्तावना

      भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात         २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती.

जमीन

      मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

पूर्व मशागत

      एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.

सुधारित वाण

अ.क्रवाणप्रकारहंगामपक्क होण्यास लागणारा कालावधी (दिवस)सरासरी उत्पादन (क्विं/हें)शिफारस
एस.बी -१२उपटीखरीप/उन्हाळी१०५-११०     ११५-१२०१२-१५      १५-२०संपूर्ण महाराष्ट्रासाठी
जे.एल- २४ (फुलेप्रगती)उपटीखरीप९०-९५१८-२०संपूर्ण महाराष्ट्रासाठी
टी.अे.जी – २४उपटीखरीप/उन्हाळी१००-१०५        ११०-११५२०-२५   २५-३०संपूर्ण महाराष्ट्रासाठी
जे.एल. २२० (फुले व्यास)उपटीखरीप९०-९५२०-२५जाड दाण्याची, जळगांव, धुळे, अकोला जिल्ह्यांकरिता
जे.एल. २८६ (फुले उनप)उपटीखरीप/उन्हाळी९०-९५२०-२५पश्चिम महाराष्ट्रासाठी व जळगांव, धुळे अकोला जिल्ह्यांकरिता
टी.पी.जी.-४१उपटीखरीप/उन्हाळी१२५-१३०२५-३०जाड दाण्याची, पश्चिम महाराष्ट्रासाठी जळगांव, धुळे, अकोला जिल्ह्यांकरिता
टी.जी. – २६उपटीखरीप/उन्हाळी९५-१००     ११०-११५१५-१६      २५-३०संपूर्ण महाराष्ट्रासाठी
जे.एल. ५०१उपटीखरीप/उन्हाळी९९-१०४      ११०-११५१६-१८     ३०-३२म.फु.कृ.वि. राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हे
फुले आरएचआरजी – ६०२१निमपसरीउन्हाळी१२०-१२५३०-३५पश्चिम महाराष्ट्रासाठी
१०फुले उन्नतीउपटीखरीप/उन्हाळी११०-११५     १२०-१२५२०-२५     ३०-३५संपूर्ण महाराष्ट्रासाठी टिक्का व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम

पेरणीची वेळ

      खरीप – १५ जून ते १५ जुलै

      उन्हाळी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, पेरणीचे वेळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा            

               त्यापेक्षा जास्त असावे.

(bhuimug lagwad)

बियाणे

      भुईमूगाचे वाणनिहाय बियाणे प्रति हेक्टरी खालीलप्रमाणे वापरावे.

      १०० किलो : एसबी – ११, टीएजी – २४, टीजी – २६, जेएल – ५०१, फुले ६०२१ , १२० ते १२५ किलो फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी – ४१, फुले उनप, फुले उन्नती

बीजप्रक्रीया

      बियाण्यापासून प्रादुर्भाव होणा-या व रोपावस्थेत येणा-या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डेंझिम किंवा ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकून पेरावे.

पेरणी अंतर

      दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी ठेवावे. उन्हाळी हंगामात जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पध्दतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागुन उगवण चांगली होते.

आंतरपिके

      खरीप भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफुल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिके ६: २ या प्रमाणात भुईमूग + ज्वारी १:१ तर कपाशी १:१ या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकांमुळे अधिक आर्थिक फायदा होत असल्याचे प्रयोगाअंती दिसून आलेले आहे. भुईमूग + सोयाबीन (४:१) आणि कडेने एरंडीची लागवड (दोन ओळी) केल्यास पाने खाणारी अळीचे नियंत्रणास मदत होते. सुरु उसात उपट्या भुईमूग वाणाची आंतरपिक म्हणून लागवड करण्यासाठी ९० सें.मी. अंतरावर स-या पडून ऊसाची लागवड केल्यानंतर एक आठवड्याने १० सें.मी. अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस उन्हाळी भुईमूगाची लागवड करावी.

खत मात्रा

      पुर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी २० गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे. खत व्यवस्थापन (सुधारित शिफारशीनुसार २०१३) भुईमूगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे सोबत जिप्सम ४०० क्वि/हे (२०० क्विं/हे पेरणीवेळी तर उर्वरीत २०० क्विं/हे आ-या सुटतांना) जमिनीत मिसळुन द्यावे. उन्हाळी भुईमूगासाठी नत्र व स्फुरद बरोबर २५० किलो जिप्सम १.२५ किलो पेरणीवेळी व १२५ किलो आ-या सुटण्याच्या वेळी) द्यावे.

आंतरमशागत

      पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व २ निंदण्या (खुरपण्या) द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमूगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करु नये. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पेंडीमिथॉलिन १.०० किलो क्रि. हा प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातुन ओलीवर फवारणी करावी. तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी इमॅझिथायपर १० टक्के एस एल ०.०७५ कि.क्रि. हा/हे. (७५० मिली व्यापारी उत्पादन/हे) ५०० लिटर पाण्यातून द्यावे.

पाणी व्यवस्थापन

      खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. भुईमूग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी(आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.

पीक सरंक्षण

      फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १० मिली किंवा ८ मिली, डिमॅटोन १५ टक्के प्रवाही औषध १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी  ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय १० मिली किंवा किनॉसफॉस २५ इ.सी. २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्पादन

      पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर काढणी वरील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर तर उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते.

(bhuimug lagwad)

माहिती स्तोत्र :- http://krishi.maharashtra.gov.in/

कापसाचे फवारणी वेळापत्रक (Kapus Favarni Velapatrak )

माझा कापसाच्या शेतीतील स्वअनुभव, शास्त्रज्ञांच्या शिफारशी, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव, प्रतिपंप फवारणीचा खर्च, एकाच वेळेस अनेक किडींचे नियंत्रण यावर आधारित सर्वसामान्य फवारणी वेळापत्रक पुढील पानावर देत आहे. हे वेळापत्रक प्रत्येक वर्षी जसेचे तसेच लागू होईल, असे सांगता येणार नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून येणारी कीड, रोग व झाडाच्या अवस्थेनुसार लागणारी संजीवके, विद्राव्य खतांची यामध्ये शिफारस केली आहे. आपल्या आवशक्यतेनुसार याचा वापर करावा. इतर तांत्रिक नावांना पर्यायी व्यापारी नावेसुद्धा समोरच दिली आहेत.

कीटकनाशके  इतर फवारताना पाण्यात मिसळण्यासाठीची शास्त्रीय क्रमवारी खालीलप्रमाणे वापरावीतत्यांची शॉर्ट फॉर्मलाँग फॉर्म  उदाहरणे.

१) WSG/WDG  –           Water Soluble Granules/Water Disposal granules उदा. थायोमिथॉक्झाम

२) S.P.              –          Soluble Powders उदा. असिफेट, असिटामाप्रीड

३) WP/WSP      –          Wetable Powders उदा. मेन्कोझेब, कार्बेडायझीन

४) SL                –          Soluble Concentrates उदा. हेग्झाकोनॅझॉल, इंडोग्झीकार्ब

5) EC                –           Emulifiable Conceritrates उदा. क्लोरोपायरिफॉस, क्विनॉलफॉस, फ्रोफेनोफॉस

६) PGR             –           Plant Growth Regulator, Pramoters उदा. ह्युमिक अॅसिड, बायोस्टिमुलंट, नायट्रोबेंझीन

७) WSF             –           Water Soluble Fertilizers – उदा. १९:१९:१९, युरिया, डी.ए.पी., ई.डी.टी.ए.

टीप- सल्फर व कॉपर एकत्र किंवा दुसऱ्या कीटकनाशकांसबोत वापरू नका. इतर सर्वांचा वापरसुद्धा तपासून मगच फवारा, द्रावण घट्ट झाल्यास फाटल्यास योग्य मिश्रण न झाल्यास न विरघळल्यास फवारू नका. एखादा घटक अयोग्य असल्याने असे होऊ शकते. वरील क्रमवारीनुसार पाण्यात मिसळणे फायद्याचे ठरते. मात्र, प्रत्येक वेळेस हे सर्वच फवारावे असे नाही. शक्य झाल्यास एका पंपाचे मिश्रण तयार करून ते योग्य सिद्ध झाल्यास २०० लिटर पाण्यात द्रावण तयार करावे.

Kapus Favarni

अमावस्या  फवारणीचा संबंध: सर्वसाधारपणे जवळपास बऱ्याच उपद्रवी अळ्यांचे पतंग अंधाऱ्या रात्री पिकावर अंडी घालतात व त्या अंड्यामधून २ ते ४ दिवसात अळी बाहेर पडून नुकसानाला सुरूवात करते. जास्त अंधारी रात्र अमावस्या व त्यापूर्वी व नंतर असते. त्यामुळे कापूस व इतर सर्वच पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होतो. फवारणीचे नियोजन करतांना अमावश्यानंतर तीन दिवसांच्या आत अंडीनाशकांची फवारणी करावी. सध्यातरी सर्वोत्कृष्ठ अंडीनाशक म्हणून सरेंडर बाजारात उपलब्ध आहे. ज्याच्या वापराने अळीची अंडी, छोटी अळी व रसशोषक किडींचे एकत्रित नियंत्रण होते. त्यामुळे कापसाला पाते लागल्यानंतरच्या प्रत्येक अमावश्यानंतर सरेंडर ३० मिली प्रतिपंप फवारणीचे नियोजन करावे व सोबत आवश्यकतेनुसार इतर घटक वापरावीत.

कापूस फवारणी वेळापत्रक
क्र.कालावधीसमस्याशिफारशीत फवारणी
पहिली३० ते ४५ दिवसमावा, तुडतुडा वाढरिहांश (थायोमिथोक्झाम एफ.एस.) -२० मिली + रिफ्रेश/टेकअप – ४० मिली + परिस १९:१९:१९-७५ ग्रॅम
दुसरी४५ ते ६० दिवसफुलकिडा, तुडतुडा बोंडअळीची सुरूवातरेज/अल्लीका – २० मिली + झेप /उडान – १० मिली
तिसरी६० ते ७० दिवसफुलकिडा, बोंडअळी, तुडतुडा (शक्यतोअमावशेनंतर)सरेंडर/प्रोफेक्ससुपर – ४० मिली+ रिहांश /स्लेअरप्रो- २० मिली+ गजब-५ मिली+ सल्फाबुस्ट-२५ ग्रॅम
चौथी७० ते ८० दिवसफुलकिडा, बोंडअळी, तुडतुडाइमान/टाफगोर/कराटे पैकी एक+ लान्सर गोल्ड/तपूस/असीफेट + परिस स्पर्श
पाचवी८० ते ९० दिवसपांढरी माशी, तुडतुडा, बोंडअळी, फुलकिडेतिसऱ्या फवारणी प्रमाणे सर्व औषधी अमावेशनंतर ३ दिवसाच्या आत
सहावी९० ते १०० दिवसपांढरी माशी, बोंडअळ्या,तुडतुडापांडा सुपर/हमला – २५ मिली किंवा एसएलआर – ५० मिली + भरारी/फ्लाईट-५ मिली + बिग-बी-१०० ग्रॅम

योग्य परिणामासाठी आमच्या एसएमएस मधील शिफारशींमध्ये बदल करू नयेत.

Kapus Favarni

शेतकरी शिफारस (Nilesh Patil )

लाल्या रोग खत देणे
मुळापासून ते शेंड्या पर्यंत पाने लाल पिवळी पडणे
खत देणे
२% DAP + MgSo ४
पाण्या खालील जमिनी साठी एकरी
युरिया ३० किलो
SSP ४० किलो
MgSo ४ ८ किलो

नोट : एखाद्या वेळेस किडीनुसार किंवा परिस्थितीनुसार औषधांमध्ये बदल होवू शकतो. कोणतीही क्रिया करण्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.अग्रोपंच किंवा इतर माध्येमांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही 

काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या, गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा

महाराष्ट्रातील शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचं चित्र आहे. काळा गहू पौष्टिक, औषधी गुणधर्म असल्याने अधिक दर मिळतो, अशा चर्चा सुरु आहेत. जे शेतकरी काळ्या गव्हाची लागवड करण्याच्या विचारत असतील त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. काळ्या गव्हाच्या गावाच्या नावाखाली शेतकर्‍यांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे. बियाणे कायद्यात त्या वाणाची नोंदच नाही. महाराष्ट्रात काळ्या गव्हाच्या लागवडीची शिफारस पण नसल्याचे समोर आले आहे.

काळ्या गव्हाच्या बियाण्याचा काळाबाजार

अव्वाच्या सव्वा दराने काळ्या गव्हाचे बियाणे विक्रीचा काळाबाजार सुरू आहे. तर काही शेतकरी अधिक दराच्या लोभात काळ्या गव्हाची लागवड करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, भारतीय गहू संशोधन संस्थेत गहू पिकाचे 22 वाण नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत 22 गहू वाणांच्या तुलनेत काळ्या गव्हात पोषकतत्वे ,रोगप्रतिकारकता व उत्पादकता कमी दिसून आले आहे. काळ्या गव्हाच्या वाणासंबंधी राष्ट्रीय स्तरावरून शिफारस नसताना लागवडी केल्या जात असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राकडे शहानिशा केली असता त्यांनी काळ्या गव्हाबद्दल माहिती दिली.

वाणाची नोंद होणं महत्वाचं

भारतीय गहू संशोधन केंद्रामध्ये गव्हाचे एकूण 22 वाण नोंद करण्यात आले आहेत. 1965 च्या बियाणे कायद्याच्या राजपत्र अधिसूचनेनुसार वाणाची नोंद होणे महत्त्वाचे आहे. केंद्राने केलेल्या मूल्यांकन निकषात काळा गहू हा वाण सरस ठरलेला नाही, अशी माहिती गहू संशोधन केंद्र, कुंदेवाडीचे अधीक्षक सुरेश दोडके यांनी दिली.

इतर वाणांच्या तुलनेत कमी उत्पादकता

काळ्या गव्हाची उत्पादकता इतर वाणांच्या तुलनेत कमी आहे. इतर गहू वाणांच्या तुलनेत प्रथिने , लोह, जस्त यांची उपलब्धता अधिक आहे. इतर वाणांच्या तुलनेत रोगप्रतिकारक नाही. उत्पादनपश्चात विक्रीकरीता अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, असं गहू संशोधन केंद्राकडून जाहीर करण्यात आलंय.

दरम्यान, काळ्या गव्हाची लागवड राजस्थान, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरीदेखील काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळत आहेत.

काळ्या गव्हाचे बियाणे साधारणतः साठ रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. एका एकर क्षेत्रावर चाळीस किलो बियाण्याची पेरणी केल्यास सर्व साधारणपणे बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन होऊ शकते. बाजारात जवळपास सात हजार रुपये क्विंटल दराने या गव्हाची खरेदी होते

जपानमधून मिळवलेले विदेशी जर्मप्लाझम (EC866732) हे सामान्य उच्च उत्पन्न देणारे आणि रोग प्रतिरोधक गव्हाचे वाण (PBW621) आणि ‘Nabi MG’ म्हणून ओळखले जाणारे काळे गहू म्हणून निवडले गेले. मोहाली मध्ये भारतात.

काळा गव्हाची आरोग्यदायक फायदे माहिती आहेत का ? (Kala Gahu Black Gahu)

आपण सामान्यतः पांढरा गहू दैनंदिन खाण्यासाठी वापरु शकतो परंतु पांढर्‍या पिकाच्या तुलनेत काळा गहू अधिक आरोग्यदायी असतो. काळ्या गव्हाचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत आणि त्यामध्ये बरेच महत्त्वाचे पोषक तत्व आहेत. हा गहू खाण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमीनो अ‍ॅसिड असतात, ज्यामुळे या गव्हाचा समृद्ध पौष्टिक व सकस आहारात समावेश करता येईल.

काळ्या गव्हाची ओळख कशी झाली?

गव्हाच्या प्रजाती खुप वर्षापासुन आपल्याला ज्ञात आहेत. परंतु बर्‍याच वर्षांच्या संशोधनानंतर नॅशनल अ‍ॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, मोहाली पंजाब येथे २०१७ या वर्षी काळ्या गव्हाचे संशोधन झाले. नॅशनल अ‍ॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, मोहाली (NABI) यांनी ७ वर्षांच्या संशोधनानंतर या गव्हाला आपल्या नावे पेटंट केले आहे. या गव्हाला ‘नबी एमजी’ (NABI MG) असे नाव देण्यात आले असून ते काळा, निळा आणि जांभळ्या रंगात उपलब्ध आहे आणि सामान्य गव्हापेक्षा बरेच पौष्टिक आहे. शिवाय, काळा गहू तणाव (Stress), लठ्ठपणा (Obesity), कर्करोग (Cancer), मधुमेह (Diabetes) आणि हृदयाशी संबंधित (Heart Diseases) आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहे.

काळ्या गव्हाचे फायदेः

हा गहू सामान्य गव्हापेक्षा जास्त पौष्टिक आहे आणि गुणवत्तेच्या दृष्टीने ते ब्लूबेरी नावाच्या फळाइतकीच पौष्टिक आहे. चला काळ्या गव्हाच्या फायद्यांबद्दल जाणून घेवु.

१. तणाव (Stress):

आजच्या काळात बहुतेक प्रत्येक व्यक्तीला कमी-जास्त प्रमाणात तणावाचा त्रास होतो. औषधे शरीरात गंभीर दुष्परिणाम सोडत असताना, काळ्या गव्हाने हा भयानक आजार संपवण्यासाठी आशेचा किरण आणला आहे.

२. लठ्ठपणा (Obesity):

लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी काळ्या गव्हाचे संशोधनात्मक परिणाम संशोधनात सापडले आहेत.

३. कर्करोग (Cancer):

कर्करोग हा असा आजार आहे ज्यासाठी अद्याप कायमचे उपचार उपलब्ध नाही. जेव्हा या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही औषधे उपलब्ध नसतात तेव्हा काळा गहू हा त्या सर्वांसाठी पूरक आहार म्हणून उत्तम पर्याय म्हणून उदयास आला आहे.

४. मधुमेह किंवा मधुमेह (Diabetes):

भारत आणि जगभरात सर्वत्र पसरलेला रोग, बरीच विचित्र गोष्ट अशी आहे की बरीच महागड्या औषधी असूनही ते बरा होऊ शकत नाहीत. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांवर संशोधनात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मधुमेह रूग्णांनी काळ्या गव्हाची चपाती (रोटी) खाल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य राहते आणि मधुमेह नियंत्रित होतो. या व्यतिरिक्त जे लोक दररोज ही चपाती (रोटी) खातात त्यांना मधुमेह होण्याचा धोका फारच कमी असतो आणि त्यांना या आजारापासून संरक्षण मिळते.

५. कमी रक्तदाब:

काळ्या गव्हाची चपाती (रोटी) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना देखील प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आणि ते खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. म्हणून असे म्हटले जाते की जर रक्तदाबाचा ञास असणार्या रुग्णांनी दररोज ही चपाती (रोटी) खाल्ली तर त्यांचे रक्तदाब वाढत नाही आणि त्यांना उच्च रक्तदाब या आजारापासून आराम मिळतो.

६. कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही:

काळ्या गव्हाच्या चपाती (रोटी) वरील अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की ते खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही आणि हृदय निरोगी राहते. जे लोक दररोज ही चपाती (रोटी) खातात, त्यांच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ लागते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. वास्तविक या चपातीमध्ये (रोटी) असंतृप्त फॅटी अ‍ॅसिड आढळतात आणि असंतृप्त फॅटी अ‍ॅसिडस् हृदयासाठी निरोगी असतात.

७. बद्धकोष्ठता दूर करते:

काळ्या गव्हाची चपाती (रोटी) पाचक प्रणालीसाठी फायदेशीर मानली जाते आणि काळ्या गव्हाची चपाती (रोटी) खाल्ल्याने पाचन तंत्राशी संबंधित अनेक आजार बरे होतात. एवढेच नाही तर ज्या लोकांना बद्धकोष्ठताची समस्या जास्त असते त्यांनी ही चपाती (रोटी) खाल्ल्यास आराम मिळतो आणि पोट स्वच्छ राहते. म्हणून, बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी आपल्या आहारात काळ्या गव्हाची चपाती (रोटी) समाविष्ट करावी आणि हा आहार दररोज घ्यावा.

पोषक तत्वेप्रती १०० ग्रॅम
उर्जा (कि. कॅलरी)312 ग्रॅम
कार्बोदके64.2 ग्रॅम
प्रथीने (ग्रॅम)11
डाएटरी फायबर12
अ‍ॅश1.6
फॅट्स1.2
ट्रान्स फॅट्सNil

इतर पोषक तत्वे                                 

अ‍ॅन्थोसायनीन (पिपिएम)140
विटॅमीन बी3 (मि.ग्रॅम)5.0
विटॅमीन बी5 (मि.ग्रॅम)1.2
विटॅमीन ई (मि.ग्रॅम)1.2
विटॅमीन बी9 (फोलेट) (mcg)36
पोटॅशीयम (मि.ग्रॅम)350
आयर्न (पिपिएम)45
झिंक (पिपिएम)36
कॅल्शीयम (मि.ग्रॅम) 35
सोडीयम (मि.ग्रॅम)2.5
mcg= 64

स्रोत :- marathi.krishijagran.com

काळ्या गव्हाची शेती करण्या अगोदर हे वाचा

सोयाबीन पिकावरील रोग व त्याचे व्यवस्थापन (Soyabean Rog)

कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे एक नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील या पिकाखालील असलेल्या क्षेत्रापैकी जवळपास ३५ टक्के क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्राच आहे. सोयाबीनमध्ये १८-२० टक्के तेलाचे आणि ३८-४० टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. आंतरपीक, दुबारपीक तसेच पीक फेरपालटीमध्ये सोयाबीन अतिशय महत्वाचे पीक आहे. सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, शिफारशीनुसार तणाचा, किडींचा तसेच रोगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोयाबीन पिकावर येणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची ओळख व व्यवस्थापन खालीलप्रमाणे आहे.

कॉलर रॉट (बुंधा कुज):-Soyabean Rog

 हा रोग ‘स्क्लेरोसीअम रॉल्फसी’ या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो.

 पीक वाढीच्या काळात उष्ण व दमट हवामान या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते.

 जमिनीलगत असलेल्या खोडाच्या खालच्या भागाला बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. तसेच बुरशीची पांढरी बिजेही आढळून येतात.

   – त्यांनतर खोडाचा बुरशीग्रस्त भाग सडू लागतो, त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त रोपे सुकू लागतात व मरून पडतात.

व्यवस्थापन:-

 पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्राम थायरम किंवा २.५ ग्राम कार्बेन्डाझिम किंवा १.५ ग्राम थायरम + १.५ ग्राम कार्बेन्डाझिम या बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी.

 बुरशीजन्य रोपे उपटून शेताच्या बाहेर पुरुन टाकावीत असे केल्याने रोगग्रस्त रोपाच्या बुरशी लगतच असलेल्या चांगल्या रोपांपर्यंत जाण्यापासून बचाव होतो.

 रोगग्रस्त रोपे उपटलेल्या जागेवर कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून स्प्रे पंपाचे नोझेल काढून आळवणी करावी, तसेच पिकाची फेरपालट करावी.

2) मूळ  खोडसळ: -Soyabean Rog

 –  या रोगाची लागण रोपावस्थेपासूनच दिसून येते.

 – रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते.

 खोडाची व मुळाची साल रोगग्रस्त झाल्याने रोपांना अन्नपुरवठा होत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात व नंतर रोपे जमिनीलगत कोलमडून मरून जातात.

 जमिनीत कमी ओलावा तसेच जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस या बुरशीच्या वाढीला अनुकूल  आहे.

व्यवस्थापन:-

 – बियाण्यास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम + थायरम १.५ ग्रॅम मिश्रण घेऊन प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी व नंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

 –  जमिनीत निंबोळी पेंड किंवा तत्सम सेंद्रिय खते टाकावीत

   पावसाचा खंड पडल्यास ओलाव्यासाठी पाणी द्यावे.

3) पिवळा मोझॉक विषाणू: -Soyabean Rog

        – हा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो.

     रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो.

         शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.

         पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसतात.

व्यवस्थापन:-

        रोगप्रतिकारक/ सहनशील वाणांची पेरणी करावी, जसे की, जे.एस.२०-६९, जे.एस. २०-२९, जे.एस. ९७-५२ आणि जे.एस. ९५-६०.

        आंतरपीक व मिश्रपीक घेतल्यास रागाचे प्रमाण कमी असल्याचे आढळते.

        पिवळे चिकटे सापळे साधारणपणे ६४ प्रति एकर प्रमाणे १५×३० से.मी. आकाराचे सापळे उगवणीनंतर १०-१५  दिवसांनी पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

       – पिक उगवणीनंतर २०-२५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

        पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. उदा, थायमेथोक्झाम २५ डब्लू.  जी.१०० ग्रॅम किंवा इथोफिनप्रोक्स १ लिटर प्रति हे. ५०० ली.पाण्यात मिसळून फवारावे.

4) तांबेरा:-Soyabean Rog

  हा रोग बुरशीजन्य असून या रोगांमुळे सुरुवातीला झाडाच्या पानाची खालची बाजू पिवळसर तांबूस ठिपक्यांनी दिसते व नंतर हेच ठिपके पानाच्या वरच्या बाजूवर आल्याचे दिसते.

 हा रोग हवेमार्फत पसरतो आणि काहीच अवधीमध्ये त्या परिसरातील सर्व पिकावर पसरतो.

 रोगाची तीव्रता जास्त असल्यास ही बुरशी पानाच्या देठावर पसरते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात, आणि उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंतची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.

व्यवस्थापन:-

       – या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीची लागवड हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. उदा, फुले कल्याणी (डी. एस.२२८), फुले अग्रणी (के.डी. एस.३४४) व फुले संगम(के.डी. एस.७२६)

       – प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी लवकर म्हणजे १५-२५ मे च्या दरम्यान करावी.  त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पिक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून बचाव होतो.

    – रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपीकोण्याझोल २५% प्रवाही १० मिली. किंवा हेक्झाकोण्याझोल ५ %   प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

5) मोझॉक:-Soyabean Rog

  – हा रोग सोयाबीन मोझॉक व्हायरस (पोटीव्हयरस) या विषाणूमुळे उद्भवतो.

 या रोगाचा प्रसार, मावा किडीद्वारे व बियाण्यापासून होतो.

  – रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटलेली दिसते तर पाने आखूड, लहान, जाडसर  व सुरकुतलेली होतात.

  – रोगग्रस्त रोपांना फळधारणा कमी प्रमाणात होते व झाल्यास तेही खुरटलेलीच असतात.

व्यवस्थापन:-

   केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीत आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.

6) शेंगावरील करपा-Soyabean Rog

– हा रोग कोलेटोट्रिकम डेमाटीअम या बुरशीमुळे होतो, या रोगास “पॉड   ब्लाईट” असेही म्हणतात.

– यामध्ये विशिष्ट असा कोणताही आकार नसलेली व मोठे होत जाणारे लालसर अथवा गडद तपकिरी ठिपके पाने, खोड आणि शेंगावर दिसून येते.

–  कालांतराने शेंगावर बुरशीचे काळे बिजाणू तयार होतात, अशा शेंगा तपकिरी / काळ्या पडतात व बी तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

– ही बुरशी पानावर, खोडामध्ये तसेच शेंगामध्ये सुप्तावस्थेत राहते.

व्यवस्थापन:-

      – पेरणीकरिता निरोगी उत्तम उगवणक्षमता असलेले बियाणे घ्यावे.

      – पेरणीपूर्वी (कार्बेन्डाझिम ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के) मिश्र घटक ७५ टक्के डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो  बियाणे किंवा २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

 रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोनाझोल १० % डब्लू.पी. + सल्फर ६५ % डब्लू.जी. २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी.

7) पानावरील बुरशिजन्य ठिपके-Soyabean Rog

 हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो.

  – झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात.

 कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.

 आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.

व्यवस्थापन:-

– पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बेन्डाझिम ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के) मिश्र घटक ७५ टक्के डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

 रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पायरॉक्लोस्ट्रॉबिन २० % डब्लू. जी. किंवा टेबुकोण्याझोल १० % डब्लू.पी. + सल्फर ६५% डब्लू.जी. २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

8) पानावरील जिवाणूचे ठिपके: -Soyabean Rog

     – हा रोग झानथोमोनास आक्झॉनोपॉडीस पीव्ही.ग्लायसिन्स या जिवाणूमुळे होते.

   – हा रोग झाडाच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात.

 ठिपक्यांच्या भोवती पिवळसर वलय दिसते, व ठिपक्यांचे प्रमाण जास्त झाल्यास पाने गळून पडतात.

    – हे जिवाणू पिकाच्या अवशेषात किंवा जमिनीवरील बियाण्यात विश्रांती घेतात.

    – या जिवाणूंचे वहन वारा, पाण्याचे थेंब आणि किडीद्वारे होते.

  – ते झाडाच्या नैसर्गिक छिद्रातून किंवा शेतकाम करतांना झाडाला झालेल्या जखमातून आत प्रवेश करतात.

व्यवस्थापन:-

 यजमान (होस्ट) नसणाऱ्या पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी.

 खत वापरात पालाश व स्फुरद असण्याची काळजी घ्यावी.

 पिक निघाल्या नंतर खोल नांगरणी तसेच झाडाचे सर्व अवशेष काढून जाळुन घ्यावे.

    – रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम प्रति १० लिटर   पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ऊस रोप वाटिका लागवड व त्याचे फायदे (Us Ropvatika Us Rop)

ऊस रोपे लागणीचे फायदे – 1) एक ते दीड महिन्यापर्यंत रोपे शेताबाहेर (ट्रेमध्ये/ पिशवीत) वाढत असल्यामुळे या काळात जमिनीस विश्रांती मिळते. या काळात हिरवळीच्या खताचे पीक घेण्यास किंवा शेतातील पिकाच्या काढणीस अवधी असल्यास रोपे लागण करून हंगाम साधता येतो.

2) काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वाफसा नसल्याने वेळेवर लागण करता येत नाही, अशा वेळेस ऊस रोपे लागण करून वेळेवर हंगाम साधता येतो.

3) सर्व रोपांना सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी आणि वाढीचे इतर घटक योग्य व सारख्या प्रमाणात मिळाल्यामुळे सर्व उसांची वाढ एकसारखी (ऊस संख्या एकरी 45 ते 50 हजार) होऊन फुटव्यांची मर कमी होते, उत्पादनात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ होते.

4) क्षारपड जमिनीत रोपांची लागण केल्यास रोपांचा वाढीचा जोर चांगला राहून वाढ चांगली राहते.

5) लागवड केलेल्या उसातील नांग्या भरण्यासाठी किंवा खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी रोपांचा वापर फायदेशीर असतो.

6) नवीन वाण प्रसारित झाल्यावर बेणे कमी असल्यास रोपे तयार करून लागवड केल्यास कमी बेण्यापासून जास्त क्षेत्रावर नवीन वाणाची लागवड केल्यास दोन ओळींतील अंतर जास्त ठेवता येते, त्यामुळे यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. दोन ओळींमध्ये आंतरपिके घेता येतात. नवीन जातीचा लवकर प्रसार करता येतो. बेण्याची बचत होते.

7) रोपांची वाहतूक कमी खर्चात आणि दूर अंतरावर करता येते.

अ) प्लॅस्टिक ट्रेमध्ये एक डोळा ऊस रोपे निर्मिती –

जागेची निवड –

ऊस रोपे तयार करण्यासाठी पाणथळ, वाळवीचा प्रादुर्भाव असलेली जागा निवडू नये. वर्षभर पाण्याची सोय असावी. ऊन, वारा व जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी जागेवर शेडनेट गृह साधारणपणे रोपांच्या प्रमाणानुसार तयार करावे. एक आर शेडनेट गृहात 2.00 x 1.5 फुटाचे 42 कपांचे प्लॅस्टिक ट्रे वापरल्यास 45 दिवसांत अंदाजे 10,000 रोपे तयार करता येतात.

साहित्य –

1) प्लॅस्टिक ट्रे – 360 मि.मी. x 560 मि.मी. x 70 मि.मी., 42 कप, वजन – 160 ग्रॅम.

2) कोकोपीट चांगले कुजलेले, पीएच – 6.5 ते 7.5, निर्जंतुक, कर्ब – नत्र गुणोत्तर 20:1, ईसी 600-700(micromohs)

3) रोपे वाहतुकीसाठी प्लॅस्टिक क्रेट्‌स – 60 सें.मी. x 40 सें.मी. x 22 सें.मी., वजन प्रति कॅरेट 1.620 किलोग्रॅम.

4) पाणी देण्यासाठी झारी, रबरी पाइप व शॉवर किंवा सूक्ष्म तुषार संच, पाण्याची टाकी इत्यादी.

5) सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, कार्बेन्डाझिम, ऍसिटोबॅक्‍टर, थायमेट इत्यादी.

बेणे निवड –

रोपवाटिकेसाठी बेणे मळ्यातील नऊ ते 11 महिने वयाचे, सुधारित जातीचे शुद्ध, जाड, रसरशीत, लांब कांड्यांचे, निरोगी बेणे वापरावे. बेणे तोडल्यापासून शक्‍यतो 24 तासांच्या आत त्याची लागवड करावी.

प्लॅस्टिक ट्रेमध्ये एक डोळा ऊस लागण –

प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात, त्यासाठी ऊस लागणीअगोदर एक महिना ट्रेमध्ये रोपे तयार करावीत.

1) बेणेमळ्यातील बेणे आणल्यानंतर एक इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत.

2) एक डोळ्याचे तुकडे पाच ते दहा मिनिटे 0.1 टक्का कार्बेन्डाझिमच्या (10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम) द्रावणात बुडवून नंतर ते सावलीत सुकवावेत.

3) बेणे थोडे सुकल्यानंतर जिवाणूसंवर्धनाची बेणेप्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात एक किलो ऍसिटोबॅक्‍टर + एक किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.) + 1.5 ते 2.0 किलो शेण मिसळून त्यात 30 मिनिटे बेणे बुडवून नंतर पाच मिनिटे सावलीत सुकवून ट्रेमध्ये लागवडीसाठी वापरावे.

4) 25 किलो कोकोपीटमध्ये साधारणपणे दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट + एक किलो युरिया चांगले मिसळून ते प्लॅस्टिक ट्रेमध्ये कपात एकतृतीयांश भरून घ्यावे. नंतर त्यावर एक डोळा कांड्या ठेवाव्यात. त्यावर पुन्हा कोकोपीट टाकून ट्रे पूर्ण भरून घ्यावेत.

5) प्लॅस्टिक ट्रे ठेवताना त्याखाली जमिनीवर थायमेट टाकावे.

6) ऊस लागण झाल्यावर गरजेनुसार झारीने अथवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे.

7) रोपांना दोन- तीन पाने आल्यानंतर शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.

ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर शेतात लागणीसाठी वापरावीत.

ब) प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करणे –

प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करण्यासाठी एक मीटर रुंद आणि रोपांच्या संख्येनुसार पाच ते दहा मीटर लांब आकाराचे वाफे तयार करावेत. एक ब्रास पोयट्याची माती, चांगले कुजलेले शेणखत (3-1) या प्रमाणात घेऊन यामध्ये 25 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून चांगले मिश्रण करावे. हे मिश्रण 5 बाय 7 इंच आकाराच्या व बाजूने पाच- सहा छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरावे. पिशवीचा वरचा एक ते दीड इंच भाग पाणी देण्यासाठी मोकळा ठेवावा. पिशव्या झारीच्या किंवा पाइपच्या साह्याने चांगल्या भिजवून घ्याव्यात.

क) एक डोळा ऊस लागण करणे –

😎 रासायनिक कीडनाशक आणि जिवाणूसंवर्धकाची बेणेप्रक्रिया केलेले ऊस बेणे पिशवीत लागणीसाठी वापरावे. डोळा असलेला भाग पिशवीत वरच्या बाजूस राहून कांडीचा सर्व भाग मातीखाली झाकला जाईल याची काळजी घ्यावी. या पिशव्यांना गरजेनुसार झारीच्या अथवा पाइपच्या साहाय्याने किंवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे. रोपांना दोन ते तीन पाने आल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. एक ते दीड महिन्यानंतर रोपांना तीन ते चार हिरवी पाने आल्यानंतर शेतात लागवड करावी.

शेतात ऊस रोपांची लागण –

1) साधारणपणे 30 ते 45 दिवसांची रोपे शेतात लागवडीस वापरावीत.

2) रोपांची लागवड शक्‍यतो दुपारनंतर करावी.

3) रोपांसाठी दोन ओळींतील अंतर भारी जमिनीत चार ते पाच फूट व दोन रोपांतील अंतर दोन ते 2.5 फूट ठेवावे. काही ठिकाणी पाच ते सात फूट अंतर ठेवूनही एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मात्र, त्यासाठी पीक व्यवस्थापन वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे.

ठिबक सिंचनाचा वापर करताना दोन ओळींतील अंतर व आंतरमशागतीची पद्धत

अ. नं. दोन सरीतील अंतर रोपातील अंतर कुठे वापरात आणावी एकरी लागणारी ऊस रोपे

१ 4 फूट 2 फूट पॉवर टिलरने आंतरमशागत 5,550

२ 5 फूट 2 फूट मिनी ट्रॅक्‍टरने आंतरमशागत 4,450

३ 8 फूट 2 फूट नेहमीचा ट्रॅक्‍टर आंतरमशागत 2,780

४ जोड ओळ(1.2 मीटर बाय 2.5 मीटर) 2 फूट मजुरांकडून तोडणी व मिनी ट्रॅक्‍टरची मशागत 5,000

4) सरीतील अंतर पाच फुटांपेक्षा जास्त ठेवताना वेळेवर मशागत आणि इतर सर्व बाबी वेळेवर होत असतील तरच अंमलबजावणी करावी, अन्यथा पाच फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवू नये. रुंद सरीचा वापर करताना पिकाकडे दुर्लक्ष झाल्यास तोटा होण्याचा जास्त संभव असतो.

5) ठिबक सिंचनावरील पिकाची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, तसेच सरासरी उसाचे वजन दोन ते 2.5 किलो भरते, त्यामुळे हे पीक लोळण्याची शक्‍यता असते. जमिनीखालील (Sub Surface) ठिबक सिंचन पद्धती जास्त दिवस टिकणारी व फायदेशीर दिसून येते; मात्र यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.

6) जास्त रुंदीच्या सरीसाठी को- 0265 आणि को- 86032 या जाती जास्त फुटवे येणाऱ्या असून, त्यांची निवड करावी.

7) जास्त रुंदीच्या सऱ्या वापरताना शेतकऱ्यांमध्ये शंका असते, की जास्त अंतरामुळे अपेक्षित ऊस संख्या मिळणार नाही; परंतु आपण एक डोळा रोपांची लागवड केली तर आपणास निश्‍चित अपेक्षित ऊस संख्या मिळते.

नेहमीची ऊस लागवड पद्धत व एक डोळा रोपे पद्धतीची तुलना

अ. नं. लागवडीची पद्धत अंदाजे हेक्‍टरी ऊस डोळे/ रोपेहेक्‍टरी ऊस संख्या एका रोपापासून मिळणारी उसाची संख्या

१ एक डोळा ऊस रोपे 12,500 (1 मे. टन) 1,00,000

२ नेहमीची दोन डोळे टिपरी पद्धत 50,000(3-4 मे. टन) 25,000 – 80,000

नेहमीच्या पद्धतीत उगवलेले डोळे विचारात घेतल्यास एका रोपास 2.2 फुटवे मिळतात. हेच प्रमाण रोपे लागवडीत एका रोपास नऊ फुटवे मिळतात, त्यामुळे नेहमीच्या दोन डोळे टिपरी पद्धतीत गाळण्यालायक ऊस कमी मिळतात, तर रोपे लावण्याच्या पद्धतीत हेक्‍टरी गाळण्यालायक ऊस जास्त तर मिळतातच, शिवाय प्रत्येक उसाचे वजन आणि साखर उताराही जास्त मिळतो.

स्रोत :- बळीराजा सुरेश कबाडे फेसबुक


टीप :- दिलेली माहिती हि फक्त अंदाज येण्यासाठी आहे या माहितीशी अग्रोपंच अँप चा काहीही संबंध येत नाही कोणतीही क्रिया करण्या अगोदर कृषी सहाय्यकाचा सल्ला घेणे .

 सोयाबीन पीकाची लागवड (Soyabean Lagvad Soyabean Rog)

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल

असल्यामुळे जगतिकस्तरावर  महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के  सोयाबीन तेलाचा  वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के  प्रथिने सोयाबीन  पासून  उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी खर्चात  जास्तीतजास्त उत्पादन देणारे  नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.

देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो . याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क  ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १०० च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात . सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे  हेक्टरी १०० किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा बेवड म्हणून चांगला उपयोग होतो. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते . तर पाश्चात्य देशामध्ये या पिकास कामधेनु तर चीनमध्ये मातीतील सोने म्हणून संबोधले जाते.

सोयाबीनची कमी उत्पाद्कता असण्याची प्रमुख कारणे

  1. आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
  2. सुधारीत  जातींचा  वापर न करणे
  3. दर हेक्टरी  झाडांचीसंख्या न राखणे
  4. बीजाक्रिया न करण, उगवणशक्तीची  तपसणीं न करणे
  5. योग्य खत मात्रांचा  शिफारशीनुसार वापर नकरणे
  6. तण तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे
  7. आंतरपीक पद्धतींचा वापर नकरणे

सोयाबीनच्या उत्पाद्न वाढीसाठी महत्वाच्या बाबी

जमीन

उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते . हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या आसपास आणि विद्युतवाहकता ४.० डेसी सायमन / मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक उत्तम येते .

हवामान

उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.

पूर्वमशागत व भरखते

जमीन खोल  नांगरुन उभ्या आढ्या कुळवाच्या तूंन पाळ्या र्दछन जर्णीन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर चांगलं कुज़लल शैण्छत किंव कंपक्टि ठत ईक्टरी २५ ते  ३०गाड्या वापराव्या .

उगवणशक्ती कमी होण्याची कारणे

  1. सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये  कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षाच्यावर   साठवणूककेलेले  बियाणे  उगवणशक्ती तपासल्याशिवायपेरणीस वापरू नये.
  2. कडक उन्हात बियाणे  वाळवून साठवल्यास उगवणशक्तीकमी होते.
  3. मळणीयंत्राची गती ४००. आर.पी.ए. च्यावर असल्यास बीयातील अंकुरास धक्का लागतो  व त्याचा परिणाम उगवणशक्तीवर होतो.
  4. साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील  बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते .म्हणून जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी असावी .

कालावधी – खतांची मात्रा  व वेळेवर  पूस असल्यास पिक ९० ते १०० दिवसात तयार होते.

सुधारित वाण

एम.ए.सी.एस.१३,एम.ए.सी.एस.५८ ,एम.ए.सी.एस.१२४ ,एम.ए.सी.एस.४५०,एम.ए.सी.एस.११८८,फुले कल्याणी (डी.एस.२२८),फुले अग्रणी ,जे.एस.९३-०५ ,जे.एस ९७-५२ , जे.एस ९५-६० ,एन.सी.आर ३७ एम.ए.यु.एस.-४७ , एम.ए.यु.एस.-६१,एम.ए.यु.एस.६१-२, एम.ए.यु.एस.-७१,एम.ए.यु.एस.-८१, एम.ए.यु.एस.-१५८,जे.एस.३३५, टीए.एम.एस.९८-२१

बियाणे प्रमाणे – सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्केच्यावर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया

उग्वणीच्या  काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.

पेरणी

सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

खत व्यवस्थापन

सोयाबीन पिकास हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.

आंतरमशागत

सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.

पेरणीपूर्व

फ्लुक्लोरॅलीन १ कि./हे. किंवा ट्रायफ्लुरॅलीन १ कि./हे. यापैकी कोणतेही एक तणनाशक ६०० ते ७०० लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.

उगवणपुर्व

(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) अलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा मेटॅलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा पेंडीमिथेंलीन १ किलो क्रियाशील घटक /हेक्टर प्रमाणे फवारणी करावी.

पेरणीनंतर तण उगवल्यानंतर

  1. क्रिझॅलोफॉल इथाईल ५० ग्रॅम किलो क्रियाशील घटक /हेक्टरद पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  2. इमॅझीथायपर १o टक्के एस.एल. १00 ग्रॅम केिली क्रियाशील घटक /हेक्टर पेरणीनंतर १५-२० दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

आंतरपीक पद्धतीचा वापर करणे

कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात, परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. बेभरवशाचे तसेच कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीपासून शाश्वत व स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते.
  2. प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही एका पिकाचे उत्पन्न हमखास मिळते.
  3. आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
  4. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो. तसेच रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते.
  5. जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो.
  6. आंतरपिकातील सोयाबीन सारखे नगदी पीक शेतक-यांच्या आर्थिक अडचणी दूर करु शकते.
  7. तूर + सोयाबीन सारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल.

आंतरपीक पद्धती

  • तूर + सोयाबीन (१:२)
  • कपाशी + सोयाबीन (१:१) .
  • सोयाबीन + भुईमूग (१४, १:६) .
  • सोयाबीन + ज्वारी (१:२, २:२) .
  • सोयाबीन + बाजरी (२:४, २:६)

कीड व रोग व्यवस्थापन

सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा-या किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी

अ) कोड नियंत्रण

खोड माशी

क्लोरोपायरीफॉस २0 टक्के इसी १.५ लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस ४० टक्के इसी ८oo मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना ५oo-७o० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

पाने पोखरणारी अळी

पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.

पाने खाणा-या आणि पाने गुंडाळणा-या अळ्या

  1. क्रिनॉलफॉस २५ इसी १.५ ली.
  2. ट्रायझोफॉस ४o इसी ८oo मि.ली.
  3. मेथोमिल ४0 टक्के एसपी १ कि. ग्रैं.
  4. क्लोरोपायरीफॉस २o इसी १.५ ली.
  5. इथोफेनप्रॉक्स १o इसी १ ली.
  6. इंडोक्झाकार्ब 300 मि.ली.
  7. लम्बडा सायद्देलोश्चिन ५ टक्के सीएस ३oo मि.ली.
  8. स्पिनोसॅड ४५ एसी १२५ मि.ली.
  9. इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के डब्लुजी १५० ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाचा प्रती हेक्टरी ५००-७०० लीटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.

रस शोषणा-या किडी (मावा, तुडतुडे, हिरवा ढेकूण इ.)

मेथिल डिमेटॉन २५ इसी ६oo मि.ली. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इसी २oo मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस सी ८oo मि.ली. यापैकी एका कीटकनाशकांचा प्रती हेक्टरी ५00 लीटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा.

हुमणी

पावसाळ्याच्या सुरुवातीस कडुनिंब व बाभळीच्या झाडावर किटकनाशकांचा फवारा देऊन मुंगेच्यांचा नाश करावा. शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करण्यासाठी १० टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास ५ टक्के क्लोरेडेन किंवा ५ टक्के हेप्टाक्लोर भुकटी प्रती हेक्टरी ६५ केिली जमिनीत मिसळावी.

ब) रोग नियंत्रण

या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल ५ इसी १ लिटर  (प्रतिबंधात्मक) आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रॉपिकोनेझोल २५ इसी १ लिटर या बुरशीनाशकांची प्रती हेक्टरी १ooo लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिकाची काढणी, मळणी व उत्पादन : जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि ९५ टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते. काढणी केल्यानंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी.

उत्पादन : सोयाबीनपासून हेक्टरी २५ ते ३० किंटल उत्पादन मिळते.

उन्हाळी/हिवाळी सोयाबीन लागवड,

नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हनगामाबरोभरचं शेत आता रब्बी हंगामामध्ये सोयाबीन घेन्यासाठी उत्सूक आहेत.ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी/हिवाळी सोयाबीन करायची आहे त्यांच्यासाठी हि माहिती खुप उपयुक्त ठरेल कारन,ईथे ऊन्हाळी/हिवाळी सोयाखबीन लागवड करत आसताना आपन कशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे याबद्दल माहिती आपन जानून घेनार आहोत.
उन्हाळा/हिवाळी सोयाबीन लागवडीसाठी लागवडीचा कालावधी, योग्य बियाणे, लागवड /पेरणी आंतर, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन हे सर्व नियोजन योग्य पद्धतीने करने गरजेचे आहे.हिवाळ्यात सोयाबीन पिकाची जोमाने वाढ होत नाही पावसाळी सोयाबीन एवढं उत्पादन येत नाही, तसेच उन्हाळी सोयाबीनचं सुद्धा हवं तसं उत्पादन येत नाही, उन्हाळ्यात फुलधारना भरपूर होते पन जास्त तापमानाचा फटका सोयाबीन पिकाला फुलधारना आवस्थेत बसतो.आणि फुलगळ होउन ऊत्पादनात घट येते.त्यातल्यात्यात जर योग्य नियोजन केलं तर चांगल उत्पादन घेता येउ शकतं.
उन्हाळी-/हिवाळी सोयाबीन उत्पादन कमी मिळालं तरी फायदेशीर ठरू शकते कारन भाव चांगला मिळतो आणि आपन उत्तम उगवनक्षमता आसलेलं बियाणे तयार करू शकतो.उन्हाळी/हिवाळी सोयाबीन भिजलेलं नसल्याने त्याची 100% उगवन होते.

बियाणे निवड-उन्हाळी/हिवाळी सोयाबीन लागवड
उन्हाळी/हिवाळी सोयाबीन पेरनीसाठी फुले संगम,फुले कल्यानी,फुले किमया या वानांची निवड करावी.335,9305 या जातीशिवाय ईतर कोनतीही वान आपन पेरनीसाठी निवडू शकता.शक्यतो फुले संगम,फुलज किमया, फुले कल्याणी हे वान निवडावे.
पेरणी आंतर-
उन्हाळी/हिवाळी सोयाबीन जास्त वाढ होत नसल्याने 30 सेंमी आंतरावर पेरणी करावी किंवा टोकन लागवड करताना 45 सेंमी आंतरावर लागवड करावी. उन्हाळी/हिवाळी सोयाबीन साठी एकरी 35-40 किलो बियाणे वापरावे.
खत व्यवस्थापन-उन्हाळी/हिवाळी सोयाबीन लागवड
ऊन्हाळी/हिवाळी सोयाबीन पेरणी करताना पावसाळी सोयाबिनपेक्षा जास्त खताचा डोज द्यावा. एकरी 1-1.5 बँग 12.32.16 किंवा 14.35.14 आणि 10-15 किलो सल्फर द्यावे. सोयाबीन पिकाची चांगली वाढ होत नसेल तर सोयाबीन एक महिन्याचं झाल्यानंतर काही प्रमाणात युरीया वापरू शकता.अशा पद्धतीने खत व्यवस्थापन करावे.
फवारणी नियोजन-
हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात सोयाबीन पिकावर तुडतुडे, पांढऱ्या माशीबरोबरचं ईतरही किड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.त्यामुळे किड व्यवस्थापन योग्य वेळी योग्य फवारणी करून करनं आवश्यक आहे.तसेच आळीचा प्रादुर्भाव योग्य वेळी नियंत्रण आवश्यक आहे.

vikaspedia.in

  जांभूळाची लागवड (Jambhul Lagvad Jambhul Rog)

पाऊस सुरू झाला म्हणजे शेताच्या सभोवताली जांभूळ बियांची पेरणी करावी. दोन खड्ड्यांतील अंतर 20 फूट ठेवावे. एका खड्डयात एकच बी पेरावे. पाऊस संपल्यानंतर रोपांच्या सभोवताली काटेरी कुंपण करावे म्हणजे गुरे अगर बकर्‍या रोपे खाणार नाहीत. जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात रोपांना पाणी देण्याची गरज नसते. अशा पद्धतीने बियांपासून निर्माण झालेली रोपे फार काटक असतात…

जांभूळ हे औषधी फळ आहे. त्यामुळे भविष्यात या फळाला मोठी मागणी राहणार आहे. जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने महाराष्ट्रातील जिरायती जमिनीतही येऊ शकते. म्हणून महाराष्ट्रात जांभळाची सर्वत्र लागवड झाली पाहिजे.

कोकणातील पालघर जिल्ह्यात ‘बहाडोली’ नावाचे एक गाव आहे. त्या गावातील जांभळे मोठ्या आकाराची व अत्यंत स्वादिष्ट असतात. अशी उत्तम प्रतीची जांभळे महाराष्ट्रात सहसा आढळत नाहीत. मे महिना हा जांभळाचा हंगाम असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी बहाडोली येथे जातात; जांभूळ फळे खरेदी करतात. ती खाऊन त्यातून ज्या बिया निघतात, त्यांची आपल्या जमिनीत पेरणी करतात. ही जात इतकी लोकप्रिय झाली आहे की, आता
तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र व गुजरात राज्यातील शेतकरीसुद्धा मे महिन्यात बहाडोलीला येतात व जांभूळ फळे खरेदी करतात. त्यापासून मिळणार्‍या बियांची पेरणी करतात.

पाऊस सुरू झाला म्हणजे शेताच्या सभोवताली जांभूळ बियांची पेरणी करावी. दोन खड्ड्यांतील अंतर 20 फूट ठेवावे. एका खड्डयात एकच बी पेरावे. पाऊस संपल्यानंतर रोपांच्या सभोवताली काटेरी कुंपण करावे म्हणजे गुरे अगर बकर्‍या रोपे खाणार नाहीत. जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात रोपांना पाणी देण्याची गरज नसते. अशा पद्धतीने बियांपासून निर्माण झालेली रोपे फार काटक असतात…

जांभूळ हे औषधी फळ आहे. त्यामुळे भविष्यात या फळाला मोठी मागणी राहणार आहे. जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने महाराष्ट्रातील जिरायती जमिनीतही येऊ शकते. म्हणून महाराष्ट्रात जांभळाची सर्वत्र लागवड झाली पाहिजे.

कोकणातील पालघर जिल्ह्यात ‘बहाडोली’ नावाचे एक गाव आहे. त्या गावातील जांभळे मोठ्या आकाराची व अत्यंत स्वादिष्ट असतात. अशी उत्तम प्रतीची जांभळे महाराष्ट्रात सहसा आढळत नाहीत. मे महिना हा जांभळाचा हंगाम असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी बहाडोली येथे जातात; जांभूळ फळे खरेदी करतात. ती खाऊन त्यातून ज्या बिया निघतात, त्यांची आपल्या जमिनीत पेरणी करतात. ही जात इतकी लोकप्रिय झाली आहे की, आता
तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र व गुजरात राज्यातील शेतकरीसुद्धा मे महिन्यात बहाडोलीला येतात व जांभूळ फळे खरेदी करतात. त्यापासून मिळणार्‍या बियांची पेरणी करतात.

जांभूळ लागवड कशी करावी?

पाऊस सुरू झाला म्हणजे शेताच्या सभोवताली जांभूळ बियांची पेरणी करावी. दोन खड्ड्यांतील अंतर 20
फूट ठेवावे. एका खड्डयात एकच बी पेरावे. पंधरा दिवसांत बी उगवून येईल. पाऊस संपल्यानंतर रोपांच्या सभोवताली काटेरी कुंपण करावे म्हणजे गुरे अगर बकर्‍या रोपे खाणार नाहीत.  जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात रोपांना पाणी देण्याची गरज नसते.अशा पद्धतीने बियांपासून निर्माण झालेली रोपे फार काटक असतात. त्यांना सोटमूळ येते. ते जमिनीत 8 ते 10 फूट खोल जाते व तेथील ओलावा शोषून घेते. म्हणून जांभळाची लागवड बी पेरूनच करावी.

जांभळाची कलमे ‘कोकण-बहाडोली’ जात

बहाडोली येथील जांभळाची झाडे बियांपासूनच तयार झाली आहेत व त्यांना मोठ्या आकाराची फळे लागतात. याचा अर्थ हे फळझाड बियांपासून अभिवृद्धी करता येते. आता जांभळाची कलमे करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
त्यामुळे दापोली येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा’ने ‘कोकण-बहाडोली’ नावाची जात विकसित केली आहे. या जातीची कलमे तयार केली जातात; परंतु कलमे न मिळाल्यास बी पेरून लागवड करावी.

‘बहाडोली’ गावाला कसे जावे

बहाडोली हे गाव पश्‍चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यास स्टेशनवरून रिक्षा मिळतात. ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांनी मुंबई-अहमदाबाद हाय-वेने यावे व मनोर येथून डावीकडे वळावे. मनोरपासून बहाडोली 10 किलोमीटर अंतरावर आहे. मे महिना हा जांभूळ फळांचा हंगाम असतो. त्यावेळी तेथे जावे.

जांभूळ

      जांभूळ हे फळ महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले परंतु दूर्लक्षित असे कोरडवाहू सदाहरित फळझाड आहे. फळे आंबट, गोड तुरट लागतात. जांभळाच्या बियांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग मधुमेहासाठी केला जातो.

हवामान

      उष्ण व समशीतोष्ण हवामान चांगले मानवते. समुद्रसपाटीपासून १५० मी उंचीपर्यत चांगले येते. हे एक काटक वृक्ष असल्याने कमी तसेच अति पावसाच्या (३५० ते २००० मिमी) प्रदेशातही चांगल्या प्रकारे येते.

जमीन

      जांभळाची झाडे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वाढतात. गायरानाच्या हलक्या, पडीक ते सुपीक मध्यम काळ्या, माळाच्या जमिनीत ही झाडे चांगली वाढतात. पाण्याचा उत्तम निचरा होणारी, खोल मातीची जमीन असावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा.

अभिवृध्दीचा प्रकार

       जांभळाची लागवड बियांपासून रोपे तयार करुन तसेच पॅच पध्दतीने डोळे भरुन अभिवृध्दी करता येते. डॉ.बाबासाहेब सावंत कृषि विद्यापीठाने बहाडोली जांभळाच्या जातीची अभिवृध्दी करण्यासाठी मृदूकाष्ठ ही कलम पद्धती विकसित केली आहे.

लागवडीचे अंतर

      १० X १० मी लागवडीसाठी १ X १ X १ मी आकाराचे खड्डे खोदावेत. प्रति हेक्टरी १०० झाडे लावता येतात.

पाणी

      लागवडीनंतर कलमांना सुरुवातीची दोन वर्षे पाणी देणे आवश्यक आहे. पहिल्या वर्षी प्रति कलमास हिवाळ्यात दर १० दिवसांनी तर उन्हाळ्यात दर ५ दिवसांनी पाणी द्यावे. दुस-या वर्षी प्रति कलमास दर १५ दिवसांनी तर उन्हाळ्यात दर १० दिवसांनी पाणी द्यावे. रोपांना जगविण्यासाठी फक्त संरक्षक पाण्याच्या मात्रा पहिल्या वर्षी द्याव्यात.

खते

       खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत + १५-२० किलो पोयटा माती व १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व उर्वरीत भाग चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरुन घ्यावा. जांभळाच्या रोपाला पहिल्या वर्षी १ घमेले शेणखत, २०० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. हे खताचे प्रमाण दरवर्षी वाढवत जावे. पाचव्या वर्षी ५ घमेली शेणखत १ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

आंतरपिके

      लागवडीनंतर सुरुवातीची ७८ वर्षे आंतरपिके घेता येतात. त्यामध्ये पावसाळ्यात झेंडू, ग्लॅडीओलस किंवा भेंडी, काकडी, वेलवर्गीय भाजीपाला ही भाजीपाला पिके घेता येतात. हिवाळ्यात अॅस्टर, ग्लॅडीओलस, गॅलार्डीया इ. फुलपिके, श्रावणी घेवडा, चवळी, वांगी, टोमॅटो, मिरची इ. भाजीपाला पिके घेता येतात.

फळांची काढणी

      जांभळाची रोपांपासून लागवड केल्यास साधारणत: ८-९ वर्षांनी फळे लागतात. कलमापासून लागवड केल्यास सातव्या वर्षापासुन उत्पादनास सुरुवात होते. फळे बांबूच्या करंडीतून किंवा फळ्याच्या खोक्यातुन बाजारात पाठवावीत

उत्पादन

      पूर्ण वाढलेल्या झाडापासून  (८-१० वर्षानंतर) ५० ते १०० किलो फळे मिळतात.

कीड व रोग नियंत्रण

  1. साल खाणारी अळी – सुरुवातीस अळी झाडावरील साल पोखरुन खाते आणि नंतर भोक पाडून फांद्या किंवा मुख्य खोडात शिरते.  त्यामुळे झाड कमकुवत होते आणि झाडाचे उत्पन्न घटते. या किडीच्या नियंत्रणासाठी फांद्या किंवा खोडातील भोकात सुमारे ५ मिली रॉकेल किंवा पेट्रोल ओतावे व ते भोक ओल्या चिकट मातीने बुजवून टाकावे. या किडीचा प्रादुर्भाव विशेषत : सप्टेंबर- ऑक्टोबर आणि फेंब्रुवारी – मार्च महिन्यात दिसुन येतो.
  2. फळमाशी – फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळे किडकी होतात आणि खाण्यास अयोग्य होतात. प्रादुर्भाव हा जून-जुलै महिन्यात आढळतो. नियंत्रणासाठी बागेतील किडग्रस्त फळे वेचून खोल पूरावीत. झाडाखालील जमीन थोडी खणावी म्हणजे फळमाशीच्या कोशावस्थेत जाणा-या अळ्या पक्ष्यांमार्फत मारल्या जातील.  बागेत कामगंध सापळे प्रति हेक्टरी ४ ते ६ समान अंतरावर लावावेत.

रोग –

      पानावरील ठिपके आणि फळकूज – ग्लोमेरॅल्ला सिंगुलाटा या बुरशीमुळे हे रोग होतात. प्रादुर्भावीत पानावर फिक्कट राखाडी किंवा तांबूस- राखाडी ठिपके आढळतात. प्रादुर्भावीत फळे कुजतात आणि सुकून गळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी डायझेन झेड -७८, २ ग्रॅम/प्रति लीटर पाण्यात किंवा ४:४:५० तीव्रतेचे बोर्डो मिश्रण झाडावर फळे नसताना किंवा फळे धरल्यानंतर फवारावे.

स्रोत : http://krishi.maharashtra.gov.in/

कापूस लागवडी विषयी माहिती (Kapus Lagvad Kapus Rog)

कापूस

कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक असून २०१२-२०१३ मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के (४१.४६ लाख हेक्टर) इतके आहे. तथापी, कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता (४९६ कि/हे) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (३०५ कि) कमी आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती.

उन्हाळी बागायती कपाशी

कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र याप्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते.

कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.

कपाशीच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात ६० ते ९० सें.मी पर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पळकाट्या, पाला व इतर कचरा गोळा करुन तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेणखत वा कंपोस्ट खत हेक्टरी २५ गाड्या या प्रमाणात मिसळावे. ९० सें.मी. अंतरावर उथळ स-या पाडाव्यात, उथळ स-यांमुळे कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते व त्यामुळे पाण्याची बचत होते. खोल व रुंद स-यांमुळे झाडाची मुळे वर राहतात व जादा पाण्यामुळे पिकांची कायिक, शाकीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरुरीपेक्षा जास्त दिले जाते. स-यांची लांबी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ मीटर ठेवावी.

पेरणीतील अंतर

उन्हाळी बागायती कपाशीमध्ये पेरणीचे अंतर ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. कपाशीच्या दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतरावर कपाशीच्या दर हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असून त्यासाठी पुढील प्रमाणे अंतर ठेवावे. वाणाचा प्रकार

वाणाचा प्रकारपेरणीचे अंतर (सें.मी)हेक्टरी झाडांची संख्याएकरी झाडांची संख्या
सुधारित९० X ६०,५१८,४०७
संकरितअमेरिकन X अमेरिकन९० X ९०,३४५,९३८
अमेरिकन X इजिप्शियन९० X १२०,२५९,७०३

पेरणीसाठी वाणांची निवड

बागायती कपाशीसाठी सुधारित/संकरित वाणांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी तसेच बियाणे प्रमाणीत असल्याची खात्री करुनच विकत घ्यावे. उन्हाळी हंगामात दख्खन कालवे विभागात लागवडीसाठी पुढील वाणांचाच वापर करावा.

वाणकालावधी (दिवस)उत्पादन (क्वि./हे.)रुईचा उतारा (टक्के)धाग्याची लांबी (मि.मी)हेक्टरी बियाणे (किलो)शिफारस केलेले जिल्हे
सुधारित वाण अ) अमेरिकन
१.एलआरए ५१६६१६०-१७०२०-२२३५-३६२६-२७७-८कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
२.जेएलएच – १६८१५०-१६०१५-२०३५-३६२६-२७७-८महाराष्ट्रातील खानदेश विभाग
३.फुले ६८८१५०-१६०२२-२५३७२६-२७७-८महाराष्ट्रातील दख्खन कालवे विभाग
संकरित वाण अ) अमेरिकन X अमेरिकन
१.एच -१०१६०-१७०२५-२८३६-३७२६-२७२.५-३कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
ब) अमेरिकन X इजिप्शियन
१.डीसीएच-३२१८०-१९०१२-१५३२-३३३४-३५२.५-३सांगली, सातारा, सोलापूर
२.फुले -३८८१७०-१७५१५-२०३३-३४३४-३५२.५-३सांगली, सातारा, सोलापूर

महाराष्ट्रातील शिफारशीत निवडक बीटी संकरित कापूस वाण

  1. अमेरिकन X अमेरिकन
कंपनीचे नाव/संस्थेचे नावबी.टी.संकरित वाण
राशी सीड्स, अतूर, तामिळनाडूराशी-२, शक्ती-९, साई, राशी- ६५६
अंकूर सीडस् नागपूरअंकुर ०९, अंकुर ६५१, जय
महिको सीडस्, जालनाएमआरसी – ७३२६, एमआरसी – ७३५१
अजित सीडस्, औरंगाबादअजित -११, अजित-१५५, अजित-१७७, अजित १९९
कृषिधन सीडस्, जालनाकेडीसीएच-४४१ त्रिनेत्र
नाथ सीडस्, औरंगाबादएनसीईएच -२ आर
तुलसी सीडस्, गुंटुरतुलसी – ४
विक्रम सीडस्, अहमदाबादव्ही आयसीएच-५, व्ही आयसीएच-१५
जे.के.सीड्स, हैद्राबादवरुण, दुर्गा
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबादबन्नी, मल्लिका, कनक -९५४, भक्ति
पारस सिड्सब्रह्मा

देशामध्ये सन २०१२-१३ पर्यंत १००० पेक्षा अधिक बीटी वाण आहेत. शेतक-यांनी आपल्या गरजेनुसार वाणाची निवड करावी.

ब) अमेरिकन X इजिप्शियन

कंपनीचे नावबी.टी.संकरित वाण
नाथ सीडस्, औरंगाबादकाशिनाथ
कृषिधन सीडस्, जालनासुपर फायबर
महिको सीडस्, जालनाएमआरसी – ७९८१
अंकूर सीडस् नागपूरअंकूर – १९५१
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबादएन.सी.एच.बी.९९२

बुरशीनाशक

अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशीनाशकांची प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणात करावी. त्यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.जीवाणू संवर्धक

हवेतील नत्राचे स्थिरीकरण करुन नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम या जीवाणू संवधर्काची प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरुन ठेवलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी स्फूरद विरघळणा-या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजे नत्र व स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्के बचत होते.

पेरणी

बागायती बिगर बीटी कपाशीची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनाता घट येते. पेरणी झाल्यानंतर लगेचच ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात.

वेगवेगळ्या भागासाठी, उदा. १) सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांसाठी मार्चचा पहिला पंधरवडा, २) अहमदनगर जिल्हयासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा आणि ३) खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवडा, याप्रमाणे पेरणीच्या वेळीची शिफारस केलेली आहे. पेरणी करताना सरीच्या मध्यावर २-३ इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते, बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे. तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखत द्यावे.

बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५ डि.से.पेक्षा कमी झाल्यावरच (२५ मे नंतर) करावी. तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावर करावी.

बागायती कपाशीसाठी रासायनिक खते

बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य प्रतिसाद देते म्हणून खतांचा पुरवठा ही एक महत्त्वाची बाब आहे. संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे.  वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. बीटी वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के रासायनिक खतमात्रा (१२५:६५:६५ किलो प्रति हे.) जास्त घ्याव्यात.

द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात. द्रवरुप खते संचाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर पंप या साधनांचा वापर करावा.

नांग्या भरणे

सर्वसाधारणपणे १० दिवसांत सर्व बिया उगवतात, ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, त्याच सुधारित अगर संकर वाणाचे नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे, किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशव्यांतील रोपे २० ते २५ दिवसांच्या आतच लावावीत.विरळणी

पंधरा दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेऊन बाकीची उपटून टाकावीत. विरळणी जमीन ओली असताना करावी.खुरपणी

पेरणीनंतर जरुरीप्रमाणे दोन खुरपण्या व कोळपणी करुन ६० दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे. यासाठी जेथे शक्य असेल तेथे जरुरीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. त्यासाठी खालीलप्रमाणे एक रासायनिक तणनाशक वापरावे व आवश्यकतेप्रमाणे पिकाच्या खुरपण्या कराव्यात. तणनाशकामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते.

अ.क्रतणनाशकाचे नावक्रियाशील घटकाचे हेक्टरी प्रमाणहेक्टरी पाण्याचे प्रमाणफवारणीची वेळ
पेन्डीमिथॅलिन१.५ लिटर५०० लिटरउगवणीपूर्वी एक फवारा
क्युझॉलोफॉपइथिल१.५ लिटर५०० लिटरपेरणीनंतर १०-३५ दिवसापर्यंत

भारी जमिनीत विशेषत: रासायनिक खते व पाणी जास्त दिले तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायिक वाढ जास्त होते. त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते व बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो. यासाठी पीक ७० ते ८० दिवसांचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा  खुडावा, यामुळे पिकात हवा खेळती राहते. बोंडे सडत नाहीत व कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

संजीवकाचा वापर

कपाशीला लागणारे पात्या, फुले, बोंडे यांची कीड, रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात घट येते. नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नॅप्थॅलिन अॅसेटिक अॅसीड (प्लॅनोफिक्स) या संजीवकाची हेक्टरी १०० मि.ली व ५०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी त्यानंतर १५ ते २० दिवसांनी करावी. यामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते.

पाणी पुरवठा

सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पेरलेल्या कपाशीला ८०० ते ९०० मि.लि. पाणी लागते. कपाशीला पेरणीपासून पाते लागेपर्यंत तुलनेने कमी पाणी लागते. या काळात पिकाला जास्त पाणी देऊ नये, कारण जादा पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते. पीक फुलो-यात आल्यावर पाण्याची गरज वाढत जाते व बोंडे भरताना ती सर्वांत जास्त असते. कपाशीच्या उगवण, पाते लागणे, फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीत ओलावा असणे जरुरीचे आहे. पेरणी ओलाऊन करावी. नंतर ३ ते ४ दिवसांनी चिंबवणीचे पाणी द्यावे. पावसाळा सुरु होऊन पुरेसा पाऊस पडेपर्यंत हवामान व जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात पाऊसमान पाहून पाणी द्यावे. मात्र दोन पाळ्यांत १५ ते २० दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेऊ नये. जर पाण्याचा पुरवठा अपुरा असेल तर सरी आड सरी यापध्दतीने पाणी द्यावे. पहिल्या पाळीला १ ली, ३ री, ५ वी याप्रमाणे स-यांत पाणी सोडावे व दुस-या पाळीला २ री, ४ थी, ६ वी याप्रमाणे स-यांत पाणी सोडावे. यामुळे कपाशीला लागणा-या पाण्यात सुमारे ३० टक्के बचत होते.

ठिबक सिंचनाचा वापर

शेतात पाहणी केल्यानंतर आराखड्यानुसार ठिबक संचाचीउभारणी करावी. त्यामुळे पाण्याची  बचत तर होतेच शिवाय तणांचा उपद्रव कमी होतो.

पेरणी अंतर

उन्हाळी बागायती कपाशीत भुईमूगाचा एस.बी. ११ हा उपट्या वाण किंवा मुग, उडीद किंवा गवार आंतरपीक म्हणून घेतल्यास जास्त फायदा होतो. यासाठीच्या सरीच्या एका बाजूस कपाशी,  दुस-या बाजूस भुईमूग यांची १: १ या प्रमाणात पेरणी करावी. दोन्ही पिकांची पेरणी सरीच्या बगलेच्या मध्यावर करावी. आंतरपिकाची पेरणी कपाशीच्या पेरणीपूर्वी एक महिना अगोदर केल्यास फायदा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच तूर, सोयाबीन यासारखी आंतरपीके घेतल्यास फायदा होतो.

वेचणी

शेतातील अंदाजे ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी, त्यानंतर साधारणपणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेचण्या कराव्यात. कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले, कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा, असलेला व किडका आणि कवडी कापूस वेगळा वेचावा. प्रत्येक जातीचा कापूस वेगळा साठवावा, वेचल्यानंतर कापूस ३-४ दिवस उन्हात वाळवून स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा.

पिकांची फेरपालट

कपाशीचा प्रकार१ ले वर्ष२ रे वर्ष३ रे वर्ष
उन्हाळीऊसऊस-खोडवाउन्हाळी कापूस + गहू/हरभरा
खरीप पूर्वकापूस + गहू/हरभराभुईमूग/तीळ +ज्वारी+करडई—–


कायिक बदल

लाल्या

लक्षणे:- कपाशीची पाने लाल होण्याचे मुख्य कारण नत्राची कमतरता होय. नत्र खतांच्या कमतरतेमुळे बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये पानातील हरित द्रव्यामधील नत्र वापरले जाते आणि पाने लाल होतात. तसेच मॅग्नेशियम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि रस शोषणा-या किडींच्या (मुख्यत्वे तुडतुडे) प्रादुर्भावामुळे सुध्दा कपाशीची पाने लाल होतात.

उपाय :- १) लाल्या प्रतिकारक वाणांची निवड करावी. २) शिफारसीत खतांच्या मात्रा द्याव्यात. बीटी वाणासाठी शिफारशी मात्रेपेक्षा २५ टक्के खत जास्त द्यावीत. त्यामध्ये २० टक्के नत्र लागवडीच्या वेळी, ४० टक्के नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि ४० टक्के नत्र लागवडीच्या ६० दिवसांनी द्यावे, मॅग्नेशियमसारखे सूक्ष्म अन्नद्रव्य (२० ते ३० किलो/हे) जमिनीत द्यावे. वाढीच्या काळात २ टक्के डिएपी खतांच्या दोन फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

आकस्मिक मर रोग

लक्षणे – दिवसाचे तापमान ३८०  सें.पेक्षा जास्त दिर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रिया शास्त्रावर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणा-या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्राव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.

उपाय :- वेळेवर पाणी द्यावे. (८-१० दिवसांच्या अंतराने) पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी जास्त करु नये २) पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून द्यावे. ३) विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया + १.५ किलो पालाश १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मि.लि. द्यावे. ४) त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी १०० लिटर पाणयात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.

पीक सरंक्षण

  1. कपाशीवरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन
रोगाचे नावकधी दिसतो (पेरणीपासून दिवस)ओळखउपाय
बुरशीजन्य करपा  (अल्टरनेरिया ब्लाइट)७०-७५ दिवसपानावर व बोंडावर गोलाकार विटकरी किंवा काळ्या रंगाचे ठिपकेप्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
जीवाणूजन्य करपा (बॅक्टेरिअल लीफ ब्लाइट)७५-८० दिवसपानावर गडद विटकरी रंगाचे कोनात्मक ठिपकेवरीलप्रमाणे
मर व मुळकूज (बिल्ट व रुट रॉट)उगवणीपासूनझाड वाळून जाते मुळे सडतात/कुजताततीन ग्रॅम प्रति किलोप्रमाणे थायरम किंवा ४ ग्रॅंम प्रति किलो प्रमाणे ट्रायकोडरमाची बीज प्रक्रिया करावी, रोग प्रतिकारक वाण वापरावे.


कपाशीवरील प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापन

१) रसशोषक किडी

किडीचे नावकधी दिसतात (पेरणीपासून दिवस)ओळखउपाय
मावा४५फिकट पिवळे/गर्द हिरवे/काळपट रंगाचे, साधारण २ मिमी लांब१)बीज प्रक्रिया –इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू.एस ४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान २५ डी.एस ६० ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास        २) खोडप्रक्रिया – ऑक्सीडिमेटॉन मिथील २५ ई.सी. हे आंतरप्रवाही किटकनाशक १:४ या प्रमाणात पाण्यात मिसळून कपाशी पिकाच्या हिरव्या खोडावर मध्यभागी एका बाजूने ४-५ इंच भागावर लावावे.३) ५ % निंबोळी अर्काची फवारणी.४) क्रायसोपा अंडी ५०,०००/- प्रति हेक्टरी पिकावर सोडावीत.५) डायमिथोएट ३० ई.सी १३ मिली ऑसिफेट ७५ एस.पी. १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
तुडतुडेउगवणीपासूनतिरके चालणारे, पंखविरहीत, हिरवट रंगाचे किडे, पानाखाली
फुलकिडे१ ते ३०पिल्ले आकाराने लहान, फिकट पिवळ्या रंगाचे, प्रौढ पिवळसर रंगाचेडायमेथोएट ३० ईसी १३ मिली, २५ ईसी किंवा फिप्रोनील ५ ई.सी. ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पांढरीमाशी८०-११०पांढ-या रंगाची आकाराने लहान व दोन पंख असलेलीफवारणी – अॅसिटीमिप्रिड २० एस.पी . २ ग्रॅम किंवा – ट्रायझोफॉस ४० ई.सी ३५ मि.ली. किंवा बुप्रोकेजिन २५ ईसी २० मिली किंवा निंबोळी अर्क ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पिठ्या ढेकूणपिकाच्या सर्व अवस्थाशरीरावर पांढरट मेणचट आवरण असते.व्हर्टिसिलीअम लेकानी ५० ग्रॅम किंवा ब्रुप्रोकेजिन २५ ईसी ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  1. बोंड अळी
किडीचे नावकधी दिसतात (पेरणीपासून दिवस)ओळखउपाय
अमेरिकन बोंड अळी(हिरवी अळी)४५-८५अळी हिरव्या रंगाची असून, शरीरावर लांबीच्या बाजूने तुटक करड्या रेषा असतात. पतंग मोठ्या आकाराचा पिवळसर तपकिरी रंगाचा असतो.जैविक नियंत्रणएच.एन.पी.व्ही ५०० एल.ई./हेक्टरबी.टी.व्हार कुरस्टाकी १ किलो/हेक्टरक्रायसोपा अंडी ५००००/हेक्टर,फेरोमन सापळे हेक्टरी ५,निंबोळी अर्क ५ टक्के फवारणीरासायनिक नियंत्रणलॅम्बाड सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी.८ मिलीस्पिनोसॅड ४५ एस.सी. ३.५ मिली किंवाप्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मिली किंवाइन्डोझॅकार्ब १५.८ ई.सी. ८ मिली किंवाक्यलोरपायरीफॉस ५० ई.सी. २० मिली किंवाक्विनॉलफॉस २० ई.सी. २० मिली १० लीटर पाण्यात मिसळून गरजेनुसार एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
ठिपक्याची बोंड अळी३०-६५अंगावर पांढरे ठिपके असतात ही तपकिरी रंगाची अळी १५-१८ मि.मी लांब असते.
शेंदरी बोंड अळी७५-११०शेंदरी रंगाची अळी साधारण १८-१९ मि.मी लांब असते. डोक्याजवळचा भाग काळपट रंगाचा असतो.

कापसाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

पेरणीच्या वेळीबीज प्रक्रिया –इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू, एस. १० ग्रॅम किंवा कार्ब्रासल्फान (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) सापळा पिके म्हणून मका, चवळी, ज्वारी, राळा यांची लागवड करावी.
पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी रस शोषणा-या किडींसाठी फवारणी करावी.क्रायसोपा अंडी ५००००/ हेक्टरी शेतामध्ये सोडवीत.५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.डायमिथोएट ३० ईसी ८ मिली किंवा मेथील डिमेटॉन २० ई.सी. २४ मिली किंवा ऑसिफेट ७५ एस.पी १० लीटर प्रती पाण्यात मिसळून फवारावे.
शेंडे अळी व बोंड अळीसाठी दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी करावी.बीटी कुरस्टाकी १ किलो/हेक्टरी फवारणी.ट्रायकोग्रामा अंडी १.५ लक्ष/हेक्टरफेरोमेन सापळे आणि पक्षी थांबे शेतामध्ये लावावेत.
रस शोषणा-या किडीसाठी तिसरी फवारणी, दुस-या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनीअॅसिटॅमिप्रिड २० एस.पी. २ ग्रॅम किंवाट्रायकोग्रामा अंडी १.५ लक्ष/हेक्टरअॅसिफेट ७५ एस.पी. १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
सर्वप्रकारच्या बोंड अळ्या शेंडे अळी, अमेरिकन व शेंदरी बोंड अळीएच.एन.पी.व्ही. ५०० एल.ई/हेक्टर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ८ मि.ली. स्पिनोसॅड ४५ ई.सी. ३.५ मि.ली. किंवा १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी

पीक साधारणपणे १ ते १.५ महिन्याचे असताना शेतात शेंडेअळीच्या प्रादुर्भाव आढळून येतो. किडग्रस्त शेंडे तोडून नाश करावा.

संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करुन नयेय

संश्लेषित पायरेथ्राईडच्या वापरानंतर दुसरी फवारणी अॅसिफेट/कार्बारील किंवा क्यॅुनॉलफॉसची करावी.

अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी फवारावे.

सर्व प्रकारच्या बोंडअळीसाठी बी.टी, हे जैविके अणुजीवयुक्त किटकनाशक वापरावे.

अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत.

कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे.

निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांच्या सुरुवातीच्या काळात वापर करावा.

पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.

उत्पादन – बागायती कपाशीच्या सुधारित वाणांचे हेक्टरी २० ते २४ क्विंटल तर संकरित वाणाचे हेक्टरी २५ ते ३० क्विंटल

स्रोत :- https://mr.vikaspedia.in/

कापूस फवारणी वेळापत्रक